चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है! - aashu_d

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:27

चित्र कमांक १

SRK & Sourav.jpg

शाहरुख: अरे काय झालं? एसएमेस करुन आत कशाला बोलावलंस?
सौरव : (रडवेला होऊन) फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!
शाहरुख : कोण ते?
सौरव : सगळे टोळकं करुन बसलेत ना तिथे.. आणि मधे तो #$%$% 'भेग कापेल' दात दाखवतोय दिसत नाही का तुला?
शाहरुख : ओ! ते होय! तू लक्ष नको देऊस. तू आपला माझ्यासोबत थांबतोस का?
सौरव : त्यासाठीच तर तुला आत बोलावलं.. की मला कंपनी दे.
शाहरुख : मी फक्त करणलाच 'कंपनी' देतो. Proud
सौरव : Angry एsssss! बाबा, तू एक भसकलेला आहेस..पण मी अजून तितका 'कामातून' गेलो नाहीये!
शाहरुख : चिल यार! (कुछ कुछ होता है स्टाईल मध्ये) आय अ‍ॅम कूल!
सौरव : तो थंडा मामला आता जगजाहीर झाला आहे..
शाहरुख : अरे मी नुसतं चेहर्‍यावरुन आनंदी असल्याचं दाखवत असलो तरी प्रत्यक्षात तसं नाहीये. या किंग खानच्या डोक्यावरचा ताज सगळ्यांना दिसतोय पण त्याचे खुपणारे काटे कुणाला कळतात?
सौरव : का रे भाऊ?
शाहरुख : कशाला उगाच खपल्या काढतोस... आयपीएल मध्ये दणकून हार खाल्लेली जणू माहितच नाही तुला.. ती प्रीटी आधी "तुझ्यासोबत हिरोईनचं काम हवं" म्हणून मागेपुढे करणारी आता माझ्या वार्‍यालाही उभी राहत नाही. माझ्या आयुष्यातल्या चुका भोगण्याची वेळ आलीये माझ्यावर!
सौरव : अजून कोणत्या आता?
शाहरुख : साक्षात शहेनशहाशी दुश्मनी घेऊन बसलो ना? हत्तीच्या xxx चा मुका घ्यायला गेलो आणि आपटलो!
सौरव : Rofl

शाहरुख : चूप बस लेका! कितीही झालं तरी पिढीचं अंतर आहे! भल्याभल्यांना नाही जमलं ते मला कसं जमेल? पडद्यावर हीरो असणं आणि प्रत्यक्ष आयुष्यात असे स्टंट करणं यातला फरक समजलाच नाही रे.. हवा गेली होती ना डोक्यात यशाची! खाल्ला मार!
सौरव : हो रे कुठे शहेनशाहाचा 'डॉन' आणि कुठे तुझा तो पुंगाणीवाला मरतुकडा विजय.. काय पण ध्यान दिसत होतं.. ते अंगात मूळच असावं लागतं..
शाहरुख : हो ना.. पश्चातबुध्दी काय कामाची? "क्या आप पाचवी पास से तेज है" साईन करताना माझी अक्कल वर्षाच्या मुलाएवढी पण नसावी! कॉपी करायला गेलो.. लहानपणापासूनची वाईट सवय रे!! महागात पडली! तो सल्लू बघ, दस का दम मध्ये काय धमाल करतोय! मला का नाही सुचलं असं ओरिजिनल करायला? साला, सगळी लफडी करतो, ऐश्वर्याला धमक्या देतो, विवेकला मारहाण करतो, फूटपाथ वरच्या पाच पाच लोकांना उडवतो तरी लोकं आपली याच्याच तालावर नाचतायत! आणि मी बघ, मारहाण काय, आजवर एका तरी हिरोईन बरोबर नाव जोडलं गेलंय माझं?
सौरव : बेसिकमध्येच लोचा आहे त्याला लोक तरी काय करणार बिचारे! Wink
शाहरुख : आपण दोघांनी एक पिक्चर करायचा का?
सौरव : मी? सिनेमात?
शाहरुख : अरे माझ्या कंपनीच्या सिनेमात ३ तास मीच दिसणार रे! तू आपला असशील कुठे आजूबाजूला कोपर्‍यात..
सौरव : पण नाव काय ठेवायचं :
शाहरुख : रब ने बनाए हारे हुए बाजीगर चक दे स्वदेस!
सौरव : व्वा! आणि हिरोईन?
शाहरुख: बघू .. घेऊ कुणीतरी मॉडेल.. तसेही पैसे नाहीचेत.. आयपीएल ने पार धुतलं रे मला..
सौरव: अरे पण तुला निदान जाहिराती तरी आहेत.. माझं बघ.. त्या भेग कापेल नं एकाच बॉलमध्ये पार एलबीडब्ल्यू - त्रिफळा- कॅच अशी तिहेरी विकेट घेतली रे माझी! Sad
शाहरुख: कसल्या जाहिराती म्हणतोस? त्या हिंडालियमच्या ताटलीतून भीक मागण्याच्या? काय पण कॅचलाईन! "थोडा और विश करो डिश करो" अक्षरश: भीकेला लावलं रे यांनी मला..
इतक्यात बाहेरुन यांना लोक आवाज देतात..
सौरव : चल, मला बाहेर पडलेल्या पेप्सीच्या बाटल्या गोळा करुन घ्यायच्यात भंगारमध्ये विकायला..
शाहरुख : हो रे! मी पण त्या डिश साफ करायला घेतो.. पण सिनेमाचं नक्की ना?
सौरव : हो! नक्की!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सल्लू बघ, दस का दम मध्ये काय धमाल करतोय! मला का नाही सुचलं असं ओरिजिनल करायला? साला, सगळी लफडी करतो, ऐश्वर्याला धमक्या देतो, विवेकला मारहाण करतो, फूटपाथ वरच्या पाच पाच लोकांना उडवतो तरी लोकं आपली याच्याच तालावर नाचतायत! >>>हे मातुर अगदी बराब्बर बगा

>>> फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!
Lol
मस्त लिहिलंय.

फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!,
हिंडालियमच्या ताटलीतून भीक मागण्याच्या>> हे भारी आहे Lol