पुन्हा बाजीराव व भन्साळी
.
असे चित्रपट पुन्हापुन्हा निर्माण होत नाहीत म्हणून त्यांची अचुकता महत्त्वाची समजायला हवी.
शिवाय आघाडीच्या दोन नायिका चित्रपटात आहेत. त्यांना नाचवले नाही तर माझे पैसे कसे वसूल होतील असा पूर्णपणे धंदेवाईक प्रश्न भन्साळी साहेबांनी देवदास सारख्या अनैतिहासिक चित्रपटावेळी विचारला होता. तोच निकष ते या ऐतिहासिक विषयालाही लावत आहेत. हे सर्वथा चूकच आहे.
तेव्हा या पाच मिनिटांच्या खोडसाळपणामुळे बाजीरावाबद्दलच्या प्रतिमेचे काही बिघडेल काय हा उलटा प्रश्न विचारणे अयोग्य आहे.
भन्साळीची ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची थेरे कुठवर जातील याचा नेम नाही. त्याला या निमित्ताने कोणीतरी ठणकावून सांगून शुद्धीवर आणणारे कोणी नाही हे दुर्देव आहे. कारण इतिहासाची मोडतोड हा विषय सेंसर बोर्डाच्या अखत्यारीत येईलच असे नाही. तेव्हा प्रत्येक वेळी हा चित्रपट इतिहासावर आधारित नाही ही एक ओळ सुरुवातीला दाखवून या लोकांना पळवाट काढण्याची संधी मिळत आहे.
धुम्रपानाच्या दृष्याच्या वेळी 'धुम्रपान आरोग्याला अपायकारक आहे' अशी पट्टी फिरवणे बंधनकारक आहे तसे अशा इतिहासाला धरून नसलेल्या प्रसंगी ' हा प्रसंग इतिहासाला धरून नाही, निर्माता - दिग्दर्शकाची अधिक पैसे मिळवण्याची खाज पूर्ण करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटात घातला आहे' अशी पट्टी फिरवायला लावली, तर या धंदेवाईकांना ते चालेल काय?
तेव्हा त्यांचा पैसा, त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे म्हणत प्रेक्षक म्हणून आपली ही हतबलता पाहता कमीत कमी अशा लबाडांचे समर्थन तरी नको. शिवाय एवढे आहे, तर चित्रपट पाहण्याची सक्ती नाही हा उपदेश आहेच.
एकीकडे इंडियन एक्सप्रेसने या चित्रपटाला दीड स्टार दिला आहे तर दुसरीकडे काहीजणांनी हा सिनेमा दुस-यांदा पाहणार असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.
आता चित्रपट प्रदर्शीतही झाला आहे. त्याच्या झगमगाटात आपण हे सारे विसरून जाऊ आणि आता भन्साळीची नजर आणखी कोणत्या महापुरूषावर किंवा साहित्यावर पडते याची वाट पाहू. 'वाट' हा शब्द मुद्दाम योजलेला आहे.
आवडला. मस्तच आहे. इतिहासात
आवडला. मस्तच आहे.
इतिहासात मुसुलमान क्रूर रंगवले गेले आहेत. पण पैसा वारस जायदाद या सगळ्यासाठी घरभेद करण्यात हिंदूही कमी नव्हते , हे रंगवल्यामुळे या चित्रपटाला पुण्यातून विरोध असावा , असे वाटते.
बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही. तसे तर षिनिमाच्या इतिहासात अकबर , अशोक , इंद्र , कृष्ण , गणपती शंकर , रावण ... सगळेच नाचले आहेत. संगीतही सुंदर आहे... पूर्ण शास्त्रीय संगीत. कान तृप्त झाले.
आज बाजीराव शिनेमाबाबत इतिहासाची मोडतोड म्हणून थयथयाट करणारे नथुराम नाटकातील खोट्या संवादांवर टाळ्या पिटत होते.
