स्क्रीन रे़कॉर्डर - संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो कसा घ्यावा?
Submitted by निनाद on 19 November, 2015 - 20:11
संगणकाच्या पडद्यावरील कार्याचा व्हिडियो घ्यायचा आहे.
पण तो कसा घेतला जातो याची अजिबात कल्पना नाही.
स्क्रीन कास्ट कसा घ्यावा या बाबत काही मार्गदर्शन कराल का?
कोणती प्रणाली चांगली आहे? त्यातही मुक्त आणि मोफत असेल तर उत्तम.
मला CamStudio सापडले पण मग अजून वाचल्यावर कळले की त्यात व्हायरसेस असू शकतात. म्हणून ते सोडले.
Windows Media Encoder वापरून पण असे व्हिडियो घेता येतात का? कारण हे फार जुने आहे. ते नवीन ओएस वर चालेल का असाही प्रश्न आहेच.
तुम्ही रेकॉर्ड करत असाल तर ते कसे करता?