क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पीचबद्दल होत असलेली चर्चा निरर्थक आणि अनाठायी आहे >> " ते जोहान्सबर्गला फास्ट व बाऊन्सी विकेट बनवतात तेंव्हां !", अशी पीचबद्दल समर्थनात्मक सबब आपण देतों, हेंही निरर्थक व अनाठायी नाहीं का ? [ आजही अश्विनने हें म्हटलं आहे ]

हा प्रकार भारतात नाही चालणार ११ नंतर पहलाज यांनी सेंसरशिप लावली आहे. लेटनाईट मिडनाईट सारखे असंस्कारी शब्द चालणार नाही Wink

<< इतर कोणाचीही विकेट पिचमुळे न जाता खराब शॉट आणि अप्रतिम बॉलिंगमुळे गेलेली आहे. >> ज्या वेळीं खेळपट्टीवर चेंडू अतिशय अनियमितपणे वळत व खाली/वर रहात असतात, तेंव्हा अगदीं साधे,सरळ चेंडूही फसवे ठरतात, किंबहुना अधिकच फसवे ठरतात; त्यामुळे अशा खेळपट्टीवरफलंदाज कोणत्या चेंडूला बाद झाला यावरून तो 'पीचमुळे बाद झालाच नाही', असं म्हणणं तितकंसं योग्य नसावं.
आणि, आपल्या 'अप्रतिम बॉलींगबद्दल'ही मीं तरी फार हुरळून जावून बोलणार नाहीं; उदा., अश्विन चा ' कॅरम बॉल' सकलेनचा 'दूसरा' सोडाच पण शेन वॉर्नच्या लेगब्रेकपेक्षांही वळलेला पाहिल्यावर, त्याचं श्रेय अश्विनला किती व पीचला किती हा विचार मनात येणारच ना !
'कबाबमें हड्डी' होण्याचा माझा स्वभाव नाही व भारताच्या विजयामुळें मला नेहमीच आनंदच होतो. पण गेल्या दोन कसोटीतील विजयाचा आनंद मात्र निखळ नव्हता, हें प्रांजळपणे कबूल करतों.

कसोटीवरील कांहीं संभाव्य कॉमेंटस - Wink
१] अशानं काळ सोकावतो ! असंच होत राहिलं तर आमची कसोटीही पांच ऐवजी तीन वर्षांतच संपायची !! [-महाराष्ट्राचे मु.मं]
२] 'डायरेक्टर ऐवजी आतां मला 'पीच क्यूरेटर' करा; दोन दिवसांतच कसोटी सामने जिंकून देतो !' [ रवि शास्त्री]
३]' जिंकण्यासाठी कांहींही ! मग ती निवडणूक असो वा कसोटी !!' -[मा. पवारसाहेब]

भाऊ, दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळले. भारतीय आता सराईतपणे फिरकी खेळू शकत नाहीत हे लक्षात घेतल्यावर मला अमला चे वक्तव्य अधिक अचूक वाटते.
http://www.espncricinfo.com/india-v-south-africa-2015-16/content/story/9...

ज्या दिवशी जोहान्सबर्ग / लॉर्ड्स / वाका वर अश्विन किंवा हेराथ बॉलिंग ओपन करू शकतील किंवा न्यूझीलंड मधे क्रिकेट खेळणेच बंद होईल त्या दिवशी पिच बद्दल तक्रारी करायच्या , तोवर भारतीय विजयांचा निर्विवाद आनंद घ्यायचा असे मी ठरवले आहे. एकंदर फक्त फिरकीच्या जोरावर सिरीज जिंकणे हा प्रकार आपल्याबाबत (आपल्या बॅटींग ची बदलती पद्धत बघून) फार अधिक दिवस राहील असे वाटत नाही.

<< ... तोवर भारतीय विजयांचा निर्विवाद आनंद घ्यायचा असे मी ठरवले आहे. एकंदर फक्त फिरकीच्या जोरावर सिरीज जिंकणे हा प्रकार ...> > असामीजी, कदाचित विजयाचा आनंद निर्विवाद मिळेलही पण कसोटी सामना पाहिल्याचं समाधान कांहीं अंशीं तरी मिळेल का , हा खरा प्रश्न आहे . आणि, वाडेकरनेही इंग्लंडमधे फिरकीने गोलंदाजीची सलामी केली होती असं आठवतं; पण तिथल्या खेळपट्टीवर असं करणं याच्या मुळाशीं त्या फिरकी गोलंदाजांच्या असामान्य प्रतिभेवरचा विश्वास असावा !