संवाद अगदी सुंदर आहेत
अरे ये तो दर्गा और दुर्गा मे फर्क नही जानती.
ये तो सच है की हर धर्म ने किसी ना किसी रंग को चुन लिया है. किसीने भगवा किसीने हरा... लेकिन दुर्गापूजा में दुर्गा को हरी साडी अर्पण करते है और दर्गा मे भगवी चादर अर्पण करते है , तब धर्म का रंग किधर जाता है ?
भाऊबंदकी व धर्मजातीचे कट्टरपण यातून पेशव्यांचा ब्राह्मण वंश ( बहुदा ) संपला व आज हिंदू बाजीरावाचा फक्त मुसलमान वंशच शिल्लक आहे , हा इतिहास पहायला तरी जावेच .
बाकी , बाजीराव व शाहूराजे यापेक्षा आमच्या डोळ्याना निजाम अधिक भारदस्त वाटला... रझा मुराद आहे का तो ?
छोटा समशेरबहाद्दूर मस्त आहे.
सोशल मिडियामधे आलेली आणि
सोशल मिडियामधे आलेली आणि चांगली वाटलेली एक प्रतिक्रिया देत आहे.
पुण्यात बाजीरावचा शो बंद पाडला गेला!
कुणाला काय बोलायचे आहे ते बोलो, हे व्हायलाच हवे होते आणि झाले ते बरेच झाले. ह्या मूर्ख गल्लाभरू हिंदी सिनेमावाले आता ह्या ऐतिहासिक पुरुषांच्या जीवावर सुद्धा स्वत:चा गल्ला भरत आहेत.
ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढताना एक प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. हा प्रामाणिकपणा बहुतेक सर्व ऐतिहासिक व्याक्तीत्वांच्या चित्रपटातून दिसला आहे. गांधी (बऱ्याच अंशी), Making of Mahatma, सरदार, नेताजी The Forgotten Hero, वीर सावरकर ई.
चित्रपट हे कलेपेक्षा पैसे कमावण्याचा धंदा अधिक आहे हे माहित आहे, आणि एका चित्रपटावर होणारा खर्च लक्षात घेता ते मान्यही आहे. commercial चित्रपट तयार करतानाच त्यातील कला जपण्याचा प्रयत्न करणारे अनेक उत्तमोत्तम कलाकार (त्यात दिग्दर्शकदेखील आलेच) आपल्याकडे होऊन गेले, त्यांना मनापासून मुजरा आहे!
ऐतिहासिक पुरुषांच्या; व्यक्तित्वांच्या जीवनावरील चित्रपट काढताना पैसा कमविणे ह्याहून अधिक काही असे उद्दिष्ट हवेच हवे! हिंदी चित्रपटवाल्या पोट फुटेस्तोवर पैसे कमावलेल्या कशाचीही चाड न उरलेल्या मंडळींकडून हि अपेक्षाच नाही, आणि म्हणूनच त्यांनी असल्या विषयांना हात घालूच नये!
पण नाही! ह्यांना चैन पडत नाही. इतिहासातील एक पुरूष घ्यायचा, एक बाई घ्यायची आणि काढायचा त्यावर एक चित्रपट. मोठमोठे नाव असलेले (पण तेवढी लायकी नसलेले) नट-नट्या घ्यायच्या (हे शब्द हल्ली विसरलेत लोक, पण ह्या मंडळींना कलाकार म्हणणार नाही, त्यांच्यासाठी कला दुय्यम आहे, जमली तर कला दाखवायची, मूळ उद्देश पैसा!), भव्य देखावे उभे करायचे आणि वाट्टेल ती कथानके जोडून ह्या ऐतिहासिक कर्तृत्ववान पुरुषांविषयी चित्रपट काढायचे! हलकट साले! बरे झाले मुस्काड फोडून सगळे शो बंद केले!
वा वा ! त्या नथुरामाच्या
वा वा ! त्या नथुरामाच्या नाटकाच्यावेळी हे महोदय झोपेची गोळी खाऊन कुठे निजले होते म्हणे ?
