दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना एकदम कुल वाटले दोघेही.
पण आपल्या लाडक्या गँग ने मात्र डोळ्यातून पाणी काढले यार! आशूला बघून फारच वाईट वाटलं. मधेच त्याचा तो लाडू बनवता येतात का डायलॉग कहर! Proud
टू गुड सिरिअल आहे ही!!! बंद नका करू प्लीज Sad

हो ना एकदम कुल वाटले दोघेही.
पण आपल्या लाडक्या गँग ने मात्र डोळ्यातून पाणी काढले यार! आशूला बघून फारच वाईट वाटलं. मधेच त्याचा तो लाडू बनवता येतात का डायलॉग कहर! Happy +1

लाडक्या गँग ने मात्र डोळ्यातून पाणी काढले यार>> नेहमीच समजूतदार पणे नाही वागू शकत म्ह्णत सुजा आणि बी प्रॅक्टीकल म्हणत म्हणत शेवटी मीनल आणि केके पण शेवटी फुटलेच !
रेश्मा आणि तीचे बाबा यांच्यातला तो सोन्याच्या बांगड्या आणि काचेच्या रंगीत बांगड्यावाला डायलॉग पण आवडला.

एकदम कुल वाटले दोघेही. >> मला तर फक्त बाबाच कुल वाटले. आईच्या चेहर्‍यावर दुःख दिसत होतं की. आणि रेश्माच्या बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव कायम एकसारखेच असतात.

रेवा काल छान दिसत होती.

आपल्या लाडक्या गँग ने मात्र डोळ्यातून पाणी काढले यार! >> +१ पण आशूला रडताना बघून मला हसायलाच जास्त येत होतं.

रेश्मा आणि तीचे बाबा यांच्यातला तो सोन्याच्या बांगड्या आणि काचेच्या रंगीत बांगड्यावाला डायलॉग पण आवडला. >> +१

हो बांगड्या डायलॉग एक नं. Happy
रेश्मा मुंबईत आल्यानंतर तिच्यात झालेले बदल ऐकवत असते बाबांना तो पण सीन आवडला.

June pratisad vachat hote.
१००% asach honar mhanun he he sangitalel te te zalach naahi.
Mhanun ch bahuda malika jinkli

नेक्स्ट सीझन लवकरच!!! Happy

मला ही मालिका बरीचशी आवडली. काही काही एपिसोड गंडलेले होते पण तरीही मालिकेने सुरूवातीपासून ठ्वलेला फोकस अजिबात ढळू दिला नाही. कथेच्या ओघात थोडाफार रोमान्स, प्रेम, आकर्ष्ण हे टप्पे येऊन गेले तरी त्यांची हाताळणी अजिबात बाळबोधपणे केले नव्हती. (सध्या आठवताहेत ते: मीनल आणि सुजय लिव्ह इन डिस्कस करतात तो एपिसोड, कैवल्य सुजयला पियुबद्दल सांगतो ते भाग, रेश्माचे सुरूवातीचे काही एपिसोड्स आणि आताचे शेवटचे एपिसोड)

ही मालिका सहा मित्रांभोवती फिरणारी असल्याने शेवटपर्यंत ही सहाच मित्रांची कथा राहील याची दक्षता घेतली गेली. आपापसांत जोड्या लावल्या नाहीत हे मला फार आवडलं.

मालिकेचा आत्ताचा शेवट अपेक्षित झाला. मी वाटच बघत होते, रेश्मा कधी येते ट्रेनमध्ये. आज मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर पण होते गाडीत. सुंदर डायरेक्शन केलं त्यांनी. गुड टीमवर्क ह्या मालिकेचं.

रेश्माच्या बाबांचे आजचे डायलॉग छान होते.

एका मैत्रीणीचं ऐकून ही मालिका जरा उशिरा बघायला घेतली, ती म्हणाली बघ नक्की, तुला आवडेल. तिला धन्यवाद देईन आता. Happy

June pratisad vachat hote.
१००% asach honar mhanun he he sangitalel te te zalach naahi.
Mhanun ch bahuda malika jinkli

कालचा भाग अपेक्षेप्रमाणेच झाला. रेश्मा माजघरात परतणार हे कालपासूनच माहित होतंच. फक्त कसं हे पहायची उत्सुकता होती. ती ट्रेन दिसल्यावर उगीच डीडीएलजे स्टाइल तिला आत ओढून घेतात की काय असं वाटलं. हे आणि असे अनेक ठरलेले घीसेपीटे सीन्स होतील असं जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा ते तसं न दाखवणं, बर्‍यापैकी प्रॅक्टीकली शक्य गोष्टी दाखवणं हा या मालिकेचा युएसपी म्हणूया. झी च्या परंपरेनुसार एखाद्या मालिकेची सुरुवात छान करुन नंतर वाट लावणे ( लेटेस्ट उदाहरण होसुमीयाघ) हे न केल्याबद्दल अनेक आभार.
नंदिनीच्या पूर्ण प्रतिक्रियेला +१. पुढचा सीझन बघायला नक्कीच आवडेल. थोडी भिती आहेच की पहिल्या सीझन मधे एका उंचीवर नेऊन ठेवलेल्या मालिकेचा पुढचा सीझन कसा हाताळतील.
कधी कधी वाटतं, असंभव, टीपरे असो किंवा दूरदर्शनच्या जुन्या मर्यादित भागांच्या गाजलेल्या अनेक मालिका असोत, पॉप्युलॅरीटीच्या आधारावर भारंभार एपिसोड न काढता, योग्य वेळेत त्या बंद केल्यानेच त्या मालिका मनात आजतागायत राहिल्या !
रच्याकने, कालच्या भागात आशुचं ते ट्रेन मधे कपडे वाळत घालणं भारी होतं Happy

