Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन, आडो, शुभेच्छा !!
हर्पेन, आडो, शुभेच्छा !!
हर्पेन लिंक इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! मस्त आहे एकदम.
हर्पेन शुभेच्छा !!
हर्पेन शुभेच्छा !!
धन्यवाद मंडळी आडो मस्तच की...
धन्यवाद मंडळी
आडो मस्तच की... मनापासून शुभेच्छा
हा घे हाफ मॅरॅथॉनच्या रूटचा व्हिडियो
https://www.youtube.com/watch?v=Wom991U32qU&feature=share
दोन्हींचा शेवट एकाच ठिकाणी आहे. शेवटी भेटू जमलं तर
नमस्कार मंडळी, मी गेल्या
नमस्कार मंडळी,
मी गेल्या काही महिन्यांपासून धावायचा प्रयत्न करतोय. आधी रोडवर तासाभरात ६ साडे सहा किमी जॉग करत व्हायचे. नंतर जीममध्ये ट्रेडमिलवर २० - २५ मिनिटांमध्ये ३ किमी होतात. आता परत रोडवर धावायचं ठरवतोय.
काय काय काळजी घ्यावी?
तसेच साडेतीन चार किमीनंतर स्पीड कमी होत जातो. जुन्या अनुभवात २५ मिनिटात ३ किमी व्हायचे तर उरलेले ३ किमी ३० - ३५ मिनिटे घ्यायची. तर ह्याच स्पीडने अजून धाऊन ६ किमी अंतर पूर्ण करायवयास काय काय करावे लागेल?
मी पाणी ठेवत नाही रोडवर धावतांना त्यामुळे असे होत असेल का? धाऊन झाल्यावर एकदम पाणी पितो.
पाणी / ग्लुकोज आदी ठेवून फायदा होईल का?
- धन्यवाद.
हर्पेन, धन्यवाद. मी हाफचा
हर्पेन, धन्यवाद.
मी हाफचा व्हिडिओ पण बघितला कालच.
ऑल द बेस्ट ! पुढल्या वर्षी
ऑल द बेस्ट !
पुढल्या वर्षी मी पण असेन कदाचीत ते वेळेच जमल तर,
स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करता तुम्ही सगळे ?
हर्पेन, आडो ऑल द बेस्ट. पळा
हर्पेन, आडो ऑल द बेस्ट. पळा पळा कोण पुढे पळतो
स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करता तुम्ही सगळे ? >>
सायकल, रनिंग, रोईंग आणि स्किईंग ह्यांच्या स्टॅमिना वाढवायला इंटर्वल ट्रेनिंग असतात. अरोबिक कॅपिसिटी ही हळू हळू खूप वेळ धाऊन तयार होते. तसेच एकदम हाय इंटेसिंटी वर्काऔटने पण तयार होऊ शकते. ( अनअॅरोबिक थ्रेशहोल्ड वाढवून. ) पण दुसर्या प्रकारात पहिल्या प्रकारचा एन्डुरंस नसेल तर जास्त फायदा होत नाही.
सुरूवात असेल तर खूप वेळ, खूपदा, हळूहळू धावणे हाच पर्याय आहे. ह्यातील हळूहळू हे महत्त्वाचे आहे. रनिंग प्लान्स मिळतात, जे फॉलो केले तर २ एक महिन्यात हाफ धावू शकता येते. गुगलवर बरेच फ्री आहेत.
मी पाणी ठेवत नाही रोडवर धावतांना त्यामुळे असे होत असेल का? धाऊन झाल्यावर एकदम पाणी पितो. >> रनिंग आणि सायकलिंग मध्ये पाणी अत्यावश्यक आहे. ग्लुकोज / केळं पण चालेल. (धावेल) डिकॅथलॉन मध्ये कंबरेला अडकवायची एक बॅग मिळते. ( पट्ट्यासारखी) त्यात छोट्या बाटल्या ठेवता येतात.
