कोक्पर - ७
डेव्हिडने पंधरावीस टार्गेट्स शूट केले होते. गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटाच्या गोंगाटातही तो सर्वत्र लक्ष देत होता.
डेव्हिडने पंधरावीस टार्गेट्स शूट केले होते. गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटाच्या गोंगाटातही तो सर्वत्र लक्ष देत होता.
"साधा मोर्चा असेल मग तिथले पोलिस बघून घेतील. पोलिसांशी बोलून एके ठिकाणी थांबवायला सांग. मग "क्रॉसिंग" गेल्यावर जाऊ द्या... पण आपल्याकडून काहीच अॅक्शन नको. कीप मी अपडेटेड. ओव्हर अँड आऊट"
"दिमित्री, रुसलानला पाठवून पोलिसांशी बोलून घे. मोर्चा चौकाच्या आधीच थांबवायला सांग. लगेच. कुठे पोचला आहे तो.? ओव्हर"
"अकराशे मीटर सर. ओव्हर"
"ओके थांबवा... ओव्हर अँड आऊट." सूचना देऊन डेव्हिड रायनोकडे वळला.
सुलेमानच्या चेहर्यावर पुढे काय हा प्रताप करणार आहे असे भीतीदायक प्रश्नचिन्ह उमटले.
डेव्हिड आणि सहकारी एका इमारतीत गेल्यावर तपासणी करत असताना दोन व्यक्तीवर संशय येउ लागला.
"सर, यांच्या घराची तपासणी करत असताना आतल्या पलंगाखाली पाचशे डॉलर्स आणि ही हत्यारे सापडलीत आणि काही सुकामेवा देखील सापडला."
एका सार्जंट्ने डेव्हिडला माहिती पुरवली.
"हत्यारे कोणत्या प्रकारची? "
"सर एक लोकल रिव्हॉल्वर आहे. आणि दुसरी पिस्तूल आहे ९एमएम"
"9 एमएम अरे व्वा. घेऊन या त्याला"
"त्या ट्रकमधले सगळे टार्गेट झाले का?" अॅर्नॉल्डने अचानक विचारले.
"हो. मागच्या ट्रकमध्ये चार होते आणि पुढच्यात तीन होते."
"कोणी सुटले नाही ना? नाहीतर त्यांना आपल्या पोझिशन्स कळतील आणि मग ते त्याच प्रकारे हल्ला ठरवतील."
"नाही आम्ही जिथे होतो तिथून तरी कुणीच नाही"
"ठीक आहे. कॅरी ऑन." अॅर्नॉल्ड विल्यम्सबरोबर पोझिशन्स घ्यायला निघून गेला.
"डेव्हिड, एक सांगायचे होते.".....
"बोल."
"समोरचे निळ्या छताचे घर 1059 मीटर १० ओ’क्लॉक. तिथे मला गडबड वाटतेय."
"का?"
"विशेष असे काही नाही पण तिथे एक बाई, म्हणजे मुलगीच म्हण, फोनवर सतत बोलत होती. पण त्याआधी तिचा नवरा, अं..... हो बहुधा नवराच असेल, छतावर येऊन सतत आजूबाजूला नजर ठेवून होता. नंतर फोन आल्यानंतर त्याचे छतावर येणे बंद झाले. "
"कसा दिसत होता?" डेव्हिडने पटकन विचारले
"संध्याकाळची वेळ आणि पावसामुळे इतके क्लिअर दिसत नव्हते. लिन्गोनटाईप दाढी होती. केस ट्रिम केलेले होते. गोरा म्हणता येईल इतका उजळ होता."
"American Sniper" या अप्रतिम चित्रपटात एक लहानसे ५ मिनिटांचे दृश्य होते. पण ते बघितल्यावर अस्वस्थ झालो होतो. सैनिकांना किती मानसिक यातना सहन कराव्या लागत असतात याचे एक छोटासा नमुना अनुभवला होता. चित्रपट पाहिल्यावर त्या दृश्यावर सतत विचार चालू होते. एक सामान्य नागरीकाच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करत होतो. भावना, प्रेम, क्रोध, निंदा, तिरस्कार इ. फक्त आपल्यासाठी असतात. सैनिकांसाठी फक्त "ऑर्डर" असते.
त्या एका दृश्याभोवती स्वतंत्र कथा रचन्याचा प्रयत्न केला आहे. कथा ही चित्रपटावरून असल्याने त्यातल्या बर्याच पुरक व समान गोष्टी कथेत घेतलेल्या आहे.