मित्रहो,
शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.
या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.
तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.
तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.
यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.
यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.
पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.
सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..
मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?
यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.
तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.
या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.
मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)
अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.
असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.
दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू
या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.
याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..
संघाने हिंदू हा शब्द सोडून
संघाने हिंदू हा शब्द सोडून देवून भारतीय हा शब्द वापरावा व स्वतःच्या देशाचा तिरंगा फडकवावा
संघ सर्व देशभक्त भारतीयांना
संघ सर्व देशभक्त भारतीयांना हिंदू मानतो हे खरे आहे. जैन, बौध्द, शिख तर अगदीच भारतीय आणि देशप्रेमी आहेत. >> यामधे ख्रिश्चन आणि मुसलमान यांना तुम्ही वगळले आहे की संघ त्यांना "हिंदू" मानत नाही, संघाच्या नेत्यांनी याबाबत बरेच वेळा गोंधळात पाडणारी विधाने केली आहेत. "भारतात जन्मलेला तो हिंदू" यापासून अगदी काल-परवा आलेल्या "मुसलमानांचे डिएने तपासले तर ते हिंदूच असतील" या पर्यंत, संघ किंवा 'संघपरिवार' यांची ठोस भूमिका काय आहे, हेदेखिल स्प्ष्ट केल्यास बरे.
बेफींचे खालील मुद्दे अंशतः पटत आहेत.
१. प्रतिज्ञेमुळे डिस्क्रिमिनेशनचा जास्त आघात न सोसावा लागलेल्यांच्याही मनात तेढ पेरली जात नाही का?
२. एका धर्मापासून वेगळे होऊ पाहणारा आणि झालेला धर्म असा परिचय त्यागून स्वतंत्रपणे अस्तित्त्वात असलेला एक धर्म असा परिचय निर्माण होणे आवश्यक नाही का?
असो आता कथा मूळपदावर
असो आता कथा मूळपदावर आणायला-
प्रकु, ' शिवशक्ती संगम '
यातील शिव म्हणजे काय शक्ती म्हणजे काय, आणि संगम म्हणजे काय हे संघाच्या दृष्टिकोनातून लिहिता येईल का?
एखादा धागा काढण्याचे एवढेही
एखादा धागा काढण्याचे एवढेही प्रायश्चिस्त नसावे. धागा काढणारा संपूर्ण ज्ञानी असतो, काय? किती ते प्र्श्नांची सरबत्ती. मुळात विविध धर्मातील लोक आपापले सण-वार करीत असताना तेही देव- धर्म पुजा-अर्चा करीत असताना एवढा गहजब कशाला. आजही बौद्ध धर्म हिंदु सणवार करतात. तरीही एवढा आकांड-तांडव का? हेअनाकलनिय आहे.
चर्चा उत्तम चालली आहे.
चर्चा उत्तम चालली आहे. चिनुक्स, तात्या, कपोचे, जिज्ञासा,साती आणि अनेकांच्या पोस्ट्स आवडल्या.
इथे काही मोघम विचार आणि निरीक्षणे मांडण्याचे धार्ष्ट्य करीत आहे.
संघाकडून जाणून बुजून संस्कृतप्रचुर भाषा वापरली जाते. जे शब्द प्रत्यक्ष वापरात नाहीत तेही रूढ करण्याचा प्रयत्न जाणवतो. देशी आणि तद्भव शब्द, रुळलेले आणि अर्थवाही असे परकीय शब्द न वापरण्याचा, भाषाशुद्धिकरणाचा प्रयास जाणवतो. एकंदरीतच शुद्धिकरणाचा प्रयत्न जाणवतो. अर्थात संघाला ग्राह्य असेल ती व्यवस्था, भाषा म्हणजे शुद्धी. पण धर्मसुधारणा, कुप्रथानिर्मूलन, कर्मकांडाविषयी रोखठोक भूमिका संघ घेताना दिसत नाही. आता यावर संघस्वयंसेवक असे वागतात, तसे वागतात हे अपेक्षित उत्तर इथे अपेक्षित नाही. समाजवादी जसे सुधारणांविषयी उघड भूमिका घेतात, तशी भूमिका आणि कार्य संघाकडून दिसत नाही. समान संस्कृती या नावाखाली आणि ध्येयाखाली कोणती संस्कृती संघ आणू इच्छित आहे ते इतरेजनांना समजेल इतकी स्पष्टता आणि पारदर्शीपणा संघात दिसत नाही. संतमहंतांची, आखाडेबाज साधूंची उग्र वागणूक संघाला किंवा संघसंबंधितांना आदरणीय वाटते.
