Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओले म्हणजे गारा. हिंदी शब्द
ओले म्हणजे गारा.
हिंदी शब्द आहे
सिर मुंडवा के ओले पडे असा
सिर मुंडवा के ओले पडे असा प्रसिद्ध हिंदी वाक्प्रचार आहे. (आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशा अर्थाचा आहे.)
इथले चुकीचे शब्दं वाचून मुळचे
इथले चुकीचे शब्दं वाचून मुळचे शब्दं विसरायला होतायत...
जब भी कोई लडकी देखू मेरा दिल
जब भी कोई लडकी देखू मेरा दिल दीवाना बोले
ओले ओले ओले ओले ओले ओले
यातल्या ओल्यांचा काय अर्थ आहे?
यातला ओले चा अर्थ खूप गहन
यातला ओले चा अर्थ खूप गहन आहे. "दिल बोले ओले ओले" म्हणजे "ओ ले, ओ ले" यातला "ओ" दिल आपले लक्ष वेधण्यासाठी वापरतो आणि "ले" म्हणजे घे. म्हणजे गाणाऱ्याला त्याचे ह्रदय म्हणते,
)
"(आता उगीच रडू नकोस) हि मुलगी आहे पहा हि घे (आणि शांत बस)"
(हा अर्थ प्राचीन उत्खननात एका बखरी मध्ये मला आढळला
माझी एक मजेशीर आठवण आहे. मी
माझी एक मजेशीर आठवण आहे. मी लहान असताना सकाळी रेडिओ मोठ्या आवाजात लावण्याची सर्वत्रच वहिवाट होती. तेव्हां संत नामदेवांचे एक भजन लागायचे कधीमधी रेडीओवर... "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा." मला ते आवडायचे देखील खूप.
पण त्यातील "हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति" ही ओळ
"हरिदास गर्जती हरिनाम चाखिती" अशी ऐकू येऊन मला बुचकळ्यात पाडायची.
पुढे कधी तरी इंटरनेटवर संपूर्ण लिरिक पहायला मिळालं.
लहानपणी रेडियोवर
लहानपणी रेडियोवर ऐकलेले....
'अवचित परिमळू *ळकला वनमाळी, श्री हरि गोपाळू आला गे माये...' असं काहीतरी,
मला ते अक्षर 'बु' असे ऐकू येत होते आणि असं काय विचित्र गाणे आहे असे शेवटी वडिलांनाच विचारले.
श्यामची आई चित्रपटातल वनमाला
श्यामची आई चित्रपटातल वनमाला बाईन्च्या तोन्डी असलेल गाण
द्रौपदीचा बन्धू शोभे नारायण मी अस म्हणायचो
गणपतीचा बन्धू शोभे नारायण
रणवीरचे मल्हारी गाणे (बाम)
रणवीरचे मल्हारी गाणे (बाम) सतत कानावर पडले वेगवेगळ्या अॅवॉर्ड फंक्शन मधे. ते सुरुवातीचे काय म्हण्तात दरवेळी काहीही ऐकू येते. 'ह्हाहाय' 'हाहाकार' 'तक्तधाम' इ. इ. काही शब्द नसतीलही बहुधा. पन उत्सुकता नक्की काय आहे ते
ते हा ह्न्तं हन्तं वालं -
ते हा ह्न्तं हन्तं वालं - हन्तं हा हन्तं हा हन्तं हा - आहे ना / का ?
'तक्तधाम' मला ते 'फक्त हाण'
'तक्तधाम'
मला ते 'फक्त हाण' 'फक्त हाण' असं ऐकू येतं

