मित्रहो,
शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.
या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.
तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.
तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.
यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.
यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.
पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.
सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..
मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?
यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.
तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.
या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.
मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)
अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.
असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.
दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू
या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.
याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..
भाजप, अभाविप, विहिंप, बजरंग
भाजप, अभाविप, विहिंप, बजरंग दल इ. डु आय काढून काड्या करण्याची सवय अग्दी मुरली आहे संघ अन संघिष्टांच्या अंगांगात.
(No subject)
जातीयवाद कशातून येतो ? केवळ
जातीयवाद कशातून येतो ?
केवळ कायदे केल्याने जातीयवाद बंद होत नाही. एकटेदुकटे आंजा विवाह केल्यानेही तो नष्ट होत नाही. जातीयवाद मोडायचा तर मोठ्या प्रमाणावर आंजा विवाह व्हायला हवेत. जातीयवाद मोडायचा तर त्याचा उगम, कारणे समजून घेऊन ती स्वतःपुरतीच न ठेवता इतरांनाही समजावून सांगितली पाहीजेत. आजार घालवायचा तर आजारावर बोललं पाहीजे. रुग्णाची तपासणी केली पाहीजे. आजारावर बोलणारा, उपचार करणारा तो जातीयवादी अशी उफराटी मांडणी केली जाते त्यामागचे हेतू जातीयवाद जोपासणा-या संस्थेला जगवण्याचे असू शकतात.
गंमत म्हणजे जातीयवाद म्हणून ओरडणारे स्वतःही जातीयवादाचे शिकार असतात हे त्यांना माहीतही नसतं. दोन प्रकारचे जातीयवादी त्यामुळे दिसतात. एक अज्ञानातून जातीयवाद जोपासणारे आणि दुसरे जातीयवादाचे फायदे माहीत असल्याने अथवा उच्च नीच व्यवस्था मान्य असल्याने जाणीवपूर्वक पाठिंबा देणारे.
पैकी अज्ञानातून किंवा प्रथा, परंपरा म्हणून जातीयवाद पाळणा-यांना बदलत्या काळाच्या दबावाखाली त्याचे जुनाट रूप सोडून देणे सोपे गेले. मात्र जातीयवादाच्या समर्थकांना अनिच्छेनेच बदलाला समर्थन द्यावे लागले. जातीयवाद नको पण जात हवी असं एक नवं रसायन त्यामुळे हळू हळू रुजवता आलं.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचे आंदोलन उभे राहीले, नवनिर्माणाचे आंदोलन उभे राहीले, अलिकडच्या काळात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभे राहीले पण सामाजिक भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन कुणाला उभे करावेसे वाटले का ? स्वातंत्र्यपूर्व काळात आंदोलन उभे राहील्याने त्याचे अनेक फायदे मिळाले. पण जात नष्ट झाली नाही. उतरंडीतून सर्वात खालच्या थरावरच्या माणसाने मी जात सोडतो म्हणून चालत नाही. तो बाजूला झाली तरी बाकीची व्यवस्था इथेच आहे आणि तो ही इथेच नांद्णार आहे. त्याची ओळख या इतरांसाठी बदलत नाही. इतरांसाठी त्याची जात कुठे गेली ?
त्यामुळे जात इतरांच्या मनातून जाण्यासाठी सामाजिक आंदोलन व्हायला हवे.
यासाठी संघ, काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, नक्षलवादी, ब्रिगेड, आंबेडकरवादी तयार आहेत का ?
ज्या संघटनेचे नेते अशी अचाट
ज्या संघटनेचे नेते अशी अचाट वक्तव्ये करीत असतात, ज्यांचे अनुयायी अश्लाघ्य कृत्ये करतात, त्यांना थांबवण्याऐवजी जे नेते त्याकडे दुर्लक्ष करतात, साधी स्लॅप ऑन हॅंडही नाही. त्या संघटनेबद्दल सहानुभूती का ठेवावी म्हणे? >>> असल्या प्रकारांबद्दल अजिबात सहानुभूती नाही. पण ते संघटनेबद्दल. त्यातले लोक जे परिचयातले आहेत ते "नॉर्मलच" आहेत. ते स्वतः काही करत नसले तर उगाचच त्यांना कशाला दूषणे द्यायची? त्यांनी याविरूद्ध आवाज उठवावा वगैरे ठीक आहे, तो त्यांचा चॉईस आहे.
