आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
http://www.telegraph.co.uk/ne
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/china/12051354/Chinese-bu...
ही स्थिती भयावह आहे. लवकरच दिल्लीतही अशीच स्थिती दिसू लागल्यास नवल वाटणार नाही.
आयएसच्या संकेतस्थळावर
आयएसच्या संकेतस्थळावर पाश्चिमात्य देशांना संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. पॅरिस म्हणजे सुरुवात होती, उद्या वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि मॉस्कोवर भयानक हल्ले चढवू. आमच्या बंदुकीपासून हे जग आता सुरक्षित राहू शकत नाही....असा जगाच्या विनाशाचा इशारा प्रसिद्ध केला आहे. दोन दिवसांपुर्वी आयएसने पब्लिश केलेल्या क्लिपमध्ये इटलीच्या रोममधील 'कोलोसिअम'च्या दिशेने आयएसचे रणगाडे व लष्करी वाहने पुढे सरकत असल्याचे दाखविण्यात आले. हे लष्कर (आर्मी ऑफ रोम) लवकरच कोलोसिअमवर ताबा मिळवेल आणि पाश्चिमात्यांविरोधात युद्ध छेडेल असे दाखवण्यात आले. आयएस एकंदर ६० देशांबरोबर संघर्ष करत आहे आणि अंतिम विजय 'आयएस'चाच होईल असा डंकाही पिटला आहे. ख्रिश्चनांचे धार्मिक स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटीमधील प्रमुख वास्तूही दाखवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनदरांच्या विक्रमी घसरणीच्या पार्श्वभूमीवर तेल उत्पादक देशांच्या (ओपेक) शिष्टमंडळाने भारताचा दौरा केला. ओपेकचे महासचिव अब्दुल्ला अल बद्री ह्यांनी भारताचे केंद्रिय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांची भेट घेतली. भारताची ८५% इंधन आयात ओपेक सदस्य देशांकडून करतो. भारत व ओपेक मधला हा पहिलाच 'इन्स्टिट्यूशनल डायलॉग' आहे.
>>भारत व ओपेक मधला हा पहिलाच
>>भारत व ओपेक मधला हा पहिलाच 'इन्स्टिट्यूशनल डायलॉग' आहे.<<
अतिशय महत्वाचं. या ऑइल वॉरचा फायदा भारताला मिळेल असं वाटतयं, खासकरुन वित्तिय तूट कमी करण्यासाठी.
कॅनडा २५,००० निर्वासितान्ना
कॅनडा २५,००० निर्वासितान्ना स्विकारणार आहे. युद्धपातळीवर लवकरात लवकर निर्वासितान्चे अर्ज स्विकारणे सुरु आहे... फेब २०१६ पर्यन्त हा टप्पा पुर्ण होणे अपेक्षित आहे.
अनेकान्नी कॅनडात यायला नकार दिला (मग सिरियात रहा... ), आता युनो चे अधिकारी ज्या १०,००० निर्वासितान्नी कॅनडात यायला आधी नकार दिला होता त्यान्ना पुन्हा सम्पर्क साधते आहे.
काय सुरु आहे समजत नाही. निर्वासित आहेत पण यान्ना केवळ जर्मनीत जायचे आहे. विशाल असा रशिया, सौदी, कतार, UAE यान्नी किती लोकान्ना प्रवेश दिलेला आहे ?
बहुधा परत नंतर सीरियात जाता
बहुधा परत नंतर सीरियात जाता यावे म्हणून असेल.
काय सुरु आहे समजत नाही.
काय सुरु आहे समजत नाही. निर्वासित आहेत पण यान्ना केवळ जर्मनीत जायचे आहे >> उदय.. माझ्यामते यामागं बरीच कारणं आहेत. जर्मनीबद्दल या लोकांना आधीपासून माहिती आहे. जर्मनीचं निर्वासितांबद्दलच धोरण खूप उदार आहे. जर्मनीतली (एकूणच काँटिनेंटल युरोपातली) सोशल सिक्युरिटी सिस्टीम खूप चांगली आहे. शिवाय एकदा युरोपमधल्या एका देशात आल्यावर पूर्ण युरोपभर कुठंही जाता येतंं. शिवाय युरोपातून सिरिया जवळ आहे. जर कॅनडात आले तर त्यांना तिकडंच एकाच देशात रहावं लागेल.