आणखी एक मुद्दा: उद्या बौद्धांनी त्यांचे जुने विहार, चैत्य, स्तूप जे शिवलिंग, गणपती, इतर देवीदेवतांची मंदिरे म्हणून हिंदूंकडून पूजले जाताहेत, ते आपल्या ताब्यात यावेत, तिथे आपल्या पद्धतीने उपासना चालावी अशी चळवळ उभारली तर संघ तिला पाठिंबा देईल का? की हिंदू-बौद्ध एकच अशी हुशार खेळी खेळेल? संघटनाबांधणी हे साध्य आहे की साधन आहे तेही संघाच्या बाबतीत स्पष्ट होत नाही. अर्थात ते दोन्ही आहे असा खुलासा मिळू शकेल. शिस्तीत डावा-उजवा किंवा एक दो कदमताल करणे हे रेजिमेंटेशन- बराकीकरण झाले. या शिस्तीपलीकडे काय? केवळ आज्ञापालन? आणि त्याचेच भूषण?
संघ आणि जातीभेदनिर्मुलन
संघ आणि जातीभेदनिर्मुलन :
संघाच्या स्थापनेमागची भूमिका :
डॉ.हेडगेवार यांनी अगोदर क्रांतिकारी म्हणून आणि नंतर कॉंग्रेसमधून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. परंतु इंग्रज कधी जातील त्यापेक्षा 'इंग्रज आपल्यावर इतका काळ राज्य का करू शकले' हा प्रश्न त्यांना भेडसावत असे.
यामध्ये परकीय गोष्टींना दोष देण्यापेक्षा आपल्या समाजात काय उणीवा हे शोधावे व त्या दूर करण्याकरता कार्य करावे असे त्यांना वाटले.
आपल्या समाजातील त्रुटी म्हणजे समाज संघटीत नाही. त्याला कारण म्हणजे समाजात असलेली विषमता. जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्यता, उच्च-नीच भेदभाव अशा अति-अयोग्य गोष्टी हिंदू समाजात आहेत. यामुळे एक मोठा घटक प्रगती पासून वंचित राहिला.
या उणीवा दूर करण्या साठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघात सुरुवातीपासून सर्व जातीजमातींमधील लोकांना मुक्त प्रवेश होता.
------
डिसेंबर १९३४ मध्ये संघाचे शिबीर वर्ध्याला भरलेले गांधीजीं शिबीराजवळ वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी एकदा शिबिराला भेट दिली. या भेटीत स्वयंसेवकांना बरेच प्रश्न विचारून सर्व स्वयंसेवक हिंदू म्हणून एकत्र आहेत त्यांच्यात कोणत्याही जातिभेदाला थारा नाही याची त्यांनी खातरजमा करून घेतली. तसेच सर्व स्वयंसेवक सरमिसळीने राहतात पंक्तीत एकत्र जेवायला बसतात याची पडताळणी त्यांनी केली.
१९३९ मध्ये संघ शिक्षा वर्गात डॉ.आंबेडकरांना हाच अनुभव आला. सकाळी येऊन बाबासाहेबांनी सर्व कार्यक्रम पहिले आणि दुपारी हेडगेवार आणि इतर स्वयंसेवकांसोबत त्यांनी भोजन घेतले. त्यानंतर डॉ. हेडगेवारांच्या विनंतीवरून बाबासाहेब तासभर 'दलित आणि दलितांचा उद्धार' याविषयी बोलले.
डॉ.आंबेडकरांनी देखील स्वयंसेवकांना प्रश्न करून शाखेत कोणताही भेदभाव नाही हे तपासून पहिले.
