Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2016 - 12:54
आजवर ऐकून आहे मी असे
चांगली असतात काही माणसे
लालसा ठरते....तिला हे सांगणे
की नको होऊस आता लालसे
वाटले भेटेल कोणी वेगळे
चेहरे सारे निघाले आरसे
टाळणे, टाळून वळुनी पाहणे
बघ तुला जमतात हल्ली साहसे
पदरही आभाळलेला भेटला
निथळली दुष्काळलेली धाडसे
वाट कवितेची रहस्यासारखी
काढली कोणी नि कोणाचे ठसे
सांगतो हासून कोणी हे मला
हासणार्यांचे इथे होते हसे
मी इथे बसणार आहे एकदा
पण इथे येतात काही कवडसे
ठेवले मी नांव माझे 'बेफिकिर'
जेवलो आहे स्वतःचे बारसे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
छान...
छान...
गजल आवडली, वाटले भेटेल कोणी
गजल आवडली,
वाटले भेटेल कोणी वेगळे
चेहरे सारे निघाले आरसे
टाळणे, टाळून वळुनी पाहणे
बघ तुला जमतात हल्ली साहसे>>व्वा !
>> आजवर ऐकून आहे मी असे >>
>> आजवर ऐकून आहे मी असे
>> चांगली असतात काही माणसे
मतला खूप खूप आवडला
mast
mast
मतला ।मस्त !
मतला ।मस्त !
अतिशय सुंदर गझल…. माणसे ,
अतिशय सुंदर गझल….
माणसे , लालसे ,आरसे …. एकापेक्षा एक शेर…
वा सुंदर गझल
वा
सुंदर गझल
छान!
छान!
>>>आजवर ऐकून आहे मी
>>>आजवर ऐकून आहे मी असे
चांगली असतात 'काही' माणसे>>>मस्त!
>>>वाट कवितेची रहस्यासारखी
काढली कोणी नि कोणाचे ठसे>>>वाह् वा व्वा...बात है!
'कवडसे' ही मस्तच!
('एकदा'च हवंय,की 'एकटा'? टायपो तर नसावा?)