काहीही

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पुण्यामधे सलमान, लारा आणि शान थिरकणार
आयडीया रॉक्स इंडियाच्या धुनवर

९ मार्च २००८ पुणे: आयडीयाच्या देशभर चालणार्‍या आयडीया रॉक्स इंडिया या कार्यक्रमाच्या सतत तिसर्‍या वर्षी पुण्यामधे शान आणि सलमान थिरकणार आहेत. तसेच लारा दत्ता मलायका अरोरा खान आणि समीरा रेड्डी यासारख्या ग्लॅमरस अभिनेत्री आपली जादू पुण्यावर टाकणार आहेत. त्यामुळे आयडीयाचा कार्यक्रम पूर्णपणे रॉकिंग असेल यात वादच नाही.

आयडीया या देशातल्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीचा आयडीया रॉक्स इंडिया हा देशव्यापी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून देशातल्या विविध सांस्कृतिक आणि विविधभाषी तरूणाईला संगीताच्या उद्देशाने एकत्र आणणे हेकार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

आयडीया रॉक्स इंडिया हा कार्यक्रम दरवर्षी मोठा आणि उत्तम बनत चालला आहे. यावेळेला हा कार्यक्रम दोन भागात आखण्यात आला आहे. देशभरातल्या विविध ४० शहरामधून चालणारा "टॅलंट हंट" हा यामधील प्रमुख भाग आहे. तसेच २० शहरामधून होणारे शानचे आयडीया रॉक्स इंडिया कॉन्सर्ट्स हा या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे. तब्बल ९ आठवडे चालणार्‍या कॉन्सर्ट्स मधे शान आणि त्याचा ग्रूप २० शहरामधून परफॉर्म करेल.

श्री. संजीव आगा, मॅनेजिंग डिरेक्टर, आयडीया सेल्युलर या प्रसंगी बोलताना म्हणाले, "भारतामधे रीऍलिटी शोज आणि लाईव्ह कार्यक्रम हे आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहेत. मात्र आयडीया रॉक्स इंडिया या कार्यक्रम खरोखर ऐतिहासिक ठरत आहेत. या कार्यक्रमामधेसंगीताच्या माध्यमातून अवघ्या देशाची तरूणाई एकत्र येत आहे. आतापर्यंत देशामधे खास तरूणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला नव्हता."

आयडीया रॉक्स इंडिया पूर्ण देशामधे आपल्या झंझावाताने सर्व संगीतप्रेमीना खुश करेल, आणि ३० मार्चला गोवा येथे एका जबरदस्त कार्यक्रमामधे याची सांगता होइल. यावर्षी आयडीयाने आपल्या ग्राहकाना आणि त्याच्या प्रतिभेला संदी देण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ५५४५६७७ या आयडीया व्हॉइस पोर्टल मधे आयडीया ग्राहकाना आपले गाणे ऐकवून शानसोबत परफॉर्म करण्याची जबरदस्त संधी या ग्राहकाना मिळेल. इतकेच नव्हे तर, प्रत्येक शहराच्या तीन विजेत्याना झी टीव्हीच्या सारेगामापाच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीमधे प्रवेश मिळेल.

या कार्यक्रमासाठीचे पासेस आयडीयाच्या विविध व्हॅल्यु ऍडेड सेवामधून तसेच आयडीयाच्या नवीन ग्राहकाना जिंकता येतील. तसेच प्रत्येक शहराच्या काही "लकी" आयडीया ग्राहकाना या कार्यक्रामच्या दरम्यान शानला भेटण्याची संधीदेखील मिळेल.

श्री. प्रदीप श्रीवास्तव, मुख्य मार्केटिंग अधिकारी हे याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले की, "शानचे गाणे हे आबालवृद्धाना आवडते. त्याच्या सुरातली विविधता, गाणामधील वैविध्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे व्यासपीठावरील सळसळता उत्साह यामुळे आयडीया रॉक्स इंडिया थ्री या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त होते.

श्री. लक्ष्मीनारायण, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, महाराष्ट्र आणि गोवा यानी यासंदर्भात बोलताना सांगितले की, "कुठल्याही संगीत कार्यक्रमाचे खरे गमक असते त्याच्या प्रेक्षकाचा सहभागावर. आयडीया व्हॉइस पोर्टलमधून आम्ही भारतीय तरूणाईला एक अशी संधी देत आहोत ज्यामुळे त्याना त्याच्या प्रतिभेचा आविष्कार तर साधता येइलच पण त्याचबरोबर सेलेब्रीटीजबरोबर सादरीकरणाचा अनुभवदेखील त्याना मिळू शकेल. यातूनच कुणीतरी एक सेलेब्रीटी होइल असा आम्हाला सार्थ विश्वास आहे."

आयडीयाने या कार्यक्रमासाठी सहा खास डायल टोन्स उपलब्ध केल्या आहेत. आयडीयाचे ग्राहक या रिंगटोन्स तसेच जिंगल्स, कलाकाराचे आवाज ४५६ वर कॉल करून डाऊनलोड करून घेऊ शकतात. आयडीया फ्रेश मोबाईल पोर्टलवरून चित्रं, ऑडीओ आणि व्हीडीओ क्लिप्स डाऊनलोड करू शकतात.

या कार्यक्रामचे खास आकर्षण म्हणजे खास टीव्हीच्या प्रेक्षकासाठी हा कार्यक्रम स्टार अथवा झी टीव्हीवर मार्च २००८ मधे प्रक्षेपित करण्यात येत आहे.

वा, वा, छानच. तिकडे त्या क्रिकेटपटूंचा जाहीर सत्कार नि त्यांना प्रत्येकी लाखो रुपये देणार. इकडे हा असा भव्य कार्यक्रम.

मला वाटते भारतात आता सर्वत्र आबादी आबाद आहे. कुणालाहि कसलीहि चिंता नाही. १०० कोटी लोक छान छान घरांमधे रहातात, सर्वांना भरपूर उत्कृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे. सर्वजण सुशिक्षित झाले. स्त्रीपुरुष समानता झाली. जातिभेद संपले. राज्यकारभार कसा सुरळितपणे, वशिलेबाजी, लाचलुचपत न होता, आपोआप चालतो आहे. लोकांची आपापसातली भांडणे मिटली.

जणू शरयू तीरावरी अयोध्या च जणू.

मग तिकडे राजकारणी लोक, कुणि राडा करताहेत, कुणि जहाल अग्रलेख लिहून नि भाषणे करून एकमेकांना असभ्य अश्या शिव्या देताहेत! त्यांनाहि करमणूक हवीच ना! मधून मधून निवडणूक, निवडणूक खेळून स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. पण कुठे सचिन, हृतिक, खान लोक, नि कुठे चिदंबरम नि मनमोहन, नि वाजपेयी! कुठे ऐश्वर्या, बिपाशा, नि कुठे मायवती, रबडी देवी!

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण!

पुनः एकदा छानच.