Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 December, 2015 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
प्रथम चिरलेला कांदा, खोबर,गुळ, मिरची (चिरून), कोथिंबीर, हिंग हळद आणि मिठ हे एकत्र करून हाताने थोडे कुस्करून ठेवावे.
आता गॅसवर भांडे गरम करून त्यावर राई, जिरे, लसुण पाकळ्या,कढीपत्ता वे मेथी दाण्यांची फोडणी देऊन लगेच त्यावर कुस्करलेले मिश्रण टाकायचे.
हे थोडे परतवले, अर्धवट शिजले की त्यात लगेच चिंचेचा कोळ घालून (गरजेनुसार पाणी घालून) झाकण ठेवायचे. उकळी यायच्या आत गॅस बंद करायचा. उकळी येऊ द्यायची नाही.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
तोंडाला सुटले ना पाणी?
हिच कढी फोडणी न देताही करतात.
ही कढी मटणासोबत घेण्याची पद्धत आहे.
चविला आंबट गोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही मजा येते.
माहितीचा स्रोत:
नणंद
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटतेय,नक्की करून पाहीन.
मस्त वाटतेय,नक्की करून पाहीन.
जागू, ही नुसती वाचायची नाही.
जागू, ही नुसती वाचायची नाही. करून बघणार. मस्त आहे.
अरे वा! वेगळीच आहे पद्धत....
अरे वा! वेगळीच आहे पद्धत.... छान वाटतेय.
पण कढीला उकळी का येऊ द्यायची नाही?
मस्त जागू. करून पाहीन.
मस्त जागू. करून पाहीन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान फोटो पण छान.
खूप छान फोटो पण छान.
वॉव! दिसते तर खुपच छान! चव
वॉव! दिसते तर खुपच छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चव मस्तच असणार!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सेव्ह केलिये! बनवायलाच हवी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतेय कढी
मस्त दिसतेय कढी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त....
मस्त....
कांदा न घालता मी करते, कधी
कांदा न घालता मी करते, कधी नारळाचं दुध घालते कधी खवलेले खोबरे नुसते. बाकी बहुतेक घटक सेम पण कधी मनात आले तर तुपाची फोडणीपण करते. कधी तेलाचीही करते पण जास्त तुपाची.
आता इथे कांद्याची आयडिया मिळाली त्यामुळे अशी करून बघायला हवी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारी!!! तोंडाला खरंच पाणी
लय भारी!!! तोंडाला खरंच पाणी सुटले........ :लाळ गाळणारा बाहुला:
मस्त!
मस्त!
जागु एकदम तोंपासु आहे पाकृ मी
जागु एकदम तोंपासु आहे पाकृ मी नक्की करून पाहणार आहे. सोपी पण आहे. आणि सर्व सामान आहे घरी.
अगदीच नाही तर सुकं चालेल का? (ओलं करून)
ओल्या खोबर्या ऐवजी काय वापरू शकतो?
छान प्रकार.. बी ने लिहिलेली
छान प्रकार.. बी ने लिहिलेली आणि तू लिहिलेली कढी बघून मला आमच्याकडे मोप मिळणार्या गोरख चिंचेची कढी करावीशी वाटतेय.. करेनच.
मस्त प्रकार वाटतोय..
मस्त प्रकार वाटतोय..
अरे यात काहीच
अरे यात काहीच नाही?......:फिदी:
असो...मस्त आहे कढी. नक्की करून बघणार!
केली.पण भातावर घ्यायला
केली.पण भातावर घ्यायला तितकीशी नाही आवडली.कारण खोबर्याचे गुळगुळीत वाटण सवयीचे ना!
बाकी चव मस्त होती.
खुप आवडली.
खुप आवडली.
उकळी आली तर कढी फाटेल बहुतेक.
उकळी आली तर कढी फाटेल बहुतेक. म्हणून उकळी येऊ द्यायची नाहिये.
त्यात दूध, नारळाचे दूध किंवा
त्यात दूध, नारळाचे दूध किंवा दही पण नाही तर मग कढी कशी फाटेल?
पाकृतले काही कळत नाही, पण कढी
पाकृतले काही कळत नाही, पण कढी आवडीची आणि फोटो सॉलिड आहे... जर मटणासोबत चालत असेल तर भारीच असणार.. मला सोलकढी भाताबरोबरही मटण खायला आवडते..
कुठल्याही सामिष आहाराबरोबर हि
कुठल्याही सामिष आहाराबरोबर हि एकदम फक्कड लागते. जागू आमच्याकडे गूल न घातलेले एक व्हर्जन पण करतात ह्याचेच.
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
उकळी येऊ न द्यायचे कारण उकळी आली की त्यातली जिन्नसे जास्त शिजतात मग त्याची चव बदलते.
कांदा हा न शिजलेलाच चांगला लागतो त्या कढीत. म्हणजे जरा कच्चटच हवा.
देवकी आपण सोलकढी जशी जेवणाच्या सोबत घेतो तशीच ही कढी घेण्याची प्रथा आहे. जास्तकरून पाचकळशी समाजात ही कढ फेमस आहे.
आपण सोलकढी जशी जेवणाच्या सोबत
आपण सोलकढी जशी जेवणाच्या सोबत घेतो तशीच ही कढी घेण्याची प्रथा आहे.>>>>>> ओ.के.
उकळी येऊ न द्यायचे कारण उकळी
उकळी येऊ न द्यायचे कारण उकळी आली की त्यातली जिन्नसे जास्त शिजतात मग त्याची चव बदलते.>> ओक्के!
'चिंतेची कढी' वाचलं आणि इथे
'चिंतेची कढी' वाचलं आणि इथे डोकावलं तर आंबट झालो अक्षरशः ..
मस्त रेसीपी .. सौ. ना दाखवून स्वतः बनवण्याच्या तयारीला लागायला हवं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त रेसिपी. सौ. ना दाखवून
मस्त रेसिपी.
सौ. ना दाखवून स्वतः बनवण्याच्या तयारीला लागायला हवं. फिदीफिदी>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
छान आहे कढी. तोंपासु. पण मधेच
छान आहे कढी. तोंपासु.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण मधेच मटणाचं काय??
जागू माझ्या प्रश्नाचं उत्तरच
जागू माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही दिलंस![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दक्षे, वाईच खाली उत रून आण की
दक्षे, वाईच खाली उत रून आण की वलं खोब्रं..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ओल्या खोबर्याची चव , भिजवलेल्या सुक्या खोबर्याला नाही येत तेव्हढी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे रेस्पी जागु.. थंडी च्या दिवसात, नुस्तीच गरमागरम पीत बसता येईल..
मस्त दिसतेय.. करुन पाहण्यात
मस्त दिसतेय..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
करुन पाहण्यात येईल.. खाणारे लोक्स असताना
Pages