यावरूनच सुज्ञ वाचकांना कळून
यावरूनच सुज्ञ वाचकांना कळून येतच असेल की कोण कसे आहे ते ?
तरी असल्या फालतू आणि चीप कमेन्टसकडे सहृदयतेने दुर्लक्ष करा.
मोगा यु सेड इट थुत्तरफोड
मोगा यु सेड इट थुत्तरफोड
वाद हा नाही की कोणत्या धर्मात
वाद हा नाही की कोणत्या धर्मात भाऊबंदकी / घरभेद झाले आणि कोणत्या नाही.
वाद हाही नाही की सिनेमा इतिहासपट आहे की नाही
वाद हा आहे की ज्या लोकांना वर्षानुवर्षै एका ठराविक पद्धतीचा इतिहास शिकवला गेलाय (जरी त्याला १००% पुरावा असा काहीही नाही, ऐकिव माहितीच जास्त जी पर्कोलेट होत गेलीय तरीही), त्याना अशा प्रकारे तोच इतिहास नव्या अतिरेकी नाट्यमय पद्धतीने इतिहास दाखवला जावा आणि तो त्याना आवडावा अशी निर्माते दिग्दर्शक अपेक्षा करत आहेत / आग्रह धरत आहेत, हे अयोग्य आहे.
भव्य देखावे उभे करायचे आणि
भव्य देखावे उभे करायचे आणि वाट्टेल ती कथानके जोडून ह्या ऐतिहासिक कर्तृत्ववान पुरुषांविषयी चित्रपट काढायचे! हलकट साले! बरे झाले मुस्काड फोडून सगळे शो बंद केले! >>
ही भाषा हीन वाटत नाही पण मोगांनी "महोद्य" म्हणाले तर हीन ठरले ? व्वा व्वा
इतिहासात मुसुलमान क्रूर
इतिहासात मुसुलमान क्रूर रंगवले गेले आहेत. पण पैसा वारस जायदाद या सगळ्यासाठी घरभेद करण्यात हिंदूही कमी नव्हते , हे रंगवल्यामुळे या चित्रपटाला पुण्यातून विरोध असावा , असे वाटते.>>
चित्रपटात काय दाखवले आहे माहीत नाही, पण इतिहासात लिहिले आहे की मस्तानी व बाजीराव मरण पावले तेव्हा त्यांचा मुलगा समशेर खूपच लहान होता. जर पेशवे घराण्यात समशेरबद्दल कसलीही insecurity असती तर त्याचा काटा काढणे पेशव्यांना कठीण नव्हते. पण त्यांनी तसे केलेले नाही. स्वतः काशीबाईसाहेबांनी समशेरला पुत्राप्रमाणे वाढवले, शिकवले, लग्न करुन दिले,सत्तेतला वाटा दिला. आणखी काय करायला हवे होते? आईवडील गेल्यावर पूर्ण पोरक्या झालेल्या मुलास पेशवे घराण्याने सांभाळले व मोठे केले यात काय घरभेद आणि क्रूरपणा? समशेर बहाद्दर पानीपतात शहीद झाले. जर पेशवे घराण्याने त्यांना नीट वागवले नसते तर ते पानीपतावर पेशव्यांच्या बाजूने लढले असते का?
मुळात मस्तानी अनौरस. त्यात तिचे व बाजीरावांचे लग्न झाले होते का नाही, ते धर्म संमत होते का नाही, याबद्दल काहीच नक्की माहीत नाही. अशा बॅकग्राऊंडच्या परधर्मीय परकीय आईच्या मुलाला थेट पेशवा करणे तर शक्य नव्हते पण तरी त्याला शक्य तितके हक्क दिले गेले. तत्कालीन राजे/सरदारांच्या अनौरस्/आंतरजातीय्/धर्मीय संततीच्या वाटयाला जो अन्याय यायचा तो समशेरच्या वाट्याला आला नाही.
cnw खालची लिन्क बघा.
cnw खालची लिन्क बघा. मीनाक्षी कुलकर्णी यानी लिहीलेले वाचा. माझा पण आधी गैरसमज होता मस्तानीबद्दल, तो दूर झाला.
http://www.maayboli.com/node/56439?page=7
डीविनिता , तुमच्याच
डीविनिता , तुमच्याच परिच्छेदात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.
