मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
माझी एक मावशी दापोलित रहायची
माझी एक मावशी दापोलित रहायची भाड्याने खोली घेऊन, तिच्या त्या बंगलीवजा घरात भुताटकी होती म्हणे.
म्हण्जे ओवरीवरचा झोपाळा हलू लागत कराकरा वाजणे, रात्री बेरात्री रहाट वापरल्याचा आवाज येणे, व बघायला गेले असता तिथे कुणीच नसणे वगैरे.
आला आला, अजून एक ट्रेलर
आला आला, अजून एक ट्रेलर आला….
सगळ्यात मस्त, धारपांच्या कथा
सगळ्यात मस्त, धारपांच्या कथा वाचा, पुर्ण भुताचं फिलिंग मिळेल.
कुठे आला ? झी च्या साईट्वर का
कुठे आला ?
झी च्या साईट्वर का नाही आला
तिथे कधीच अपडेट व्हिडिओ
तिथे कधीच अपडेट व्हिडिओ नसतात, एका महिन्यानंतर बघायचे. मग आत्ताचे व्हीडिओ- नवीन व्हीडिओ म्हणून आलेले दिसतील.
तिसरा प्रोमो जरा बरा वाटला
तिसरा प्रोमो जरा बरा वाटला आधीच्या दोन पेक्षा !
नविन प्रोमो बघितला काल,
नविन प्रोमो बघितला काल, शेजारी बसलेली लेक म्हणतेय आई तो माणुस मागच्या दाराने आत गेला आणि त्याने दार उघडल त्यात काय घाबरायच?
ट्रेलर खूप प्रेडिक्टेबल आहे
ट्रेलर खूप प्रेडिक्टेबल आहे आत्ताचा.. विहिरीचा इतका नव्हता. मला वाटल होत की कळशीबरोबर किंवा कळशीव्यतिरीक्त काहीतरी वेगळच समोर येत अस दाखवतील. किंवा जड लागलेली कळशी रिकामी असेल.. पण नव्या ट्रेलरमध्ये जेव्हा ते दोघे दारात थांबतात आणि मुलगा एकटाच पुढे जातो तेव्हाच समजत की दार उघडल्यावर नोकरच दिसणार पलिकडे...
ट्रेलर खूप प्रेडिक्टेबल आहे
ट्रेलर खूप प्रेडिक्टेबल आहे आत्ताचा.. विहिरीचा इतका नव्हता. मला वाटल होत की कळशीबरोबर किंवा कळशीव्यतिरीक्त काहीतरी वेगळच समोर येत अस दाखवतील. किंवा जड लागलेली कळशी रिकामी असेल.. पण नव्या ट्रेलरमध्ये जेव्हा ते दोघे दारात थांबतात आणि मुलगा एकटाच पुढे जातो तेव्हाच समजत की दार उघडल्यावर नोकरच दिसणार पलिकडे... <<< अगदी बरोबर
अगदी अगदी शुकु. त्या घराची
अगदी अगदी शुकु. त्या घराची रचना बघता लेक म्हणतेय तो स्कोप जास्त आहे.. बाकी लेक हुश्शार हो तुझी..
आले आले झी साईट्वर दोन
आले आले झी साईट्वर दोन ट्रेलर्स .
अत्यन्त चुकीचा हेल काढून मालवणी बोलतायेत ती लोक
नविन प्रोमो बघितला काल,
नविन प्रोमो बघितला काल, शेजारी बसलेली लेक म्हणतेय आई तो माणुस मागच्या दाराने आत गेला आणि त्याने दार उघडल त्यात काय घाबरायच? >>>> अरे सेम पिंच शुभांगी, माझी लेक पण मला काल हेच म्हणाली, तो मागच्या दाराने आत गेला असेल
हे प्रोमो तूनळी वर नै का
हे प्रोमो तूनळी वर नै का ?
मला फअक्त एक कोंबड्यांच्याच दिसला.. बाकीचे कुठ बघायला मिळतील..टिव्ही सोडून सांगा ..
@टीना- तू नळी?? चांगलं
@टीना- तू नळी??
चांगलं नाव आहे, पाच मिनिटं लागली मला हे समजायला!
मला फअक्त एक कोंबड्यांच्याच दिसला >>>>>याचा अर्थ मात्र अजुन लागला नाही
बाकीचे कुठ बघायला मिळतील.. >>>>>>
हे घ्या... सध्या दोनच अपडेट आलेत..
http://www.zeemarathi.com/promos/ratris-khel-chale-starts-22nd-feb-mon-s...
http://www.zeemarathi.com/promos/new-show-ratris-khel-chale-starts-22nd-...
ठांकू.. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्
ठांकू..
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. अरे टायपो झालाय..
