लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
अमॅझॉन, पेपरफ्राय, फॅबफर्नीश
अमॅझॉन, पेपरफ्राय, फॅबफर्नीश ई. वर सुद्धा बांबु आणि ईतर लाकडाचे मिळतील.
अगं मग प्लॅस्टिक आणि
अगं मग प्लॅस्टिक आणि त्याच्यात फारसा फरक नाही उरणार >>
प्लॅस्टीक मधे जंतुंची वाढ होऊन ते जास्त काळ राहतात. लाकडामधे नैसर्गीक जंतु न जगण्याचे काहीतरी गुणधर्म असतात असे संशोधन पुर्वी वाचले होते. विशेषतः मांसाहारी कापण्यासाठी जेव्हा ती फळी जास्त वापरली जाते.
सगळ्यात बेस्ट ते सिरॅमिक
सगळ्यात बेस्ट ते सिरॅमिक टाइलवाले असावेत. पूर्वी यायचे अंजलीचे तसे. अजून मिळतात का माहिती नाही.
मस्त मस्त पटकन होणारी
मस्त मस्त
पटकन होणारी असल्यामुळे आजच करणार
आणि फोटोला & रेस्पि ला पैकीच्या पैकी मार्क
अवांतर प्रश्न - लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का?
बाकीचे ऑप्शन ठेवलेत मी.. तरी
बाकीचे ऑप्शन ठेवलेत मी..
तरी एकदा गावी चक्कर मारावीच लागेलस दिसतय..
अरे हो दिमा,
मार्क द्याचे राहुनच गेले नै का..
धा पैकी साडेनौ..
अर्धा मार्क मिरची एकाएकी मोठी झाल्यामुळे कापण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी
छान आहे कृती. तमिळ लोकांमधे
छान आहे कृती.
तमिळ लोकांमधे टोमॅटो-रस्सम करताना ही लोक टोमॅटो उकळून घेतात तेंव्हा टोमॅटोची साल अशीच सुटते पण ही पद्दत जास्त आवडली. ह्यासाठी निबर तरीही पिकलेले टोमॅटो हवेत.
>>>> माहितीचा स्रोत: वहिनी.
>>>> माहितीचा स्रोत: वहिनी. <<<<< वहिनी कोण?
मिरच्यांना/टोमॅटोला भाजायच्या आधी तेल लावले तर?
भाजलेली मिरची हिंगमिठात चुरडुन वापरली तर?
ओ टीनातै, मिरची अचानक मोठी
ओ टीनातै, मिरची अचानक मोठी झाली नाही, उष्णतेने प्रसरण पावली आहे.
लाकडी चॉपिंग बोर्डला चुकूनही
लाकडी चॉपिंग बोर्डला चुकूनही पॉलिश करू नका. फ्रेंच पॉलिश = मिथिल अल्कोहोल + लाख + इतर रंगद्रव्ये. = जहाल विषारी.
*
लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का? << प्लॅस्टिकनेही तसे नुकसान होत नाही.
>>>> लाकडावर कापल्यामुळे
>>>> लाकडावर कापल्यामुळे सुरीची धार जास्त काळ चागली राहते का? << प्लॅस्टिकनेही तसे नुकसान होत नाही. <<<<
डॉक्टर लोक काय वाट्टेल ते सांगतील, पण लाकडावरच कापावे, लाकडाचे कण खाण्यात आले तरी पोटाला फारसे काही बिघडणार नाही (तसेही आपण सुपारी/बडीशेप वगैरे लाकडे खातच अस्तो), पण प्लॅस्टीकचे कण पोटात जाणे घातक...
ही माझी शंभराव्वी पोस्ट.... दिडम्याला समर्पित.
निबर - @ बी कडक म्हणायचे का
निबर - @ बी कडक म्हणायचे का तुम्हाला
सध्यातरी प्लास्टिक चा आहे . लाकडी कुठे मिळते का बघावे
फ्रेंच पॉलिश = मिथिल अल्कोहोल
फ्रेंच पॉलिश = मिथिल अल्कोहोल + लाख + इतर रंगद्रव्ये. = जहाल विषारी.>>>> ह्म्म. हे लक्षात आलं नव्हतं.
निबर - @ बी कडक म्हणायचे का
निबर - @ बी कडक म्हणायचे का तुम्हाला >> हो निबर म्हणजे कडक्/भरलेला इथ होतो..
फुगलि तोवर ठीक, इथ तिची उंची वाढलेली दिसताय न माझ्या दोन डोळ्यांना त्याच काय..
मार्क द्यायचेत का? दहापैकी
मार्क द्यायचेत का?
दहापैकी का?
ओके, पकडा दहा मार्क्स,
त्यातुन दोन मार्क वजा कारण टोमॅटो भाजायला ठेवल्यावर मधे मधे हलवायचे ते सांगितले नाही.
एक मार्क वजा कारण मिरची चॉप करताना देठासहित करायचि की बिनादेठाची ते सांगितले नाही.
अजुन दोन मार्क वजा कारण टोमॅटोच्या काढलेल्या सालिंचे, मिरची/कोथिंबिरीच्या देठांचे काय करायचे, ते सांगितले नाही.
अजुन एक मार्क वजा कारण साली व देठ वगैरे जर कचर्यात टाकायचे तर ते ओल्या कचर्यात की सुक्या कचर्यात टाकायचे ते सांगितले नाही.
