क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चर्चा चालू आहे,
असामी छान पोस्टस. Happy

मी सामना वा हायलाईटस पाहिल्या नाहीत फारश्या म्हणून नेमके मत मांडू शकत नाही.
पण जर वरखाली बाऊन्स वा अधनमधना चेंडू कुठल्याश्या क्रॅकवर पडून भुताटकी दाखवणे अश्या प्रकारात मोडणारी खेळपट्टी असेल तरच ती अनफिट म्हणू शकतो अन्यथा फक्त पहिल्या दिवसापासूनच बॉल वळत आहेत या निकषावर टिका नाही करू शकत.
किंबहुना वर उल्लेखलेली खराब खेळपट्टी भारत तयारही करणार नाही, कारण अश्यात मग भारतही फेव्हरेट राहणार नाही. अशी खेळपट्टी बनवायचा जुगार एका बलाढ्य संघाला नमवायला कमजोर टीम करू शकते, कारण मग जुगारात कमजोर संघ जिंकायचे चान्सेस आधीच्या तुलनेत वाढतात.
या खेळपट्टीवर आपले सेहवाग आणि सिनिअर फॅब फोर खेळले असते तर आपलीही अशी दुर्दशा झाली असती का असाही विचार करायला हवा. कारण आपल्याही या संघातील फलंदाजांचे तंत्र फिरकी विरुद्ध त्या तोडीचे नाही. उगाच यांच्यामुळेही खेळपट्टी बदनाम होत असेल.
तुर्तास जे काही वेगवान वा सो कॉलड स्पोर्टींग खेळपट्टीचे प्रयोग असतील ते डोमेस्टीक क्रिकेटमध्ये व्हायला हवे. बाहेरच्या देशांशी खेळताना पाहुणा कसा आहे ते बघून पुड्या बांधणे योग्य. कारण या दर्यादिलीच्या नादात आपण घरातही हरू लागलो तर त्याचा फटका थेट आत्मविश्वासावर बसू शकतो.

बाकी ऑस्ट्रेलियाच्याही एकदोन खेळाडूंनी टिका केलीय असे ऐकलेय. पक्के चाप्टर (मराठीत हरामी?) असतात हे ऑसीज.. Wink

<< होम अ‍ॅडव्हांटेज टेस्ट मध्ये सगळ्यांनीच घेतला आहे त्यामुळे ICC त्याबद्दल काही करू शकत नाही.>> आज नागपुर खेळपट्टीबाबत पंचांकडून आक्षेप नोंदवण्यात आला त्यावरील वृत्तातील हा आत्यंतिक महत्वाचा मुद्दा -
प्रत्येक देश आपल्या सोईच्या खेळपट्ट्या बनवतो पण ...how far a team can stretch the " home advantage " हें महत्वाचं !!!
<< तेंव्हा क्रिकेट हा पैसे मिळवून देणारा खेळ नव्हता, आत्ता आहे. त्यामूळे तेंव्हा विजयाला जी किंमत होती त्यापेक्षा त्यापेक्षा आत्ता नक्की अधिक झालेली आहे (emotionally नाही).>> क्रिकेट हा आतां पैसे मिळवून देणारा खेळ झाला आहे कारण तो अधिकाधीक लोकप्रिय होतोय, जाहिराती खेंचतोय; मग ही लोकप्रियता टीकवणं तर सर्वच संबंधितांसाठी अधिकच महत्वाचं ठरतं ! आपण तर त्याच्या नेमकं विरुद्ध करतोय, असं नाही वाटत ? सोनं देणार्‍या कोंबडीची उलट अधिकच काळजी घ्यायला हवी !! Wink

आपण तर त्याच्या नेमकं विरुद्ध करतोय, असं नाही वाटत ? >> भाऊ "चुरशीचा सामना नि विजयी होणारा संघ" ह्या सोन्याची अंडी देणार्‍या कोंबड्या आहेत. पाच दिवस सामने चालतीलच ह्याची खातरजमा देणारे पिच नव्हे.

LOL भाऊ. नाहि पाहता आला पहिला दिवस. कसे होते पिच ? नागपूरसारखे कि बंगलूरू सारखे कि मोहालीसारखे ? अहिक स्पिन होत नसेल असे वाटतय मिश्रा नाहिये त्यावरून. स्क्रफ बॉलने रिव्हर्स स्विंग करायचा प्लॅन आहे का ?