ह्म्म. मी सलग. सव्वा तास धाऊ
ह्म्म. मी सलग. सव्वा तास धाऊ शकते ( ७० ते ७५ मि १० के ला )
नाईके चा रनिंग प्लॅन फॉलो करते आहे पण एक तास झाला की स्टॅमीना एकदम कमी होतोय तो कसा वाढवायचा ?
धन्यवाद केदार!
धन्यवाद केदार!
एक तास हा मेंटल ब्लॉक असू
एक तास हा मेंटल ब्लॉक असू शकेल धनश्री. पाणी जवळ ठेवतेस कां? पाण्यानेही बरं वाटत नसेल तर इलेक्ट्रॉल घाल त्यात. आणि दर आठवड्याला अंतर थोडं थोडं वाढव. १० च्या नंतर आज आपण १०.२५ करू असं ठरव मनाशी.
हर्पेन, आडो- तुम्हाला दोघांना
हर्पेन, आडो- तुम्हाला दोघांना शुभेच्छा
हो, पाणी पिते, पण कमी पडत
हो, पाणी पिते, पण कमी पडत असेल... मेन्टल ब्लॉक बद्दल बरोबर आहे, एक तास झाला आता शक्य नाही अस मनात येत खर ! थोड थोड अंतर वाढवायला पाहीजे.
बाकी,त्तुम्हाला आणि हर्पेन यांना शुभेच्छा !!
हर्पेन, आडो- शुभेच्छा
हर्पेन, आडो- शुभेच्छा
धन्यवाद मंडळी __/\__ तात्या
धन्यवाद मंडळी __/\__
तात्या धनश्री ईट्स माईंड ओव्हर मॅटर
५-६ किमी अंतर धावताना कोणते बूट / ईलेक्ट्रॉल / पाणी वगैरे गोष्टी फारश्या महत्वाच्या नाहीत असे माझे मत आहे.
मी तरी धावताना पाणी बरोबर ठेवत नाही. अगदीच कधी वाटलं तर वाटेत दुकाने किंवा चहाच्या टपर्यांवर थांबून पाणी पितो. एरवी जिथून सुरुवात करतो तिथे पाणी (आपणच घरून घेऊन गेलेलो) असते ते प्यायचे. सुरुवातीला लूप कमी अंतराचा ठेवायचा. म्हणजे ३ किमी चे २ लूप म्हणजे ६ होतील किंवा लूप बनवणे श्क्य नसेल तर ३ जायचे आणि मग परत वळायचे वगैरे
अर्थात दोन आकडी अंतर धावताना पाणी पिणे जरूरी आहे. आम्ही ५ किमी च्या दोन फेर्या करतो म्हण्जे मधे एकदातरी पाणी पिता येते म्हणजे तितके पुरते किंवा अजून जास्त अंतर धावताना पाणी पाजण्यासाठी मित्र मंडळींना आमंत्रित करतो.
पळताना पाणी पिताना सावकाश प्यायचे घसा ओला होईल इतपतच पोटभरीचे नाही.
किती तास धावलो किती अंतर धावलो किती जोरात धावलो हे सगळे निव्वळ आकडे असतात.
धावताना आपल्याला कसे वाटते / कोणत्या वेगाने धावताना मस्त वाटते त्या वेगाने धावत रहायचे.
हळूहळू वाढतेच अंतर / पळण्याचा अवधी / वेग ईत्यादी
हर्पेन, आडो.. मॅरॅथॉनसाठी
हर्पेन, आडो.. मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.
व्हेरी इनस्पाररींग. इथले अपडेट्स वाचून परत एकादी हाफ पळावी म्हणते.
हर्पेन, आडो शुभेच्छा
हर्पेन, आडो शुभेच्छा
हर्पेन आणी आणी, तुम्हा दोघाना
हर्पेन आणी आणी,
तुम्हा दोघाना शुभेच्छा..
