Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन दिवस सामना क्वचितच पहातां
दोन दिवस सामना क्वचितच पहातां आला. रहाणेचं शतक झालेलं मात्र पहातां आलं. {<< दोन शॉट मला जबरदस्त आवडले ते म्हणजे राहणे चा शतक करतानाच स्ट्रेट पंच नि धवन ने केलेला बॅकफूट defensive push जो मिड ऑन नि कव्हर बायसेक्ट करून गेला.>> सहमत. ] खूपच कौतुक वाटलं. रहाणे तर आजही छान खेळलाय !
एकंदरीतच ह्या कसोटीत भारताचा खेळ अभिमानास्पद झाला. द. आफ्रिकेचंही कौतुक वाटलं; पीचबाबत तक्रारीचा सूर त्यानी अजिबात लावलेला नाही. आमला व द.आफ्रिकेचे प्रशिक्षक यांनी तर भारतीय फलंदाजी व गोलंदाजीचं कौतुकच केलंय.
कुठल्या तोंडाने तक्रार करतील
कुठल्या तोंडाने तक्रार करतील जिथे सगळा संघ १२१ धावांवर बाद होतोय तिथे रहाणे एकट्याने १२७ केले. याचा अर्थ चुकी त्यांच्या फलंदाजांचीच आहे. आज ही पहिले ४ खेळाडू लवकर बाद झाले तरी रहाणे आणि कोहली टिकून खेळले. अशी भागीदारी करायला कुठल्याच द आफ्रिकेच्या फलंदाजाला जमले नाही एका बाजूने एबी खेळत होता तर दुसरीबाजू लावून धरणे हा प्रकार कोणीच केला नाही. जवळपास सगळे १० बळी निव्वळ चेंडूचा वेग आणि त्याची दिशा यावर लक्ष न दिल्याने घालवले.
What strategy prompted the
What strategy prompted the decision to send Rohit at No 3 ? Why can't we accept that No 3 belongs to Pujara in tests and move on ? Rohit ला सेटल करण्यासाठी इतरांचे बकरे कशाला बनवताहेत ? कोहली ने रोहित बरोबर नंबर सहा स्वॅप करून बघावे एकदा म्हणजे लक्षात येईल काय ते.
रहाणे, विराट मस्त खेळले.
रहाणे, विराट मस्त खेळले. नोहिट स्वतःच्या आणी माझ्या लौकिकाला जागला पुन्हा एकदा. राखीव खेळाडूंपैकी कुणीही (पक्षी: राहुल, गुरुक्रीत, मिश्रा, अॅरोन) नोहिट च्या जागी घेतले, तरी आहे त्यापेक्षा वाईट तर नक्कीच घडणार नाही. एक राहुल सोडला, तर बाकीचे सगळे बॉलिंग चे ऑप्शन्स सुद्धा देतील.
Why can't we accept that No 3
Why can't we accept that No 3 belongs to Pujara in tests and move on ? Rohit ला सेटल करण्यासाठी इतरांचे बकरे कशाला बनवताहेत ?
>>
त्याला बहुधा बॅटींग प्रॅक्टीससाठी पुढे आणला असावा. अर्थात या खेळपट्टीवर २००+ लीड आणि तीन दिवस शिल्लक म्हणजे सामना खिशातच आहे असे समजून असले प्रयोग करणे हे योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा झाला. पण नंबर ३ पुजाराचाच हे नक्की.
हो तिसर्या नंबरवर पुजारा
हो तिसर्या नंबरवर पुजारा किंवा रहाणे. तांत्रिक दृष्ट्या तेच दोघे.
अजिंक्य रहाणेचे अभिनंदन!!!
अजिंक्य रहाणेचे अभिनंदन!!!
प्रोटीज दुसर्या इनिंग्जमध्ये कसे बॅटिंग करतात ते पहायला मजा येईल.
Fifth Indian to score two
Fifth Indian to score two centuries in two innings of a test match after Vijay Hazare, Sunil Gavaskar, Rahul Dravid and Virat Kohli. Well played Rahane.
रहाणेचं सामन्यातलं दुसरं शतक
रहाणेचं सामन्यातलं दुसरं शतक दिमाखदार ! अभिनंदन.