मनीष, जर्मनीची व्हेटिंग
मनीष, जर्मनीची व्हेटिंग सिस्टीम काय आहे काही कल्पना आहे का? अमेरिकेत बराच काळ बॅकग्राउण्ड चेक करून मर्यादित लोकांना प्रवेश देत आहेत. कॅलिफोर्नियाबद्दल परवा सांगत होते.
नुकतंच अमेरिकेने तैवानला १.८
नुकतंच अमेरिकेने तैवानला १.८ अब्ज डॉलर्सचे लष्करी सहाय्य करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहिर केलं. ह्या निर्णयावर टीका करुन चीनने अमेरिकी राजदूताला समन्स बजावले आणि ह्या शस्त्र व्यवहारात गुंतलेल्या अमेरिकी कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचा इशारा दिला. तसेच साऊथ चायना सी मध्ये गस्त घालणारे ऑस्ट्रेलियाचे विमान पाडले जाऊ शकते अशी धमकीही दिली. ह्या धमकीनंतरही अमेरिका आण ऑस्ट्रेलिया ठाम आहेत.
अमेरिका तैवानला दोन विनाशिका, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, अॅम्फिबियस युद्धनौका व इतर शस्त्रं पुरवणार आहे. "तैवान हा चीनचा अविभाज्य भूभाग असून अमेरिकेची तैवानला शस्त्रविक्री चीनच्या सुरक्षेला आव्हान देणारी आहे" अशी म्हणून चीनने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तैवानच्या आखातात शांती व स्थैर्य निर्माण व्हावे म्हणून हा शस्त्रपुरवठा करीत असल्याची माहिती अमेरिकेने दिली.
एकिकडे ऑस्ट्रेलियाने वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा वापर करुन हवाईदलाच्या 'पी-२सी ओरियन' ह्या लांबपल्ल्याच्या टेहळणी विमाना द्वारे साऊथ चायना सी मधील एका कृत्रिम बेटावरुन टेहळणी केली. त्यामुळेही ऑस्ट्रेलियाने आपल्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप करत चीन खवळला आहे. परंतु ही गस्त थांबणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री मेरी पेन ह्यांनी बजावले.
COP21 - Grand success and
COP21 - Grand success and grand failure.
http://swarajyamag.com/world/cop21-where-it-succeeded-and-where-it-didnt/
ह्या बाबतीत भारताचे मॅगसेसे पुरस्कार विजेते water man श्री राजेंद्र सिंग काय म्हणतात ......
http://m.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/indias-waterman-sa...
ब्रूनेईच्या सुलतानाने देशात
ब्रूनेईच्या सुलतानाने देशात नाताळ साजरी करण्यास बंदी घातली. ख्रिश्चनांनी नाताळ घरातल्या घरात साजरा केला तरी चालेल. दुकानांवर केलेली सजावटही उतरवायला लावली आहे. मुसलमानांनी ख्रिस्ती लोकांच्या नाताळात सहभागी होणे हे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचे म्हटले आहे.
येते वर्ष जागतीक ध्रुवीकरण अनुभवेल अशी लक्षणे आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम असे दोन मोठे तट पडतील इतका भयानक द्वेष निर्माण होणार. तिकडे ट्रंप आणि त्या फ्रेंच बाई उघड उघड मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची भूमिका घेवून राहिलेत.
http://m.firstpost.com/world/real-life-grinch-bruneis-sultan-bans-christ...
मस्त विहिंपला जोरदार टक्कर
मस्त विहिंपला जोरदार टक्कर आहे.
ट्रंपचा प्रचार करायला साक्षी महाराजांना पाठवायचे का.?
