चिंचेची कढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 December, 2015 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लिंबा एवढ्या चिंचेचा गोळा
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
१ वाटी ओल खोबर खरवडून,
१-२ मिरच्या
थोडी कोथिंबीर चिरून
थोडस हिंग,
अर्धा चमचा हळद,
४-५ मेथीचे दाणे,
४-५ लसुण पाकळ्या चिरुन,
राई, जीर, प्रत्येकी अर्धा चमचा (छोटा)
कढीपत्ता
चवीनुसार गुळ चिरून,
चवीनुसार मिठ,
फोडणीसाठी तेल.


(वरील फोटोत हळद राहिलेय)

क्रमवार पाककृती: 

प्रथम चिरलेला कांदा, खोबर,गुळ, मिरची (चिरून), कोथिंबीर, हिंग हळद आणि मिठ हे एकत्र करून हाताने थोडे कुस्करून ठेवावे.

आता गॅसवर भांडे गरम करून त्यावर राई, जिरे, लसुण पाकळ्या,कढीपत्ता वे मेथी दाण्यांची फोडणी देऊन लगेच त्यावर कुस्करलेले मिश्रण टाकायचे.

हे थोडे परतवले, अर्धवट शिजले की त्यात लगेच चिंचेचा कोळ घालून (गरजेनुसार पाणी घालून) झाकण ठेवायचे. उकळी यायच्या आत गॅस बंद करायचा. उकळी येऊ द्यायची नाही.

तयार आहे चिंचेची कढी

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

तोंडाला सुटले ना पाणी?

हिच कढी फोडणी न देताही करतात.

ही कढी मटणासोबत घेण्याची पद्धत आहे.
चविला आंबट गोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही मजा येते.

माहितीचा स्रोत: 
नणंद
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा न घालता मी करते, कधी नारळाचं दुध घालते कधी खवलेले खोबरे नुसते. बाकी बहुतेक घटक सेम पण कधी मनात आले तर तुपाची फोडणीपण करते. कधी तेलाचीही करते पण जास्त तुपाची.

आता इथे कांद्याची आयडिया मिळाली त्यामुळे अशी करून बघायला हवी. Happy

जागु एकदम तोंपासु आहे पाकृ मी नक्की करून पाहणार आहे. सोपी पण आहे. आणि सर्व सामान आहे घरी.
ओल्या खोबर्‍या ऐवजी काय वापरू शकतो? Uhoh अगदीच नाही तर सुकं चालेल का? (ओलं करून)

छान प्रकार.. बी ने लिहिलेली आणि तू लिहिलेली कढी बघून मला आमच्याकडे मोप मिळणार्‍या गोरख चिंचेची कढी करावीशी वाटतेय.. करेनच.

अरे यात काहीच नाही?......:फिदी:
असो...मस्त आहे कढी. नक्की करून बघणार!

केली.पण भातावर घ्यायला तितकीशी नाही आवडली.कारण खोबर्‍याचे गुळगुळीत वाटण सवयीचे ना!
बाकी चव मस्त होती.

पाकृतले काही कळत नाही, पण कढी आवडीची आणि फोटो सॉलिड आहे... जर मटणासोबत चालत असेल तर भारीच असणार.. मला सोलकढी भाताबरोबरही मटण खायला आवडते..

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

उकळी येऊ न द्यायचे कारण उकळी आली की त्यातली जिन्नसे जास्त शिजतात मग त्याची चव बदलते.

कांदा हा न शिजलेलाच चांगला लागतो त्या कढीत. म्हणजे जरा कच्चटच हवा.

देवकी आपण सोलकढी जशी जेवणाच्या सोबत घेतो तशीच ही कढी घेण्याची प्रथा आहे. जास्तकरून पाचकळशी समाजात ही कढ फेमस आहे.

'चिंतेची कढी' वाचलं आणि इथे डोकावलं तर आंबट झालो अक्षरशः ..

मस्त रेसीपी .. सौ. ना दाखवून स्वतः बनवण्याच्या तयारीला लागायला हवं. Proud

दक्षे, वाईच खाली उत रून आण की वलं खोब्रं.. Wink

ओल्या खोबर्‍याची चव , भिजवलेल्या सुक्या खोबर्‍याला नाही येत तेव्हढी Happy
मस्त आहे रेस्पी जागु.. थंडी च्या दिवसात, नुस्तीच गरमागरम पीत बसता येईल.. Happy

Pages