वळण
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
12
अनेकदा टोकाची भांडणे झाली
महिनोंमहिने शीतयुद्धे चालली
रडूनपडून आदळआपट झाली
तुझी...माझी वाट वेगळी म्हणताना
निरोप-समारोप घेऊन झाले
केलेले उपकार.. राहीलेली परतफेड
ह्यावर अवमान-अपमान करुन झाले
सगळा गुंता नकोसा झाला
सोबत नकोशी झाली
एकमेकांच्या सावल्याही नकोशा झाल्या
आहे ते जगच नकोसे झाले
पण कुठेतरी आग विझायची बाकी होती
ओघळलेल्या आसंवामधून
आतमधे दडलेला ओलावा दिसायला लागला
भांडता भांडता भावना उलगडायला लागल्या
नवी वाट निवडताना जुन्या वाटेवर पाउल जड झाले
आणि धुमसत धुमसत प्रेम नावाचे एक वेगळेच प्रकरण सुरु झाले!!!
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
अतिशय सुंदर! खुप आवडली.
अतिशय सुंदर! खुप आवडली.
धन्यवाद सस्मित. डोळ्यात पाणीच
धन्यवाद सस्मित. डोळ्यात पाणीच आल.
हे थेट गद्य आहे
हे थेट गद्य आहे
डोळ्यात पाणीच आल.>>>??? का?
डोळ्यात पाणीच आल.>>>??? का?
कविता उतरत नव्हती आणि ती जशी
कविता उतरत नव्हती आणि ती जशी लिहिली तशी पोस्ट केल्यानंतर लगेच तुझा प्रतिसाद बघून कविता थोडेतरी उतरली असे वाटले म्हणून डोळ्यात पाणी आले.
बेफीकीर, हे गद्य नाही हे मुक्तछंदी आहे.
>>>बेफीकीर, हे गद्य नाही हे
>>>बेफीकीर, हे गद्य नाही हे मुक्तछंदी आहे.<<<
हा मुक्तछंद नव्हे बी, मुक्तछंद वेगळा असतो.
आवडली.
आवडली.
ओह ! ग्रेट !!
ओह !
ग्रेट !!
वाह!
वाह!
छान.
छान.
१ नंबर भावा राडाच
१ नंबर भावा राडाच
आवडली कांट्याकुट्यांतून
आवडली
कांट्याकुट्यांतून जाणंही सार्थकीं लागतं, शेवटीं वाट सांपडली तर !!