परदेशात जाताना उपयोगी बेसिक टिप्स

Submitted by मुग्धा केदार on 3 December, 2015 - 05:25

प्रथमच परदेशात जाताना (भटकंती वगळता कामासाठी )बरेच काही प्रश्न, शंका, कुशंका मनात असतात. त्यासाठी अर्थातच खुप तयारी करावी लागते. जिथे जायचे आहे तिथल्या हवामानानुसार थोडा फार फरक पडत असतो. ही तयारी करत असताना नवशिक्याना उपयोगी पडतील अश्या टिप्स, आणि अनुभव या धाग्यावर माबोकरांनी कृपया शेअर कराव्यात. काही दिवसांपुर्वी हा धागा काढण्याविषयी चर्चा झाली होती त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/46521?page=66
http://www.maayboli.com/node/46521?page=67

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेश म्हणजे कुठे? प्रत्येक देशाच्या कस्टम्सचे नियम वेगळे आहेत. कस्टम्समधून निघाले पदार्थं तर पुढे खाता येतिल. असो.

ऑस्ट्रेलियात येत असाल तर दूध अन दुधाचे कोणतेहॉ पदार्थ आणू नका. कोणताही घरी केलेल्या पदार्थात नक्की काय काय आहे ते प्रवास करणार्^याला माहीत असूद्या. अखंड बिया असलेलं काहीही किंवा तसं दिसणारं काहीही (अगदी हळीवाचे लाडूही) फेकून द्यायची तयारी ठेवा. आणलेलं सगळं डिक्लेअर करा. डिक्लेअर न करता त्यांच्या झडतीत सापडल्यास मोठ्ठा दंड आहे. ऑस्ट्रेलियन कस्टम्स बर्‍यापैकी नाठाळ आहे.
इथल्या भारतीय ग्रोसरी दुकानांत बहुतेक सगळं मिळतं. तरी रेडी टू ईट काही खास आणायला हरकत नाही.

शुभेच्छा.

आणलेलं सगळं डिक्लेअर करा. डिक्लेअर न करता त्यांच्या झडतीत सापडल्यास मोठ्ठा दंड आहे. ऑस्ट्रेलियन कस्टम्स बर्‍यापैकी नाठाळ आहे. भारतीय ग्रोसरी दुकानांत बहुतेक सगळं मिळतं.
दाद सहमत आहे!

बहुतेक सगळे पदार्थ भातीय दुकानात मिळतात. त्याचा फार विचार करण्यात अर्थ नाही.
अगदी हाताशी दुकान नसले तरी ब्रेड आणि लोणी वगैरे गोष्टी सर्वत्र उपलब्ध असतात.
उपाशी राहण्याची वेळ येत नाही. शिवाय भारतीय उपहार गृह सर्वत्र असतात. हवे तर त्यांना जरा तिखट करायला सांगता येते. Happy

विमानातून उतरण्या आधी डिसेंबार्केशन स्लिप पुर्ण व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.
त्यात अनेकदा औषधे/खाद्यपदार्थ आणले असतील तर डिक्लियर करणे आवश्यक असू शकते.
ही स्लिप म्हणजे तुम्ही सरकारला दिलेली माहिती असते, ती गांभीर्याने घ्यावी.

कस्टम मधले प्रश्नः
हे सामान तुमचे आहे का?
हे सामान तुम्ही स्वतः पॅक केले का?

तुम्ही आणलेल्या सामानाबद्दल तुम्ही जबाबदार असता हे ध्यानात ठेवा.

शक्य तो आपले सामान आपणच भरा, म्हणजे ऐनवेळी धांदल होत नाही.

< पराठे कधी करुन ठेवु? फ़्रीज करुन द्यावे का? आणि या सगळ्या पदार्थांसाठी काही स्पेशल वेगळे पॅकिंग करायला हवं का? फ़क्त झिपलॉक मधे दिलं तर चालेल. पराठे फॉईल मध्ये द्यायचा विचार आहे.>

वैधानिक इशारा : पुढचा मजकूर एका गुजराती कुकरी शोत सांगितलेल्या माहितीनुसार आहे.

