टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )

Submitted by दीड मायबोलीकर on 13 January, 2016 - 12:36
tomato bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल टमाटे : ३ मध्यम,
कांदा : १ मध्यम,
मिर्ची : एखाद दुसरी लहानशी. तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त.,
कोथिंबीर : थोडीशी,
लसूण : ३-४ पाकळ्या,
जिरं.,
मीठ.,
उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल. (फोटोत नाहिये)

क्रमवार पाककृती: 

माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्‍याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं.

तर,

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा :

टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा :

दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. (माझी स्पेशल शेफ'स नाईफ पाहून ठेवा Wink ) जिरं भाजून जाड कुटून घ्या.

सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)

चव पाहून मीठ घालून मिक्स करा.

वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.

ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला.

फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत 'दाखवायच्या' भांड्यात काढून फोटो काढा :

पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
एक-दोघांपुरतं.
अधिक टिपा: 

माबोवर अगदी अळूच्या देठांचं भरीत दिसलं, पण हे नव्हतं. म्हटलं टाकायला हवं.

कितीही वाटलं, तरी कांदा भाजू नका. चव अन टेक्स्चरमधला क्रंच जातो. हवं तर कांद्याची पात घालू शकता कांद्याऐवजी.

आमच्यात चपातीला पोळीच म्हणतात. पुरणपोळीला पुरणपोळी म्हणतात.

फोटो मारकांसाठी काढलेले आहेत. मारकं द्यावे ही नर्म इनंती.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके टीना. पण दीमांनी टाकलेले पक्षी कुठले आहेत? तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी कधी त्यांचं अन्न टिपताना दिसतात.

ओके टीना. पण दीमांनी टाकलेले पक्षी कुठले आहेत? तसले पक्षी माझ्या ऑफिसजवळ कधी कधी त्यांचं अन्न टिपताना दिसतात.
>> Guineafowl

गिनी मोठा पक्षी Wink
नेट वर हेच सापडलं

Guineafowl meat is drier and leaner than chicken meat and has a gamey flavour. It has marginally more protein than chicken or turkey, roughly half the fat of chicken and slightly fewer calories per gram. Guineafowl eggs are substantially richer than chicken eggs

-- साभार विकी

रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर? इकडे यूट्यूब दिसत नाही. घरून बघेन.

अवनी, 'गिनी मोठा'च सापडलं मलाही Lol

नीरजा Proud

ह्यावेळेस दीमांचा हात नाही सापडला तर त्यांनी टाकलेले पक्षीच मिळाले भंकस करायला Lol

रश्मीने काय दिलंय यूट्यूबवर? इकडे यूट्यूब दिसत नाही. घरून बघेन.>> +१
ह्यावेळेस दीमांचा हात नाही सापडला तर त्यांनी टाकलेले पक्षीच मिळाले भंकस करायला >> हो ना

ओ दिमा,
एक प्रश्न..
तो चॉपर पॅड कुठून घेतला ? माझ्याकडे पण आहे लाकडाचा पन मला आणखी एक हवा आहे म्हणून विचारतेय.. आधीचा कुठून घेतला तु हे विचारु नये..फ्लॅटमेटचे सामान वारसा हक्काने मजपर्यंत आले Happy

चॉपिंग बोर्ड व जाळी, कर्टसी डीमार्ट.

त्या पक्ष्यांना आमचे शेजारी व त्या पक्ष्यांचे मालक 'चिनी कोंबडी' म्हणतात. चांगली गुडघ्याइतकी उंच असते जात. बिन्धास्त इकडेतिकडे फिरत असतात, कर्कश्श आवाज करत. कुत्री/मांजरं देखिल घाबरतात त्यांना.

चॉपिंग बोर्ड >> तेच ते..
डीमार्ट मधे लाकडी.. मी जाते तेथे तर निव्वळ प्लास्टीक विकतात.. आता परत शोध घ्यावा लागेल..

टीना, लाकडी चॉपिंग बोर्ड नाही मिळाला कुठे तर गावाला जाशील तेव्हा एखादं फळकुट रंधा मारवून पॉलिश करवून घे की. किंवा एखाद्या छोट्या पाटाचे पाय गायब झाले असतील तर त्याच्यावर सोपस्कार करुन वापर. बेस्ट फ्रॉम वेस्ट Wink

लाकडाचे झारे, उलथनी, डाव वगैरे मिळतात तिथे मिळू शकतो लाकडी चॉपिंग बोर्ड.
जुन्या विळीचे पाते काढून पाटाचा ला चॉ बो होऊ शकतो.
केश्वे, फळकुटाला पॉलिश मारण्यापेक्षा सन्मायका लावून घेतलेला बरा.

फळकुटाला पॉलिश मारण्यापेक्षा सन्मायका लावून घेतलेला बरा.>>> अगं मग प्लॅस्टिक आणि त्याच्यात फारसा फरक नाही उरणार. टीनाला प्लॅस्टिकचा नक्वाय. तरी तिला लाकडी वापरल्याचा थोडासा आनंद मिळवायचा असेल तर लाकडाच्या डिझाईनचा सनमायका लावायचा Proud

मला विळीच लागते चिरायला. सुरीने जमतच नाही भाजी चिरणे Uhoh

Pages