Submitted by निनाद on 19 November, 2015 - 20:11
संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो घ्यायचा आहे.
पण तो कसा घेतला जातो याची अजिबात कल्पना नाही.
स्क्रीन कास्ट कसा घ्यावा या बाबत काही मार्गदर्शन कराल का?
कोणती प्रणाली चांगली आहे? त्यातही मुक्त आणि मोफत असेल तर उत्तम.
मला CamStudio सापडले पण मग अजून वाचल्यावर कळले की त्यात व्हायरसेस असू शकतात. म्हणून ते सोडले.
Windows Media Encoder वापरून पण असे व्हिडियो घेता येतात का? कारण हे फार जुने आहे. ते नवीन ओएस वर चालेल का असाही प्रश्न आहेच.
तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर ते कसे करता?
सोबत त्या व्हिडियोवर टयटल्स किंवा बाण दाखवणे वगैरे प्रकार करता येतात का?
आवाज कसा देता?
असे रे़कॉर्डर वापरताना काही युक्त्या?
व्हिडियो बनवतानाचे तुमचे काही अनुभव?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निनाद.. sagit हे खुप छान
निनाद.. sagit हे खुप छान software आहे स्क्रिन कॅपचरींग साठी आवाजासह.. वापरायला पण एकदम सोपे..पण सुरवातीला सेटअप ला थोडा वेळ जातो (अर्थात कोणतेही वापरले तरी तो लागणारच)
ईथे लिनक्स वर मी इस्तनबुल,
ईथे लिनक्स वर मी इस्तनबुल, रेकॉर्डमायडेस्कटॉप आणि एक्सव्हीडकॅप वापरतो. बाकी पण बरेच आहेत.
टायटल्स साठी जीनोमचे एक स्वतःची प्रणाली आहे.
ईतर परिणाम नेहमीचे व्हीडीयो एडीटर जसे की केडीएनलाईव्ह ई. मधे होईल.
यापैकी काही विंडोजवर चालत असतील ते बघावे लागेल. विंडोजबद्दल जास्त काही माहिती नाही.
यात सेमीट्रांसपरंट सर्कल वा
यात सेमीट्रांसपरंट सर्कल वा अॅरो टाकणे फारसे अवघड नाही.. कारण स्क्रिनवरचा कर्सर पण रेकॉर्ड होऊ शकतो..
मागे मी टोटल स्क्रीन रेकोर्डर
मागे मी टोटल स्क्रीन रेकोर्डर गोल्ड वापरले होते. पुष्कळ विविध सुविधा होत्या त्यात. वापरायलाही सोपे होते.
कॅमटेशिया सिस्को वेबेक्स
कॅमटेशिया
सिस्को वेबेक्स रेकॉर्डर
लिंक वरुन पण होते बहुतेक रेकॉर्ड, चेक करते.
sagit +1
sagit +1
Sagit की Snagit ?
Sagit की Snagit ?
उत्तम माहिती मिळतेय. धन्यवाद!
उत्तम माहिती मिळतेय. धन्यवाद!