नवीन लोकानी नव्याने लिहिलेला इतिहास जुन्याना आवडणार नाही.
...
हे जर खरे असेल तर..
जुन्या लोकानी जुन्या पद्धतीने लिहिलेला इतिहास काही नव्या लोकानाही आवडत नसेल.
....
त्यामुळे ज्याला जे पहायचे आहे ते त्याने पहावे व इतरानी ते त्याला पाहू द्यवे.
बघितला राव एकदा चा बाजीराव
बघितला राव एकदा चा बाजीराव मस्तानी…
इतिहास इतिहास म्हणून कोकलत बसणाऱ्यानी इतिहासाचा चष्मा घरीच फेकून चित्रपट बघितला तर एकंदर चांगला आहे.
थोड मनोरंजन आणि भंसाळीचा सेट वगळता चित्रपटात मस्तानी या पात्राला शक्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. थोड्या प्रमाणात इतर पेशवे नकारात्मक मान्सिकतेचे दाखवले(जसे 'लोकमान्य' चित्रपटात आगरकर कारण नसताना निगेटिव दाखवले होते)त्यामानाने मस्तानी बाबत दिलेला दाखला खराच म्हणायला हरकत नाही.
आता स्टोरी विचाराल तर तुम्हा सर्वाना राऊ माहीतीच आहे. चित्रपट बघायला काहीच हरकत नाही. बाकी कोणी तरी बोलीवुड वाला एका मराठा साम्राज्य वर सिनेमा बनवतो त्याचे अभिनदंन न करता काही येड़े इतिहासाची बोंब उठवून थेटर मध्ये सिनेमा बंद पाडतात त्याण्ची कीव करावीशी वाटतेय. इतिहासाचा चोथा करणारे अन नुकतेच पोगो बघून काल धुड्घुस घालणारे भाजप मधील सनातन्याच्या निषेद …!!
थैंक्स भंसाळी…!!
मोहे रंग दो लाल ... घेतले.
मोहे रंग दो लाल ... घेतले. प्रवास सत्कारणी लावला.
>>भव्य देखावे उभे करायचे आणि
>>भव्य देखावे उभे करायचे आणि वाट्टेल ती कथानके जोडून ह्या ऐतिहासिक कर्तृत्ववान पुरुषांविषयी चित्रपट काढायचे! हलकट साले! बरे झाले मुस्काड फोडून सगळे शो बंद केले! >>
हे मी लिहिलेले नसून आलेला मेसेज लिहिला होता.
>>ही भाषा हीन वाटत नाही पण मोगांनी "महोद्य" म्हणाले तर हीन ठरले ? व्वा व्वा
आक्षेप "महोदय" ला नसून "भांग पिऊन पडणे" याला होता.
नो मोअर एनी प्रतिवाद प्लिज !
चित्रपटातील पिंगा व मल्हारी
चित्रपटातील पिंगा व मल्हारी ही गाणी आवडलीत त्यांच्यासाठी हा चित्रपट पहाणार आहे.
बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी
बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी व तिच्या मुलाच्या जिवावर उठले होते , याचा बोभाटा आधीच झालेला होता.. त्यामुळे समशेर नाहीसा झालाअसता तर जनतेने पेशवे कुटुम्बियानाच गृहीत धरले असते.
त्ञामुळे बाजीरावाच्या निधनानंतर समशेरचा संभाळ त्यानी ( झक्क मारत ) केला . जर त्याला सन्मानपूर्वक जीवन द्यायचेच असते तर ते पूर्वीच दिले असते , त्यालाही अन मस्तानीलाही.
