भल्ला/दहि भल्ला कसा करायचा ?

Submitted by गंगी on 27 January, 2016 - 12:28

मी औरंगाबाद ला खाल्ला होता दहि भल्ला... कसा बन्वायचा कोणाला माहितेय का...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडीद डायरेक्ट पितरांपर्यंत पोहोचू शकतात म्हणून.
पितर आणि शनीवारच्या शनीच्या पूजेत उडीद /उडीद आयटम लागतात.

*

अहो, मी दिलिये की रेसेपीची लिंक तुम्हाला. Uhoh मथुरावासीचा भल्ला आणि दहीपुरी खाल्ल्याशिवाय आमची दरवर्षीची औरंगाबाद ट्रीप संपन्न होत नाही. त्यामूळे तो काय प्रकार आहे हे माहितेय.
उकडलेल्या बटाट्यात अरारुट किंवा कॉर्नफ्लोअर घालून त्याच्या टिक्क्या करायच्या. देशी घी मध्ये तळल्याप्रमाणे शॅलो फ्राय करायच्या. बिना कांदा-लसणाचे छोले करून त्यात ही टिक्की ठेवायची. वरून थोडं दही, चाटची हिरवी आणि लाल चटणी, शेव इ घालायचं. दॅट्स इट.

इथे आलेल्या प्रतिसादांवरून असे दिसते आहे की तो कोण मथूरा का आग्रा वासी आहे तो औरंगाबादवासीयांना आलू चाट "दही भल्ला" या नावाने खायला घालतो आहे Lol

पुण्यात गुरूवार पेठेत जैन मंदिरा जवळ एक दिल्लीवाल्याची गाडी असायची संध्याकाळी. तिथे तो असा पदार्थ द्यायचा. तिकडे जाऊन बघून या अजून आहे का ती गाडी.

तो कोण मथूरा का आग्रा वासी आहे तो औरंगाबादवासीयांना आलू चाट "दही भल्ला" या नावाने खायला घालतो आहे
<<
Rofl

Pages