अजुन एक मार्क वजा कारण डस्टबीन वापरलीही नाही, व त्याचा कुठे उल्लेखही नाही.
एकंदरीत फोटो छान आले असल्याने एक मार्क अधिक करा
एकुण गोळाबेरीज करुन उदारमनाने दहापैकी चार मार्क्स देण्यात येत आहेत.
हॉग्वर्ट्समधली पॉइंट सिस्टम
हॉग्वर्ट्समधली पॉइंट सिस्टम पाळायचीय का?
लिंबूटिंबूंच्या ४ मार्कांत भर घालतो.
"माझ्या झाडावरचे" टमाटे यासाठी ५ मार्क.
पाककृतीत लिंबू न वापरल्याबद्दल एक बोनस मार्कj
झाले दहा.
मस्तच, खुप आवडीचा प्रकार..
मस्तच, खुप आवडीचा प्रकार..:)
एक मार्क वजा: नॉनव्हेज
एक मार्क वजा:
नॉनव्हेज वाल्यांनी टॉमेटो ऐवजी काय वापरले तर चालेल ही तळटीप लिहीली नाहीये
मृणाल-१, निबर म्हणजे खूप
मृणाल-१, निबर म्हणजे खूप पिकून गलगल झालेले नकोत. नाहीतर टोमॅटो फुटुन जातील.
दिमा, हे असे करून ( म्हणजे
दिमा, हे असे करून ( म्हणजे रेसीप्या) पसंत पडायला लागाल हां( मायबोलीवर हो).
(गॅस जरा नीट धूवून ठेवा, पिवळट झालाय. सोडा आणि विनेगरनी पुसला की झालं. आणि थेंब उडलेले पुसून घ्या बोल वरचे.)
सगळे फाप करताय्तच तर बस्के
सगळे फाप करताय्तच तर
बस्के | 14 January, 2016 - 07:36
वाह.. मस्त फोटो आहेत!! टोमॅटो भाजणे अवघड वाटेल गॅसवर, म्हणून जमेल की नाही माहित नाही. एनाराय पब्लिक ओव्हन मध्ये फॉईलमध्ये गुंडाळून बेक केले तर होतील का टो भाजके?
>>
बस्के त्याने एनाराय पब्लिक भाजके होईल. टो कसे भाजके होतील?
सहिये!!! साल्सासारखं वाटतंय..
सहिये!!! साल्सासारखं वाटतंय.. शेवटचे फ़ोटो भारी आलेत!
हॅपॉप्रमाणे accio tomato bharit म्हणता आलं असतं तर!
पण ह्या टाकून दिलेल्या
पण ह्या टाकून दिलेल्या सालांमधे कितीतरी फायबर असतात ते वाया जातील हा एक तोटा आहे ह्या पाककृतीचा
पण ह्या टाकून दिलेल्या
पण ह्या टाकून दिलेल्या सालांमधे कितीतरी फायबर असतात ते वाया जातील हा एक तोटा आहे ह्या पाककृतीचा >>>> हो हो. त्याबद्दल एक मारकं कापला पाहिजे दीमांचा त्या सालांचं ड्रेसिंग करता आलं असतं भरतावर
छान सोपी आणि स्वादिष्ट
छान सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी! लवकरच बनविणार!
त्या सालांचं ड्रेसिंग करता
त्या सालांचं ड्रेसिंग करता आलं असतं भरतावर >>>> परत परत
मी काय बी'' प्रश्न नाय विचारत
मी काय बी'' प्रश्न नाय विचारत पन समजा कच्च्या तेला पेक्षा कढीपत्ता जिर्याची फोड्णी वरुन दिली तर चालल का?
(गॅस जरा नीट धूवून ठेवा,
(गॅस जरा नीट धूवून ठेवा, पिवळट झालाय. सोडा आणि विनेगरनी पुसला की झालं. आणि थेंब उडलेले पुसून घ्या बोल वरचे.)
<<
वोच्च बोल्या मय के अब्बी तलक ग्यास किस्कू कय्से नै दिख्या. ओ हमरा पुरखोंका वडिलोपार्जित ग्यास हय. अधून मधून घासते हय हम लोग उस्कू.
अउर वो बोल पे के थेंबा कच्चे तेल के हय. मुद्दाम ठेवे हुए हय. तेल बी दिखने कू होना के नय? तुम लोगा हौर बोलेंगे के डाल्याच नय करके.
*
वो जिरे कढीपत्ते की फोडणी चलेगी. कशी लागते ते सांगा.
साधी, सोपी, करण्याजोगी,
साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी, ( ८ विशेषण झाली + २ एडवा) अश्या पाकृला १०/१०.... प्रतिसादांची संख्या पाहता भारी पाकृ असेल असं वाटलं... शतकी गाठण्यासाठी पाकृत की लेखकुत पोटेंशियल हवं?
साधी, सोपी, करण्याजोगी,
साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी, ( ८ विशेषण झाली + २ एडवा)
>>>
साधी, सोपी, करण्याजोगी, चविष्ट, सिझनल,शाकाहारी, पौष्टीक, देखणी,बिना कटकटीची,फोटोसहित
त्या चिकन च्या रेस्पित ली
त्या चिकन च्या रेस्पित ली शेगडी वेग़ळी होती , ही वेगळी दिसतेय..
कुछ तो गड्बड है दया!!
Pages