बुलबुल संभाषण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 December, 2015 - 01:10

हल्ली आमच्याकडे काळ्या डोक्याचा बुलबुल दिसायला लागला आहे. इतर पक्षांपेक्षा हा जरा व्यवस्थित फोटो काढून घेतो स्वतःचे. त्याच्या वेगवेगळ्या पोझ मध्ये तो जास्त चुळबुळ न करता पण जागेवरच अंगविक्षेप करत आरामात फोटो काढून देतो. सोबत मला त्याचे मुक संभाषण पण ऐकू आले त्याचे. Happy

१) काढणार का फोटो थांब जरा सिनरी पाहतो. झाडांच्या पानात काढ.

२)

३)
साफसफाई चालू आहे बहुतेक. (ड्राय क्लिनिंग :हाहा:)

४)

५) झाली का व्यवस्थित निरिक्षण चालू आहे. वरून एक चतुर पण विहारतोय.

६) हट्टा कट्टा झाल्यावर कसा दिसेन? असाच गोलमटोल.

७) इश्य असा कशाला फोटो काढलास?

८) थोड पदर घेऊन इश्य

९) आता दिसतोय ना जंटलमन का काय म्हणतात ते.

१०) कोण आहे रे खाली?

११) वर ये तुला बघतो.

१२) काडी पैलवान नको समजू मला.

१३) ऑ मला घाबरतच नाही.

१४) मी नाही जा फोटो काढून देणार.

१५) चाललो मी. बाय बाय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कीत्ती गोड.. जागु, तुझी आणि पक्षांची दाट मैत्री आहे, तुझ्या कडुन कीती लाड करुन घेतात ते, अगदी वेग वेगळ्या पोज मधे फोटो काढु देतात तुला... Happy

वा सुंदर फोटो. बहुतेक पिल्लू आहे, कारण तुरा अगदीच थोटा आहे ( कदाचित तूझ्या घरी जन्मलेला असणार, म्ह्णून ओळख ठेवलीय त्याने. )

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

दिनेशदा घरात बाळे घालतात ते लाल तुर्‍याचे बुलबुल.