झुणक्यासाठी:
# मिक्स सॅलडचा एक पॅक पुरेसा आहे
# एक मध्यम आकाराचा कांदा
# अर्धा गाठा छोटा लसूण
# फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कांडलेले लाल तिखट, मिठ इत्यादी.
# चण्याच्या डाळीचे चार चमचे पिठ अर्थात बेसन
# किंचित ओवा
भाकरीसाठी:
# ज्वारीचे ताजे पिठ
# मिठ
# खदखद उकळलेले पाणी
१) मिक्स सॅलडची पाने दोन ते तीन वेळ न हाताळता नळाखाली धुवून घ्यावी. ही पाने नाजूक असल्यामुळे त्यांना हाताळायची गरज नाही. जर पाने कोंबून भरलेली असेल तर त्यात एक दोन शेवळी तंतू नजरेस पडतात ते पाण्यावर येतात त्यांना काढून टाकावे. पाने धुताना भरपुर उजेडात ती निरखून घ्यावी म्हणजे काडीकचरे असल्यास निवडता येईल.
२) ह्या मिक्स सॅलडमधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत. ती कुठली आहेत ह्यासाठी खालचे चित्र बघा. माझ्याकडे महिन्यातून दोन तीन वेळा मी हा पॅक आणतो. तो ताजा असेल तेंव्हाच संपला तर बरा असतो. पण, इतका मोठा पॅक संपवणे मला शक्य होत नाही म्हणून मी त्याचा झुणका नाहीतर पित्झा करतो. अशानी तो एका खेपेतच संपून जातो.
३) फोडणीसाठी मी कांदा आणि लसूण अनुक्रमे चिरुन.. निवडून घेतले.
४) कांदा पावभाजीला जसा असतो तसा बारीक चिरुन घेतला.
५) बेसन तव्यावर एक दीड चमचे तेलात परतून घेतले. बेसन परतताना कालथा सतत मागे पुढे न्यावा लागतो आणि आच अगदी मंद ठेवावी लागते. नाहीतर बेसन जळून जाते. बेसन नीट भाजले गेले ह्याची एक खूण म्हणते त्याचा सुवास. बेसन, रवा, गव्हाचे पिठ भाजताना त्याचा एक भुक चाळवणारा दरवळ किचनमधे येतो. बेसन जेवढे रवाळ तेवढे उत्तम. जर तुमच्याकडे डाळीची भरड असेल तर मग काय बात अहाहा!!!
६) भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. असे केले की माझे पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही.
७) आता फोडणीसाठी मी त्याच तव्यावर तो तवा न धुता त्याच्यावरच तेल घातले. तेल तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घाला. पण झुणक्याला जरा अधिक तेल ..तिखट लागते. तेल तापले की त्यावर मी आधी सुक्या मिरच्या घातल्या. मग जिरे मोहरी.
८) झुणक्याला एक खास आकर्षक रंग येण्यासाठी मी त्यावर ही घरची मिरची पावडर सुद्धा घातली पण अगदी जेमतेल रंग येण्यापुरती. ओवा घालायला मला आवडतो म्हणून मी घातला.
९) आता ताटामधे धुतलेला सॅलड आच कमी करुन तव्यावर हळूहळू खाली सांडू न देता घालावा. थोडा सॅलड घालून तो आधी परतावा कारण खूप मोठा सॅलड घालून तो परतायला जागाच उरणार नाही. मग, ह्यावर उरलेला सॅलड रचावा. डोंगर दिसेल असा.
१०) लगेच एक ताट तव्यावर ठेवावे. ही पाने इतकी हलकी असतात की ती सहज एका ताटाखाली मावतात. जर ताट उघडे पडत असेल तर त्यावर कुकरचे एक पातेले पाणी भरुन ठेवले की ताटावर वजन पडेल.
११) दोन मिनिटात पाने शिजतात आणि भाजीचा गोळा होतो. ही पाने फार शिजवायची नाही. ती फार नाजूक असतात. त्यातला रस थोडा झिरपायला हवा आणि थोडा पानांमधेच रहायला हवा. हे ह्या कृतीचे एक गमक आहे. ह्यात आता मिठ घालायचे.
१२) शिजलेल्या पानांवर भाजलेले बेसन भुरभुरत घालायचे आणि ते लगेच ढवळायचे. ह्यावेळी बेसन पळीला आतमधे चिकटून जाते. म्हणून दुसरी एक पळी वा चमचा घेऊन ते खरडून टाकायचे.
१३) आता ह्या क्षणाला हे मिश्रण परत एकदा ताटाखाली झाकूण ठेवायचे. ह्यावेळी कुकरचा डबा लागणार नाही. दोन मिनिटांनी गॅस विझवून टाकायला पण.. पण .. पण ताट काढायचे नाही. ती वाफ तशीच आतामधे १० मिनिटे राहू दिली की झुणका इतका मऊ होतो की तो जिभेवर टाकला की विरघळतो आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.
