आजवर ऐकून आहे मी असे
Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2016 - 12:54
आजवर ऐकून आहे मी असे
चांगली असतात काही माणसे
लालसा ठरते....तिला हे सांगणे
की नको होऊस आता लालसे
वाटले भेटेल कोणी वेगळे
चेहरे सारे निघाले आरसे
टाळणे, टाळून वळुनी पाहणे
बघ तुला जमतात हल्ली साहसे
पदरही आभाळलेला भेटला
निथळली दुष्काळलेली धाडसे
वाट कवितेची रहस्यासारखी
काढली कोणी नि कोणाचे ठसे
सांगतो हासून कोणी हे मला
हासणार्यांचे इथे होते हसे
मी इथे बसणार आहे एकदा
पण इथे येतात काही कवडसे
ठेवले मी नांव माझे 'बेफिकिर'
जेवलो आहे स्वतःचे बारसे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: