कोक्पर - २

Submitted by उदय८२ on 5 January, 2016 - 01:38

कोक्पर - १

"डेव्हिड, एक सांगायचे होते.".....
"बोल."
"समोरचे निळ्या छताचे घर 1059 मीटर १० ओ’क्लॉक. तिथे मला गडबड वाटतेय."
"का?"
"विशेष असे काही नाही पण तिथे एक बाई, म्हणजे मुलगीच म्हण, फोनवर सतत बोलत होती. पण त्याआधी तिचा नवरा, अं..... हो बहुधा नवराच असेल, छतावर येऊन सतत आजूबाजूला नजर ठेवून होता. नंतर फोन आल्यानंतर त्याचे छतावर येणे बंद झाले. "
"कसा दिसत होता?" डेव्हिडने पटकन विचारले
"संध्याकाळची वेळ आणि पावसामुळे इतके क्लिअर दिसत नव्हते. लिन्गोनटाईप दाढी होती. केस ट्रिम केलेले होते. गोरा म्हणता येईल इतका उजळ होता."
"घरात अजून कोण आहे दोघांशिवाय?"
"माहीत नाही. दोघेच असतील. आणखी कोणी दिसले नाही. "
"कधीपासून?"
"काल संध्याकाळ पासून.. दुपारी तो माणूस दोनतीन वेळा छतावर आला. म्हणून लक्ष गेले. नंतर मी त्याच्यावरच लक्ष ठेवून होतो. संध्याकाळी सव्वासहाला ती मुलगी फ़ोनवर बोलताना खिडकीत दिसली. त्यानंतर तो माणूस वर आलाच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी पंधरावीस फोन आले."
"ठीक आहे. नंतर रायनोला टीम सोबत पाठवतो चेक करायला. फॅमिली असेल. बहुधा……….."

तेव्हड्यात झूम आवाजात दोन टोयोटा ट्रक वेगाने समोरच्या चौकातून अचानक उजव्या हाताला वळून खालून जाणार्‍या ताफ्याकडे येऊ लागले. त्यातल्या दोघांनी कारच्या दोन्ही बाजूने बाहेर येऊन बाजूच्या इमारतींवर आणि ताफ्यावर जोरदार फायरिंग चालू केली. गोळीबारामुळे ताफ़ा बरोबर इमारतीखाली थांबला. त्यातल्या सैनिकांनी पोझिशन्स घेतल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने डेव्हिडने गोळ्यांचा वर्षावापासून वाचण्यासाठी एकदम मागे धाव घेतली. विल्यम्सला देखील खेचून घेतले. फिलिप खाली पळाला. अॅर्नॉल्डने आडोसा घेतला होता. त्याने एकाला टार्गेट केले. गोळीची दिशा कळल्याने मागच्या गाडीतल्यांनी इमारतीच्या दिशेने तुफान गोळीबार सुरू केला. तो पर्यंत डेव्हिड छतावरच्या टाकीच्या शिडीवर पोहोचला. आपली बंदूक टाकीवर ठेवून त्याने पोझिशन घेतली. मागच्या गाडीतल्या ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्याला गोळी घातली.

"शूट दॅट ड्रायव्हर डेव्ही!" अॅर्नॉल्ड किंचाळला.
"आय ऍम ऑन इट"
स्स्स्सुप... विल्यम्स ने पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरला शूट केले. त्याबरोबर ती गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि बाजूला जाऊन आदळली. तिच्या मागचा ट्रक थोड्या अंतरावर थांबला. पहिल्या गाडीतून एक इसम रॉकेटलाँचर घेऊन बाहेर पडला. त्याने ताफ्यातल्या एका गाडीवर नेम धरला आणि रॉकेट सोडणार तोच डेव्हिड अचूक नेम साधला. गोळी मानेतून आरपार गेली. पण तेवढ्यात त्या इसमाने ट्रिगर दाबल्याने रॉकेटची दिशा बदलली आणि ते इमारतीकडे वेगाने येऊ लागले.
" कमिंग......... गो बॅक" डेव्हिड ओरडला. विल्यम्स आणि अॅर्नॉल्डनी लगेच एकाबाजूला उडी मारली.
धूम............ कानठळ्या बसणाऱ्या आवाज घुमला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रॉकेट धडकले. पूर्ण सेंट्रलब्लॉक हदरले.
"कॅच एव्हरी #$%^. बिफोर दे नो स्नॅपर पोझिशन्स." अॅर्नॉल्डने हुकूम सोडला.
"येस डेव्हिड. टेक बॅक ट्रक"
डेव्हिडने मागच्या ट्रकच्या ड्राव्हरला ठार केले. त्यातील लोकांनी गाडीचा आडोसा घेऊन गोळीबार सुरू केला.
दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. इतक्यात जोरदार बॉम्बस्फोटासारखा आवाज होऊन त्या दोन्ही गाड्या हवेत उडाल्या. अचानक झालेल्या घडामोडीने सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहु लागले.
गोळीबार बंद झाला. विल्यम्सचा रेडिओ वाजला.