--------
सन १९६०मध्ये इंदोर येथील अखिल भारतीय शिबिरात द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी म्हणाले, "आज जातीव्यवस्था सर्व प्रकारे भ्रष्ट झाली आहे यात संदेह नाही. नवे घर उभे करण्याकरता जुने घर अनेकवेळा पाडावे लागते. आज ज समाजरचना अस्तित्वात आहे ती विकृत आहे. ती इथूनतिथून फोडून तिचा ढीग केला पाहिजे. तिथून पुढे जे विशुद्ध रूप बनेल ते बनेल. आपल्याला सर्वांचा एकरस असा समूह तयार करून, आपल्या विशुद्ध राष्ट्रीयतेचे संपूर्ण स्मरण हृदयात ठेऊन राष्ट्राच्या नित्य चैतन्यमय व सूत्रबद्ध सामर्थ्याची आकांक्षा अंतःकरणात जागृत ठेवणारा समाज उभा करावयाचा आहे. "
"संघ जात मानत नाही. संघाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. जातीसंस्था आज देश्काल्बाह्य झालेली आहे. माझी अशी इच्छा आहे कि अस्पृश्यता कायद्याने नव्हे तर प्रत्यक्षच संपुष्टात यावी. या दृष्टीने मला फार वाटते कि धर्माचार्यानीच अस्पृश्यतानिवरणाला धार्मिक मान्यता द्यावी." असे मत गुरुजींनी मांडले.
पुढे याला मूर्त स्वरूप देण्याकरता १९६९च्या उडुपी येथील संमेलनात सर्व पंथांच्या धर्माचार्यांच्या उपस्थितीत 'कोणीही हिंदू पतित नाही, सर्व हिंदू बंधू आहेत' असा प्रस्ताव संमत झाला. हा प्रस्ताव ज्यांच्या अध्यक्षतेखाली संमत झाला ते आर.भरनैय्या हे स्वतः अनुसूचित जातीतील आय.ए.एस. अधिकारी होते. त्यांनी भावनावश होऊन गुरुजींना आलिंगन दिले.
तथापि नुसते प्रस्ताव संमत करून अस्पृशता नष्ट होणार नाही हे गुरुजी जाणत होते. संघाच्या स्वयंसेवकांनी त्याचा पाठपुरावा करून जगातील हिंदूंनी आपल्या एकमेकांतील व्यवहारात एकात्मता तसेच समानतेची भावना आपल्याजवळ बाळगली पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.
--------
दि.८ मे १९७४ रोजी पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे 'सामाजिक समता व हिंदू संघटन' या विषयावर भाषण झाले. संघाची सामाजिक समरसतेची भूमिका समजून घेण्यासाठी हे भाषण वाचले पाहिजे.
'अस्पृश्यता चूक नसेल तर जगात काहीच चूक असू शकत नाही. पिढ्यानपिढ्या आलेले अवगुण व दोष दूर करण्याचे प्रयत्न करणे हि आजच्या काळाची दिशा असली पाहिजे' असे विचार बाळासाहेबांनी मांडले.
दि.२८,२९ मार्च १९८१ला झालेल्या संघाच्या अ.भा.प्रातिनिधिक सभेत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास राहिलेल्या बंधूंना उर्वरित समाजाशी समकक्ष करण्यासाठी आरक्षण व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला.
१४ एप्रिल १९८३ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी डॉ. हेडगेवारांचा वर्षप्रतिपदेच्या दिवशी येणारा जन्मदिवस होता. हा योग साधून संघाच्या प्रेरणेने महाराष्ट्रात 'सामाजिक समरसता मंच' स्थापन करण्यात आला.
त्या वेळी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विषय ऐरणीवर आला होता. सामाजिक वातावरण गढूळ झाले होते. त्या वेळी संघ स्वयंसेवकांनी गावागावात जाऊन सभा घेऊन समाजाची मनोभूमिका नामांतरासाठी अनुकूल केली. भीतीने आपले घरदार सोडणाऱ्या मराठवाड्यातील अनेक दलित बांधवांना पुण्या-मुंबईकडील संघकार्यकर्त्यांनी आपल्या घरी आसरा दिला होता.