पण ते संघटनेबद्दल. त्यातले
पण ते संघटनेबद्दल. त्यातले लोक जे परिचयातले आहेत ते "नॉर्मलच" आहेत. ते स्वतः काही करत नसले तर उगाचच त्यांना कशाला दूषणे द्यायची? त्यांनी याविरूद्ध आवाज उठवावा वगैरे ठीक आहे, तो त्यांचा चॉईस आहे.
<<
डब्लूटीएच! मग नेत्यांचं, पॉलिसी मेकर्सचं काय???
(बोल्ड केलेल्याबद्दल नंतर लिहीतोय)
फारेण्डा,
माझेही अनेक जवळचे मित्र संघ, विहिंपचे फार अॅक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. शिवसेना अन मनसे, दोन्हींचे नेते, कार्यकर्ते माझ्या जवळच्या संबंधात आहेत. याचा अर्थ असा नव्हे, की मी त्यांच्या फिलॉसॉफीला अॅक्सेप्ट करावे.
जिथे जमेल तिथे त्यांचे प्रबोधन करायचा प्रयत्न मी करीतच असतो. ज्या व्यक्तींमधे कडवट धर्मांधता, किंवा छुपे अजेंडे - उदा. वनवासी आश्रमाचे काम करताना इतर धर्मांबद्दल विखार इ. दिसतात, तिथे मी संबंध तोडून टाकून खुलेपणाने भांडण स्वीकारतो. बाकीच्यांना मी काय आहे ते ठाऊक आहे, अन मला ते लोक व्यक्ती म्हणून ठाऊक आहेत.
पण, ज्याप्रमाणे एका प्रकारच्या लोकांमुळे संघ वाईट नाही, त्याचप्रमाणे तो दुसर्या प्रकारच्या लोकांमुळे चांगलाही नाही. संघ हा मुळातच त्याच्या मूलभूत विचारांसाठी वाईट आहे.
कोणते हे मूलभूत विचार?
उदाहरण क्र. १.
"हिंदूं"चे संघटन.
हिदुत्व ही "लाईफस्टाईल" असल्याच्या कितीही बाता मारल्या, तरी हिंदू म्हणजे काय, ते सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम सिंपल उत्तर, इ. २री च्या मुलांना समजेल असे = 'देवळात जातात ते हिंदू'. अन इ. हागरीबिगरीच्या लोकांसाठी, शाळेच्या दाखल्यात अन इतर सर्कारी कागदांवर जे धर्माच्या रकान्यात 'हिंदू' लिहितात ते.
ओके. गुड.
कशासाठी हे असे संघटन करणे गरजेचे आहे? धर्माच्या बेसिसवर का?? राष्ट्रभक्त ना तुम्ही? मग भारतीयांचे संघटन का नको? हिंदूच का??
जर रोजच्या जगण्यात ९९% वेळा, उदा. जॉब, प्रवास, जेवण, झोप, व्यायाम इ. इ. इ. करताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा इतरही धर्माची गरज वा संबंध वा उपयोगच नसेल, तर धर्माच्या बेसिसवर संघटन करण्याची गरज काय?
जर, आम्ही क्ष्क्षचे संघटन करीत आहोत, तुम्ही संघटनेत या. असे सांगायचे असेल, तर अनुयायी जमा करण्यासाठी लॉजिकली काय करावे लागेल? उत्तर आहे, क्ष्क्ष असणे हे लय भारी असते. क्ष्क्ष हे जगातली सर्वात मोठी शक्ती आहेत. यांच्याशिवाय जग चालत नाही.
जगातील कामगारांनो, एक व्हा. जगातील हिंदूंनो, एक व्हा. आर्य लोकांनो, एक व्हा.
याच्या पुढे कुठे जाते ही विचारधारा?
चला! उठा!! आपले श्रेष्ठत्व सिद्ध करा!!!
त्या काफिरांना.... त्या अमक्यांना.....
*
>>त्यांनी याविरूद्ध आवाज उठवावा वगैरे ठीक आहे, तो त्यांचा चॉईस आहे.<<
"मुसलमानांनी त्यांच्या धर्मात सुधारणा घडवून आणावी. तो त्यांचा चॉईस आहे."
↑ या वाक्याबद्दल काय म्हणणे आहे तुमचे?
"संघ आपल्या धर्मात सुधारणा घडवण्याच्या विरोधी आहे, पण त्यांच्या धर्मात ताबडतोबीने सुधारणा आणू पाहतो."
↑ या वाक्याबद्दल काय म्हणणे आहे तुमचे?
बरेच काही आहे लिहिण्यासारखे.
*
शिव-शक्ती चा संगम करायचाय. एल ओ एल. गेली ९० वर्षे काय करीत होते मग? आज जाग आली?? ९० वर्षांचा हिशोब मागावा का?
