विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.
आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.
बर्याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.
मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.
नारळाच्या झाडावर चढलेले हे उत्सवमुर्ती. ह्याच फोटोत डाव्या बाजूला साळुंखी पक्षी वार करण्यासाठी आलेली दिसते.
१)
नंतर धामण झाडाच्या झावळ्यांच्या खोपच्यात लपली तेंव्हा तिला शोधण्याची एकेकाची धडपड आणि चेहर्यावरचे हावभाव पहा.
२) हा दयाळ त्या नारळाच्या झाडाखालच्या तारेवर.
हा राड्याच्या प्लान संध्याकाळी चालू होता. बराच वेळ ती धामण बाहेर येण्याची मी टेरेस वरून वाट पहात होते. पण ती काही येत नव्हती. मग मला एका कामानिमित्ताने बाहेर जावे लागले त्यामुळे हे नाट्य कधी संपुष्टात आले ते कळले नाही. पुढच्यावेळी पूर्ण टिपण्याचा प्रयत्न करेन.
भारी आहे राडा!
भारी आहे राडा!
राडा रॉक्स !! मस्त
राडा रॉक्स !! मस्त
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव चमकून जाऊन परत परत २-३ वेळा वाचलं>>>+१
मस्त लेख.
Camera dhamchya hatat
Camera dhamchya hatat
भारी ..
भारी ..
मस्त जमलाय राडा .. खारुतैचे
मस्त जमलाय राडा .. खारुतैचे हावभाव सही टिपलेत एकदम ..
सहीचे.
लय भारी फोटू
लय भारी फोटू राड्याचे.
खारुताई फारच सर्वात गोड, माझी आवडती.
आयला! काय जबरी आहे हे! भारीच!
आयला! काय जबरी आहे हे! भारीच!
मला आधी वाटलं हे काय म्हणून आत डोकावलो. पुढे साप वगैरे बघून मला वाटलं लोकं गर्दी करतात त्या राड्याबद्दल लिहित आहेस की काय पण पुढे हे भारीच निघालं!
मला खरं तर आनंद होतोय हे वाचून कारण मी भारतात असताना तरी पबलिक साप दिसला की फार राडा करायचे आणि लगेच मारायला वगैरे निघायचे. साप दिसला आणि त्यापुढे इतकं कौतूकानी सगळे मोमेंट्स टिपलेत त्याचच मला नवल वाटत आहे. पुढे पक्षांनी त्याला मारलं वगैरे तर वाईट वाटेल पण ती नॅचरल ऑर्डर म्हणावी लागेल. भारी वाटलं वाचून.
केपी, शिक्रा म्हणजे?
भन्नाट फोटो आणि फार भारी
भन्नाट फोटो आणि फार भारी फोटोथीम!
भारी
भारी
बुवा, शिक्रा इथे पाहा -
बुवा, शिक्रा इथे पाहा - https://en.wikipedia.org/wiki/Shikra
भारी आहे फोटो! खारुताइचे
भारी आहे फोटो! खारुताइचे हावभाव फार भारी!
(राडा नावाचा मासाच असेल आणी जागुने तिच्या फेमस प्लेटित काहितरी खन्मग मान्डले असणार असच नेहमिप्रमाणे वाटल.)
धन्यवाद रमड
धन्यवाद रमड
वैद्यबुवा साळुंख्या सापाला
वैद्यबुवा साळुंख्या सापाला रक्त येई पर्यंत इजा करतात. पण सापही तितकाच चपळ असतो. झपकन कुठल्यातरी बिळात घुसतो.
सगळ्यांचे आभार.
@६) मी खाली पहाते तू वर
@६) मी खाली पहाते तू वर पहा>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा!
फोटूंना दिलेली शीर्षके वाचून तात्काळ फेसबुकवरील क्रांतिताईच्या अश्या पोस्ट्स'ची आठवण आली.
जागू मस्तच
जागू मस्तच
जबरदस्त राडा
जबरदस्त राडा
मस्त जमलाय राडा मस्त
मस्त जमलाय राडा
मस्त फोटोग्राफी ग
भाव अगदी अचूक टिपले आहेत
भाव अगदी अचूक टिपले आहेत राड्याचे
जागू,विषय नाविन्यपूर्ण व फोटो
जागू,विषय नाविन्यपूर्ण व फोटो सुंदर,विषयाला साजेसे.
मस्त
मस्त
मलाही आधी हेच वाटले, पण
मलाही आधी हेच वाटले, पण जागुने तसे मस्त फोटो टाकलेत मागे सापान्चे वगैरे त्यामुळे थोssडा अन्दाज आला की हे सापाविषयी वगैरे काही असेल.
जागु धन्यवाद. खरे तर निसर्गाच्या इतक्या जवळ तुला रहायला मिळाले याचे हेवा मिश्रीत कौतुक वाटतेय.:स्मित: हेवा चान्गल्या अर्थाने घे.
बाकी प्राणी-पक्षान्चे हावभाव अचूक टिपलेस. पुढच्या वेळेस खेकडा आणी त्याच्या बिळान्चे फोटो टाक ग. मला फार आवडते तसे बघायला.:फिदी:
कॅमेरा धामण च्या हातात
कॅमेरा धामण च्या हातात द्यायला लागला असता >>>
मस्त
मस्त
जागु, मस्त आहे राडा. खारुताई
जागु, मस्त आहे राडा. खारुताई लय भारी आहे.
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव
धाग्याचं नाव आणि लेखिकेचं नाव चमकून जाऊन परत परत २-३ वेळा वाचलं >>> +१ , जागु आणि राडा कसं शक्ययं?
मस्त फोटोज !
रश्मी अग सध्या खुप बिळ केली
रश्मी अग सध्या खुप बिळ केली आहेत खेकड्यांनी. अगदी जागोजागी. नक्की टाकेन ते फोटो.
सगळ्यांचे धन्यवाद.
(No subject)
Pages