सन १९८७ मध्ये महाराष्ट्रात 'रिडल्स' प्रकरणामुळे गदारोळ माजला होता. त्यावेळी डॉ.आंबेडकर थोर राष्ट्रपुरुष असून राजकीय विवाद उत्पन्न करून समाजाचे विभाजन करू नये अशी भूमिका संघाने घेतली. दि.६ डिसेंबर १९८७ ला सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.आंबेडकरांना अभिवादन केले. त्यावेळी श्रीमती माई आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले होते.
सन १९९०-९१ मध्ये डॉ.आंबेडकरांच्या जन्मशताब्दी आणि म.फुले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त पुण्याच्या फुले वाड्यापासून ते नागपूरच्या दिक्षाभूमिपर्येंत ९००० किमी अंतराची आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून जाणारी 'फुले-आंबेडकर संदेश यात्रा' काढण्यात आली. हे दोन्ही महापुरुष सर्व समाजाचे आहेत, सर्व समाजाने त्यांना स्वीकारले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
डॉ.आंबेडकरांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संघ स्वयंसेवकांनी मुंबईत व अन्यत्र संचलन करून मानवंदना दिली. मुंबईत झालेल्या समारोपाच्या विराट कार्यक्रमात बौद्ध भिक्षुंसोबत चतुर्थ सरसंघचालक प्रा. राजेंद्र सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी उपस्थित होते.
मंदिरप्रवेश :
केरळच्या गुरुवायूर मंदिरात दुपारच्या पूजेनंतर केवळ ब्राह्मणांना जेवण देण्याची पद्धत होती. त्याला विरोध म्हणून डाव्या विचारांच्या केरळ हरिजन फेडरेशनचे क्ल्लार सुकुमारन यांनी तिरुवनंतपुरमच्या श्री पद्मनाभ मंदिरापासून गुरुवायूरपर्यंत १०० दलितांना घेऊन ३७० किमी पदयात्रा आयोजित केली. दि. १५ फेब १९८३ ला गुरुवायूर मंदिरात पोहोचून तेथे ब्राम्हणासोबत भोजन करण्याचा त्यांच्या कार्यक्रम होता. आपल्या आंदोलनास पाठींबा द्यावा असे पत्र त्यांनी संघकार्यालयात पाठविले.संघाने त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन पद्यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत घडवून आणले, पदयात्री मंडळींचे भोजन योजनापूर्वक तथाकथित उच्च जातीच्या संघकार्यकर्त्यांच्या घरी आयोजित करणे अशी सर्व मदत संघाने केली.
२ मार्च १९३०ला बाबासाहेबांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी जेव्हा रामपादुका नाशिकमध्ये आल्या तेव्हा त्यांचे स्वागत आणि प्रथम पूजन त्या आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध सत्याग्रहीच्या हस्ते करण्यात आले. दि. १० नोव्हेंबर १९८९ या दिवशी अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा शिलान्यास दलित कुटुंबात जन्मलेल्या कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते करण्यात आला.
१९९० पासून तमिळनाडूतील ग्राम मंदिर पुजारी मंच हा विभाग दरवर्षी २५ दिवसांचे ग्रामीण भागातील सर्व जातीच्या लोकांसाठी 'पुजारी प्रशिक्षण वर्ग' आयोजित करतो.
संघाच्या धर्मजागरण समन्वय विभागाने पश्चिम महाराष्ट्रात सन २०११ पासून अनुसूचित जातीतील बांधवांसाठी 'पुरोहित प्रशिक्षण वर्ग' सुरु केले. असे चार वर्ग आतापार्येंत झाले असून त्यात एकूण १०४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग प्रत्येकी १२ दिवसांचे असून त्याचा आभ्यासक्रम त्र्यंबकेश्वरच्या दीक्षित भटजींनी तयार केला आहे. त्याला चार पिठाच्या शंकराचार्यांनी मान्यता दिली आहे. प्रशिक्षित झालेल्या पुरोहितांना समाजमान्यता आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून ठीकठीकाणचे सर्व जातींचे संघ कार्यकर्ते त्यांना आवर्जून आपल्या घरी धर्मिक कार्याच्या पौरोहीत्याला बोलावतात.
