टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
tomato bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं मग प्लॅस्टिक आणि त्याच्यात फारसा फरक नाही उरणार >>
प्लॅस्टीक मधे जंतुंची वाढ होऊन ते जास्त काळ राहतात. लाकडामधे नैसर्गीक जंतु न जगण्याचे काहीतरी गुणधर्म असतात असे संशोधन पुर्वी वाचले होते. विशेषतः मांसाहारी कापण्यासाठी जेव्हा ती फळी जास्त वापरली जाते.

सगळ्यात बेस्ट ते सिरॅमिक टाइलवाले असावेत. पूर्वी यायचे अंजलीचे तसे. अजून मिळतात का माहिती नाही.

मस्त मस्त
पटकन होणारी असल्यामुळे आजच करणार
आणि फोटोला & रेस्पि ला पैकीच्या पैकी मार्क
अवांतर प्रश्न - लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का?

बाकीचे ऑप्शन ठेवलेत मी..
तरी एकदा गावी चक्कर मारावीच लागेलस दिसतय..

अरे हो दिमा,
मार्क द्याचे राहुनच गेले नै का..
धा पैकी साडेनौ..
अर्धा मार्क मिरची एकाएकी मोठी झाल्यामुळे कापण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी Happy

छान आहे कृती.

तमिळ लोकांमधे टोमॅटो-रस्सम करताना ही लोक टोमॅटो उकळून घेतात तेंव्हा टोमॅटोची साल अशीच सुटते पण ही पद्दत जास्त आवडली. ह्यासाठी निबर तरीही पिकलेले टोमॅटो हवेत.

>>>> माहितीचा स्रोत: वहिनी. <<<<< वहिनी कोण?
मिरच्यांना/टोमॅटोला भाजायच्या आधी तेल लावले तर?
भाजलेली मिरची हिंगमिठात चुरडुन वापरली तर?

लाकडी चॉपिंग बोर्डला चुकूनही पॉलिश करू नका. फ्रेंच पॉलिश = मिथिल अल्कोहोल + लाख + इतर रंगद्रव्ये. = जहाल विषारी.
*
लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का? << प्लॅस्टिकनेही तसे नुकसान होत नाही.

>>>> लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का? << प्लॅस्टिकनेही तसे नुकसान होत नाही. <<<<
डॉक्टर लोक काय वाट्टेल ते सांगतील, पण लाकडावरच कापावे, लाकडाचे कण खाण्यात आले तरी पोटाला फारसे काही बिघडणार नाही (तसेही आपण सुपारी/बडीशेप वगैरे लाकडे खातच अस्तो), पण प्लॅस्टीकचे कण पोटात जाणे घातक...

ही माझी शंभराव्वी पोस्ट.... दिडम्याला समर्पित.

निबर - @ बी कडक म्हणायचे का तुम्हाला
सध्यातरी प्लास्टिक चा आहे . लाकडी कुठे मिळते का बघावे

निबर - @ बी कडक म्हणायचे का तुम्हाला >> हो निबर म्हणजे कडक्/भरलेला इथ होतो..
फुगलि तोवर ठीक, इथ तिची उंची वाढलेली दिसताय न माझ्या दोन डोळ्यांना त्याच काय..

मार्क द्यायचेत का?
दहापैकी का?
ओके, पकडा दहा मार्क्स,
त्यातुन दोन मार्क वजा कारण टोमॅटो भाजायला ठेवल्यावर मधे मधे हलवायचे ते सांगितले नाही.
एक मार्क वजा कारण मिरची चॉप करताना देठासहित करायचि की बिनादेठाची ते सांगितले नाही.
अजुन दोन मार्क वजा कारण टोमॅटोच्या काढलेल्या सालिंचे, मिरची/कोथिंबिरीच्या देठांचे काय करायचे, ते सांगितले नाही.
अजुन एक मार्क वजा कारण साली व देठ वगैरे जर कचर्‍यात टाकायचे तर ते ओल्या कचर्‍यात की सुक्या कचर्‍यात टाकायचे ते सांगितले नाही.
अजुन एक मार्क वजा कारण डस्टबीन वापरलीही नाही, व त्याचा कुठे उल्लेखही नाही.
एकंदरीत फोटो छान आले असल्याने एक मार्क अधिक करा
एकुण गोळाबेरीज करुन उदारमनाने दहापैकी चार मार्क्स देण्यात येत आहेत. Proud