रात्री खोलीच्या बाजुला कोंबड्यांच खुराड असल्यामुळे धड झोप आली नाही असं नै का म्हणत ती बाई किचनमधे.. तो प्रोमो..
ठांकू कशाला? रात्री खोलीच्या
ठांकू कशाला?
रात्री खोलीच्या बाजुला कोंबड्यांच खुराड...
हा-हा.. तो पहिला प्रमो होय!
फेसबूकला झीच्या पेजवर आहेत की
फेसबूकला झीच्या पेजवर आहेत की सगळे प्रोमो ...
अरे हो- सगळेच प्रमो भेटले
अरे हो- सगळेच प्रमो भेटले कि...
हा तिसरा..
https://ku-tr.facebook.com/zeemarathiofficial/videos/10154540470564307/
किती बेक्कार बोलताहेत हि
किती बेक्कार बोलताहेत हि लोक..
मी तर बाहेरची आहे तरीसुद्धा ते पाठ करुन बोलत आहेत हे ठळक जाणवतयं..
एकच घर आणि तोच आजुबाजुचा परिसर दाखवलेला दिसतोय..
मला तर फक्त तिसरा प्रोमो जरा इंटरेस्टींग वाटला पण प्रेडिक्टेबल होता जरासा..
तो विहिर बराय पण कोंबड्या म्हणजे काहिही वाटला..
यापेक्षा सुपरनॅचरल सिरियल बघावी माणसाने
धारपांच भुकेली रात्र पुस्तक मागवलयं..येईल उद्या हातात
धारपांचं चंद्राची सावली
धारपांचं चंद्राची सावली पुस्तक वाचा.सॉलीड आहे.
... माझा तर तिसर्या
...
माझा तर तिसर्या प्रमोनंतर मुड गेलाय ती सिरिअल बघायचा. त्यापेक्षा "स्केरी मुव्हीज" काय वाईट आहे?
ऑर्डर दिल्यानंतर दिसल
ऑर्डर दिल्यानंतर दिसल ते..
पहिले काही पान वाचुन जाम इच्छा झालीए ते वाचायच..बघु.. आणि ते आम्ही तुम्ही नकोच..
अमानवीयचे किस्से असतील
अमानवीयचे किस्से असतील त्यात
या घरात कोंबड्या नाय्य्य्य.....
धारपांची सगळीच पुस्तकं वाचा
धारपांची सगळीच पुस्तकं वाचा कोकणातला फील वाली पण आहेतच, उदा: चेटकीण.
झी न्युज वर असा तपशील दिलाय.
झी न्युज वर असा तपशील दिलाय. मी इकडे पेस्टतेय.
ही गोष्ट आहे कोकणातल्या नाईक कुटुंबाची. या कुटुंबात चार भावंडे. यापैकी माधव आणि त्याची बायको निलिमा नोकरीनिमित्ताने शहरात स्थायिक झालेली. गावी ब-याच दिवसांनतर घरात एक शुभकार्य होणार आहे. त्यासाठी माधव आपल्या कुटुंबासह कोकणात निघालाय. गावी पोहचल्यानंतर एकामागोमाग एक अतार्किक घटनांची मालिका सुरू होते. माधवची बायको निलिमा जी स्वतः शास्त्रज्ञ आहे ती या सर्व घटनांमागचं गुढ शोधण्याचा निर्णय घेते. नाईक कुटुंबावर पसरलेल्या या भीतीच्या सावटाला नेमकं कोण जबाबदार असेल ? खरंच यामागे काही गूढ शक्ती असेल की कुणी जवळच्याच व्यक्तीने रचलेली ती एक खेळी असेल ? यामागचं सत्य जाणून घेण्यात नाईक कुटुंब यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या मालिकेतून उलगडत जातील.
येस्स!! माझा अंदाज बरोबर
येस्स!! माझा अंदाज बरोबर होता, ही सस्पेंन्स मालिका आहे, बाकी मालिकेचा सारांश वाचून- यात भुलभुलैया घेतला नाही, म्हणजे मिळवली!
ओह मालवणी भुभु आहे होय
ओह मालवणी भुभु आहे होय
(No subject)
रात्री खोलीच्या बाजुला
रात्री खोलीच्या बाजुला कोंबड्यांच खुराड असल्यामुळे धड झोप आली नाही असं नै का म्हणत ती बाई किचनमधे..>>
ही बाई असेल निलिमा.. जी शास्त्रज्ञ असेल.. असे वाटतेय..
माधवची बायको निलिमा जी स्वतः
माधवची बायको निलिमा जी स्वतः शास्त्रज्ञ आहे ती या सर्व घटनांमागचं गुढ शोधण्याचा निर्णय घेते. >>>> अय्यो शास्त्रज्ञ आहे ती?
Pages