चिनुक्स ह्यांच्यामुळे इथे
चिनुक्स ह्यांच्यामुळे इथे विज्ञानाविषयी चर्चा झाली. संघ आणि विज्ञान हे कोम्बिनेशन वाचुन हसु राहावले नाही . अहो देशातील अग्रणी संघसेवक पंप्र मोदी हे एका इस्पितळाच्या उद्घाटनातील भाषणात म्हणतात की सर्जरी आपल्या इथे पुराणकाळापासुन आहे ह्यासाठी गणेश ह्या देवतेचे उदाहरण देतात.अग्रणि संघसेवकाची ही कथा तर बाकिच्यांचे काय बोलायचे. शाळा बांधण्यासाठी हे चळवळ उभी करणार नाहित.मंदिरासाठी करतील कारण त्यांच्याद्रुष्टिने मंदिर हे शाळेपेक्षा महत्वाचे आहे असे का हे सुज्ञास सांगणे न लागो.
मुकु, तुम्ही का बरं त्रागा
मुकु, तुम्ही का बरं त्रागा करुन घेतांय? धागकर्ता प्रकु हे संघाशी संबंधित आहेत, त्यामुळे संघासंबंधिचे प्रश्न त्यांना विचारले जाणारच, तुम्हाला संघाविषयी माहिती असल्यास तुम्हीदेखिल या प्रशांची उत्तरे देऊ श्कता. यात प्रायश्चित्त क्सले?
अगदी सहमत. बाबरी मशीद पाडून
अगदी सहमत.
बाबरी मशीद पाडून राममंदिर बांधणे हे जर संघाला पटते तर बौद्धांकडुन हिसकावुन घेतलेली स्तूपे , बौद्धविहार संघ बौद्धाना परत करेल का ?
संघ त्यांच्या ' टोळी' च्या व्याख्येत मुस्लिम ख्रिस्चनाना समाविष्ट करत नाही , या टोळीला भारतीय हा शब्द वापरण्याचे सोडून हिंदु हा शब्द वापरला जातो, त्याचा अर्थ अगदी उघड आहे... मुस्लुम ख्रिच्सनाना शह देणे हाच यांचा मुख्य अजेंडा आहे.
राहिला प्रश्न समाजसेवेचा... तर इतर अनेक व्यक्ती , संघटनाही ते करत असतात.
साती, भागवतांच्या भाषणात
साती,
भागवतांच्या भाषणात ह्यावर संघाचे काय नेमके म्हणणे आहे ते विषद केलेय:
संघाचे संघटन तत्त्वनिष्ठ आहे, ते व्यक्तिनिष्ठ नाही, त्यामुळेच तत्त्वांचे अनुकरण करायचे असते. तत्त्वाचे सगुण रूप म्हणून शिवाजी महाराजांकडे आपण पाहतो. म्हणूनच संघाच्या सहा उत्सवांमध्ये शिव-उत्सवाचा समावेश पूर्वीपासूनच आहे. त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक छत्रपतींच्या चरित्राचे स्मरण करतात. शिव ही शिवत्वाची परंपरा आहे. "सत्यम् शिवम् सुंदरम्' ही देशाची संस्कृती आहे. शिवत्वाचे शाश्वत अस्तित्व जगाने ओळखले आहे. मात्र, जगाची रीत शक्ती ओळखणारी असल्याने शिवविचार आणि शक्तीचा संगम आवश्यक आहे.''
http://www.esakal.com/esakal/20160103/4824410410723158150.htm
बौध्द धर्माविषयी वरती चर्चा
बौध्द धर्माविषयी वरती चर्चा झालेली आहे. माझ्या मते बौध्द धर्म आणि शिवधर्म हे दोन धर्म हिदुत्वापासुन बर्याच अंशी सुटका करून घेउ शकलेले आहेत.
होय हो. म्हणूनच गोंधळ
होय हो.
म्हणूनच गोंधळ होतोय.
शिव म्हणजे शिवाजी राजे की शिव म्हणजे शिवभगवान की शिव म्हणजे पवित्र!
कारण शक्तीशी जोडणार तर शिव म्हणजे शंकर हवे.
