मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
मी पहिला मालिका कोकणात घडते
मी पहिला
मालिका कोकणात घडते असे वाटतेय
भाषा मालवणी आहे
अजुन काय हॉरर असनार आहे या
अजुन काय हॉरर असनार आहे या मध्ये...आधीच चालू असलेल्या मालिकन्मधल्या
कारस्थनी बायका पाहिल्या
की त्या च मालिका हॉरर वाटतात...
(No subject)
मालिका हॉरर आहे का नाही?
मालिका हॉरर आहे का नाही? कुठल्या चॅनेलवर आहे? कधीपासून? किती वाजता?
स्वप्ना झी मराठीवर सुरु होणार
स्वप्ना झी मराठीवर सुरु होणार आहे, २२ फेब. पासून रात्री १०.३० वाजता.
मला असे वाटते की, वेग-वेगळ्या
मला असे वाटते की, वेग-वेगळ्या भयकथा (Horror) असव्यात.
मला असे वाटते की, वेग-वेगळ्या
मला असे वाटते की, वेग-वेगळ्या भयकथा (Horror) असव्यात. >>> असे असेल तर मजा येईल बघायला. एकच कहाणी असेल तर ताणत राहतील झी वाले.
हॉरर असेल तर मग मजाच आहे...
हॉरर असेल तर मग मजाच आहे... हॉरर म्हणजे फुल टाईमपास...
सुरवातीला झी मराठीवर रत्नाकर
सुरवातीला झी मराठीवर रत्नाकर मतकरींच्या गहिरे पाणी या पुस्तकातल्या कथा गहिरे पाणी या नावानेच मालिकेतून दाखवल्या होत्या. मस्त होत्या. तशाच असतील तर जरा काहीतरी वेगळे बघायला मिळेल.
वेगवेगळ्या कथा असतील तर खरंच
वेगवेगळ्या कथा असतील तर खरंच बरं..एकच स्टोरी बोअर होईल.
एखाद दुसरा हिंदी हॉरर्सचा भाग
एखाद दुसरा हिंदी हॉरर्सचा भाग पाहिला आहे. त्याच लायकीची ही सिरियल असेल तर महाबोअर असणार. पावडर फासलेली आणि लाल्/पांढ र्या लेन्सेस लावलेली भुतं पाहुन कंटाळा आला आहे. हिंदी आणि मराठी सिरियल्स साधारण सारख्याच लाइनवर असतात, त्यामुळे आता तरी फार अपेक्षा नाहीत. नंतर अपेक्षाभंग झाला तर आनंदच् होइल.
असंभव सारखी असेल तर मज्जा
असंभव सारखी असेल तर मज्जा येईल बघायला
अनोळखी दिशा चांगली होती.
अनोळखी दिशा चांगली होती.
अन्जू, धन्यवाद! मोबाईलवर
अन्जू, धन्यवाद! मोबाईलवर रिमायन्डर लावलं आहे. पहिल भाग तरी नक्की बघेन.
डी नारायण यांच्या कथांवर
डी नारायण यांच्या कथांवर आधारीत आहे असं कळालं. महेश कोठारेच असतील तर न पाहीलेलं बरं. मी मराठी वर वाट लावली होती त्या कथांची.
काल ह्या मलिकेच नवीन ट्रेलर
काल ह्या मलिकेच नवीन ट्रेलर दाखवत होते. ती बाई रात्रीची विहिरीवर पाणी भरत असते, रहाट ओढता ओढता अचानक ते जड होत ती जोर लाऊन त्याला वर खेचते आणि अचानक फक्त दोरी वर येते आणि त्याला बांधलेली कळशी गायब असते… कसल हॉरर वातावरण दाखवलंय ते बापरे… मज्जा येणार आहे बघताना. (मी आणि माझा भाऊ मुद्दाम मम्मीला चिडवतो आम्ही हि मालिका बघणारच म्हणून आणि मम्मी मग खूप ओरडते म्हणते, 'लाथ घालेन हे असल काही लावलात तर'… मग माझा भाऊ म्हणतो 'अग ते डेली सोप बघतेस न त्याच्यापेक्षा तरी भयानक नसेल ग हे' )
डी नारायण = नारायण धारप?
डी नारायण = नारायण धारप?
हॉरर नाहीय खरंतर, गुढ
हॉरर नाहीय खरंतर, गुढ प्रसंगांवर आधारीत आहे मालिका. झीवाल्यांनी त्यांच्या पेजवर लिहिलं होतं तसं..
इथे हॉरर म्हणजे पावडर फासलेली, लाल लेन्सेस लावलेली ममा म्हणतेय तशी भुतं अपेक्षीत आहे.
खरच कालचा ट्रेलर छान होता .