जास्त दिवस टिकण्यासाठी जे पदार्थ करायचेत ते करताना तेल तुपाचं प्रमाण जास्त ठेवावं.म्हणजे कोरडे पडणार नाहीत.
पॅकिंग करताना एका वेळी खायला जितकं लागेल त्या प्रमाणात वेगवेगळं पॅकिंग करावं.

शिरा, उपमा, खिचडी इ.ची मिश्रण तेला/तुपावर कोरडी(पाणी.दूध) न घालता चांगली भाजून घ्यायची. त्यात हवे ते मसालेही टाकायचे. इच्छित स्थळी पोचल्यावर ते मिश्रण गरम पाण्यात शिजवून प्रक्रिया पूर्ण करायची.

सगळ्यांचे प्रतिसाद आणि माहिती साठी धन्यवाद. माझा नवरा जर्मनी हॅमबर्गला जातोय. टर्किश फ़्लाईट्ने (इस्ताम्बुल ३ तास) जाणार आहे. ती व्यवस्था कंपनी करते.
तिथे आधीचं त्याचे २ मित्र आठवड्यापुर्वीचं गेलेले आहेत. दिवसांत लागणारा सगळा स्वयंपाक ते दोघे करायचा प्रयत्न करतात, विशेष स्वयंपाक येत नसताना.
त्यातला एका (गुजराथी) मित्राने एक्सेल शीट पाठवली आहेत त्यात जास्तीत जास्त फ़ुड आयट्म्स घेउन ये असं लिहिलय. रोज लंच नेण्यासाठी रिकामा टिफ़िन पण आणायला सांगितला आहे. काय करणार आहेत त्यांचं त्यांना माहिती. त्याचे बरेचसे सिनीयर्स/कलिग्स सामान बर्‍यापैकी नेतात असं काल मला सांगत होता.
त्या लिस्ट मधे कणीक, डाळ, तांदुळ, सगळे मसाल्याचे पदार्थ, ठेचा, कडधान्य, चहापावडर आणि १०० थेपले असं पण लिहिलयं. अजुन बरचं काय काय आहे.
सध्या मी पराठे/ थेपले, चकल्या, गुळ्पापडीचे लाडु, उपमा मिक्स, खिचडी मिक्स असं द्यायचा विचार आहे. आणि बाकिची ग्रोसरी.

@संपदा वूडलॅंड चे जॅकेट, शुज आणि थर्मल वेअर्स, ग्लोवस्ज वगैरे घेतलेत.

@अतरंगी.. आता मागवुन मिळतील की नाही शंका आहे कारण उद्या रात्री निघाव लागेल, पण विपुत नं. देउन ठेवा पुढच्या वेळेस किंवा त्याच्या इतर मित्रांना उपयोग होईल.

बेसनाचे लाडू फ्रीजमधे बरेच दिवस रहातात. घेण्याच्या आधी मायक्रोवेव्ह करणे...लुसलुशीत लाडू तयार.

मी जवसाची चटणी व तुप घालून पोळीचे रोल्स नेले होते तर ते २४ तास मस्त राहिले होते. घरी पोचल्यावर मायक्रोवेव्ह करून अमेरिकेतल्या नातेवाईकांनी तेच मिटक्या मारत खाल्ले. उरलेले पण फ्रीजमधे ठेवले व पुढे २-३ दिवस परत खाल्ले.