१४) हा झाला तयार हिरवा तजेलदार झुणका.
आता भाकरी:
१) परातीत भाकरीचे पिठ खळ करुन घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मिठ घालावे. खदखद उकळलेले पाणी त्यात घालावे. आणि कालत्यानी पिठ आणि पाणी एकत्रित करावे. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर चालेल पण जास्त होऊ नये. दहा मिनिटे हे पिठ असेल राहू द्यावे. नंतर ते मळून घ्यावे. आणि पोळपाटावर इतके पिठ पसरवावे की पो.पा.चा लाकडी भाग दिसेनासा होईल. जो भाग पिठाकडे आहे तो तव्याच्या वर येईल तो अक्षरश: पाण्यानी सारवतो तसा सारवून घ्यावा म्हणजे भाकरीला नीट पापुद्रा येतो.
२) वरचा भाग कोरडाठिक्क दिसायला लागला की भाकरी उलटून घ्यायची.
३) भाकरीला फुगा आला की भाकरी आचेवर धरायची.
४) ही झाली पहीली भाकरी:
५) आणि ही दुसरी:
तुमच्याकडे सॅलडचा पॅक नसेल तर इतर कोवळ्या भाज्या वापरता येतील.
मस्त रेसिपी बी. +१०० ओटा
मस्त रेसिपी बी.
+१०० ओटा स्वच्छ करेन अगदी सांडलच पिठ तर पण थेट सिंक मधे ताट > सिंक मधे ताट ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही तुमचे सिंक किती स्वच्छ ठेवता यावर अवलंबून आहे. स्टील चे सिंक स्वच्छ असेल आणि त्यात भांडी आणि भाज्या च धुतल्या जात असतील तर काहीच हरकत नाही.
सामी, बरोबर. हल्ली किचन मधे
सामी, बरोबर. हल्ली किचन मधे एक किंवा त्याला जोडून अजून एक असे दोन सिंक असतात. आणि भाज्या, कडधान्य हे सर्व आपण सिंक मधेच धुतो.
माझी बहिण थेट गॅसच्या ओट्यावर पोळ्या लाटते. मी तिला खूपदा म्हणतो की असे नको करुस पण हल्ली कित्येज स्त्रिया थेट गॅसच्या ओट्यावरच पोळ्या लाटतात. पोळपाटाचा उपयोग कांदाबिंदा चिरायला करतात खरे तर ज्या कापडानी ओटा पुसतो तो दरवेळी नवा धुतलेला असेलच असे नाही.
बी तुमचे किचन खुप स्वच्छ
बी तुमचे किचन खुप स्वच्छ आहे. दोन्ही पदार्थ खुप सुंदर जमलेत. खुप कौतुक वाटते तुमचे.
धन्यवाद साधना खूप छान वाटत
धन्यवाद साधना
खूप छान वाटत आहे इतके छान छान अभिप्राय वाचून आणि कौतुकाचा वर्षाव
भाकरी मस्त!
भाकरी मस्त!
मस्तं टेंप्टिंग मेनु.
मस्तं टेंप्टिंग मेनु.
वाह, छान रेसिपी.. मस्त चमचमीत
वाह, छान रेसिपी.. मस्त चमचमीत लागत असेल. फोडणी चा वास इथपर्यन्त आलाय..
ओवा घालण्याची आयडिया आवडली. आणी स्वच्छ किचन बद्दल भारी कौतुक वाटलं तुझं..
मस्त आलेत फोटो !
मस्त आलेत फोटो !
सुरेख झुणका! भाकरीही.
सुरेख झुणका! भाकरीही.
वा बी!! बेत मस्त
वा बी!! बेत मस्त दिसतोय.
स्टेप बाय स्टेप फोटोही आवडले.
मस्त झुणका , भाकरी तर जबरदस्त
मस्त झुणका , भाकरी तर जबरदस्त !
अरे हो बी, ओव्याची आयडीया
अरे हो बी,
ओव्याची आयडीया मीपन अमलात आणेल पुढं
टिप बद्दल धन्यवाद _/\_
भाकरी मस्त टम्म फुगलीये!
भाकरी मस्त टम्म फुगलीये!
वॉव मस्तच ! काय यम्मी दिसतो
वॉव मस्तच ! काय यम्मी दिसतो आहे झुणका. आवडली मला ही आयडिया. मी पण ग्रीन टोकरीचा मिक्स्ड सलाडचा पॅक घेते त्यातला थोडा वायाच जातो. आता असा झुणका करुन संपवता येइल.