कसोटी क्रिकेटबद्दल इतरत्र इतक्या तळमळीने बोलणारे टिव्हीवरचे समालोचक, तज्ञ इ.इ.तीन दिवसात संपणार्‍या कसोटी सामन्यांमुळे देशात अशा सामन्यांविषयीं अनास्था निर्माण होईल, याचा उल्लेखही करत नाहीत, यावरून त्यांचंही कसोटी क्रिकेटबबतचं प्रेम बेगडीच असावं अशी शंका येते.

आणखी एक संभाव्य कॉमेंट-
"मोहाली व नागपुर येथील पिचेसवरील टीकेमुळे देशात असहिष्णुतेचं वातावरण पसरत असल्याचं मलाही जाणवतं; पण मीं हा देश मात्र त्यामुळे सोडणार नाही कारण इतक्या विकेटस मला इतर कुठे मिळणार आहेत !" - रविंद्र अश्विन.

रणजी बद्दल केली आहे.

Dravid was in Kalyani to watch the game and his comments came at a time when there is debate about the quality of pitches being produced for the Test series between India and South Africa. The surfaces in Mohali and Nagpur have turned from the first session of the match and batsmen from both teams have struggled to survive. Dravid, however, said there was a difference when it came to international cricket.

"It's a little different at the international level, though, since you are looking for wickets and to win matches," he said.

Happy

<< भाउ, द्रवीडने पण केलीय की टीका!>> क्रिकेटप्रेमी अशी टीका करतात का, हीच कदाचित त्यांच्या कसोटी क्रिकेटप्रेमाची कसोटी असावी ! Wink
आज कोहली म्हणतो कीं ५०० धांवांच्या विकेटवर गोलंदाजी करणारे गोलंदाज निर्माण करणं अशक्य आहे; याला १००- १५० धांवाच होतील अशा विकेट बनवणं व तसे गोलंदाज निर्माण करणं हा एकच पर्याय उपलब्ध आहे का ? द. आफ्रिका देशाबाहेरच्या विकेटसवर सतत नऊ वर्षं अजिंक्य होते. या दौर्‍यावरही मर्यादित षटकांच्या सामन्यांत ' नॉर्मल' खेळपट्ट्यांवर त्यानी भारताविरुद्ध आपलं वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलय. कसंही करून विजय मिळवायचाच म्हणुन कसोठीसाठी खास खराब विकेट बनवणं हें माझ्या मतें आपला पराभव आधींच मान्य केल्यासारखे आहे . निदान ह्या विजयात जल्लोष करण्यासारखं कांहिंही नाही, असं मला वाटतं !! [ श्री लंकेने काय केलं किंवा इतर देश काय करतात, असले सदर्भ आपल्या असल्या वागण्याचे समर्थन नाही होऊं शकत]

तीन दिवसांमधे आटोपली हि ही कसोटी. स्पिनर्सनी फक्त ५ विकेट्स घेतल्या. २२४ हा सगळ्यात अधिक स्कोर. एकाही माजी प्लेयर ने अजून खेळपट्टी बद्दल आवाज उठवलेला नाहिये.
http://www.espncricinfo.com/australia-v-new-zealand-2015-16/engine/match...