शिवाजीशी जोडणार तर शिवाजी स्व्तःच एक शक्ती आहे त्याना आणखी कुठल्या शक्तीशी संगम करायची गरज काय?
The extermination of Buddhism
The extermination of Buddhism in India was hastened by the large-scale destruction and appropriation of Buddhist shrines by the Hindu Brahmins. The Mahabodhi Vihara at Bodh Gaya was forcibly converted into a Shaivite temple, and the controversy lingers on till this day. The cremation stupa of the Buddha at Kushinagar was changed into a Hindu temple dedicated to the obscure deity with the name of Ramhar Bhavani. Adi Shankara is said to have established his Sringeri Mutth on the site of a Buddhist monastery which he took over. Many Hindu shrines in Ayodhya are said to have once been Buddhist temples, as is the case with other famous Brahminical temples such as those at Sabarimala, Tirupati, Badrinath and Puri.
..
..
अयोध्येचे मंदिर हिंदुना हवे तर त्यानी ही बौद्धस्थानेही परत करावीत.
दि.२८,२९ मार्च १९८१ला
दि.२८,२९ मार्च १९८१ला झालेल्या संघाच्या अ.भा.प्रातिनिधिक सभेत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास राहिलेल्या बंधूंना उर्वरित समाजाशी समकक्ष करण्यासाठी आरक्षण व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला
हसू आवरेना !
जणु आरक्षण याम्च्या खिशातूनच देणार होते ...
आरक्षणाला विरोध कर्णारे लोक कोण असतात ?
नासिर आजून कोणी ... किती
नासिर आजून कोणी ...
किती फेकायच? रामहर भवानी काय? रामाभार स्तूप जशाच्या तसा अजूनही आहे. कोणतीच मूर्ती प्रस्थापित केलेली नाहीये तिथे.
केंद्रसरकार व राज्यसरकार
केंद्रसरकार व राज्यसरकार सध्या बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकं व भीमजयंती 125'वी देशभर मोठ्या थाटात हर्षोल्हासात वभव्यदिव्य अशी साजरी करणार असल्याचं दिसत आहे विचार'करा हीच आरएसएस पूर्वी बुद्ध फुले शाहू वआंबेडकर यांना यांच्या विचारांना आणि अद्वितीयकार्यकर्तृत्त्वाला विरोध करायची आज यांच्या हातात 'केंद्रवराज्य'दोन्हीही सत्ता असताना ''बुद्ध फुले शाहू आंबेडकर ''विचारधारेचा' बुरखापांघरण्याची गरज का म्हणून वाटावी???
मंडल आयोग हा ५२% हिंदुं ओबिसी
मंडल आयोग हा ५२% हिंदुं ओबिसी लोकांच्या हितासाठी होता.त्याला देशभरातुन तिव्र विरोध झाला.५२%ओबिसी, दलित, आदिवासि, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शिख, जैन ह्या लोकांचा ह्या आयोगाला विरोध नव्हता.मग ह्या आयोगाविरूध्द वातावरण कोणी तापवले? एकीकडे हिंदु सारे एक म्हणायचे नि दुसरीकडे ५२% हिंदुच्या हिताला विरोध करायचा हा विरोधाभास नव्हे का?
चांगलि चर्चा चाललि आहे. बाकी
चांगलि चर्चा चाललि आहे.
बाकी संघाने सर्वसमावेशक वृत्ती ठेवली असेल तर अमक्या जातीची आणि तमक्या समुदायाची , तमक्या लिंगाची वेगवेगळी विंग काढण्यापेक्षा, (हल्लीच ख्रिश्चन विंगची घोषणा झालीय) एक समानच अजेंडा ठेवावा.
हिंदू ऐवजी भारतीय शब्द वापरावा. सगळे एकच म्हटल्यावर बाबरी असली काय आणि मंदीर असलं काय , एकच, असे म्हणून बाबरी मशीदीचा नाद सोडावा .
स्त्रियांचा सहभाग फक्त स्वागतगीते गाणे आणि शिदोर्या रांधणे यापेक्षा जास्त ठेवावा अश्या काही किमान अपेक्षा आहेत.
.
.
प्रकु, उत्तम माहिती. मला
प्रकु, उत्तम माहिती. मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळल्या.