भारत व रशिया दरम्यान गुरुवारी
भारत व रशिया दरम्यान गुरुवारी काही Oil deals झाली. ONGC विदेश लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड व ऑईल इंडिया लिमिटेड ह्या कंपन्यांनी रशियन ऑईल जायंट्सशी (Vancor and Rosneft) ही डील केली आहेत.
The oil sector agreements, reached as part of the annual summit between PM Narendra Modi and President Vladimir Putin, we re overshadowed by weightier deals in defence and nuclear power. But they indicate a change of heart on both sides. Kremlin was not keen amid high crude prices and Putin's nationalist views on ownership of oil and gas resources.New Delhi developed an aver sion to Russian acquisitions after buyout of Imperial Energy turned sour. With sanctions blocking access to western funding, Rosneft is looking east where India looks attractive -in terms of market for crude and funds -with 6-7% growth and 7% rise in oil demand. The time-tested bilateral political relationship is an added advantage.
खालील लिंकमध्ये दिलेल्या चायनीज चॅलेंज शिर्षकाखालील तुलनेत दिसून येते की २०१५ मध्ये भारताने रशियाशी ऑईल डील करण्याच्या बाबतीत चीनला मागे टाकले.
http://m.economictimes.com/markets/commodities/india-gets-oil-deals-as-r...
पॅराग्वे, उरुग्वे, ब्राझिल
पॅराग्वे, उरुग्वे, ब्राझिल आणि आर्जेन्टिनामध्ये भयानक पूर परिस्थिती उद्भवली आहे. लाखभर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले..... Thanks to El Nino phenomenon.
http://m.timesofindia.com/world/rest-of-world/Over-100000-flee-flooding-...
ऑस्ट्रेलियात लागलेल्या
ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यात १००हून जास्त घरे जळून खाक झाली. कालपर्यंत वणवा अटोक्यात आला नव्हता. प्रखर उन्हाळ्यामुळे अजून अश्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लिंकमधला व्हिडियो भयानक आहे. अख्खी घरं, उभी झाडं जळताना दिसतायत.
http://m.timesofindia.com/world/rest-of-world/More-than-100-homes-lost-i...
झिंबाब्वेने चीनचे राष्ट्रीय
झिंबाब्वेने चीनचे राष्ट्रीय चलन युआन आपल्या देशातील प्रमुख चलन म्हणून स्वीकारल्याची घोषणा झिंबाब्वेचे अर्थमंत्री पॅट्रिक चिनामासा ह्यांनी केली. चीनव्यतिरिक्त युआनचा वापर प्रमुख चलन म्हणून करणारा झिंबाब्वे हा पहिलाच देश आहे. चीनने ह्यापुर्वी झिंबाब्वेला दिलेले ४ कोटी डॉलर्सचे कर्जही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन हा झिंबाब्वेचा दुसर्या क्रमांकाचा व्यापारी भागिदार देश आहे.
झिंबाब्वेची अर्थव्यवस्था चलनवाढ व बेरोजगारीमुळे कोलमडली असताना २००९ मध्ये झिंबाब्वेने स्वतःचे राष्ट्रीय चलन रद्द करुन अमेरिकी डॉलरचा चलन म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर दक्षिण अफ्रिकेचे 'रँड', ब्रिटनचे पौंड ह्याचाही वापर सुरु केला होता. मग गेली काही वर्षं त्यांची अर्थव्यवस्था सुधारत असून आफ्रिकेतील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे. गेल्यावर्षी झिंबाब्वेने युआनचा देशात वापरण्यात येणार्या राखीव चलनांमध्ये समावेश केला होता. इतर देशही झिंबाब्वेचे अनुकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा नक्कीच अमेरिकी डॉलरला धक्का आहे.
डॉलरला धक्का की झिम्बव्वेची
डॉलरला धक्का की झिम्बव्वेची पळवाट?
युरो, चीनचे राष्ट्राध्यक्ष झी
युरो, चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग ह्यांनी ह्या महिन्याच्या सुरुवातीला झिंबाब्वेला भेट दिली होती आणि जवळजवळ १० आर्थिक व व्यापारी करारांवर सह्या झाल्या होत्या. कर्जही माफ केलं गेलंय. युआन प्रोजेक्ट तर केलाच गेला असणार ना?
