डेव्हिडने पंधरावीस टार्गेट्स शूट केले होते. गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटाच्या गोंगाटातही तो सर्वत्र लक्ष देत होता.
विल्यम्स बराच जखमी झाल्यामुळे गच्चीच्या भिंतीला टेकून बसला. डेव्हिड आपली स्नायपरगनचे scope अॅडजेस्ट करत आजूबाजूला पाहत होता. त्याने बघितले चौकाच्या पश्चिमकडून साधारण बाराशेमीटरवरून एक तरुणी आणि आठदहा वर्षांचा एक मुलगा आजूबाजूला पहात सावकाश येत होते. लहान मुलाने घोळदार ’फिरन’ घातला होता. बरोबरची तरुणी इकडे तिकडे बघत त्याला आणत होती. विल्यम्सला अशक्तपणामुळे सारखी ग्लानी येत असल्याने डेव्हिडने त्याला हलवून जागे केले आणि वॉकीटॉकीवर येणार्या मेसेजवर लक्ष द्यायला सांगितले. डेव्हिडने हेडफोनला सॅटेलाईटफोन जोडला आणि माहिती देण्यास सुरुवात केली.
"कमिंग लॉट्स कमिंग. वॉरहेड टू लॉट्स"
"कॉपी दॅट. लॉट्स हिअर व्हॉट्स न्यू ? ओव्हर"
" नथिंग, चौकातून कोणी येत नाही आहे. दगडी घराजवळून दोघेतिघे अधूनमधून येत आहेत. त्यांची संख्या बर्याच प्रमाणात कमी झाली आहे असे वाटत आहे. ओव्हर"
"अॅर्नॉल्डला गरज लागल्यास व्हॅनजवळ बोलवून ठेव. व्हॅनजवळ आपल्यापैकी कोण आहे? ओव्हर"
"नाही..पण टीम ए आहे. आणि व्हॅनमधल्या सैनिकांनी मोर्चा सांभाळला आहे. ओव्हर"
"अॅर्नॉल्डला पाठव त्यांच्याजवळ. ओव्हर"
"एक तरुणी लहान मुलाला घेऊन चौकाच्या दिशेने सावकाश येत आहे. ओव्हर"
"या धुमश्चक्रित? ओव्हर"
"हो. माझे लक्ष आहे त्यांच्यावर. बहुदा चौकाच्या आधीच काम असेल त्यांचे. ओव्हर"
"मुलींकडे लक्ष कमी द्या. अॅर्नॉल्ड आला?. ओव्हर"
"हो. विल्यम्सने वॉकिटॉकिवरुन मेसेज दिला. ओव्हर"
"डेव्हिड कोक्पर बद्दल माहिती आली आहे. अफगाणी खेळात वापरायच्या साहित्याला "कोप्कर" म्हणतात."
"खेळ???? मग ते नाव का ठेवले जाईल.?"
"काही विशेष असेल त्यात."
"काय खेळ आहे?"
"विचारतो आहे. थांब"
"विल्यम्स मला काहीतरी दिसते आहे, दुर्बीण लाव." विल्यम्स जखमी अवस्थेत कसाबसा उठला.
"तो मुलगा फारच हळू येत आहे. कोटाच्या खालच्या टोकाला लाल काळे काय आहे?"
"काही दिसत नाहीए. झालर टाईप काही असेल. ओ! ही तीच मुलगी आहे."
"कोणती?"
"तीच, सकाळी जिच्याबद्दल सांगितले होते. खिडकीतून जी सारखी दिसत होती पण लहान मूल नव्हते. घरी नवरा होता.
हो. पण आता ती एका लहान मुलाबरोबर आहे."
"हो. पण काल बराच वेळ...." .सॅटेलाईटफोनवर जनरलचा आवाज आला.डेव्हिडने विल्यम्सलाही फोनशी कनेक्ट केले.
"अफगाणिस्तान मध्ये "बुझकशी" नावाचा एक खेळ आहे त्यात रिंगणात मेलेल्या लहान बकर्याचे शव ठेवले जाते ते घोडस्वारांनी उचलायचे आणि मैदानाच्या दुसर्या बाजूला असलेल्या गोल रिंगणात नेऊन टाकायचे. असा काहीसा प्रकार आहे. यात घोडेस्वार हे शव ताब्यात घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. तू रग्बी बघतोस ना? तसाच काहीसा प्रकार बॉल ऐवजी बकर्याचे शव असते."