आज मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर पण होते गाडीत. >> आम्ही सतत विचार करत होतो, हा माणूस कोण आणि का दाखवतायत सारखा. Happy

नंदिनी, मित >> +१ Happy

कालचा भाग एवढा नाही आवडला. रेशमा माजघरात दुसऱ्या दिवशी परत आली असं दाखवलं असतं तर जास्त आवडलं असतं. तिला परत येताना दाखवायची उगीच घाई केली आणि ट्रेन मध्ये परत आली हे थोडसं नाही पटलं . .घरी १ दिवस तरी राहिल च ना ती आई कडे.. मग ती ५ जणांना खूपच मिस करतेय असं तिच्या बाबांना लक्षात येतं आणि शिवाय तिच्या पुढ च्या आयुष्याचा प्रश्न पण आहेच वगैरे वगैरे. आणि ते तिला मुंबई ला परत जाऊ देतात.
शेवट माजघरातच दाखवला असता तर खूप मजा आली असती.असो. आता मालिका संपली.योग्य वेळी बंद केली आणि सुरवाती पासून शेवटपर्यंत आपली उंची कायम राखली ..का बघतोयहा प्रश्न कध्धीच पडला नाही.इतर मालिकांप्रमाणे. आणि एकमेकांच्या जोड्या लावल्या नाहीत आपापसात यासाठी फुल मार्कस् .!
नेक्स्ट सीजन पण असाच असू दे ह्या अपेक्षेने च आतूरतेने वाट पहातेय..दिल दोस्ती दुनियादारी-२.!

शेवटी ते माजघरात आले सर्व, असं दाखवतील दोन मिनिटं का होईना असं मलापण वाटलं. स्टेशनवर शेवट करतील असं वाटलं नाही. केलंच मी माजघर मिस काल.

अन्जू + 1
पण रेश्मामध्ये झालेला बदल ट्रेनच्या दोन सीन मधून दाखवला, ते आवडलंच मला. सुरुवातीला ती मुंबईत येताना कैवल्य, सुजय आणि आशूच्या धिंगाणा कम मस्तीला घाबरुन पळून दुसरीकडे जाऊन बसते. आणि कालच्या सीनमध्ये स्वतःच मस्ती करत किती आनंदाने सगळं एन्जाॅय करताना दाखवलीय.

पण सगळे माजघरात पोहोचल्यावरच सिरियल संपायला हवी होती.

कैवल्य, सुजय आणि आशूच्या धिंगाणा कम मस्तीला घाबरुन पळून दुसरीकडे जाऊन बसते. आणि कालच्या सीनमध्ये स्वतःच मस्ती करत किती आनंदाने सगळं एन्जाॅय करताना दाखवलीय.>>> तेच तर ना!
माजघर तो वो है जहा मिल बैठे ये छे यार!!! Happy

काल ३डी रॉक कॉन्सर्ट पाहिला. कोणी अगदी कोणीही सुरात नव्हतं.
सॉरी टू से पण बघवला नाही कार्यक्रम. मधेच बंद केला. Sad

तो कार्यक्रम सुरात असण मला तरी अपेक्षितच नव्हत.त्यांच्या मैत्रीची धमाल आनी सीझन - १ ची सांगता झाली.नशीब झी ने काही तरी वेगळ केल ह्या सीरीयल च्या बाबतीत.

काल ३डी रॉक कॉन्सर्ट पाहिला. कोणी अगदी कोणीही सुरात नव्हतं.
सॉरी टू से पण बघवला नाही कार्यक्रम. >>>> अगदी. कमीतकमी स्वानंदीकडुन बेसुर गाण्याची अपेक्षा नव्हती. बाकिच्यांची बॅकग्राउंड माहित नाही सो त्यांच्याबद्दल नो कमेंट्स...

काल ती जुईली जोगळेकर किती वाईट गात होती
ती सारेगमप च्या एका पर्वाची विनर होती ना , पण तिचा आवाज काही खास नाहीये
नाही आवडला कालचा कार्यक्रम

मुग्धा स्वानंदी छान गायली की ग. ज्युईलीपेक्षा तीच छान गायली. ज्युईलीचा आवाज चांगला आहे पण तिला अशीच धांगडधिंगाणावाली गाणी म्हणायला दिली, कॉलेज स्टुडंटसना हेच आवडतं फक्त, असं गृहीत धरतात ते चुकीचं आहे, सॉरी टू से पण अमेयचा आवाज चांगला नाहीये पण त्याला कीती गाणी दिली म्हणायला, त्याने एकच चांगलं म्हटलं, सुजयने बरीच चांगली गायली.

काल काही अपवाद गाणी वगळता कानावर फार असह्य अत्याचार झाले (डोळ्यावरही). ज्युईलीकडे तर बघवतही नव्हतं. एका डान्समधे रेश्मा आणि अ‍ॅनाचे ड्रेसपण असह्य होते.

Pages