कुंबळे होता तेंव्हा भारतात पाच दिवस सामने चालत. पहिले दोन दिवस पीच पाटा असेल. नंतरचे तीन दिवस फिरकीला अनुकूल होत जाऊन शेवटचा दिवस आखाडा होत असे. टॉस जिंकला कि अर्धीअधिक मॅच जिंकली असे होत असे. पहिली बॅटींग करणारा बॅटींग ला धार्जीण्या खेळपट्ट्ञांवर डोंगर उभारणार नि नंतरच्या तीन इनिंग्स ढासळत्या खेळपट्ट्ञांवर नशिब अजमवाणार. कधी कधी आखाडा होण्या ऐवजी बाऊन्स एव्हढा लो होत असे कि पाचवा दिवस उगवेतो सामना अनिर्णीतच राहणार हे नक्की दिसत असे. त्यामूळे 'तीन दिवस समान स्पिन असणे चांगले' कि 'पाच दिवसांच्या खेळासाठी एका संघाला निव्वळ नाणेफेक जिंकल्याचा फायदा मिळावा हे अधिक चांगले' हे ठरवणे खरच कठीण आहे. आयडील पिच म्हणजे नक्की काय हे कसे ठरवायचे ? ह्याच पिचवर मॉर्केलने जे रिव्हर्स स्विंग चे सुरेख दर्शन दाखवले ते फास्ट बॉलर ला धार्जीणे स्वरुप नव्हते का ? पाच दिवस सामना चाललाच पाहिजे हा हट्ट का आहे हे नक्की लक्षात येत नाही. माझ्या मते पाच दिवस हा एक सोयीस्कर असा मापदंड घातलेला आहे कि त्या पलीकडे सामना चालू नये. ह्याचा अर्थ पाची दिवस सामना सुरू राहावाच अशी अट नसावी. समजा विजय , पुजारा नि धवन थोडे अधिक खेळले असते किंवा डूप्लेसी, अमला शेवटच्या इनिंगमधे थोडा वेळ अधिक तग धरून राहते नि सामना चौथ्या दिवशी संपता तर हा योग्य कसोटी सामना झाला असता का ? अधिक विचार केलात तर लक्षात येईल कि जे पिच पहिल्या दिवसापासून वळते ते चौथ्या-पाचव्या दिवशी पूर्णपणे ढासळून आखाडा बनू शकते. (बहुतेक वेळा बनतेच) त्यामूळे पहिले तीन दिवस खर तर level playing field आहे. सीम्रसना धार्जीणे पिचेस बहुतेक वेळा सकाळच्या सत्रानंतर थोडी ईझ अप होतात त्यामूळे ती पाच दिवस जास्त level playing field राहतात. त्यामूळे भारतीय पीचेस च्या द्रुष्टीने जर spinners धार्जीणी पिचेस हवीच असतील तर तीन-चार दिवसच खर तर त्यातल्या त्यात योग्य level playing field आहे. किती दिवसांमधे संपला म्हणजे कसोटी सामना ह्यापेक्षा किती अटी तटीचा झाला ह्यावर सामन्याचे स्वरुप ठरावे असे मला वाटते. ( आफ्रिकन बॅटसमन नी थोडा अधिक संयम दाखवला असता तर नक्कीच चुरशीचा सामना होउ शकला असता. आपण काही फारशी चांगली बॅटींग केली होती असे मला अजिबात वाटत नाही. आपण अधिक अचूक बॉलिंग केली असे म्हणू शकू. दुर्दैवाने बगळूरू चा सामना वाहून गेला जिथे अधिक चुरशीचा सामना होउ शकला.)

असो, जेंव्हा पाच पाच दिवस खेळून निकाल लागत नव्हते तेंव्हा कसोटी सामने मरणार म्हणून ओरड होत होती.
जेंव्हा भारतामधे टॉस जिंकून पहिल्या दोन दिवसांमधे धावांचा डोंगर उभारायचा नि नंतर प्रतिस्पर्धी संघांचा डाव कोसळेल असे धरून सामन्याच्या विजयाची आखणी व्हायची तेंव्हाही हे कागदी सिंह म्हणत. ह्यांच्यामूळे कसोटी सामने मरणार म्हणून बोंब मारली जात होती
आता तीन दिवसांमधे दोन्ही संघ वाईट खेळतात म्हणून तीन दिवसांमधे सामने संपले तर परत ही खरी कसोटी नव्हेच असा आरोप आहे.
ODI/T-20 popular झाले तेंव्हा कसोटी सामने संपणार अशी ओरड झाली.
लाल बॉल ऐवजी पिंक बॉलने कसोटी सामना खेळला गेला तेंव्हा ओरड आहे, दिवसाऐवजी दिवस-रात्र खेळला गेला तेंव्हा हा कसोटी सामना नाही म्हणून बोंब आहे.
DRS आले तेंव्हा हा कसोटी सामना नाही म्हणून बोंब आहे.
थोडक्यात काय, काहीही झाले तरी कोणाला तरी कसोटी सामन्याच्या भवितव्याची काळजी लागलेलीच असणार नि 'आता खेळला जातोय तो सोडून आधी खेळले गेलेलेच खरे कसोटी सामने असणार' हे कोणी ना कोणी दर वेळी म्हणत राहणारच. There is no end to it. Happy

कसोटीवरील कांहीं संभाव्य कॉमेंटस - डोळा मारा
१] अशानं काळ सोकावतो ! असंच होत राहिलं तर आमची कसोटीही पांच ऐवजी तीन वर्षांतच संपायची !! [-महाराष्ट्राचे मु.मं]
२] 'डायरेक्टर ऐवजी आतां मला 'पीच क्यूरेटर' करा; दोन दिवसांतच कसोटी सामने जिंकून देतो !' [ रवि शास्त्री]
३]' जिंकण्यासाठी कांहींही ! मग ती निवडणूक असो वा कसोटी !!' -[मा. पवारसाहेब]

