रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्रोमोज वरून वाटत होतं की फारशी भयानक नसेल म्हणुन मग बघणारहोते पण टायटल साँग टरकी आहे. त्यामुळे टरकली माझी तरी..... आपणनायबघणार. आत्ता बघतंय का कोणी? काही अपडेट्स?

टायटल साँग खरंच भयंकर आहे. तरी पण पाहिली मी सिरियल. पहिला भाग असल्याने असेल जास्त हाॅरर नाही वाटली. नंतर बघूया.

निधी..
सांग नं गोष्ट थोडक्यात..

च्यायला शोधुनही सापडेना मला शिरेलीचं शीर्षकगीत.. :रागः

टायटल song सायली पंकज (जोशी) ने गायलंय. नाव बघितलं.

आजचा भाग बघितला मी. ते कोकणातलं घर, हिरवंगार कोकण आणि गुळगुळीत वळणाचा रस्ता हे फार आवडलं.

रीया,
अर्रे आज मी ताईकडे मुक्कामाला जाव का हासुद्धा विचार केला होता..
मी बहोत फट्टू आहे पण नजरेत आलेल्या एकाही मुव्ही, सिरियल, गोष्ट किंवा पुस्तक कशालाच बघीतल्या, वाचल्याशिवाय सोडत नै Wink .. खर्‍या अर्थाने अतृप्त आहे मी Lol

रिया, टीना तुमच्यासाठी खास: ती सायंटिस्ट, तिचा नवरा आणि कॉलेज गोइंग मुलगा असे तिघे मुंबईत रहातात. नवऱ्याचे मूळ घर कोकणात आहे. त्या घरात त्याचे आईवडील, दोन भाऊ यातल्या मोठ्याला बायको आणि एक मुलगी आहे, सगळ्यात लहान भावाचा साखरपुडा आहे. एक बहीण आहे जिचा नवरा लग्नाच्या पहिल्या दिवशीच वारला. एक खूप म्हातारे बेडरीडन पणजोबा, याना कसले कसले भास होतात. आणि तो मालकानू म्हणणारा नोकर डोक्याने जरा कमी आहे. तर हि सगळी पात्र. ऍक्टर्स सगळे नवखे आहेत. म्हणून जरा बोअर होतं..

माणसांपेक्षा ते घर, विहीर, झाडं आणि एकूणच वातावरण भयानक वाटतं. त्या विहिरीशी काहीतरी घडलेलं आहे ज्याला सगळे घाबरतायत.. एपिसोडच्या शेवटचा ट्विस्ट भारी होता..

झाड आणि विहीर विचित्र वाटलं, त्यावर कॅमेरापण छान रोखत होते पण घर नाही वाटलं मला.

विशेषतः झाडाचा इफेक्ट जास्त आवडला आणि जाणवला, वातावरणनिर्मितीसाठी.

शेवट धक्कादायक होता. ते जराजर्जर नाना जिवंत आणि अण्णा गेले.

धन्स मॅगी. माझं काम हलकं केलस तू. Happy

शेवट धक्कादायक होता. ते जराजर्जर नाना जिवंत आणि अण्णा गेले. >> +१
मला कळायलाचं वेळ लागला कोण गेलंय ते. मला वाटलं ते बेडरिडन आजोबाच गेलेत की काय.

आता अण्णा म्हणायला आणखी जेष्ठ कोण रायलं होत घरात..
चला..पटापट माणस मरु द्या न एकदाचे कलाकार संपवुन भुतांच राज्य येउ द्या म्हणावं..

नको. आधी फाटक पूर्ण करा. >>> Lol

मला ष्टोरी माहीत आहे. सांगू का ? >>>> तुमचीच आहे की कै स्टोरी आँ?

