मिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी

Submitted by हर्ट on 5 February, 2016 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुणक्यासाठी:
# मिक्स सॅलडचा एक पॅक पुरेसा आहे
# एक मध्यम आकाराचा कांदा
# अर्धा गाठा छोटा लसूण
# फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कांडलेले लाल तिखट, मिठ इत्यादी.
# चण्याच्या डाळीचे चार चमचे पिठ अर्थात बेसन
# किंचित ओवा

भाकरीसाठी:
# ज्वारीचे ताजे पिठ
# मिठ
# खदखद उकळलेले पाणी

क्रमवार पाककृती: 

१) मिक्स सॅलडची पाने दोन ते तीन वेळ न हाताळता नळाखाली धुवून घ्यावी. ही पाने नाजूक असल्यामुळे त्यांना हाताळायची गरज नाही. जर पाने कोंबून भरलेली असेल तर त्यात एक दोन शेवळी तंतू नजरेस पडतात ते पाण्यावर येतात त्यांना काढून टाकावे. पाने धुताना भरपुर उजेडात ती निरखून घ्यावी म्हणजे काडीकचरे असल्यास निवडता येईल.

२) ह्या मिक्स सॅलडमधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत. ती कुठली आहेत ह्यासाठी खालचे चित्र बघा. माझ्याकडे महिन्यातून दोन तीन वेळा मी हा पॅक आणतो. तो ताजा असेल तेंव्हाच संपला तर बरा असतो. पण, इतका मोठा पॅक संपवणे मला शक्य होत नाही म्हणून मी त्याचा झुणका नाहीतर पित्झा करतो. अशानी तो एका खेपेतच संपून जातो.

३) फोडणीसाठी मी कांदा आणि लसूण अनुक्रमे चिरुन.. निवडून घेतले.

४) कांदा पावभाजीला जसा असतो तसा बारीक चिरुन घेतला.

५) बेसन तव्यावर एक दीड चमचे तेलात परतून घेतले. बेसन परतताना कालथा सतत मागे पुढे न्यावा लागतो आणि आच अगदी मंद ठेवावी लागते. नाहीतर बेसन जळून जाते. बेसन नीट भाजले गेले ह्याची एक खूण म्हणते त्याचा सुवास. बेसन, रवा, गव्हाचे पिठ भाजताना त्याचा एक भुक चाळवणारा दरवळ किचनमधे येतो. बेसन जेवढे रवाळ तेवढे उत्तम. जर तुमच्याकडे डाळीची भरड असेल तर मग काय बात अहाहा!!!

६) भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. असे केले की माझे पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही.

७) आता फोडणीसाठी मी त्याच तव्यावर तो तवा न धुता त्याच्यावरच तेल घातले. तेल तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घाला. पण झुणक्याला जरा अधिक तेल ..तिखट लागते. तेल तापले की त्यावर मी आधी सुक्या मिरच्या घातल्या. मग जिरे मोहरी.

८) झुणक्याला एक खास आकर्षक रंग येण्यासाठी मी त्यावर ही घरची मिरची पावडर सुद्धा घातली पण अगदी जेमतेल रंग येण्यापुरती. ओवा घालायला मला आवडतो म्हणून मी घातला.

९) आता ताटामधे धुतलेला सॅलड आच कमी करुन तव्यावर हळूहळू खाली सांडू न देता घालावा. थोडा सॅलड घालून तो आधी परतावा कारण खूप मोठा सॅलड घालून तो परतायला जागाच उरणार नाही. मग, ह्यावर उरलेला सॅलड रचावा. डोंगर दिसेल असा.

१०) लगेच एक ताट तव्यावर ठेवावे. ही पाने इतकी हलकी असतात की ती सहज एका ताटाखाली मावतात. जर ताट उघडे पडत असेल तर त्यावर कुकरचे एक पातेले पाणी भरुन ठेवले की ताटावर वजन पडेल.

११) दोन मिनिटात पाने शिजतात आणि भाजीचा गोळा होतो. ही पाने फार शिजवायची नाही. ती फार नाजूक असतात. त्यातला रस थोडा झिरपायला हवा आणि थोडा पानांमधेच रहायला हवा. हे ह्या कृतीचे एक गमक आहे. ह्यात आता मिठ घालायचे.

१२) शिजलेल्या पानांवर भाजलेले बेसन भुरभुरत घालायचे आणि ते लगेच ढवळायचे. ह्यावेळी बेसन पळीला आतमधे चिकटून जाते. म्हणून दुसरी एक पळी वा चमचा घेऊन ते खरडून टाकायचे.

१३) आता ह्या क्षणाला हे मिश्रण परत एकदा ताटाखाली झाकूण ठेवायचे. ह्यावेळी कुकरचा डबा लागणार नाही. दोन मिनिटांनी गॅस विझवून टाकायला पण.. पण .. पण ताट काढायचे नाही. ती वाफ तशीच आतामधे १० मिनिटे राहू दिली की झुणका इतका मऊ होतो की तो जिभेवर टाकला की विरघळतो आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.

१४) हा झाला तयार हिरवा तजेलदार झुणका.

आता भाकरी:

१) परातीत भाकरीचे पिठ खळ करुन घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मिठ घालावे. खदखद उकळलेले पाणी त्यात घालावे. आणि कालत्यानी पिठ आणि पाणी एकत्रित करावे. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर चालेल पण जास्त होऊ नये. दहा मिनिटे हे पिठ असेल राहू द्यावे. नंतर ते मळून घ्यावे. आणि पोळपाटावर इतके पिठ पसरवावे की पो.पा.चा लाकडी भाग दिसेनासा होईल. जो भाग पिठाकडे आहे तो तव्याच्या वर येईल तो अक्षरश: पाण्यानी सारवतो तसा सारवून घ्यावा म्हणजे भाकरीला नीट पापुद्रा येतो.