उपमा साला आईगं पोरे आले आले
उपमा साला आईगं पोरे आले आले हे सुद्धा त्या ओले ओले गाण्यातच आहे ना?
ते मै खिलाडी तू अनाडी मधल आहे
घ्या मला चुकीचं ऐकू आलं हे
घ्या मला चुकीचं ऐकू आलं हे आता कळलं
उफ माँ>>> मला पण उपमाच वाटत
उफ माँ>>> मला पण उपमाच वाटत होतं !
रच्याकने, अनेक दिवस हे गाणं, अनेक टॉप टेन शो मधे पहिल्या नंबरवर होतं. या गाण्यामुळेच सैफ अली खान आणि गायक अभिजीत दोनोंकी 'निकल पडी' म्हणायला हरकत नाही.
'हाथी का अंडा ला ' हे बेस्ट
'हाथी का अंडा ला ' हे बेस्ट आहे एकदम!
तक्तधाम' मला ते 'फक्त हाण'
तक्तधाम' मला ते 'फक्त हाण' 'फक्त हाण' असं ऐकू येतं>> हे काय आहे ते मला कळलेलंच नाही.. पण इथे वाचल्यावर थोड्या वेळापूर्वी गाणं ऐकलं तर मलाही 'फक्त हाण' असंच ऐकू आलं.
काय शब्द आहेत ते नक्की?
मगच्या आठवड्यात कोल्हापूरला
मगच्या आठवड्यात कोल्हापूरला जाताना सीडीमध्ये अचानक मराठी गाणी लागली. त्यामधलं कुठलंसं गाणं चालू होतं त्यात बाईआवाज बरंच काही म्हणून शेवटी "विचारू कुणाला" त्यावर सुरेश वाडकर आवाज "मनाला गं मनाला गं मनाला" असं बराच वेळ गात राहतो.
कन्या रत्न म्हणे "हा अंकल विचारूचे आन्सर देत नाही नुस्तं म्हनला म्हनला. काय म्हनला ते सांग की:"
>> "हा अंकल विचारूचे आन्सर
>> "हा अंकल विचारूचे आन्सर देत नाही नुस्तं म्हनला म्हनला. काय म्हनला ते सांग की:"
हा हा हा हा
बिगी बिगी बिगी चाल ग... अशी सुरवात असलेले ते अतिशय नितांत सुंदर गाणे आहे "अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला?" खूपच गोड युगुलगीत. आणि हो हि गाणी ऐकणारे रसिक जास्तीकरून कोल्हापुरातच
हे गाण नाही आहे, जाहिरात आहे
हे गाण नाही आहे, जाहिरात आहे कुठलीतरी नवीन बाईक ची जाहिरात (hero durex कि काहीतरी ) त्यात तो म्हणतो इंडिया कि नई उम्मीद, पण मला ते नेहमीच (अजूनही ) इंडिया कि नानी हु मै … असाच ऐकू येत… आणि अगदी मोठ्या आवाजात मी ते म्हणते हि…. (म्हणल ह्याला वेड बीड लागलाय कि काय हि कोण इंडिया ची नानी )
(No subject)
उपमा साला आईगं पोरे आले आले
उपमा साला आईगं पोरे आले आले हे सुद्धा त्या ओले ओले गाण्यातच आहे ना?>>>>> म्ला वाटत ह्या उपमा वरुन मागे कितीतरी पान लोक
झालीयेत.
स्वरा, ते बाईकचं नाव बदल गं
स्वरा, ते बाईकचं नाव बदल गं आधी!! तेच चुकीचं ऐकू येतंय तुला.
Hero Duet आहे ते :p
hero durex >>>>>>>> हेच कहर
hero durex >>>>>>>> हेच कहर आहे
अरे बापरे... अस आहे का ते...
अरे बापरे... अस आहे का ते... हे म्हन्जे ते 'डबलसीट' सारख झाल म्हनायच....

डबलसीट??
डबलसीट??
हो , त्या movie मध्ये ती
हो , त्या movie मध्ये ती हिरवीण पण घराला 'Durex' चा रंग मारायला सांगते ना त्या agent ला…
मला पण आत्ता कळल मी नक्की काय टाइपलय ते ….

असा काही जोक आहे का डबलसीट
असा काही जोक आहे का डबलसीट मधे. ओके. मी चित्रपट पाहिला नाही.
(No subject)
Lila Lila Lilla (English
Lila Lila Lilla (English song) => निल्या निल्या नील्ल्या

)
( कोणतरी एखाद्या निलेश ला म्हणत असावे तसे
Pages