"ब्राव्हो 2235. कमिंग ओव्हर."
विल्यम्स लगबगीने रेडिओकडे धावला. "ब्राव्हो 2235. ओव्हर."
"रायनो हिअर, जॉब डन. स्टॉप फायरिंग. वी आर कमिंग"
डेव्हिडने हातातून रिसीव्हर घेतला "व्हाट द @#$ रायनो. ताबडतोब सेंट्रलब्लॉक जवळ ये. ओव्हर"
"हो. येतच होतो... ट्रुप्सला पुढे पाठव... मी चेकिंग करत करत येतोय."
विल्यम्स खाली निरोप द्यायला पळाला.. फिलिप्स वर आला.
"रायनो आणि विकी येत आहेत.. मी सार्जन्टस बरोबर आजूबाजूची घरे बघून येतो.. "
पंधरावीस मिनिटांनी रायनो आणि विकी वर गच्चीवर आले.
"काय? होता कुठे तुम्ही? .... लगेच येता येत नव्हते का?" अॅर्नॉल्ड बोलला.
"आम्ही आजूबाजूलाच होतो. समोरच्या चौकापर्यंत घरे वगैरे कशी आहेत बघायला गेलो होतो. तिथे आडोशाला बसल्यावर अचानक दोन ट्रक समोरून येताना दिसले. मी आणि विकी लगेच एका घरात घुसून लपलो. आणि संधी मिळताच गाडी खाली क्लेमोर लावले. धुडुम्म!!" रायनो हसतच म्हणाला.
"तरीपण... इथे आपण या कामाकरतात नाही आलोत... लक्षात...." डेव्हिड.
"ठीक आहे.. डिझर्टबॉय येईल आता. विल्यम्स, तयारीत रहा." डेव्हिडचे वाक्य मध्येच तोडत अॅर्नॉल्ड बोलला.
"अॅर्नॉल्ड मी काय म्हणतोय..." डेव्हिड त्याला बाजूला घेऊन गेला. "विल्यम्सला राहू दे. त्याला इथली जास्त माहिती आहे. आणि आपल्या मिशनच्या उपयोगी देखील येईल. "
"पण तुला माहितेय ना तो कसा आहे ते? आपल्या मिशन मध्ये दुसऱ्याला इन्व्हॉल्व्ह करता येणार नाही."
"हो रे... मी फक्त माहितीसाठी ठेवतोय. आताच्या प्रकारातून त्याला असलेली इथली माहिती दिसून आली की नाही?"
"लोटसला कळव. ती तुझी जबाबदारी."
"ठीक आहे."