"बकर्याचे शव ? मग युसुफ बकर्याबरोबर काय करणार होता? कोक्पर?"
"मे बी बकर्यांचा कळप घुसवून हल्ला वगैरे.."
"नाही. तसे काही असेल वाटत नाही. ब्लॅकबर्डला विचारतो आजूबाजूला बकर्यांचा कळप दिसतोय का ते."
"विल्यम्स, मला नाही वाटत बकर्यांना कशाही प्रकारे वापरण्यात येईल."
"पण... तो युसुफ तर कोक्पर ... कोणत्या अर्थाने म्हणाला असेल?"
"मे बी आणखी काही. पण हल्ला विफल झालाय कुठे अजून?"
डेव्हिडने परत चौकावर नजर फिरवली. ती मुलगी आता थोडी भरभर चालत होती. दोन्ही हात एकमेकांना पकडून येत आहे.. पण मुलगा सांभाळूनच चालत होता. डेव्हिडने पुन्हा एकदा मुलीवरून नजर रोखली. तिने हिजाब घातला होता आणि दोन्ही हात पोटाशी धरले होते. चौकाच्या जवळ येताच मुलीने मुलाला रस्त्याच्या बाजूला घेतले आणि त्याला थोडे पुढे ठेवून सावकाश चालू लागली होती.
"विचार कर. विचार कर विल्यम्स. कोक्पर, बकरा, बुझकशी हल्ला यांच्यात काय कॉमन असेल?"
"तेच करतोय बकर्यांकरवी हल्ला होईल हा एकच विचार सध्या मनात येतोय."
"हेच पटत नाही. काय बघतोयस?"
"काही नाही. माझ्या लहानग्याचा फोटो बघतोय. माय किड् सबॅस्टिअन"
"किड!" डेव्हिड थाडकन उडला.
"विल्यम्स, किड! किड!! लहान बकर्याला किड देखील म्हणतात. कोक्पर हे लहान बकर्याचे शव! किड! ओह माय गॉड! ते लहान मुलांचा वापर करणार आहे." डेव्हिडने त्या मुलावर स्नायपरगनचे scope रोखले आणि काळजीपूर्वक पाहू लागला. चौकापासून ते अजून थोडेसे लांबच होते.
"लोटस कोक्परचा डीकोड बहुतेक सापडला." डेव्हिड अजूनही थरथरतच होता.
"काय?"
"लहान बकर्याच्या शवाला कोक्पर म्हणतात. लहान बकर्याला किड देखील म्हणतात. किड म्हणजे लहान मुलगा देखील होतो. आता एक युवती एका लहान मुलाला घेऊन माझ्या दिशेने येत आहे. काय ऑर्डर लोटस?"
"तुला त्या दोघांचा संशय येतोय?"
"हो पण..."
"ती वायर आहे डेव्हिड," विल्यम्स किंचाळला.
"काय ?" डेव्हिडने scope त्या मुलावर रोखून अॅडजस्ट केले. कपड्यातून मगाशी प्लॅस्टिकसारखे दिसत होते ते आता अजून थोडे खाली आल्याने स्पष्ट दिसत होते. त्या लाल, पिवळी आणि काळी अशा, तीन वायरी जोडून बनवलेली एक वायर होती. मुलाच्या चालण्यासरशी खालीखाली सरकत होती.
"येस. ती वायरच आहे! "
"आर यू श्युअर?"
"येस सर. अगदी नक्की..." विल्यम्सने उतावीळपणे उत्तर दिले.
"हो सर, पण..."
सर ते गाडीच्याच दिशेने येऊ लागले आहेत.. आणि तो मानवी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. कोणीही जवळ गेल्यास सोल्जर्सच्या जिवाला धोका निर्माण होईल. त्यांना रोखण्याकरिता ऑर्डर द्या सर."
"डेव्हिड तुझे काय म्हणणे आहे?"
.....
"सर वेळ जातोय. ते जवळ येताहेत". विल्यम्स त्याच्यांवरच दुर्बीण रोखून होता. रांगत रांगत गच्चीच्या कोपर्याशी कठड्याजवळ आला.
.....
.....
" युअर कॉल डेव्हिड .. बट शुट इज बेटर ऑप्शन!" जनरलचा करडा आवाज दोघांच्या कानात तप्त शिशासारखा उतरला.
"पण सर... लहान मुलगा आहे."
