टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
tomato bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, ज्युनियर डायरेक्ट तोंडातच भरीत करतात अख्ख्या टोमाटोचं. दे पं ना सवयच आहे पण लावायची. तरी त्या(स्वत:ला) ज्ये ना (समजत) नाहीत. असो या धाग्याचं दुसरं टोक वृध्दाश्रमात पोचायच्या आत थांबू. Lol

आज केलं छान झालं ! चवीला सुध्दा टाकली नाही साखर! मोवरुन फोटो टाकता येत नाही. सॉरी फॉर झब्बु...

मी पण विकेंडला केलं होतं. (कांदा, लसूण न भाजता). मस्त झालं होतं. खास करुन भाजलेल्या मिरच्यांची चव आवडली.
** साखर टाकली होती.

हे आत्ता बघितलं थोपू वर. तुम्ही टाकलं नसावं. रुचकर पदार्थ नावाच्या ग्रुपवर सेम टू सेम आहे. मी स्क्रीनशाॅट घेतला आहे

एका व्हाट्स अप ग्रुप वर माबोकर मिनूने ही पाकृ एका फेसबुक ग्रुपवर वेगळ्याच नावाने फिरतेय अस सांगितलं . हा त्याचा स्क्रीनशॉट

IMG-20160122-WA0003.jpg

कृपया ज्यांनी-ज्यांनी फेबुवर पाहिले त्यांनी तिथे निषेध नोंदवावा, व इथली लिंक डकवावी ही विनंती. त्याचप्रमाणे ती पोस्ट रिपोर्टही करता येईल.

धन्यवाद!

लेटेस्ट अपडेट : - ग्रुप सापडला . पण क्लोझ्ड ग्रुप दिसतोय . म्हणजे पोस्ट टाकायला तिथलं सभासद व्हावं लागेल .

इथून चोरून टाकलंय म्हणजे मायबोली वाचक नक्कीच असेल तो. रेस्पी टाकायला हरकत नाही, मी काय इन्व्हेंट नाही केली रेस्पी. मात्र फोटोही चोरलेत हे वात्रट काम आहे. स्वतः करून रेस्पी टाकली अस्ती तर कौतुक केलंच असतं.

असो. जमेल त्यांनी निषेध नोंदवा. जाई, थ्यांकू इन अ‍ॅड्वान्स.

मला वाटतं ग्रूप अ‍ॅडमिन ना काँटॅक्ट करता येईल.

ग्रूप अ‍ॅडमिन ,शिरीष शेवडे यांना मेसेज पाठवला आहे.पण क्लोझ्ड ग्रुप असल्यामुळे त्यांना जाईल की नाही माहीत नाही.

किमान नाव पूर्ण आणि आडनाव अर्ध तरी.

दीडमायबो असं?
त्यापेक्षा डिम्स चालेल!

(धूम पळ ठोकणारी बाहुली :डोमा:)

आज केलं मी भरीत. सुंदर झालं होतं. फक्त मी जिरे भाजून आख्खे घातलं, भरड नाही केली. किंचित ओवा पण घातला. बाकी सेम असंच. धन्यवाद दिमा ह्या रेसिपीसाठी.

मी इथे वाचलं तेव्हा माझ्या झाडाला एक टोमाटो आलेला होता, तो झाला की त्याचं करूया असं मनात होतं पण अजून त्याला वेळ आहे आणि अजून दोन छोटे टोमाटो येतायेत. आता त्या सर्वांचं नंतर करेन.

आज विकतच्या टोमाटोचं केलं. गरम भांडी ठेवतो ती जाळी असतेना, त्यातल्या एकाची प्लास्टिक खुरे नाहीयेत ती जाळी उलटी gasवर ठेऊन मी टोमाटो भाजले. Lol

एका केरळी मैत्रिणीला दिली होती लिंक. फोटोवरून बरच समजलंच तिला, पण वाचलंही तिने. फक्तं मीठ का मतलब क्या एवढं विचारलं Wink
तिला आणि तिच्या घरच्यांना आवडले हे भरीत. कळवलेले धन्यवाद योजाटा.

आजच केलं. आणी ऑस्सम काय म्हणतात ना तसं झालं. जबरी!! धन्यवाद या रसरशीत व झणझणीत पाककृतीकरता. जोडीला खानदेशी वांग्यांचे पण भरीत आहेच.

आजच केलं. छान चव आली होती. मी कच्चं तेल आणि जिरं भाजून घालण्याऐवजी वरून जिर्याची तेलात फोडणी करून घातली.

Pages