खरच कालचा ट्रेलर छान होता . मस्त वातावरण निर्मिती केली होती . आवडला
मला हॉरर, गुढ, रहस्य पाहुन
मला हॉरर, गुढ, रहस्य पाहुन घाबरायला आवडतं. शेजारी बसलेल्या माणसाला चिमकुटे काढणे, हात घट्ट पकडुन बोन्स क्रश करणे, आपल्या बाजुचा हात दाबुन दाबुन लाल करणे, शर्टची स्लीव चुरगाळुन टाकणे हे सगळे साइड इफेक्ट्स असतात. आणि शेजारी बसलेल्या माणसाने आपल्याशी लग्न केल्यामुळे त्याला ते सहन करावेच लागतात. आता तो माणुस घाबरला आहे कि २२ फेब पासुन परत एकदा टीवी वरचं क्रॅप सहन करायचं आणि शिवाय चिमकुटे पण.
हो, मलाही उत्सुकता आहे या
हो, मलाही उत्सुकता आहे या मालिकेबद्दल, बर्याच दिवसांनी काहीतरी वेगळे बघायला मिळणार असे ट्रेलरवरुन तरी वाटले.
त्या नव्या नवरीला रात्री कोंबड्यांच्या आवाजाचा त्रास होत होता आणि घरातील इतर बायकांनी सांगितले की आपल्याकडे कोंबड्याच नाहीत, असे काहीसे दाखवले होते.
छोट्या - छोट्या गोष्टी असतील, १ किंवा २ भागांच्या तर मजा वाटेल बघायला असे वाटते.
दोन्ही प्रसंग कोकणातलेच
दोन्ही प्रसंग कोकणातलेच दाखवलेत त्यावरुन तरी असे प्रसंग फक्त कोकणातच घडतात असं वाटायला वाव आहे खुप..
मनिमाऊ
मनिमाऊ
भूतांच्या वाडीत एकदा एक भूताई
भूतांच्या वाडीत एकदा एक भूताई आपल्या बेबीभूताला ओरडत होती " मायबोलीवर जायचं नाही हं, तिथे ड्युआय असतात" . बिचा-यांना जागाच उरलेली नाही कुठं.
कोकणातल्या दमट आणि उष्ण हवामानात भूतांचे आरोग्य उत्तम राहत असल्या कारणाने कोकणात भूतं जास्त प्रमाणात आढळून येतात. अशाच प्रकारचे हवामान बंगालच्या कोस्टल भागात असल्याने इकडेही भूतांची चांगलीच चलती असल्याचे समजते. त्यामुळे कोकण किंवा बंगाल इकडे भूतांचा निवास असण्यावरून टिंगलटवाळी करू नये. थोडी तरी भुतास्की दाखवावी.
त्या नव्या नवरीला >>> नवी
त्या नव्या नवरीला >>> नवी नवरी वाटत नाही ती.. मुंबै, पुण्यात रहाणारी सासुरवाशीण पहिल्यांदाच गावाच्या घरी आली आहे अस वाटतय..
कालची झलक खरेच टरकवेबल होति.
कालची झलक खरेच टरकवेबल होति. कथाचि पार्श्वभुमी कोकण असावी. मला तर असे वाटते कि, आपल्या 'अमानविय' धाग्यातले किस्से आहेत कि काय?
पण रात्रीच्या वेळी कशाला
पण रात्रीच्या वेळी कशाला विहिरिवर जावे आणि कळशी सुटली तर घाबरायचे कशाला ते मला समझल नाही ( होरर शो आहे म्हणून असावे) शिवाय मालवणी बोलायची सवय नसल्यावर असतो तसा टोन वाटला मला
still I m going to watch this serial : P
मी मराठी वर एक तास भूताचा
मी मराठी वर एक तास भूताचा नावाची मालिका होती. साध्या साध्या ग्रामीण कथा होत्या भूताच्या. तीच तर नाही ना ही मालिका ?
डी नारायण = नारायण धारप? >>>
डी नारायण = नारायण धारप? >>> रिअली?
मागे एक कोठारेंची सिरिअल होती 'अनोळखी दिशा' नावाची. हे टायटल पण धारपांच्या पुस्तकाचं आहे आणि सुरूवातीला काही गोष्टी पण धारपांच्याच होत्या. पण मग नंतर कोठारेंनी बहुधा स्वतःच स्टोरीज लिहायला सुरूवात केली आणि मालिका कंटाळवाणी झाली आणि फायनली बंद पडली.
घराच्या जवळ्च म्हणजे अंगणात
घराच्या जवळ्च म्हणजे अंगणात वैगेरे विहीर असेल तर रात्रीही जाउ शकतात.
नंतर कोठारेंनी बहुधा स्वतःच स्टोरीज लिहायला सुरूवात केली आणि मालिका कंटाळवाणी झाली आणि फायनली बंद पडली.>>>>>>>>>>>>>> नाही. कथा धरपांच्याच होत्या पण सादरीकरण गंडलेलं.
Pages