हे उद्योग अर्जेंटीना सारख्या
हे उद्योग अर्जेंटीना सारख्या देशांनी ही करुन झाले आहेत. कोणत्याही दुसर्या देशाचे चलन असे आपले म्हणुन जास्त काळ चालत नाही. मोनेटरी आणि फ़िस्कल पॉलिसी कशी एक सारखी असेल. हे फ़क्त कर्ज परत फ़ेड करण्या साठी सोप गणित केलेल आहे. याचा अर्थ इतकाच १ झांबिअन क्वाचा हा एका युआन बरोबरीचा झाला.
ह्म्म. पॉइंट आहे. कळेलच
ह्म्म. पॉइंट आहे. कळेलच हळूहळू. ओ पण झांबिया कुठे मधेच आला?
नेपाळचे नविन पंतप्रधान नेहमी
नेपाळचे नविन पंतप्रधान नेहमी पहिली भेट भारताला देतात. ह्या वेळी मात्रं नेपाळचे नवे पंतप्रधान ओली हे चीनला जाणार होते. परंतु त्यांनी आता तो बेत बदलला असून आता ते भारतातच आधी येणार आहेत. फक्त मधेसींच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत थांबणार आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/india-not-china-could-be-f...
चुकलोच ! झिम्बाब्वे डॉलर
सौदी अरेबियामध्ये २००३-२००६
सौदी अरेबियामध्ये २००३-२००६ ह्या वर्षांमध्ये अल-कायदाशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ४७ जणांना नुकतीच मृत्यूदंडाची शिक्षा केली गेली. ह्यात 'शेख निम्र अल-निम्र' ह्या शियापंथियांच्या धार्मिक नेत्यालाही फाशी देण्यात आले. शेक अल-निम्र ह्यांच्यावर सौदी राजवटीविरोधात निदर्शने करण्याचा आरोप होता. ह्या निदर्शनांमध्ये २० जण बळी गेले होते. (इथे शेकडो लोक उडवले गेले, अतिरेकी रंगेहाथ पकडले गेले, ताब्यात घेवून आरोप सिद्ध झाले तरी एक फाशी द्यायला यंत्रणांच्या नाकी नऊ येतात आणि तिथे एकसाथ ४७ जण!).
ह्या धार्मिक नेत्याच्या फाशीबद्दल सौदीला फार मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन जाबेर अन्सारी ह्यांनी दिला. इराणमध्ये ह्या फाशीविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि लोकांनी सौदी दूतावासाला आग लावली.
#Polarization
केश्विनी, ध्रुवीकरण सर्वच
केश्विनी, ध्रुवीकरण सर्वच बाबतीत होत आहे आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवर सुध्दा.
असो जगात नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत तोपर्यंत हे असेच चालणार.
नरेश, जगात पुर्वीही नेते
नरेश, जगात पुर्वीही नेते होते, पुर्वीही समर्थक होते. इतकं ध्रुवीकरण होत नव्हतं. आणि जेव्हा झालं तेव्हा महायुद्धं पेटलं. आता आंतरराष्ट्रीय ध्रुवीकरण तर आहेच पण एकेका राष्ट्रात अंतर्गत ध्रुवीकरण खूप भयानक रित्या दिसून येतंय especially आफ्रिका आणि मध्यपूर्वेचे देश. ह्या अंतर्गत संघर्षांमध्ये बाहेरची राष्ट्रं खेचली जाऊन पोलरायझेशनला मोठा प्लॉट मिळत गेला. ह्याच निमित्ताने अमेरिका व्हर्सस रशिया हा मागे पडलेला विषय पुन्हा नव्याने तितकंच अक्राळ विक्राळ रूप धारण करेल अशी भीती आहेच. समुद्र, आकाश व धरती असं कुणीही ह्या पोलरायझेशनमधून होणार्या युद्धांमधून सुटणार नाहिये. आर्क्टिकमध्ये, एशिया पॅसिफिकमध्ये, अरब गल्फमध्ये, साऊथ चायना सी भागामध्ये... कुठेही जा, पाणी कधीही पेटेल अशी अवस्था आहे. असेच पण वेगळ्या कारणाने (स्थलांतरितांना सामावून घेणे) ध्रुवीकरण युरोपिय महासंघातही होवू शकते आणि महासंघ फुटू शकतो.