डेव्हिडने वायरलेसवरून हेडकमांडला तिथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि विल्यम्सचे महत्त्व देखील समजावून सांगितले. हेडकमांडने सगळी माहिती नीट विचारून घेऊन मगच परवानगी दिली.
सकाळचे दहा वाजायला आलेले. दोन तासांत बर्‍याच घडामोडी झाल्या. डेव्हिडने विल्यम्सला थांबवून घेतले आणि फिलिप्स त्याच्या अन्य दोन साथिदारांसह डिझर्टबॉय मधून पाठवून दिले..... रायनोने टाकीवर पोझिशन घेतली,. तर विकी दक्षिणेकडच्या कोपर्‍यावर उभा राहिला. मुख्य रस्त्याने शहरात येणारी वाहने तेथून स्पष्ट दिसू शकत होती.
अॅर्नॉल्ड, डेव्हिड आणि विल्यम्स एकत्र खाली बसून रणनीती ठरवत होते. विल्यम्सला काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याला थोडी माहिती देणे गरजेचे होते.
"विल्यम्स आता लक्ष देऊन ऐक.. आम्ही का आलो इथे... "
"ह्म्म बोल... "
"अल-मुहसान येथे सील्सने अतिरेकी संघटनांचे काही म्होरके आणि त्यांचे समर्थन करणारे स्थानिक नेते यांना काल रात्री पकडले गेले आहे त्यांची मिटींग चालू असताना सील्सने छापा घातला. त्यांच्याकडून माहीती काढून घेणे चालू आहे पण त्यांना इथे ठेवणे धोक्याचे म्हणून इराकमध्ये घेऊन जाणार आहे. मरीन्सच्या माहितीप्रमाणे त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या एरिया मधे त्यांचे प्राबल्य जास्त आहे. त्यांचे बरेच स्लीपींग सेल्स आहेत..जर हल्ला झाला तर तो निष्प्रभ करायची जबाबदारी आपल्यावर आहे."
"पण आपण फक्त चारपाच जणच आहोत? हा सिनेमा नाही. आणखी सैनिक लागतील." विल्यम्स म्हणाला.
"हो आणखी तुकड्या येणार आहेत. ते आल्यावर त्यांच्या पोझिशन्स आपल्याला तयार करायच्या आहेत. म्हणून आम्ही लवकर आलो आहोत.
रायनो- विकी, काय माहिती आणली आहे? सांगा बरं. अकरा वाजले आहेत. एक वाजेपर्यंत आपल्याला सगळं प्लॅन करून ठेवायचं आहे. पाच ते सहाच्या दरम्यान ऑपरेशन क्रॉसिंग इथून पासिंग होईल त्याआधी सगळी तयारी झाली पाहिजे."
डेव्हिडने लगबगीने सगळे सामान बॅगेतून बाहेर काढले त्या भागाचा नकाशा बाहेर काढून समोर जमिनीवर पसरला. लॅपटॉप काढून आकडेमोड सुरू केली. रायनो-विकी मॅपसमोर येऊन बसले. रायनोने पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली.

"हा अल-दुरीन चौक आपल्या समोर पश्चिमला. त्याला छेदून जाणारा उत्तर-दक्षिण रस्ता. पश्चिमेकडून येणारा हा हायवे सरळ आपल्या इमारतीसमोरून जातो तो ठीक इराण सीमेपर्यंत. या डाव्या बाजूने इमारतीच्या पुढून जो रस्ता आत जातो पाचशे मीटरवर एक मस्जिद आहे. बंदच दिसतेय. लोकांचे दैनिक कामांमधे अडथळा न आणण्याचे आदेश आहे. त्यांना त्यांची कामे करू द्यावी.

समोर खाली रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला आठशे मीटरवर सुपरमार्केट आहे. २ हजार चौरस फ़ुटाचे तरी असेल. त्याच्या आतल्या बाजूला जुनी दगडी घरं आहेत..... इथे." नकाशावर टिंब देत रायनो म्हणाला.
"आपल्याला पाच जागा निवडता येतील पूर्ण रस्ता कव्हर करण्याकरिता. जर जसा हल्ला दक्षिणेकडून ट्रक्स आलेत तोच धागा आपण पकडून पोझिशन्स ठेवत असू तर." विकीने पोझिशन्सवर खुणा करायला सुरुवात केली.

"त्या ट्रकमधले सगळे टार्गेट झाले का?" अॅर्नॉल्डने अचानक विचारले.

क्रमशः

कोक्पर - ३

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहित आहात. आवडले Happy स्नायपर प्रचंड इंटरेस्टचा विषय असल्याने अधिकच उत्सुकता.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

ह्म्म. थोडा जास्त सिनेमा सारखा वाटला.

क्लेमोर माईन्स लावण्या इतक्या जवळ दोघ जणं गेले आणि एकाही स्नायपरला ते दिसले नाहीत?

पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

क्लेमोर माईन्स लावण्या इतक्या जवळ दोघ जणं गेले आणि एकाही स्नायपरला ते दिसले नाहीत? > चकमकीत होउ शकते आणि क्लेमोर लावण्यासाठी जवळ जाण्यासाठी गरज नाही. थोडेसे जवळ जाऊन ढकलू ही शकतात. नंतर डेकोनेटरने उडवायचे असते.

ह्म्म. थोडा जास्त सिनेमा सारखा वाटला > सिनेमावरुनच घेतलेला आहे. Happy