नोहिट शर्मा never disappoints me! त्याने नेमबाजी स्पर्धेत का उतरू नये? नेम धरून लाँग ऑन बाऊंड्रीवर कॅच काढून देण्याचं त्याचं कसब वाखाणनीय आहे. वैय्यक्तिक स्कोर ५ बॉल १ रन आणी टीम चा स्कोर ४/१३८ असताना सुद्धा ईतकं self (awareness)less खेळणं सोपं नाही. त्याला एक विशेष (मंद)बुद्धी लागते.

बांगर मला खेळाडू म्हणून आवडायचा. लिमिटेड टॅलेंट, पण जिगरी होता. IPL मधे कोच म्हणून सुद्धा चांगली कामगिरी होती त्याची २ वर्षांपूर्वी. पण हे BCCI चा प्रत्येक निर्णय डिफेंड करण्याची जवाबदारी आली की भले भले (पक्षी: गावसकर) गंडतात, तिथे बांगर ची काय कथा? आपलं नशीब थोर की त्याने डॉन ब्रॅडमन ने सुद्धा पहिल्या मॅच मधे फारसं काही केलं नव्हतं किंवा तेंडुलकर सुद्धा पहील्या सिरिज मधे गाजला नव्हता वगैरे वक्तव्य नाही केली. मला तर त्या दोन्ही शर्मां ना (रोहीत आणी ईशांत) मारून मुटकून (प्रेक्षकांच्या माथी) यशस्वी बनवायचा अट्टाहासच लक्षात येत नाही. ईतक्या संधी मिळाल्या असत्या, तर वुर्केरी रामन, अरुणलाल, देवांग गांधी, गगन खोडा, अतुल बेदाडे हे सुद्धा भारताचे फॅब फाईव्ह झाले असते.

माझे असे म्हणणे आहे कि, पुढच्या २-३ सिरीज ज्या काही असतील त्यात प्रत्येक सामन्यामधे रोहोतला खेळवावे. एव्हढेच नाही तर त्याला एक काय तो नक्की क्रमांक समजा सहा देऊन सांगावे कि बाबारे पुढच्या दहा सामन्यांमधे तू इथे खेळशील. एक वेळ कोहली नसेल पण तू नक्की असशील. त्यानंतर काय ते एकदा ठरवावे कि तो टेस्ट साठी viable आहे कि नाही ते. आणि नसेल तर मग परत पाठी वळून पाहू नये. दर वेळी तेच तेच argument ऐकूण कंटाळा आलाय.

वुर्केरी रामन, अरुणलाल, देवांग गांधी, गगन खोडा, अतुल बेदाडे हे सुद्धा भारताचे फॅब फाईव्ह झाले असते. >>>> Lol काय यादी आहे !!
ह्यात विक्रम राठोड, सुजित सोमसुंदर, शिवसुंदर दास ह्यांनाही घाला .. झालच तर तो दिनेश मोंगिया.

खरच, २००० च्या आधी (सचिन कॅप्टन असताना) काय एक एक नग होते टीममध्ये !

वुर्केरी रामन, अरुणलाल, देवांग गांधी, गगन खोडा, अतुल बेदाडे हे सुद्धा भारताचे फॅब फाईव्ह झाले असते. >>>> हाहा

रहाणेचे अभिनंदन!

पिच हळूहळू पाट्याकडे झुकत चालली आहे. काळजी वाटतेय. Wink

रहाणेचे अभिनंदनच. "बाहेर" शतक आणि देशात नाही म्हणजे काय? जनरली उलटे असते.

१२१-१० आफ्रीका

रहाणेला ६ धावांची आणि भारताला २१३ धावांची बढत. आता कोणी खेळपट्टीबद्दल बोलणार नाही.

आता कोणी खेळपट्टीबद्दल बोलणार नाही. >>
जर रहाणे जिद्दीने खेळला नसता अन आपणही १५० ऑल ऑट झालो असतो तर सगळे नाचले असते ना डोक्यावर . १५० अन १२१ Diabolical Pitch Happy

रहाणे सोडा पण अश्वीन याने सुध्दा ५० केले. रहाणे सोबत १०० रन जोडले. आता आफ्रिकेच्या फलंदाजांनी धसका घेतला असेल तर ती गोष्ट वेगळी

केदार, रहाणे बरोबर जाडेजाने आणि नंतर अश्विनने सुध्दा अत्यंत उपयुक्त भागीदार्‍या केल्या आहेत. कोहलीसुध्दा काल मस्त खेळत होता. मुद्दा हा आहे की साऊथ अफ्रिकेचे फलंदाजांचे फिरकीला खेळण्याचे तंत्र चांगले आहे की नाही? आज तर फास्टर बॉलरनी सुध्दा तीन विकेट घेतल्या. जर डिव्हिलियर्स खेळू शकतो तर इतर फलंदाज नक्की चुकतात कुठे?