हॉग्वर्ट्समधली पॉइंट सिस्टम पाळायचीय का?
लिंबूटिंबूंच्या ४ मार्कांत भर घालतो.

"माझ्या झाडावरचे" टमाटे यासाठी ५ मार्क.
पाककृतीत लिंबू न वापरल्याबद्दल एक बोनस मार्कj
झाले दहा. Biggrin

एक मार्क वजा:
नॉनव्हेज वाल्यांनी टॉमेटो ऐवजी काय वापरले तर चालेल ही तळटीप लिहीली नाहीये Happy

दिमा, हे असे करून ( म्हणजे रेसीप्या) पसंत पडायला लागाल हां( मायबोलीवर हो).

(गॅस जरा नीट धूवून ठेवा, पिवळट झालाय. सोडा आणि विनेगरनी पुसला की झालं. आणि थेंब उडलेले पुसून घ्या बोल वरचे.) Wink

सगळे फाप करताय्तच तर

बस्के | 14 January, 2016 - 07:36

वाह.. मस्त फोटो आहेत!! टोमॅटो भाजणे अवघड वाटेल गॅसवर, म्हणून जमेल की नाही माहित नाही. एनाराय पब्लिक ओव्हन मध्ये फॉईलमध्ये गुंडाळून बेक केले तर होतील का टो भाजके?
>>
बस्के त्याने एनाराय पब्लिक भाजके होईल. टो कसे भाजके होतील? Proud

पण ह्या टाकून दिलेल्या सालांमधे कितीतरी फायबर असतात ते वाया जातील हा एक तोटा आहे ह्या पाककृतीचा Sad

पण ह्या टाकून दिलेल्या सालांमधे कितीतरी फायबर असतात ते वाया जातील हा एक तोटा आहे ह्या पाककृतीचा >>>> हो हो. त्याबद्दल एक मारकं कापला पाहिजे दीमांचा Biggrin त्या सालांचं ड्रेसिंग करता आलं असतं भरतावर Wink

मी काय बी'' प्रश्न नाय विचारत Wink पन समजा कच्च्या तेला पेक्षा कढीपत्ता जिर्‍याची फोड्णी वरुन दिली तर चालल का? Happy

(गॅस जरा नीट धूवून ठेवा, पिवळट झालाय. सोडा आणि विनेगरनी पुसला की झालं. आणि थेंब उडलेले पुसून घ्या बोल वरचे.)

<<

वोच्च बोल्या मय के अब्बी तलक ग्यास किस्कू कय्से नै दिख्या. 134.gif ओ हमरा पुरखोंका वडिलोपार्जित ग्यास हय. अधून मधून घासते हय हम लोग उस्कू.

अउर वो बोल पे के थेंबा कच्चे तेल के हय. मुद्दाम ठेवे हुए हय. तेल बी दिखने कू होना के नय? तुम लोगा हौर बोलेंगे के डाल्याच नय करके.

*

वो जिरे कढीपत्ते की फोडणी चलेगी. कशी लागते ते सांगा.

साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी, ( ८ विशेषण झाली + २ एडवा) अश्या पाकृला १०/१०.... प्रतिसादांची संख्या पाहता भारी पाकृ असेल असं वाटलं... शतकी गाठण्यासाठी पाकृत की लेखकुत पोटेंशियल हवं?

साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी, ( ८ विशेषण झाली + २ एडवा)
>>>
साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी,बिना कटकटीची,फोटोसहित Proud

Pages