"इट्स ओके . इट्स ऍन ऑर्डर. डेव्हिड शूट." विल्यम्स बोलला
"हाऊ कॅन यु से दॅट ..."
"इट्स ऍन ऑर्डर डेव्हिड. वी हॅव टू टेक ऑर्डर्स.. नॉट टू थिंक."
तो पर्यंत ती मुलगी आणि मुलगा चौकात पोहचले. मुलगी थांबली. बाजूच्या इमारतीच्या भिंतीशी जाऊन तिने मुलाला जवळ घेतले. ती त्याला काही सांगू लागली.
"इट्स जस्ट अ किड. तुझ्या मुलाएवढा असेल."
"तो माझा मुलगा नाहीए. शुट हिम." विल्यम्सच्या चेहर्यावर शून्य भाव होते.
"आपण दुसरं काही करता येतं का पाहू. ते थांबले आहेत तिथे मी विकीला पाठवतो."
"इतका वेळ नाहीए आपल्याकडे. विकी रायनोबरोबर गेला आहे. डेव्हिड शूट. तू वेळ घालवतो आहेस."
"डेव्हिड. निर्णय घे. युवर कॉल..सिव्हिल आहे." जनरल ने शेवटचा ऑप्शन दिला
"वेळ नाहीए डेव्हिड..".
दोघांच्याही नजरा त्या तरुणी व मुलावर. मुलगी उभी राहिली. तिने मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि आपल्या समोर उभे केले. काही क्षण शांतपणे आजूबाजूला पाहून मुलाच्या खांद्यावर थोपटले. त्या लहान मुलाने मान उंचावून तिच्याकडे पाहिले आणि व्हॅनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मुलगी थोडे अंतर राखून त्याच्यामागे चालू लागली.
"बॉय मुव्हिंग टुवर्ड्स व्हॅन."
"डेव्हिड, काय करतोयस? कसली वाट बघतोयस? शूट हिम नाउ."
"इट्स नॉट इझी. जिझस तू मला एका आठदहा वर्षांच्या लहान मुलावर गोळी चालवायला सांगतो आहेस."
"हो. पण तो लहान मुलगा नाहीए. तो एक मानवी बॉम्ब आहे. त्याचा चालण्याचा वेग वाढतोय डेव्हिड. त्याच्या छातीकडे बघ. शूट नाउ!" विल्यम्स किंचाळला.
डेव्हिड श्वास रोखून पाहत राहिला. एक जिलेटीनची काडी एका पिसीबी प्लेटला जोडलेली. फिरनचे वरचे बटण उघडे असल्यामुळे चालताना अधून मधून दिसत होती. त्यातून छोटे एलएडी बल्ब लुकलुकत होते. एका क्षणात डेव्हिडचे तोंड कोरडे पडले. त्याने आयुष्यात बर्याच अतिरेक्यांना, दंगेखोरांना गोळ्या घातलेल्या; अगदी शांतपणे. पण असा लहान मानवी बॉम्बं पहिल्यांदाच डोळ्यांसमोर येत होता.
"इट्स क्लिअर. द बॉय इज अ ह्युमन बॉम्ब!" डेव्हिडचा गळा दाटून आला.
"डेव्हिड, शूट. इट्स माय ऑर्डर."
शूट डेव्हिड."
कॅन आय शुट ऑन लेग टु स्टॉप हिम..." डेव्हिड शेवटच्या क्षणापर्यंत मुलाला वाचवायचा प्रयत्न करत होता.
"शूट नाउ"
मुलाने चौक ओलांडला. मुलगी आता रस्ता क्रॉस करून अचानक थांबली. मुलाचा वेग वाढला. व्हॅनकडे एकटक पाहत तो चालत होता.
"शुऽऽऽट.." विल्यम्स दुर्बीण रोखूनच होता खच्चून किंचाळला.
डेव्हिडने मुलाच्या वेगाशी गन अॅडजस्ट केली. मुलाच्या मांडीवर टार्गेट सेट केले.
खाड्क खट.!!
चाप ओढला गेला.
.50 BMG बुलेट लोड झाली.
खट्ट. खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..
.....................
.................
"आय ऍम सॉरी सन".... डेव्हिड दाटलेल्या गळ्याने बोलला. त्याने ट्रिगरवरचे बोट ओढले.
ठोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.
त्याच क्षणी घात झाला. बॉम्बचे ओझे घेऊन धावणारा मुलगा अचानक धडपडून गुढघ्यावर बसला.. पण........... गोळी ने आपले काम चोख बजावले...
