लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)
माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.
तर,
टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :
टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :
दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.
सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.
ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.
फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :
पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.
माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.
कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.
फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.
छान पाककृती आणि फोटो पण मस्त
छान पाककृती आणि फोटो पण मस्त आलेत.
ते फोटोतले पक्षी टर्की नाहीत
ते फोटोतले पक्षी टर्की नाहीत ना? टर्की जाडा जुडा लाल पिसारा वाला पक्षी असतो ना?
नाही तो टर्की नाही.. हे भरीत
नाही तो टर्की नाही..
हे भरीत करुन बघणेत यील
थोडा गूळ घालु हवं तर करताना
टर्की म्हणजेच बटेर का? >>>
टर्की म्हणजेच बटेर का? >>> नाही आश्विनी के.. बटेर्/बाटर वेगळे असतात..
ओके टीना. पण दीमांनी टाकलेले
ओके टीना. पण दीमांनी टाकलेले पक्षी कुठले आहेत? तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी कधी त्यांचं अन्न टिपताना दिसतात.
आमच्यात चपातीला पोळीच
आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात. >> +१ मीपन. +२
जाळी मिळाली की लगेच करणार.
जाळी मिळाली की लगेच करणार. भारी आहे.
तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी
तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी कधी त्यांचं अन्न टिपताना दिसतात. <<
पकडून विकायचा साइड बिझनेस कर केश्वे..
ओके टीना. पण दीमांनी टाकलेले
ओके टीना. पण दीमांनी टाकलेले पक्षी कुठले आहेत? तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी कधी त्यांचं अन्न टिपताना दिसतात.
>> Guineafowl
अवने, मराठीत काय म्हणतात
अवने, मराठीत काय म्हणतात त्याला ते सांग बायो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=vnTU0EzuXDw
गिनी मोठा पक्षी नेट वर हेच
गिनी मोठा पक्षी
नेट वर हेच सापडलं
Guineafowl meat is drier and leaner than chicken meat and has a gamey flavour. It has marginally more protein than chicken or turkey, roughly half the fat of chicken and slightly fewer calories per gram. Guineafowl eggs are substantially richer than chicken eggs
-- साभार विकी
केश्वे, अवनी गुगल आहे का?
केश्वे, अवनी गुगल आहे का?
रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर?
रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर? इकडे यूट्यूब दिसत नाही. घरून बघेन.
अवनी, 'गिनी मोठा'च सापडलं मलाही
नीरजा
ह्यावेळेस दीमांचा हात नाही सापडला तर त्यांनी टाकलेले पक्षीच मिळाले भंकस करायला
माहितीचा स्त्रोत संदिग्ध आहे.
माहितीचा स्त्रोत संदिग्ध आहे. 'वहिनी'. कुणाच्या? तुमच्या की आमच्या?
रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर?
रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर? इकडे यूट्यूब दिसत नाही. घरून बघेन.>> +१
ह्यावेळेस दीमांचा हात नाही सापडला तर त्यांनी टाकलेले पक्षीच मिळाले भंकस करायला >> हो ना
मस्तच पाककृती आहे. नक्की
मस्तच पाककृती आहे. नक्की करणार आणि फोटो टाकणार
१०० पैकी १००
ओ दिमा, एक प्रश्न.. तो चॉपर
ओ दिमा,
एक प्रश्न..
तो चॉपर पॅड कुठून घेतला ? माझ्याकडे पण आहे लाकडाचा पन मला आणखी एक हवा आहे म्हणून विचारतेय.. आधीचा कुठून घेतला तु हे विचारु नये..फ्लॅटमेटचे सामान वारसा हक्काने मजपर्यंत आले
भरीत आणि `दाखवायचं भांडं'
भरीत आणि `दाखवायचं भांडं' दोन्हीही मस्त !
अश्विनी, अग अवनीने लिहीलेलाच
अश्विनी, अग अवनीने लिहीलेलाच पक्षी आहे तो. मी लिहेपर्यन्त अवनीची पोस्ट आली.
चॉपिंग बोर्ड व जाळी, कर्टसी
चॉपिंग बोर्ड व जाळी, कर्टसी डीमार्ट.
त्या पक्ष्यांना आमचे शेजारी व त्या पक्ष्यांचे मालक 'चिनी कोंबडी' म्हणतात. चांगली गुडघ्याइतकी उंच असते जात. बिन्धास्त इकडेतिकडे फिरत असतात, कर्कश्श आवाज करत. कुत्री/मांजरं देखिल घाबरतात त्यांना.
म्हणजे पुढची रेसिपी चायनीज
म्हणजे पुढची रेसिपी चायनीज असणार तर
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
चॉपिंग बोर्ड >> तेच
चॉपिंग बोर्ड >> तेच ते..
डीमार्ट मधे लाकडी.. मी जाते तेथे तर निव्वळ प्लास्टीक विकतात.. आता परत शोध घ्यावा लागेल..
टीना, लाकडी चॉपिंग बोर्ड नाही
टीना, लाकडी चॉपिंग बोर्ड नाही मिळाला कुठे तर गावाला जाशील तेव्हा एखादं फळकुट रंधा मारवून पॉलिश करवून घे की. किंवा एखाद्या छोट्या पाटाचे पाय गायब झाले असतील तर त्याच्यावर सोपस्कार करुन वापर. बेस्ट फ्रॉम वेस्ट
लाकडाचे झारे, उलथनी, डाव
लाकडाचे झारे, उलथनी, डाव वगैरे मिळतात तिथे मिळू शकतो लाकडी चॉपिंग बोर्ड.
जुन्या विळीचे पाते काढून पाटाचा ला चॉ बो होऊ शकतो.
केश्वे, फळकुटाला पॉलिश मारण्यापेक्षा सन्मायका लावून घेतलेला बरा.
फळकुटाला पॉलिश मारण्यापेक्षा
फळकुटाला पॉलिश मारण्यापेक्षा सन्मायका लावून घेतलेला बरा.>>> अगं मग प्लॅस्टिक आणि त्याच्यात फारसा फरक नाही उरणार. टीनाला प्लॅस्टिकचा नक्वाय. तरी तिला लाकडी वापरल्याचा थोडासा आनंद मिळवायचा असेल तर लाकडाच्या डिझाईनचा सनमायका लावायचा
मला विळीच लागते चिरायला. सुरीने जमतच नाही भाजी चिरणे
बुकमार्क केली रेसिपी!! अजुन
बुकमार्क केली रेसिपी!! अजुन काय हवे!!!
ऑनलाइन ग्रील पण सापडले.
ऑनलाइन ग्रील पण सापडले. Barbecue Net मस्त आहेत. http://www.amazon.in/s/?ie=UTF8&keywords=gas+grill&tag=googinhydrmob-21&...
फोटो आवडले.अगदी साग्रसंगीत
फोटो आवडले.अगदी साग्रसंगीत केलय.
Pages