२) वरचा भाग कोरडाठिक्क दिसायला लागला की भाकरी उलटून घ्यायची.

३) भाकरीला फुगा आला की भाकरी आचेवर धरायची.

४) ही झाली पहीली भाकरी:

५) आणि ही दुसरी:

अधिक टिपा: 

तुमच्याकडे सॅलडचा पॅक नसेल तर इतर कोवळ्या भाज्या वापरता येतील.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी बी.
+१०० ओटा स्वच्छ करेन अगदी सांडलच पिठ तर पण थेट सिंक मधे ताट > सिंक मधे ताट ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही तुमचे सिंक किती स्वच्छ ठेवता यावर अवलंबून आहे. स्टील चे सिंक स्वच्छ असेल आणि त्यात भांडी आणि भाज्या च धुतल्या जात असतील तर काहीच हरकत नाही.

सामी, बरोबर. हल्ली किचन मधे एक किंवा त्याला जोडून अजून एक असे दोन सिंक असतात. आणि भाज्या, कडधान्य हे सर्व आपण सिंक मधेच धुतो.

माझी बहिण थेट गॅसच्या ओट्यावर पोळ्या लाटते. मी तिला खूपदा म्हणतो की असे नको करुस पण हल्ली कित्येज स्त्रिया थेट गॅसच्या ओट्यावरच पोळ्या लाटतात. पोळपाटाचा उपयोग कांदाबिंदा चिरायला करतात Happy खरे तर ज्या कापडानी ओटा पुसतो तो दरवेळी नवा धुतलेला असेलच असे नाही.

वाह, छान रेसिपी.. मस्त चमचमीत लागत असेल. फोडणी चा वास इथपर्यन्त आलाय..
ओवा घालण्याची आयडिया आवडली. आणी स्वच्छ किचन बद्दल भारी कौतुक वाटलं तुझं.. Happy

वा बी!! बेत मस्त दिसतोय.
स्टेप बाय स्टेप फोटोही आवडले.

वॉव मस्तच ! काय यम्मी दिसतो आहे झुणका. आवडली मला ही आयडिया. मी पण ग्रीन टोकरीचा मिक्स्ड सलाडचा पॅक घेते त्यातला थोडा वायाच जातो. आता असा झुणका करुन संपवता येइल.

स्वच्छ किचनसाठी १०/१०. Happy

परतुन घेतानान बेसन तेल तापवले की थंड तेलातच परतले?
फोडणित सुक्य मिरच्या जिरे मोहरी घातले आधी, लसुण कधी घातली?
रंगरकरिता मिरचीपावदार ऐवजी खायचा रंग घातला तर? केशर चालेल का?
रस पानातला झिरप्तो म्हणजे काय होएते?
दोनिहि भाकर्याच्य रंगात फरक का? मिरची पाउडर कमी पडली म्हनुन का?
का म्हानायचे त्या हिरव्यापिवल्या पदार्थाला झुणकाच ? पीईठ लावुन केलेली भाजी का नाही म्हणायचे?

मस्त बी.... कोणत्याही पाले भाजीची अशी भाजी करता येईल.

फोटो मस्त आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप आणि टिप्स सहित.

स्वच्छ किचनसाठी १०/१०. << +१

मस्त आणि टेम्प्टींग फोटो आहेत >>> +१

बी, किती निगुतीनं सगळं करतोस!

सिंकमधे ताट ठेवायची आयडीया चांगली आहे. मात्र माझ्यासाठी डेंजर! कारण मी तिथे असं काही ठेवलं आहे हे विसरुन नळ चालू करणार की सगळा बट्ट्याबोळ!!

सिंकमधे ताट ठेवायची आयडीया चांगली आहे. मात्र माझ्यासाठी डेंजर! कारण मी तिथे असं काही ठेवलं आहे हे विसरुन नळ चालू करणार की सगळा बट्ट्याबोळ!! << अग फक्त ओतण्यापुरत ठेवायचा आहे. ओतुन झाला की परत किचन ओट्यावर.

छान आहेत फोटो. तुमच्या इतर पाकृ पेक्षा यावेळी खास प्लान करून फोटोज काढले असावेत असं वाटतं Wink

मला भाकरी बनवण्यात फार गती नाही पण खायला आवडते. त्यामुळे ज्यांना अशा मोठ्याला भाकरी करता येतात ते सुगरण कॅटेगरीत येतात, माझ्यासाठी तरी. गुड जॉब.

>>ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.
Lol एकदम गंमत वाक्य आहे Happy

हे पीठ लावलेल भाजी आहे. पिठले नव्हे .

पीठले = फोडणी + पाणी + पीठ.

उकळत्या पाण्यात पीठ सोडले की पिठले होते.

बी एक भाप्र. भाजी चिरली का नाहीये? चवीत काही फरक अपेक्षीत आहे का ? रेसिपि मस्त आहे..व भाकरीही मस्त.

कितीही स्वच्छ असले तरी सिंकवर नको थाळी ठेवू...कारण त्याच पाइपाचे दुसरे टोक ड्रेनेजला जोडलेले अस्ते. म्हणून सर्वात जास्त जंतूंचा प्रादुर्भाव होतो तिथे.

Pages