धन्यवाद हर्पेन, लक्षात
धन्यवाद हर्पेन, लक्षात ठेवील!
आणि तुम्ही आणि आडो, तुम्हा दोघांनाही, मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा!
धन्यवाद लोक्स. शुभेच्छांची
धन्यवाद लोक्स. शुभेच्छांची गरज आहेच.
धन्यवाद लोक्स. शुभेच्छांची
धन्यवाद लोक्स. शुभेच्छांची गरज आहेच. >> +१
रार, ठरवच मग आता
हर्पेन, आता एकच दिवस राहिला
हर्पेन, आता एकच दिवस राहिला मधे, उद्या भरपुर विश्रांती /झोप घे. ऑल दि बेस्ट....
बहुतेक पीटी असेल या मॅरेथॉनला.
मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा
मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा
http://shammisyogalayablog.co
http://shammisyogalayablog.com/2016/01/
मॅरेथॉन धाऊन दमलेल्यांसाठी आसने आहेत . ( ह्यातील काही आसनांचा आधीही उल्लेख झालाय )
थँक्स इन्ना , पुणे रनीइंग चे
थँक्स इन्ना ,
पुणे रनीइंग चे सेशन काल आणी आज अटेन्द केले विद्यापीठात .
मुम्बईमॅराथॉन मुळे खूपच कमी लोकं होती
तर .... मुंबई मॅरॅथॉन ५ तास २
तर ....
मुंबई मॅरॅथॉन ५ तास २ मिनिटे लावून पुर्ण केली.
मागच्या वर्षीच्या वेळेशी तुलना केली नाही आणि स्वतःलाच म्ह्टले नॉट बॅड !
नेहेमी प्रमाणे उत्तम संयोजन आणि दर्शकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद !
५ तास २ मिन ही खुप चांगली
५ तास २ मिन ही खुप चांगली वेळ आहे तरीही. अभिनंदन.
थोडा मोठा लेख लिही संयोजन, रस्ते, पाणी आणि इतर खाणे या बद्दल. मी तरी अजुन देशात अशी लांब रेस पळालो नाही त्यामु़ळे जरा कळेल.
माझी पहिली वहिली अर्ध मॅरेथॉन
माझी पहिली वहिली अर्ध मॅरेथॉन मी २ तास ४१ मिनीटांत पूर्ण केली. मुंबईत धावण्याचा हा पहिलाच अनुभव पण सगळ्यांकडूनच मुंबई मॅरेथॉनची खूप प्रशंसा ऐकली होती ती अगदी खरी ठरली.
आदल्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरला बीब घ्यायला जातानाच कॅबच्या ड्रायव्हरकडूनही खूपच कौतुक ऐकलं. तो म्हणालाच की इथे राहाणार्या लोकांसाठी उद्या उत्सव असणारे. खूप सपोर्ट करतात. तुम्ही रेस फक्त एंजॉय करा. आदल्या दिवशी मॅरेथॉनच्या रूटनेच गेल्याने रस्ता नजरेखालून घालता आला हा मोठ्ठा फायदा झाला, कारण धावायला लागलं की माझं आजूबाजूला अजिबात लक्ष नाही जात.
संयोजन, सपोर्ट, पाणी वगैरे काही कुठे नाव ठेवायला जागाच नाही. लोकंही चॉकोलेट्स, केळी, गोळ्या वगैरे वाटत होते. खूपच मस्त अनुभव. हॅट्स ऑफ
अरे वा अभिनंदन आडो आणि
अरे वा अभिनंदन आडो आणि हर्पेन
२ तास ४१ मि. म्हणजे जबरदस्त धावलीस आडो .
अभिनंदन आडो आणि हर्पेन
अभिनंदन आडो आणि हर्पेन
अभिनंदन हर्पेन, आडो! मस्त!
अभिनंदन हर्पेन, आडो! मस्त!
Pages