खाणं पिणं सगळीकडे मिळतंच. अगदी वेजिटेरियन लोकांनाही फार नाही त्रास होत. ग्रोसरी शॉप्स भरपुर असतात. टुरिस्ट म्हणुन जात नाही, त्यामुळे खिशाकडे पाहुन खर्च करायची ही गरज नाही. (कंपनी चांगले मस्त per diem देत असेलच की ) मग इथुन एवढं वजन नेवुन शिवाय शिळे पदार्थ का खायचे?
ज्या ठिकाणी जाणार असतील तिथली फ्रेश फ्रुट्स, भाज्या, मस्त मस्त चीज, चॉकोलेट्स, सिरियल्स खावीत. थोडे दिवस गेले कि भारतातल्या जेवणासाठी जीव तळमळायला लागतो त्यासाठी थोडी ग्रोसरी, स्पाइसेस नेले कि पुरतं. जीभ अगदीच हट्ट करेल तेव्हाच फक्त. पण नविन ठिकाणी गेलं कि तिथले पदार्थ, लोकल फ्रेश फ्रुट्स, डेअरी प्रॉडक्ट्स, भाज्या ट्राय करुन द्या ना नवर्‍याला. बायकोच्य कष्टाचं मानसिक दडपण म्हणुन आणि वाया जावु नये म्हणुन कशाला रोज थेपले आणि लाडु खायला लावता? Wink

हा गंमतीचा भाग झाला, पण कन्सर्न आहे allowed baggage. टर्किश एअरलाइन्सचं लिमिट फक्त ३० किलो आहे (piece concept नाही) आणि तुम्हाला मिळालेली सामानाची लिस्ट भली मोठी आहे. शिवाय विंटर वेअर भरपुर न्यायचं आहे त्याचं वजन आणि वॉल्युम पण विचारात घ्या. मिस्टरांना विचारा कि त्यांची कंपनी अ‍ॅडिशनल बॅगेज चार्जेस reimburse करणार आहे का? नाही तर तो अजुन एक भुर्दंड. एअरलाइन्सच्या साइटवर जरा चार्जेस बघुन ठेवा. बाकी Best wishes for the safe journey !

* मेसेज एडिट केला नाही. एक स्पेलिंग दुरुस्त केलं. टायपो होता Happy

पण नविन ठिकाणी गेलं कि तिथले पदार्थ, लोकल फ्रेश फ्रुट्स, डेअरी प्रॉडक्ट्स, भाज्या ट्राय करुन द्या ना नवर्‍याला.>> तेच म्हणते. माझी लेक यूएस ला गेली होती तेव्हा मी एक पण पदार्थ बरोबर दिला नव्हता. मिळेल ते खातील व सर्वाइव व्हायला शिकतील म्हणून. मिपा वर जर्मन खाद्य संस्कृतीवर लेख आहे तो वाचून घ्या. चांगली बीअर, ब्रेड, सॉसेजेस चीज व ब्लॅक फॉरेस्ट केक नक्की मिळेल. Happy हलके घ्या हो ताई. फिकर नॉट.

अर्थात काही मेडिकल कंडिशन असेल तर तुम्हाला काळजी वाटणे साह जिक आहे.

अमा, मेडिकल कंडिशन आणि शुद्ध शाकाहारी असे दोन उल्लेख नाहीत त्यामुळे सगळं नविन ट्राय करायची मोकळीक आहे, मग का मुग्धाने जीवाला त्रास करायचा आणि केदारला वजन न्यायला लावुन आधी शिळं खायला लावायचं आणि नंतर ग्रोसरी दिली म्हणुन स्वयंपाक करायला लावायचा?

( माझा नावांबद्दलचा अंदाज बरोबर असावा Wink )

नावांबद्दलचा अंदाज अगदी बरोबर आहे मनिमाउ.
नवर्‍याने सांगितले आहे की रहाण्याचा आणि खाण्याचा खर्चं आपला आपणचं करायचा आहे. हे मला जरा काही कळलं नाही, पण प्रोजेक्ट वर जातोय म्हणुन असेल असा विचार करुन मी आपली तयारी सुरु केली. तिकीट वर allowed baggage 40kg आहे.
एकदा जाउन आला कि कळेल नक्कि काय ते. आता २०१६ च वर्ष असचं चालु राहणार. यावेळी २ महिने आहे, ३१ जानेवरी ला परत येईल.

गुजराथी मित्र ना? मी वर लिहिलेल्या शोमध्ये गुज्जु लोक जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला गेले तरी घरनु भाणू असल्याशिवाय जेवल्यासारख वाटत नाही. ..म्हणे.