राष्ट्रं त्याही परिस्थितीत व्यापाराद्वारे, इतर प्रोजेक्ट्सद्वारे जोडलीही जाऊ पाहत आहेत. पण हे प्रयास प्रबळ ठरतात की एका फ्लो सारखं होणारं ध्रुवीकरण प्रबळ ठरतं ते पहायचं. सगळ्यात मोठा culprit आहे दहशतवाद आणि वर्चस्व गाजवण्याची लालसा.
पठाणकोट हल्ल्यापाठोपाठ
पठाणकोट हल्ल्यापाठोपाठ अफगाणिस्तानमधल्या मझार-ए-शरीफ येथिल भारतीय वकिलातीवर हल्ला झालाय :राग:.
http://www.dnaindia.com/india/report-indian-consulate-in-afghan-city-maz...
पठाणकोट नक्की काय चालले आहे ?
पठाणकोट नक्की काय चालले आहे ? किती अतिरेकी होते ?
हल्ला करायचे मनसुबे, आणि जोडीला द्वेषाचे रसायन सदैव तयारच असते... वेळ, स्थळ ते ठरवतात... हे केव्हातरी थाम्बायला हवे...
सौदीने शिया धर्मगुरूंना
सौदीने शिया धर्मगुरूंना ठोठावलेली फाशीची शिक्षा, इराणमधील दूतावासातील जाळपोळ हा चॅप्टर पुढे जाऊन सौदीने इराणशी संबंध तोडले. आता बहारीन, सुदान आणि यूएईनेही तोच कित्ता गिरवला आहे.
http://www.bbc.com/news/world
http://www.bbc.com/news/world-asia-35240012
हे पण बघा! इकडे नॉर्थ कोरिया जबरी पॉवरफुल होऊन गेलाय!
तात्या, नॉर्थ कोरियाबद्दल मला
तात्या, नॉर्थ कोरियाबद्दल मला कायम कुतुहल वाटतं. हे लोक एरव्ही जगाच्या चर्चेत नसतात कारण त्यांचे कुणाशीही मैत्रीचे संबंध नाहित किंवा ते साऊथ कोरिया सोडल्यास कुणाच्या वाटेला उघड उघड गेलेले दिसत नाहीत. पण आतल्या आत प्रचंड विध्वंसक काम सुरु असतात आणि ती पुर्णत्वाला गेल्यावरच बाहेरच्या जगाला कळतात. हे लोक थेट अमेरिकेवर सायबर हल्ले करतात पण त्याचा बोलबाला फारसा होत नाही. खाली मुंडी पाताळ धुंडी असला डेंजरस प्रकार आहे. आतल्या आत त्यांची जनता कशी राहते, संस्कृती कशी आहे ते ही जगाला फारसं माहित नसावं.
असो....
न्युक्लिअर चेन रिअॅक्शन बाय फिशन द्वारे बनवलेला अणुबाँब आणि न्युक्लिअर फ्युजन द्वारे हायड्रोजन आयसोटोप्स वापरुन बनवलेला हायड्रोजन बाँब ह्यापैकी हायड्रोजन बाँब जरा क्लिन आहे पण महाभयानक आहे. पण मग, हायड्रोजन बाँब वापरुन हल्ला केला तर त्याचे परिणाम नक्की काय असतील? फिशनमुळे एनर्जी लिबरेट होते, हीट लिबरेट होते. आणि सोबत रेडिओअॅक्टिव्ह उत्सर्जनामुळे जेनेटिक किंवा इतर भयानक परिणाम घडून येतात. फ्युजनमुळे नक्की काय घडेल?
Pages