.
.
.
.
.
डेव्हिडच्या शुट केलेले टारगेट नियतीने त्याच्या नावावर ’पॉइंट ब्लॅंक’ म्हणून लावला.
टार्गेट हिट... डेव्हिडने हताशपणे सॅटेलाईटफोन वर माहिती दिली.
ठोऽऽ अजून एक गोळीचा आवाज ऐकून डेव्हिडने वर बघितले.
विल्यम्सने अचानक जखमी अवस्थेत एका हातात रायफल कशीबशी पकडून त्या तरुणीला टार्गेट केले होते. ती रिमोटाचे बटण दाबायच्या प्रयत्नात होती.
"कॉलिंग टीम डी कॉलिंग"
"टीम डी कमिंग ओव्हर"
"मुलाच्या अंगावर रिमोट बॉम्बं आहे डिफ्यूज करा. आणि दोन्ही बॉडीज इमारतीमध्ये घेऊन या. ओव्हर अँड आऊट"
...
.
.
.
.
"रोडब्लॉक इज क्लिअर. सेंड देम. " रायनोने वॉकिटॉकीवरुन संदेश पाठवला...
व्हॅन मध्ये नेत्यांना बसवून सैनिक पुढे निघाले. डेव्हिड पूर्वेकडे जाणार्या ताफ्याकडे ते दिसेनासे होईतो बघत होता. पण त्याची नजर "शून्यात" होती. ताफा दिसेनासा झाल्यावर डेव्हिडने रेडिओवर संदेश दिला.
"धिस इज वॉरहेड. mission accomplished... आय रिपीट mission accomplished.. ओव्हर अँड आऊट."
समाप्त.
सुन्न झाले वाचुन.. काळीज
सुन्न झाले वाचुन.. काळीज नसलेली माणसे आहेत ही जी लहान मुलांनाही न कचरता वापरताहेत हुमन बॉम्ब म्हणुन.
छान! आवडली. ब्लॅक हॉक डाउन,
छान! आवडली.
ब्लॅक हॉक डाउन, मिशन इम्पॉसिबल, अमेरिकन स्नायपर या तिन सिनेमांचा रेफ़रंस लागला. बाकी तुम्ही सांगा.
ब्लॅक हॉक डाऊन, अमेरिकन
ब्लॅक हॉक डाऊन, अमेरिकन स्नायपरवरुनच कथा बनवली आहे. हे पहिल्या भागात स्पष्ट करण्यात आले होते. त्यांचा रेफ्रन्स घेतल्या शिवाय कथा बनलीच नसती. शेवटचा भाग त्याच सीनवर बेतलेला आहे. फक्त चित्रपटात इतका वाद होत नाही. सरळ शुट केले जाते.
राहिला मिशन इम्पोसिब्ल. याचा रेफ्रन्स मला सुध्दा कळला नाही.
(No subject)
सिगार कटर ने बोट कापण्याचा
सिगार कटर ने बोट कापण्याचा भाग मला मिशन इंपॉसिबल वरुन वाटला. असो त्यावरुन वाद नको.
क ड क लिहीले आहे... थरारक
क ड क लिहीले आहे...
थरारक एकदम...
आधीच्या भागांपेक्षा हा
आधीच्या भागांपेक्षा हा जबरदस्त आहे
एका दमात वाचुन काढली.. लहान
एका दमात वाचुन काढली..
लहान मुलांचा ह्युमन बाँब म्हणुन वापर म्हणजे बापरे आहे..
खरच होतो का ?
होत असेल तर त्यांच ब्रेन वॉश कश्या पद्धतीने न काय पढवुन करत असतील ? त्या लहानग्यांना जिहाद, धर्म काय भेंड कळात असेल
शेवट लईच डेंजर... सिगारेट
शेवट लईच डेंजर...
सिगारेट कटर नी बोटं कापायचा सीन बर्याव पिक्चर्स मधे असतो..
कथा आवडली. शेवट अनपेक्षित
कथा आवडली. शेवट अनपेक्षित
सगळे भाग वाचून संपवले, खिळवून
सगळे भाग वाचून संपवले, खिळवून ठेवलं कथेन,, कथेमागची मेहनत स्पष्ट दिसतेय. फारच अप्रतिम, तू आणखी लिही तुझ्यात खिळवून ठेवण्याची क्षमता आहे मित्रा.