पायाच्या तळव्यांची आग

Submitted by मामी on 2 January, 2016 - 05:10

एका वयस्क व्यक्तीच्या पायाच्या तळव्यांची अतिशय जळजळ होते. खूपच त्रास होत आहे. तोंडातही बरेचदा फोड येतात आणि काही खाता येणं अशक्य होतं. कदाचित बरीच औषधं वगैरे घेतल्यामुळे अंगात उष्णता निर्माण झाली आहे.

१. तळपायांची आग कशी कमी करता येईल? घरगुती उपचार हवे आहेत.

२. तोंडात येणार्‍या फोडांवर काही सोपे घरगुती उपाय आहेत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे आहे, घरगुती उपचार तात्पुरते असतात. पण डायबेटीस असल्याने डॉ. सल्ला उत्तम.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स च्या कमतरते मुळे हे दोन्ही होऊ शकते. डायबेटीस मुळे सुद्द्धा हा त्रास होऊ शकतो.
डॉ. च्या सल्ल्याने उपाय योजना करा.
साजुक तूप तोंडातील फोडांसाठी गुणकारी आहे.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स च्या कमतरते मुळे हे दोन्ही होऊ शकते. डायबेटीस मुळे सुद्द्धा हा त्रास होऊ शकतो.
डॉ. च्या सल्ल्याने उपाय योजना करा.
साजुक तूप तोंडातील फोडांसाठी गुणकारी आहे.

माझ्याही तळपायांची उन्हाळ्यात खूप आग होते एकतर उष्ण प्रकृती व त्यात नागपूरचा उन्हाळा ... मी अर्धा तास थंड पाण्यात पाय बुडवून बसते ... बाकी सब्जाच बी पाण्यात/दुधात भिजवून घेते ... फायदा होतो

कविता ताइ ...... खिकन कुटॅ मिलेल- माझ्या पत्नीची हाताची बोटे आमवाताने वाकडी झाली आहेत. खुपच मेहेर्बानी होइल

बरेचसे रोग शरीरातील अशुद्ध द्रव्ये बाहेर न पडल्याने होतात.
१) त्रिफळा चूर्ण प्रत्येक जेवणा खाण्यावेळी चिमुटभर घेणे.
तीनचार दिवसांनी फरक दिसला तर वरचेच कारण हे निश्चित.

हो कविता ताई , खिकन कोठे मिळेल ते प्लिज सांगाल का?
गूगल करुन काहि मिळाले नाहि.. ..
मला हि हवे आहे, आमवात ग्रस्त नातेवाईकासाठी , तसेच तळव्यांची आग कमी करण्यासाठी दे़खिल ..

@ सतिश१९५२ तुम्हि immune suppressant (biological agent) try केलेत?का?
आम्हि केले होते , सुज असल्यास फरक पदतो... पन फार जपावे लागते.. सुरवातिला ओमेगा३ ट्राय करा , किन्वा flax seed.
immune suppressant drugs (biological agent) बद्दल एथे माहिति वाचा : http://www.permahealthcare.com/glm-extract-biolane.htm
इम्युनि विक झाल्यास कोनत्याहि परिस्थितिला सामोरे जावे लागु शकते हे ध्यानात ठेवा... )

मी अर्धा तास थंड पाण्यात पाय बुडवून बसते ... >>>>> मंजुताईंचा सल्ला आज उपयोगात आणला.गेले ५-६ महिने तळपायांची आग होतहोती.कालपासून असह्य झाले म्हणून आज १०-१२ मिनिटे पाण्यात पाय बुडवून बसले.जरा बरं वाटलं.

थंड पाण्यात पाय बुडवून बसल्यावर खूप फरक पडतो तसेच उष्णता झाल्यावर खूप जास्त पाणी प्यायल्याने पण फरक पडतो असा माझा अनुभव आहे.

Pages