लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
नाही, ज्युनियर डायरेक्ट
नाही, ज्युनियर डायरेक्ट तोंडातच भरीत करतात अख्ख्या टोमाटोचं. दे पं ना सवयच आहे पण लावायची. तरी त्या(स्वत:ला) ज्ये ना (समजत) नाहीत. असो या धाग्याचं दुसरं टोक वृध्दाश्रमात पोचायच्या आत थांबू.
आशूडी
आशूडी
लोल..
लोल..
आज केलं छान झालं ! चवीला
आज केलं छान झालं ! चवीला सुध्दा टाकली नाही साखर! मोवरुन फोटो टाकता येत नाही. सॉरी फॉर झब्बु...
मी पण विकेंडला केलं होतं.
मी पण विकेंडला केलं होतं. (कांदा, लसूण न भाजता). मस्त झालं होतं. खास करुन भाजलेल्या मिरच्यांची चव आवडली.
** साखर टाकली होती.
हे आत्ता बघितलं थोपू वर.
हे आत्ता बघितलं थोपू वर. तुम्ही टाकलं नसावं. रुचकर पदार्थ नावाच्या ग्रुपवर सेम टू सेम आहे. मी स्क्रीनशाॅट घेतला आहे
मी फेसबुकवर नाही. त्यांनी
मी फेसबुकवर नाही. त्यांनी चोरी केली आहे १००%.
एका व्हाट्स अप ग्रुप वर
एका व्हाट्स अप ग्रुप वर माबोकर मिनूने ही पाकृ एका फेसबुक ग्रुपवर वेगळ्याच नावाने फिरतेय अस सांगितलं . हा त्याचा स्क्रीनशॉट
जिथे दिसलंय तिथे सांगा ना ही
जिथे दिसलंय तिथे सांगा ना ही त्या त्या व्यक्तीची नाही रेसिपी म्हणून.
वॉटरमार्कने नाव नं टाकल्याने
वॉटरमार्कने नाव नं टाकल्याने फोटोचे सर्व मार्कं वजा केले आहेत.
कृपया ज्यांनी-ज्यांनी फेबुवर
कृपया ज्यांनी-ज्यांनी फेबुवर पाहिले त्यांनी तिथे निषेध नोंदवावा, व इथली लिंक डकवावी ही विनंती. त्याचप्रमाणे ती पोस्ट रिपोर्टही करता येईल.
धन्यवाद!
सोनू
सोनू
दीड मायबोलीकर , फेसबुकवर तो
दीड मायबोलीकर , फेसबुकवर तो ग्रुप शोधावा लागेल . उद्या शोधेन . आता झोपतेय . शुभरात्र
फेसबूकवरचा तो ग्रूप क्लोज्ड
फेसबूकवरचा तो ग्रूप क्लोज्ड आहे.. आधी जॉइन करावा लागेल..
वॉटरमार्कने नाव नं टाकल्याने >>
लेटेस्ट अपडेट : - ग्रुप
लेटेस्ट अपडेट : - ग्रुप सापडला . पण क्लोझ्ड ग्रुप दिसतोय . म्हणजे पोस्ट टाकायला तिथलं सभासद व्हावं लागेल .
गृप सापडला. ही लिंक क्लोज्ड
गृप सापडला. ही लिंक
क्लोज्ड गृप आहे.
इथून चोरून टाकलंय म्हणजे
इथून चोरून टाकलंय म्हणजे मायबोली वाचक नक्कीच असेल तो. रेस्पी टाकायला हरकत नाही, मी काय इन्व्हेंट नाही केली रेस्पी. मात्र फोटोही चोरलेत हे वात्रट काम आहे. स्वतः करून रेस्पी टाकली अस्ती तर कौतुक केलंच असतं.
असो. जमेल त्यांनी निषेध नोंदवा. जाई, थ्यांकू इन अॅड्वान्स.
मला वाटतं ग्रूप अॅडमिन ना काँटॅक्ट करता येईल.
तिथे रिपोर्ट केलंच आहे, पण
तिथे रिपोर्ट केलंच आहे, पण इथेही सांगितलंय. ज्यांना जमेल त्यांनी तिथे बोलावं
ग्रूप अॅडमिन ,शिरीष शेवडे
ग्रूप अॅडमिन ,शिरीष शेवडे यांना मेसेज पाठवला आहे.पण क्लोझ्ड ग्रुप असल्यामुळे त्यांना जाईल की नाही माहीत नाही.
२००
२००
चिंधी लोक. दिमा, watermark
चिंधी लोक. दिमा, watermark टाकून द्या.
वॉटरमार्कबद्दल अनुमोदन. किमान
वॉटरमार्कबद्दल अनुमोदन. किमान नाव पूर्ण आणि आडनाव अर्ध तरी.
किमान नाव पूर्ण आणि आडनाव
किमान नाव पूर्ण आणि आडनाव अर्ध तरी.
दीडमायबो असं?
त्यापेक्षा डिम्स चालेल!
(धूम पळ ठोकणारी बाहुली :डोमा:)
आज केलं मी भरीत. सुंदर झालं
आज केलं मी भरीत. सुंदर झालं होतं. फक्त मी जिरे भाजून आख्खे घातलं, भरड नाही केली. किंचित ओवा पण घातला. बाकी सेम असंच. धन्यवाद दिमा ह्या रेसिपीसाठी.
मी इथे वाचलं तेव्हा माझ्या झाडाला एक टोमाटो आलेला होता, तो झाला की त्याचं करूया असं मनात होतं पण अजून त्याला वेळ आहे आणि अजून दोन छोटे टोमाटो येतायेत. आता त्या सर्वांचं नंतर करेन.
आज विकतच्या टोमाटोचं केलं. गरम भांडी ठेवतो ती जाळी असतेना, त्यातल्या एकाची प्लास्टिक खुरे नाहीयेत ती जाळी उलटी gasवर ठेऊन मी टोमाटो भाजले.
एका केरळी मैत्रिणीला दिली
एका केरळी मैत्रिणीला दिली होती लिंक. फोटोवरून बरच समजलंच तिला, पण वाचलंही तिने. फक्तं मीठ का मतलब क्या एवढं विचारलं
तिला आणि तिच्या घरच्यांना आवडले हे भरीत. कळवलेले धन्यवाद योजाटा.
Khoopch Chan
Khoopch Chan
आजच केलं. आणी ऑस्सम काय
आजच केलं. आणी ऑस्सम काय म्हणतात ना तसं झालं. जबरी!! धन्यवाद या रसरशीत व झणझणीत पाककृतीकरता. जोडीला खानदेशी वांग्यांचे पण भरीत आहेच.
१००/१०० .....मस्त
१००/१०० .....मस्त
आजच केलं. छान चव आली होती. मी
आजच केलं. छान चव आली होती. मी कच्चं तेल आणि जिरं भाजून घालण्याऐवजी वरून जिर्याची तेलात फोडणी करून घातली.
झकास रेसिपी आहे, लौकरच करून
झकास रेसिपी आहे, लौकरच करून पाहतो.
Pages