जर रोजच्या जगण्यात ९९% वेळा,
जर रोजच्या जगण्यात ९९% वेळा, उदा. जॉब, प्रवास, जेवण, झोप, व्यायाम इ. इ. इ. करताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा इतरही धर्माची गरज वा संबंध वा उपयोगच नसेल, तर धर्माच्या बेसिसवर संघटन करण्याची गरज काय? >>> काही गरज नाही. 'भारतीय' ही एकच ओळख बास आहे.
बाकी माझे म्हणणे काय आहे विचारलेत ते प्रश्न समजले नाहीत. हिंदूंच्या चालीरीतीत सुधारणा सुचवणार्यांना 'त्यांना जाउन सांगा' हे मी कधीच म्हणत नाही.
फा, मी संघाबद्दल बोलतो
फा,
मी संघाबद्दल बोलतो आहे.
संघ वाईट का आहे? , त्याबद्दल.
तुम्ही तुमच्या ओळखीतल्या अॅनेक्डोटल "स्वयंसेवकां"बद्दल बोलून, व्यक्ती चांगल्या आहेत, म्हणून संघ चांगला (किंबहुना अशा व्यक्ती संघात आहेत, तेव्हा संघ वाईट कसा?) अशी थेरी मांडलीत, त्यानंतर, तुम्ही संघाला वाईट का म्हणायला हवे, त्याचे विवेचन वरती आहे.
>>
हिंदूंच्या चालीरीतीत सुधारणा सुचवणार्यांना 'त्यांना जाउन सांगा' हे मी कधीच म्हणत नाही.
<<
असे म्हणून तुम्ही संघाऐवजी हिंदूंतील समाजसुधारकांबद्दल बोलायला सुरुवात केलीत.
या बोटावरची थुंकी त्या बोटावर. See?
संघाच्या व्यवच्छेदक लक्षणांपैकी एक. तुम्हाला परत ते हे म्हणू का?
मी 'मुद्दे' म्हणणार नाही,
मी 'मुद्दे' म्हणणार नाही, अनेक शंका आहेत असेच अजूनही म्हणेन, अनेक इतर निकष अजून चर्चेत यायचे आहेत असेही म्हणेन. पण हे सगळे आता लिहिण्यात अर्थ उरलेला नाही. जो टोन प्रशासनही कधी वापरताना दिसत नाही तो इथे कोणताही आय डी वापरू लागलेला आहे.
१. संघाने केलेले सामाजिक काम
२. आपत्तीकालीन सहाय्य
३. संघाने काळाबरोबर बदलत असल्याचा दावासुद्धा का करू नये, तोही दांभिकपणाच आहे, हे सिद्ध होण्याआधीच इतका आक्रस्ताळेपणा का? जी गोष्ट आज केली जात आहे ती नव्वद वर्षांपूर्वी केली असती तर आणि तरच मान्य होणार होती का? डायनॅमिक्स असतात हे मान्य नाही का? संघाला व्याप्ती वाढवण्यासाठी काही नांवे जवळ करावी लागत आहेत असे म्हंटले जात आहे व त्यात तथ्यही असेल. पण ते सगळेच करत नाहीत का? संघाने शिस्त दर्शवली म्हणून संघाने कधीच स्वतःच्या म्हणण्यापासून ढळू नये का? इतके कडक निकष इतरांबाबतीत का नाहीत? केवळ इतरजण 'आम्ही शिस्तपालन करतो' असे म्हणत नाहीत आणि शिस्तपालन करत नाहीत म्हणून? म्हणजे एक बाजू शिस्तीत वागते म्हणून त्यांची प्रत्येक कृती स्कॅनिंगखाली आणि दुसरी बाजू वक्तव्य व कृती हे दोन्ही भडक किंवा दांभिक करूनही कुठेच अॅन्सरेबल नाही, असे कसे?