आज जाडेजाने ५ विकेट घेतल्या आहे तो कुठे बॉल स्पिन करतो ? सगळ्या विकेट्स त्याने निव्वळ आर्मबॉलवर जो स्पिन होतच नाही त्यावर घेतल्या आहे. याचा अर्थ कोणता चेंडू हळू येणार आहे कोणता जलद याकडे फलंदाजांचे लक्ष नव्हते. ?

डिमन्स इन द माईंड आर मोअर डेंजरस !

लक्षात डीमन नंतर खेळपट्टीवर भुते अधिक धोकादायक आहेत असे गुगल ट्रान्सलेटर ने सांगीतले आहे.

फॉलोऑन कशाला. दोनच तर दिवस झाले, पाऊसही नाही. शनिवार आहे मस्त ठोकमठाक करा, शनिवारची सुट्टी एंजॉय करवा लोकांची, आणि मग पुन्हा रैवारी त्यांना गुंडाळून ती सुट्टीही सार्थकी लावा.... च्याईला प्रायोजकांनी मॅच फिक्स तर नाही केली..

रहाणे जबरदस्त खेळला. त्याचा खेळ बघताना खुप छान वाटतं (हे त्याच्या २०११ मधे केलेल्या ईंग्लंड च्या वन-डे सिरीज पासून वाटत आलय). It is a pleasant experience. त्याची बॅटींग आणी स्लिप कॅचिंग बघताना असं वाटतं की ह्या माणसाचं त्या बॉल वर खुप प्रेम आहे आणी म्हणून तो एखाद्या लहान मुलाला हळुवारपणे खेळवावं तसं त्या बॉल शी वागतो. अश्विन टेस्ट मधे चांगली बॅटींग करतो. छान खेळला.

बवुमा ला जाडेजाने ज्या तर्‍हेने काढला तो बॉल जाडेजा ला धोनी एव्हढे मह्त्व का देतो/देत होता ते दाखवतो. बवुमा बरेचदा बॅक फूट्वर जाऊन खेळतो. बॉलची लेंग्थ एव्हढी अचूक होती कि तो बॅकफूटवर नक्की जाईल पण लाईन अशी होती कि कट करायला मिळणार नाही. पेस जास्त होता कि बॉल स्किड होईल नि बॅट बीट करेल. In theory easy to setup but you still need someone with pinpoint accuracy to pull it off. मजा आ गया.

दोन शॉट मला जबरदस्त आवडले ते म्हणजे राहणे चा शतक करतानाच स्ट्रेट पंच नि धवन ने केलेला बॅकफूट defensive push जो मिड ऑन नि कव्हर बायसेक्ट करून गेला.

जर पिच पाटा होत असेल तर आफ्रिकेला फॉलो ऑन द्यावा असे मला वाटते. फायदा असा कि, त्यांना पाहिल्या इनिंग मधल्या धक्क्यातून सेटल व्हायला वेळ मिळणार नाही. ह्याउलट फॉलो ऑन नाहि दिला नि आपल्या इनिंग मधे डाव कोसळला तर उगाच moral victory मिळाल्यासारखे होईल नि ते चौथ्या डावत अधिक तडफेने खेळतील (nothing to lose). ह्याउलत ते तिसरा डाव खेळत असतील तर आपण चौथा डाव पाटा खेळपट्टीवर खेळू (गरज पडली तर). त्यांचा डाव परत कोसळला तर पीच फॅक्टर नि पिच बद्दलची ओरड बंद होईल. नाहीच कोसळला तरी चौथा डाव आपल्याला मिळत असल्यामूळे आपण विजयासाठी प्रयत्न करूच.

जर पिच पाटा होत असेल तर आफ्रिकेला फॉलो ऑन द्यावा असे मला वाटते. >>> फॉलो-ऑन न देता आपले फलंदाज खेळपट्टीवर आले होते. पंचांनी आफ्रिकेला गोलंदाजांविषयी विचारणा केली असता त्यांनी आम्ही स्पिन न आणता पेस आणू असे सांगितले. पेससाठी आवश्यक प्रकाश न नसल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे आता आपण बॅटींग करणार हे नक्की.

रहाणेचा स्ट्रेट पंच भार्री म्हणजे भार्री होता.

Pages