काही नेहमीच्या पकाऊ उपद्रवी आयडीजकड़े दुर्लक्ष करा. काही आयडीजना रिप्लाय करा. वाचकांना कोण काय आहे माहीत आहेच!
तात्या, मी तुमचं मत नाही ,
तात्या, मी तुमचं मत नाही , संघाची अधिकृत भूमिका अधिकृत स्वयंसेवक म्हणून प्रकुंना विचारत्येय.
बाकी प्रकु, तुमची ती संघ आणि जातीभेदनिर्मुलनाची पोस्ट पाहून डोळ्यात पाणी आले.
इतके महान विचार आणि आचारही संघाच्या नेत्यांचे असतील तर संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत ते न झिरपता फक्त दिखाऊ शिस्त आणि कडवेपणाच झिरपला असे प्रत्यक्ष आणि जालीय ओळखीच्या संघवाल्यांकडे बघून वाटते.
साती, बाहेरही तीच परिस्थिती
साती, बाहेरही तीच परिस्थिती आहे.
सकुरा, आपल्या पोस्टीमधल्या
सकुरा,
आपल्या पोस्टीमधल्या उल्लेखांचे काही न्यूज मिळू शकतील काय? बढतीमधील प्रमोशन, सुप्रीम कोर्टाने बंद केले हे इतक्यात वाचले होते. इतरांसंबंधी लिंक मिळाल्यास आभारी राहील.
ठीके साती. संपादित.
ठीके साती. संपादित.
शिवाजी महाराजांच्या
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते? का विरोध करत होते?
आत्ताच त्यांचा उदो उदो का?
मुद्द्याला धरुन चर्चा
मुद्द्याला धरुन चर्चा करणार्या सदस्यांनो सावधान! सचिन पगारे आणि सकुरा ह्या दोन महान आयडी इथे पुन्हा 'सक्रीय' झाल्यात.
अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचे
अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचे मंदिर हा अगदी उघड उघड बौद्धविहार आहे.
अहो तात्या रोजच्या पेपरातल्या
अहो तात्या रोजच्या पेपरातल्या बातम्या आहेत त्या.
तुमच्या कडे कुठला पेपर येतो माहित नाही
आमच्या कडे सम्राट पेपर येतो त्यात असतात या बातम्या त्याची कुठली साईट नाही त्यामुळे लिंक देता येणार नाही.
पत्ता दिलात तर कात्रणे पाठवता येतिल.
पगारे | 11 January, 2016 -
पगारे | 11 January, 2016 - 23:28
मंडल आयोग हा ५२% हिंदुं ओबिसी लोकांच्या हितासाठी होता.त्याला देशभरातुन तिव्र विरोध झाला.५२%ओबिसी, दलित, आदिवासि, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शिख, जैन ह्या लोकांचा ह्या आयोगाला विरोध नव्हता.मग ह्या आयोगाविरूध्द वातावरण कोणी तापवले? एकीकडे हिंदु सारे एक म्हणायचे नि दुसरीकडे ५२% हिंदुच्या हिताला विरोध करायचा हा विरोधाभास नव्हे का?
राजिव गांधींनी मंडल विरोधात अडीच तास भाषण दिलं होतं. वाचलं आहे का पगारे? तुमचं काय मत आहे राजीवजींबद्दल?
१९३९ मध्ये संघ शिक्षा वर्गात
१९३९ मध्ये संघ शिक्षा वर्गात डॉ.आंबेडकरांना हाच अनुभव आला. सकाळी येऊन बाबासाहेबांनी सर्व कार्यक्रम पहिले आणि दुपारी हेडगेवार आणि इतर स्वयंसेवकांसोबत त्यांनी भोजन घेतले. त्यानंतर डॉ. हेडगेवारांच्या विनंतीवरून बाबासाहेब तासभर 'दलित आणि दलितांचा उद्धार' याविषयी बोलले.
डॉ.आंबेडकरांनी देखील स्वयंसेवकांना प्रश्न करून शाखेत कोणताही भेदभाव नाही हे तपासून पहिले. >>>
हे कुठे वाचायला मिळेल ?
Pages