४. ख्रिश्चन धर्मप्रसाराची अनेक उदाहरणे कानावर येतात. इस्लामचा तर प्रश्नच नाही. संघाने 'चला हिंदू व्हा' असे म्हंटलेले ऐकिवात नाही. हिंदू नसलेल्यांना खासगीत सावत्र वागणूक दिलेली असल्याची उदाहरणे वर काहींनी दिलेली आहेत. ते चूकच! पण तरी धर्माधारीत संघटना हा दोष फक्त संघाकडे का? तसेच, अजिबात धर्माधारीत संघटना नसलेले व वेगळ्याच सहिष्णू धर्माचे असलेले लोक हिंदू धर्माबाबत जो उघड तिरस्कार बाळगत आहेत त्याची मीमांसा काय? त्यांच्या प्रगतीच्या आड संघ आल्याचे स्वानुभव वाचायला मिळतील? (स्वानुभव, दुसर्याचे जवळून पाहिलेले अनुभव नव्हेत). ओवेसी जे बोलत आहेत त्याचे काय? ओवेसींचा मुद्दा काढला की त्यांचे प्रशासन चांगले आहे हा मुद्दा समोर आणण्याचे कारण काय? संघाबद्दल चर्चा करताना इतर कोणाहीबद्दल काहीही बोलायचे नाही असे येथे कोणी ठरवलेले आहे? इतर कोणाहीबद्दल बोलले की शिवराळ भाषा, भडक आणि आयसोलेटेड केसेसची उदाहरणे वगैरेंचा भडिमार का होतो?
आता ह्या सर्व शंकांचे निरसन वर दिसून आलेल्या शैलीत वाचायची काही विशेष इच्छा नाही. त्यातही कोणाला नीट लिहायचे असेलच तर वाचायला आवडेल.
पुन्हा एकदा लिहितो, संघ दांभिकपणा करत नाही असे मी कुठेही म्हणालेलो नाही.
संघ डेंजरस आहे असे अनेकांचे म्हणणे असते ते लोक स्वतः किती सौम्यपणे चर्चा किंवा प्रश्न हाताळतात हे त्यांना विचारायचे काम ज्यांचे आहे ते करोत वा न करोत.
तुम्ही तुमच्या ओळखीतल्या
तुम्ही तुमच्या ओळखीतल्या अॅनेक्डोटल "स्वयंसेवकां"बद्दल बोलून, व्यक्ती चांगल्या आहेत, म्हणून संघ चांगला (किंबहुना अशा व्यक्ती संघात आहेत, तेव्हा संघ वाईट कसा?) अशी थेरी मांडलीत >>> ??? कोठे मांडली आहे मी ती थिअरी? माझे संघातल्या लोकांबद्दल निरीक्षण आहे ते लिहीले. अॅनेक्डोटल आहे, असेही लिहीले. त्यावरून हे बाकीचे मत कसे ठरवलेत तुम्ही?
दुसर्या पॉईंटबद्दल - सुधारणेबद्दल तुम्हीच विचारले ना? मला ते प्रश्न इथे कसे संबंधित आहेत हे अजूनही समजलेले नाही. आणि विषयांतर मी केले?
माझ्यासारख्या अनेकांची मते हे रंगीत चित्रपट आहेत, व ते तुम्ही ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीतून पाहात आहात असे मी पूर्वीही म्हंटले होते, ते मला आज परत वाट्ले
आज मदहोश हुआ जाये रे या
आज मदहोश हुआ जाये रे या गाण्यात वहिदा रेहमानची ओढणी जमिनीशी समांतर प्रतलाशी ३० अंशाचा कोन करत असते असे म्हटल्याने ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्यासाठी आणखी १५ अंशाची तजवीज करण्यात आलेली आहे.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू/////
कदापि शक्य नाही.
ओके. संघ म्हणजे काय,
ओके.
संघ म्हणजे काय, याबद्दलची तुमची रंगीत मते इथे १,२,३ अश्या मुद्द्यांत लिहा. मग बोलू.
सातीच्या सर्व पोस्ट्स ला +
सातीच्या सर्व पोस्ट्स ला + 786
साती वाक्यं प्रमाणम्. ....
संघाबद्दल चर्चा करताना इतर
संघाबद्दल चर्चा करताना इतर कोणाहीबद्दल काहीही बोलायचे नाही असे येथे कोणी ठरवलेले आहे? इतर कोणाहीबद्दल बोलले की शिवराळ भाषा, भडक आणि आयसोलेटेड केसेसची उदाहरणे वगैरेंचा भडिमार का होतो?
<<
आपला संबंध नाही अशा विषयाम्च्या धाग्यावर येऊन विषयाला धरून बोला, असे कोण म्हणत असते?
बेफि,
मुसलमानांच्या प्रबोधनासाठी तुम्ही वेगळा धागा काढा पाहू. चला, उचला ती सतरंजी. इथे आम्ही संघ कसा चांगला याबद्दल तर्रकीर्तन करीत आहोत. तुमचे इथे काम नाही.
संघवाले सर्व सोडा. फक्त 3.५
संघवाले सर्व सोडा. फक्त 3.५ टक्के लोकांचा सर्वे करा. किती लोकांना संघ विचार मान्य आहे ते अभ्यासा.