पेशव्यांचा मुसलमान पुत्र पानिपतावर शहीद झाला
अणि औरस पुत्र रघुनाथ उर्फ राघोबादादा हा मात्र नारायणरावाचा खुनी म्हणून ओळखला जातो.
बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी
बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी व तिच्या मुलाच्या जिवावर उठले होते , याचा बोभाटा आधीच झालेला होता.. त्यामुळे समशेर नाहीसा झालाअसता तर जनतेने पेशवे कुटुम्बियानाच गृहीत धरले असते.
त्ञामुळे बाजीरावाच्या निधनानंतर समशेरचा संभाळ त्यानी ( झक्क मारत ) केला . जर त्याला सन्मानपूर्वक जीवन द्यायचेच असते तर ते पूर्वीच दिले असते , त्यालाही अन मस्तानीलाही.
पेशव्यांचा मुसलमान पुत्र पानिपतावर शहीद झाला
अणि औरस पुत्र रघुनाथ उर्फ राघोबादादा हा मात्र नारायणरावाचा खुनी म्हणून ओळखला जातो.
जामोप्या, जौद्या सोडा ना. ते
जामोप्या,
जौद्या सोडा ना. ते मेलं मढं धोपटण्यात काही अर्थ नाही. उग्गं राकुंना ट्यार्पी मिळतो. इथे चार स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी हंबरडा फोडल्याने ना तो पिच्चर बंद पडत, ना पब्लिक तो पहायचं थांबवत.
एवढ्या टीव्ही सिरियल्समधे इतिहासाचे इतके निर्बुद्ध खून रोज पडत असताना या एका बाबीत आरडाओरडा करून काही फरक पडत नाही.
चुकीचा इतिहास दाखवताहेत म्हणून पिच्चर बंद पाडायला आलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू टीव्हीवाल्यांनी घेऊन त्यांचा इतिहास मुळातच किती कच्चा आहे, ह्याची लक्तरे जाहीरपणे टांगलेली आहेतच. तेव्हा जौद्या. टेक अ चिल पिल.
>>आज बाजीराव शिनेमाबाबत
>>आज बाजीराव शिनेमाबाबत इतिहासाची मोडतोड म्हणून थयथयाट करणारे नथुराम नाटकातील खोट्या संवादांवर टाळ्या पिटत होते.
<<
ह्या वाक्याला काय आधार आहे? बाजीराव सिनेमावर टीका करणारे सगळे नथुराम समर्थक आहेत हे कसे काय शोधून काढले? ह्या खळबळजनक संशोधनाबाबत आणखी माहिती मिळेल का? किती लोकांच्या मुलाखती घेतल्या? नक्की काय प्रश्न विचारले? टक्केवारी काय होती वगैरे.
का निव्वळ बाजीराव ब्राह्मण आणि नथुराम ब्राह्मण असा बादरायण संबंध लावला गेला आहे?
कारण सुजाण नागरिक नथ्थ्याच्या
कारण सुजाण नागरिक नथ्थ्याच्या खोट्या वाक्यांवर टाळ्या मारत नाही
>>कारण सुजाण नागरिक
>>कारण सुजाण नागरिक नथ्थ्याच्या खोट्या वाक्यांवर टाळ्या मारत नाही
हे उत्तर असंबद्ध आहे. बाजीरावमधील खोट्याला नाक मुरडणारे तमाम लोक हे नथुरामला टाळ्या मारत होते ह्या वाक्याला काय आधार आहे हा प्रश्न होता. ह्याचे उत्तर देता आले तर पहा.
तुम्ही टाळ्या मारतात हे कळले
तुम्ही टाळ्या मारतात हे कळले म्हणून जोरदार लागली
बरे व्हा
जयंत, +१ ते शेंडेनक्षत्र नामक
जयंत, +१
ते शेंडेनक्षत्र नामक डूआयडी स्पेसिफिक कामाकरताच अॅक्टिवेट होत असते. दुर्लक्ष करावे. उत्तरात त्यांना, फक्त "तुम्ही खोटे बोलत आहात" इतकेच म्हणावे.