स्वच्छ किचनसाठी १०/१०.
परतुन घेतानान बेसन तेल तापवले
परतुन घेतानान बेसन तेल तापवले की थंड तेलातच परतले?
फोडणित सुक्य मिरच्या जिरे मोहरी घातले आधी, लसुण कधी घातली?
रंगरकरिता मिरचीपावदार ऐवजी खायचा रंग घातला तर? केशर चालेल का?
रस पानातला झिरप्तो म्हणजे काय होएते?
दोनिहि भाकर्याच्य रंगात फरक का? मिरची पाउडर कमी पडली म्हनुन का?
का म्हानायचे त्या हिरव्यापिवल्या पदार्थाला झुणकाच ? पीईठ लावुन केलेली भाजी का नाही म्हणायचे?
मस्त बी.... कोणत्याही पाले
मस्त बी.... कोणत्याही पाले भाजीची अशी भाजी करता येईल.
फोटो मस्त आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप आणि टिप्स सहित.
स्वच्छ किचनसाठी १०/१०. << +१
किती मस्त आणि टेम्प्टींग फोटो
किती मस्त आणि टेम्प्टींग फोटो आहेत .. छान!
टेम्प्टींग फोटो आहेत +१ मस्त
टेम्प्टींग फोटो आहेत +१ मस्त
मस्त दिसतंय भाकरी फक्त
मस्त दिसतंय
भाकरी फक्त ज्वारीची नाहीये बहुतेक अजून कुठलं तरी पीठ असावं त्यात.
मस्त रेसिपी...ह्यात किंचित
मस्त रेसिपी...ह्यात किंचित मेथी दाणेही छान लागतात. भाकरीचे फोटु विशेष आवडले.
मस्त आणि टेम्प्टींग फोटो आहेत
मस्त आणि टेम्प्टींग फोटो आहेत >>> +१
बी, किती निगुतीनं सगळं करतोस!
सिंकमधे ताट ठेवायची आयडीया चांगली आहे. मात्र माझ्यासाठी डेंजर! कारण मी तिथे असं काही ठेवलं आहे हे विसरुन नळ चालू करणार की सगळा बट्ट्याबोळ!!
मस्त पिठले आहे. भाकर्या पण
मस्त पिठले आहे. भाकर्या पण जोरदार
सिंकमधे ताट ठेवायची आयडीया
सिंकमधे ताट ठेवायची आयडीया चांगली आहे. मात्र माझ्यासाठी डेंजर! कारण मी तिथे असं काही ठेवलं आहे हे विसरुन नळ चालू करणार की सगळा बट्ट्याबोळ!! << अग फक्त ओतण्यापुरत ठेवायचा आहे. ओतुन झाला की परत किचन ओट्यावर.
छान आहेत फोटो. तुमच्या इतर
छान आहेत फोटो. तुमच्या इतर पाकृ पेक्षा यावेळी खास प्लान करून फोटोज काढले असावेत असं वाटतं
मला भाकरी बनवण्यात फार गती नाही पण खायला आवडते. त्यामुळे ज्यांना अशा मोठ्याला भाकरी करता येतात ते सुगरण कॅटेगरीत येतात, माझ्यासाठी तरी. गुड जॉब.
>>ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.
एकदम गंमत वाक्य आहे
मस्त...
मस्त...
मस्त रे बी ! तिकडे भाकरी जमते
मस्त रे बी ! तिकडे भाकरी जमते पण विदर्भात ज्वारीच ३० रु किलोचे वर गेली आहे !
हे पीठ लावलेल भाजी आहे.
हे पीठ लावलेल भाजी आहे. पिठले नव्हे .
पीठले = फोडणी + पाणी + पीठ.
उकळत्या पाण्यात पीठ सोडले की पिठले होते.
बी एक भाप्र. भाजी चिरली का
बी एक भाप्र. भाजी चिरली का नाहीये? चवीत काही फरक अपेक्षीत आहे का ? रेसिपि मस्त आहे..व भाकरीही मस्त.
कितीही स्वच्छ असले तरी सिंकवर नको थाळी ठेवू...कारण त्याच पाइपाचे दुसरे टोक ड्रेनेजला जोडलेले अस्ते. म्हणून सर्वात जास्त जंतूंचा प्रादुर्भाव होतो तिथे.
मस्त बी !! पदार्थ सुंदर
मस्त बी !!
पदार्थ सुंदर !
फोटो सुंदर !
वर्णन पण सुंदर !
भाकरी तर अतिसुंदर !!
सर्वांचे आभार! मेधावी, बेसन
सर्वांचे आभार!
मेधावी, बेसन ताटात काढून लगेच ते ताट ओट्यावर ठेवले
Pages