रहाणेला खेळताना पाह्ताना काय वाटतं तें चपखलपणे कुणीतरी म्हटलंय- " Chip of the old block !" किती समर्पक !! कसला दिखाऊपणा नाही, डोक्यात हवा नाही, शांतपणे , आत्मविश्वासपूर्वक आपल कसब पणाला लावून शैलीदार खेळ करायचा !!! या गुणी खेळाडूला भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
<< कुठल्या तोंडाने तक्रार करतील जिथे सगळा संघ १२१ धावांवर बाद होतोय >> ऑसीज असते यांच्या जागीं तर फरक कळला असता व द. आफ्रिकेची खिलाडूवृत्ती जाणवली असती !
ब्लॉक ब्लॉक ब्लॉक चालूय. अजून
ब्लॉक ब्लॉक ब्लॉक चालूय. अजून तो डुप्लेसिस सुद्धा बाकी आहे, त्याचा दिवस असला तर तो पण यात माहीर आहे. एबीडी सुद्धा आहेच. बरंय पण, तेवढीच सामन्यात रंगत भरताहेत.
बाकी सचिन हवा होता आज, त्याच्या दोनचार ओवर बघायला मजा आली असती..
हर्षा भोगले : Harsha Bhogle
हर्षा भोगले :
Harsha Bhogle @bhogleharsha
If you love test cricket and spin bowling watch @ashwinravi99 bowling.
आगदी मनातल बोलले ... खरच खूप दिवसांनी मजा येतेय test cricket बघायला...
७२ ओवर ७२ रन्स.. आणि दोनच
७२ ओवर ७२ रन्स.. आणि दोनच विकेट !
उद्या मजा येणार मॅच बघायला.
कदाचित आपल्याला फक्त एकच विकेट काढायची गरज असेल आणि पुढे लाईन लिहिली असेल.
पण हे ती विकेट वेळीच काढल्याशिवाय समजणार नाही...
Fifth Indian to score two
Fifth Indian to score two centuries in two innings of a test match after Vijay Hazare, Sunil Gavaskar, Rahul Dravid and Virat Kohli. Well played Rahane. >>> टोटली!
यातील गावसकर चा सिक्वेन्स खतरनाक होता - पाक विरूद्ध पहिल्या टेस्ट च्या पहिल्या डावात शतक थोडक्यात हुकले, दुसर्या टेस्ट मधे दुसर्या डावात थोडक्यात हुकले. तिसर्या टेस्ट मधे मग त्याने दोन्ही डावांत मारले. त्यानंतर लगेच विंडीज विरूद्धच्या सिरीज मधे पहिल्याच टेस्ट च्या पहिल्या डावात द्विशतक. नंतर दुसर्या टेस्ट मधे शून्यावर आउट झाल्यावर तिसर्या टेस्ट मधे पुन्हा दोन्ही डावांत शतक. त्यानंतर पुन्हा पुढच्या टेस्ट मधे अपयशी, पण त्यापुढच्या टेस्ट मधे पुन्हा शतक! द्रविड ने ही बहुधा दोनदा मारले आहे - एकदा न्यूझीलंड व एकदा पाक विरूद्ध.
फारएण्ड, बरोबर आहे. गावसकर
फारएण्ड, बरोबर आहे. गावसकर -३, द्रविड - २, आणी हजारे, (परत वाचताना आणी हजारे / आण्णा हजारे ह्यात गल्लत झाली), कोहली आणी रहाणे प्रत्येकी १.
साऊथ अफ्रिका मस्त खे ळतीये, पण असं वाटतय की it is a matter of one wicket, unless Faf and Duminy take a cue from Amla and ABD.
दिल्ली आखाडा नाहीये. ती तर
दिल्ली आखाडा नाहीये. ती तर ५ व्या दिवशीची विकेट पण वाटत नाही ये. (अजून तरी ) दुसर्या दिवशी लिहिल्यासारखे ती ऑलमोस्ट पाटा टाईप झाली आहे. ज्याप्रमाणे आमला आणि एबिडी खेळत आहेत त्याप्रमाणे बाकीच्यांनी देखील खेळले तर ड्रॉ होऊ शकते.
आता तर पुजारा अन कोहली पण टाकत आहेत.
पण एक विकेट पडायचाच काय तो अवकाश.
वॉव कसला जबरी बॉल टाकला
वॉव कसला जबरी बॉल टाकला जडेजाने. सुपर्ब! बोळा निघाला. आता पाट वाहील बहुदा.
भारी. कालची दुसरी विकेट पण
भारी. कालची दुसरी विकेट पण जबरी होती.