<<बाजीरावाच्या घरचे लोक
<<बाजीरावाच्या घरचे लोक मस्तानी व तिच्या मुलाच्या जिवावर उठले होते , याचा बोभाटा आधीच झालेला होता.. त्यामुळे समशेर नाहीसा झालाअसता तर जनतेने पेशवे कुटुम्बियानाच गृहीत धरले असते.
त्ञामुळे बाजीरावाच्या निधनानंतर समशेरचा संभाळ त्यानी ( झक्क मारत ) केला . जर त्याला सन्मानपूर्वक जीवन द्यायचेच असते तर ते पूर्वीच दिले असते , त्यालाही अन मस्तानीलाही.>>
मस्तानी प्रकरण हे तत्कालिन जनतेसाठी कुचेष्टेचा आणि टीकेचा विषय होता, कौतुकाचा नाही. मस्तानीविषयी वा तिच्या वंशाविषयी जनतेत काही विशेष सहानुभूती असल्याचे ऐकिवात नाही. अन्यथा 'जनतेने' आधीपासूनच मस्तानीची बाजू घेऊन पेशव्यांवर दबाव आणला असता पण तसं काहीच घडलं नाही. तसंही त्यावेळी लोकशाही नव्हती त्यामुळे जनतेच्या मताला फार महत्वही नव्हते.
महत्त्वच नव्हते तर दबाव कसा
महत्त्वच नव्हते तर दबाव कसा आणला असता?
विरोधी वाक्य
विरोधी नाहीये हो वाक्य. नीट
विरोधी नाहीये हो वाक्य. नीट वाचा, कळेल.
जनतेच्या मताला महत्व नव्हते..
जनतेच्या मताला महत्व नव्हते.. आणि जनतेने दबाव आणला नाही हे विरोधी वाक्य
जसे 'लोकमान्य' चित्रपटात
जसे 'लोकमान्य' चित्रपटात आगरकर कारण नसताना निगेटिव दाखवले होते)त्यामानाने मस्तानी बाबत दिलेला दाखला खराच म्हणायला हरकत नाही.
<<
मला टिळकच निगेटीव आणि आगरकर बरोबर वाटत होते सिनेमात !
आ-ताच पाहिला. खुप आवडला.
आ-ताच पाहिला. खुप आवडला. पेशव्यांचा अपमान होईल असे काहिच नाही चित्रपटात. रणवीरने बाजीराव मस्त साकारलाय. सगळेच आपापल्या भुमिकेत छान वाटलेत.
>>तुम्ही टाळ्या मारतात हे
>>तुम्ही टाळ्या मारतात हे कळले म्हणून जोरदार लागली
बरे व्हा
<<
हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. एकंदरीत माझ्या सरळ सोप्या तर्कशुद्ध प्रश्नाला उत्तर देता येत नसल्यामुळे मग हा डू आयडी आहे का आणि त्याचा कसा अपमान करावा वगैरे उथळ आकांडतांडव चालू झाले आहे. कुणी प्रश्न विचारला आहे ह्यापेक्षा काय प्रश्न विचारला आहे ते पहा.
पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, वर असा दावा केला गेला आहे की नथुरामच्या संवादाला टाळ्या पिटणारेच आज पेशव्यांच्या बायका नाचवल्या म्हणून नाके मुरडत आहेत ह्याला काय आधार आहे?
दीपांजली, सध्या निगेटिव्ह आणि
दीपांजली, सध्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या व्याख्या बदलल्यात. तुम्ही जुन्याच चष्म्यातून बघताय.
टिळकांनी गुंड पाठवून सभा उधळून लावणं आणि स्वतः हजर राहून ते कौतुकाने पाहणं हे आता जे काही होतं त्याचं उदात्तीकरण व्हाया टिळक.
Pages