१. पण ते संघटनेबद्दल. त्यातले
१. पण ते संघटनेबद्दल. त्यातले लोक जे परिचयातले आहेत ते "नॉर्मलच" आहेत. ते स्वतः काही करत नसले तर उगाचच त्यांना कशाला दूषणे द्यायची?
२,. कोठे मांडली आहे मी ती थिअरी? माझे संघातल्या लोकांबद्दल निरीक्षण आहे ते लिहीले. अॅनेक्डोटल आहे, असेही लिहीले. त्यावरून हे बाकीचे मत कसे ठरवलेत तुम्ही?
<<
हे तुमचे कॉपीपेस्ट आहेत.
तुम्हीच सांगा मत कसे ठरवले ते?
मत = "तुम्ही तुमच्या ओळखीतल्या अॅनेक्डोटल "स्वयंसेवकां"बद्दल बोलून, व्यक्ती चांगल्या आहेत, म्हणून संघ चांगला (किंबहुना अशा व्यक्ती संघात आहेत, तेव्हा संघ वाईट कसा?) अशी थेरी मांडलीत."
संघवाल्याना 'दखाडस एक आण
संघवाल्याना 'दखाडस एक आण घालीस एक' असा शे. हाऊ रान्ना बठ्ठा डुप्लिकेट शेतस.
संपादित
संपादित
संपादित
संपादित
संपादित
संपादित
"Mhanoon sangh chaangla" he
"Mhanoon sangh chaangla" he farend ni kuthe mhatle aahe? Maybe tyanche tase mhanne aahe he tumche implicit axiom aahe mhanun tumhi Strawman argument tar karit nahi na?
No, @ bhaskarachary. please
No, @ bhaskarachary.
please read all the posts fully.
i am talking about policies of an organization. AND condemning it. what is the point of bringing in anecdotal evidence of behavior of individual members of that organization, who may not have any say in the policy making??
when that kind of diversionary tactic is used, what is the conclusion?
I don't see any diversionary
I don't see any diversionary tactic here. I see Farend's saying that he opposes the 'vaktavye'. What he is saying is that the tendency to brand 'every' person related to sangh as 'evil' or 'bad' is not correct, specially when there is no evidence that the bad:good ratio is any significantly different than any other large collection of human beings coming together under some party or agenda. This is my interpretation of his assertions.
ओके. What he is saying is
ओके.
What he is saying is that the tendency to brand 'every' person related to sangh as 'evil' or 'bad' is not correct,
<<
मुसलमान व टेररिझम याबद्दल बोलण्याची संघाची टेंडन्सी बरोबर की चूक?
कसंय ना, contexts do matter. What Fa argues, is different. on another website, i shall (and do) argue in different words and spirit. but here, this is what i am saying and this is how i say it. Ask fa if what i am saying is right or wrong.
For what it is worth, I think
For what it is worth, I think he is right. I think applying such labels is actually playing into the hands of the same tendencies that one seeks to undo.
Naahi contexts vagaire che
Naahi contexts vagaire che aahech. But hya ithe mala tari tasa context vaatla nahi. Baaki fa mhanelch tyala kaahi mhanayche asel tar. baryach velela aapan ekhadya vyaktiche motives tyachya mhannyavarun deduce karnyapeksha aadhich te assume karto, irrespective of context, tase mala vaatle.
I think applying such labels
I think applying such labels is actually playing into the hands of the same tendencies that one seeks to undo.
<<
Ah! But that is something i AM trying to do.
I am trying to make it black and white and clearly so.
What they are doing, is trying to paint themselves in grays and hope to make people forget how deeply black they are. I am not about to let them get away with that.
It is the people who are sitting on the fence, (the "neutral" ones) that need to realize exactly what they are doing.
BTW Why should it be so uncomfortable when one gets labeled a sangh sympathizer by people like me?
I certainly won't get upset
I certainly won't get upset if you call me anything which is allowed in civilized world. I can't speak for others. But in general, "sagle *** shevti ***" (fill in the blanks according to your side) is a style with which I have never been able to identify. I feel it alienates more than it enlightens even if your motives are good enough.
अं.... if i understand you
अं....
if i understand you correctly,
you say you wont get upset, if i call you 'sangh sympthiser'. cuz THAT is perfectly good and civilized thing to call anybody, (if they really believe in the values and motives of that organization.)
at the same time you say you will feel alienated.
why?
अं.... if i understand you
अं....
if i understand you correctly,
you say you wont get upset, if i call you 'sangh sympthiser'. cuz THAT is perfectly good and civilized thing to call anybody, (if they really believe in the values and motives of that organization.)
at the same time you say you will feel alienated.
why?
Pages