एकाच सत्रात सगळे विकेट्स
एकाच सत्रात सगळे विकेट्स जायला हवे
पुढचा बोळा आडकला.. आता किवीच
पुढचा बोळा आडकला.. आता किवीच टाकायला पाहिजे...
आता विकेटी जायला हव्यात खरच.
आता विकेटी जायला हव्यात खरच. कसले खेळत आहेत राव. २०० बॉल २०, ५० बॉल नो रन वगैरे. शी...
फापडू गेला. आता दोन अजून
फापडू गेला. आता दोन अजून धक्के जर याच सेशनमध्ये बसले की शेवटचा टोला हाणता येईल.
निघाला निघाला बोळा निघाला
निघाला निघाला बोळा निघाला फायनली... आता फक्त एबीडीचा बोळा..
१३६/७ डिव्हिलियर्स गेला. भारत
१३६/७ डिव्हिलियर्स गेला. भारत मॅच जिंकण्याच्या जवळ आता शेपूट किती वेळ वळवळणार हेच बघायचे.
साऊथ आफ्रिका १४३ ऑलाआऊट.
साऊथ आफ्रिका १४३ ऑलाआऊट. भारताचा ३-० ने मालिका विजय. भारतीय संघाचे अभिनंदन!!!
आधीच्या दोन सामन्यांपेक्षा हा सामना थोडातरी चुरशीचा आणि संपुर्ण पाच दिवस खेळला गेला.
143/10 in 143.1 (143.10)
143/10 in 143.1 (143.10) overs!!!!!"
मस्त. अभिनंदन!!
मस्त. अभिनंदन!!
पाऊस आला नसता तर कदाचित
पाऊस आला नसता तर कदाचित whitewash झाला असता
जिंकल्याचा आनंद असला तरीही
जिंकल्याचा आनंद असला तरीही रहाणेच्या खेळीसारखे क्वचित अपवाद वगळतां या दौर्यात कसोटी क्रिकेटचं फारच एकांगी स्वरुप पहावं लागलं ही खंत आहेच ! फलंदाजांची त्रेधातिरपीट हा कांहीं चिरंतन आनंदाचा विषय होत नाहीं व फिरकीला पोषक विकेटवर फिरकी गोलंदाजांचा कसही लागत नाही. [ 'मग ते मात्र आपल्याला सोईच्या विकेटस बनवतात, तेंव्हांचं काय ? ' , या वादांत मला रस नाहीं. एक प्रेक्षक म्हणून कसोटी सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व डांवपेंच याचा कस लागलेला पहाणं व त्यातल्या चांगल्या खेळी आठवल्यावर मिळणारा आनंद या दोनच गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. ]
जिथे सर्वजण द. आफ्रिकेच्या
जिथे सर्वजण द. आफ्रिकेच्या फलंदाजाचे कौतुक करत आहेत. "फार पेशन्स ने खेळले. ठाण मांडून खेळले. इतके चेंडू खेळून सुध्दा संघासाठी टिकून राहिले" इ. तिथे भारतीय गोलंदाजांचे सुध्दा कौतूक झाले पाहिजे. कालचा पुर्ण दिवस समोरचा नुसता डिफेंन्स करत आहे माहीत असून सुध्दा नकारात्मक गोलंदाजी केली नाही उलट दर षटकात विविधता आणली. लेगसाईड बॉलिंग न करता सतत बळी घेण्याच्या दृष्टीने गोलंदाजी केली. आज डिव्हिलिअर्स आणि आमला यांनी अंत पाहिला. तरी कुठेही कोहली इ. लोकांकडून स्लेजिंग वगैरे घडले नाही. "एक जायेगा तो सब जायेंगे" या चित्रपटाच्या डायलॉग वर विश्वास ठेवून त्या एका विकेट्ससाठी सगळ्यांनी शांत राहून वाट पाहिली. त्याचे फळ त्यांना विजयाच्या स्वरुपात मिळाले.
अश्विन याने ३१ विकेट्स
अश्विन याने ३१ विकेट्स घेतल्या म्हणजे एकून आफ्रिकन विकेट्स पैकी अर्धे. ३ पुर्ण कसोट्या आणि एक अर्धी कसोटी म्हणजे आफ्रिकेच्या एकून ७० विकेट्स पैकी ३१ विकेट्स अश्विनने घेतल्या आहे त्याच्या मागोमाग २३ विकेट जाडेजाने घेतल्या. ७०-५४ = फक्त १६ विकेट्स इतरांनी मिळवल्या आहे.
Pages