ममो +१
रहाण्याचा आणि खाण्याचा खर्चं आपला आपणचं करायचा आहे >> असं असलं तरी आरामात पुरतात pier diem Happy
मस्त फिरुन, रोज बाहेर वेगवेगळे कुझिन्स खाऊन पण येताना पैसे उरले होते आमचे .. आधी आम्हाला वाटलं होत की ओव्हरबजेट होणार पण नाही .. नवर्याचा हॉटेल बिल ऑफिसने तर माझा आम्हीच भरलं ८ दिवसांच ..

बाकी सगळं ठीके. पण कंपनीचं नाव, कुठे चाललाय वगैरे इथे लिहू नये असं मला वाटतं, सुरक्षिततेच्या दृष्टीने.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाची काटकसर करण्याची क्षमता वेगळी असते. काहींना लगेच आपले अन्न सोडवत नाही.

पहिल्यांदा तुमचे यजमान भारताबाहेर जाणार आहेत तेंव्हा दुसरा अनुभव खूप वेगळा असेल. पहिल्या एक दोन फेरीत आपण खूप तयारी करतो पण नंतर तिथे मिळते ना त्यावर खूष असतो. माझी चुलत बहिण लसूण आणि आले सुद्धा नेत असे दुबईला पैसे वाचावे म्हणून.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाची काटकसर करण्याची क्षमता वेगळी असते. >>>>>
बी, बरोबर आहे तुमचं म्हणणं. खरचं पटलं
तुमच्या बहिणीसारखं याच्या मित्राने पण सांगितलयं, त्या लिस्ट मधे आलं आणि हिरवी मिरची पण आहे.

http://www.germanymantra.com/living/shopping ही साइट बघा ताई. ते पहिल्यांदाच जात असतील तर उपयोगी पडेल.

http://www.india-store.de/lng/en/food/ हे पण बघा. मो ठी ओल्ड मंक रम ची जाहिरात बघूनच मस्त वाटले. सर्व मसाले लोणची वगैरे आहेत इथून ऑर्डर टाकली व तिथला पत्ता दिला तर ते
पोहोचे परेन्त डिलिव्हरी मिळेल.

बारका फ्युचुरा प्रेशर कुकर बरोबर देता आला तर सोपे पडेल.

धागा वाहता झाला आहे का? आधीच्या सगळ्या पोस्ट वाहुन गेल्या.....

सुरुचि चा संपर्क क्रमांकः- ८०८७५३७३१८, ९८५०८८४७०८. पत्ता:- मोदी गणपती जवळ, नारायण पेठ.

मनिमाऊ व अमा, तुमच्याशी इन जनरल सहमत आहे. पण तेथे आता विंटर सुरू होत आहे, अंधार व थंडी मधे गोष्टी "एक्स्प्लोर" करायला लौकर जमेल असे नाही. तेव्हा थोडेफार खाणे बरोबर असलेले चांगले. भारतीयच असायला पाहिजे असे नाही, खाण्याच्या बाबतीत जितकी फ्लेक्झिबिलिटी लौकर येइल तितके चांगले.

जर्मनीमधे भारतीय खाणे (भुसारी सामान/ आणि तयार जेवण) मिळणे ही आता नवलाई राहिलेली नाही. भारतातून पहिल्यांदा बाहेर जाणार्‍यांच्या अनेक गैरसमजांपैकी हा एक. एक तर जावे तिकडे कस्टमचे नियम वेगळे असतात, आणि त्यात तिकडे 'सगळं काही मिळतं' हे ही लक्षात ठेवा. उगाच ओझी वाहू नयेत. +
.

मुग्धा! नवर्‍याला जर घरी काहीच करायची सवय आणी आवड नस्ले तर काय करु? कस करु होईल, नविन ठिकाणी काम झाल्यावर बनवता येइल का?
तशी सोय आणी तयारी असेल तर

राइस कुकर
एक पॅन यात बरच्स काम होत.
तुमची लिस्ट बरोबर आहे पण,आल्,मिरची वैगरे नका देवु, भाज्या-फळ बहुधा अलाउड नाहित.
किती दिवस राहणार आहेत?