काल पाहिली, म्हातारे आजारी नाना सोडले तर सर्वांनी मालवणी भाषेची वाट लावलेय, ऑडीशन्स घेतल्या नव्हत्या का? मालवणी बोलण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत सारी मंडळी पण मधेच बेअरींग सोडतात व लक्षात आलं कीपुन्हा बेअरींग धरतात........... बघू

नको. आधी फाटक पूर्ण करा.>>> Lol

मंडळी पण मधेच बेअरींग सोडतात व लक्षात आलं कीपुन्हा बेअरींग धरतात >>>> चालायचंच.

सगळ्या बायका सोन्याने मढलेल्या होत्या मात्र. हेल काढुन बोलणे म्हणजे मालवणी बोलणे हा समज कैच्याकै आहे Lol
असो पहिलाच भाग आहे, पुढे कळेल काय काय सस्पेन्स आहे ते. पण ते मिनिटामिनिटाला जिथ तिथ सस्पेन्स क्रियेट करणे अति होतय.
एकाच भागात किती त्या कसरती गुढ वातावरण निर्मितीच्या.

सर्वांनी मालवणी भाषेची वाट लावलेय>>
मिनिटामिनिटाला जिथ तिथ सस्पेन्स क्रियेट करणे अति होतय. एकाच भागात किती त्या कसरती गुढ वातावरण निर्मितीच्या.>>
चला... मला वाटलं हे मलाच असं वाटतंय... म्हणून काही लिहित नव्हतो Happy
एक गोष्ट आवडली, घाटातून येणार्‍या गाडीचे एरीयल शॉट्स.

जे कोणी नियमीत मालिका बघणार असतील तर अपडेट द्याल का प्लीज? काही अपरिहार्य कारणांनी मला ही मालिका बघण शक्य नाहीये..

टायटल सॉंग लय भारी आहे. बाकी कोकणातल्या हिरवळीचे shot's मस्त घेतलेत. एवढा काही टरकेबल नव्हता पहिला भाग. त्यांची दुसरी सून जाम ओवरacting वाटली (भाषेची पार वाट लावली आहे तिने). आणि ते आण्णा त्यांच्या व्याह्यांशी कसे उर्मट बोलत होते ते मला अजिबात पटलं नाही. अस कोणी कधी बोलत का? बऱ ह्यांच्याकडे साखरपुडा आणि दारात पाहुणेच नाहीत. लग्नघर वाटत तरी होत का ते? पण ठीक आहे पहिलाच भाग होता पुढच्या भागात कळेलच काय होतंय ते.

त्यांची दुसरी सून जाम ओवरacting वाटली (भाषेची पार वाट लावली आहे तिने).>>>>>>>> अगदी अगदी

काल उत्सुकतेने पहिला भाग बघितला आणि नेहेमी प्रमाणे भ्रमनिरास झाला.
माझा डोळा फडफडतय हा ssssssssssss....आमच्या मालवणी ची वाट लावून टाकली Sad . ते प्रत्येक वाक्याच्या शेवटी हा ssssssssssss बोलणे जाम कॉमेडी हा......:-)
सुरवातीलाच मुंबई तील कपल ची अ‍ॅक्टिंग पाहून मूड गेला. भावाच्या साखरपुड्याला जायचे कि नाही हे आदल्या रात्री आरामात ठरवत बसले असतात. पण बायको ला जर काही काम असेल तर नवरा अगोदर जाणार नाही का?
वाटेत गाडी बंद झाल्यावर नवरा खाली उतरून फोन वर बोलत असतो तेव्हा डावी कडून भरधाव बाईक जाते, आणि पुढच्या सीन मध्ये गाडी रस्त्याच्या इतक्या कडेला पार्क केलेली दाखवली की आधीची बाईक कुठुन गेली हा प्रश्न पडला.

माझा डोळा फडफडतय हा ssssssssssss....आमच्या मालवणी ची वाट लावून टाकली अरेरे . ते प्रत्येक वाक्याच्या शेवटी हा ssssssssssss बोलणे जाम कॉमेडी हा......>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Lol

Pages