>>> भाऊ - तीन चांगल्या कार्टून्स चा ऐवज आहे Happy

मी मॅच/हायलाईट्स पाहिले नाहीत. पण विकेट्सचा/ओव्हर्सचा पॅटर्न बघून एकदम मला १९९३ च्या आसपास अझर ने तीन स्पिनर्स वापरून इंग्लंड वगैरेंना हैराण केले होते ते आठवले. तेव्हा घरच्या मैदानावर कोणत्याही स्पिनर्स नी काढलेल्या चीप विकेट्स पाहून एक प्रचंड हाईप निर्माण झाला होता, पण प्रत्यक्षात सगळीकडे चांगली कामगिरी करू शकेल अशी टीम तयार करणे वगैरे सोडून सध्या घरी सामने आहेत, घ्या हात धुवून असला प्रकार सुरू होता. तात्कालिक फायदा झाला तेव्हा, पण नंतर बेदम मार खाल्ला बाहेर गेलो तेव्हा.

तेव्हा घरच्या मैदानावर कोणत्याही स्पिनर्स नी काढलेल्या चीप विकेट्स पाहून एक प्रचंड हाईप निर्माण झाला होता, पण प्रत्यक्षात सगळीकडे चांगली कामगिरी करू शकेल अशी टीम तयार करणे वगैरे सोडून सध्या घरी सामने आहेत, घ्या हात धुवून असला प्रकार सुरू होता. >>

बरोबर आहे. हाच प्रकार सगळे जण करतात.

--

जडेजा अन तत्सम त्यामुळेच बाहेर चालत नाहीत, अश्विन ही कमीच चालतो. पण तो न्याय रबाडा न मॉर्केललापण ते भारतात कुठे चालत आहेत सध्या?

आपण ऑस्ट्रेलियात गेलो तेंव्हा वस्त्रहरण झाले होते. एक इंग्लंडची टीम सोडली तर ( ज्यांच्या स्पिनर्सनी आपल्याच देशात आपले वस्त्रहरण केले) सगळीकडे सध्या हेच आहे. होम अ‍ॅडव्हाटेंज अगदी १९७०-८० च्या विंडिज टीमला पण असायचाच की ! त्यांनी भारत येणार आहे म्हणू स्लो पिचेच किंवा फिरकीच्या पिचेस कुठे केल्या. तेंव्हा भारतीय बॅटसमन किती सेशन तग धरायचे?

फक्त हे ओपणली बोलले जात नव्हते. आता जाते हाच तो फरक. होम अ‍ॅडव्हांटेज टेस्ट मध्ये सगळ्यांनीच घेतला आहे त्यामुळे ICC त्याबद्दल काही करू शकत नाही.

हो ते आले लक्षात केदार. पण टीम मॅनेजमेण्ट ने कसोटी करता काय गोल ठरवलेला आहे, मुळात असा काही प्रकार आहे का माहीत नाही. टीम मॅनेजमेन्ट म्हणून पुढचे २-३ वर्ष मॅनेजर, कोच व कप्तान यांना स्थैर्य आहे का माहीत नाही. ती १९९३ ची स्टाईल असेल ते परदेशी जेव्हा जायचे तेव्हा पाहू, सध्या ४-४ ओव्हर्स सीमर्स ने टाकल्या की आले स्पिनर्स दिवसभर असला प्रकार होईल. घरच्या मैदानावर २-०, ३-० चे रिझल्ट्स येतील, आणि कोठेही बाहेर गेले की धुव्वा.

जॉन राईट-गांगुलीने २००० मधे हे सगळे बदलून चांगली सुरूवात केली होती, तो पॅटर्न पुढे २०११ पर्यंत चांगल टिकला. तो तोडू नये आता. कधी नव्हे ते परदेशात मॅचेस जिंकायला सुरूवात झाली होती. तुम्हाला आठवत असेल तर कुंबळे मेहनत सुरूवातीपासूनच घेत होता, पण मॅच विनर झाला तो २००२ पासून. कारण फास्ट बोलर्स आले, फास्ट बोलिंग चांगले खेळणारे बॅट्समन आले, आपल्याकडेही फास्ट बोलर्स चांगले आल्याने परदेशात आपल्याला भीषण फास्ट पिचेस देण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, कारण ते अंगावर उलटू लागले. त्यामुळे कामगिरीही सुधारली. त्यात बीसीसीआय चा जोर वाढला. पूर्वी आपल्याकडे आलेल्या सगळ्यांच संघांना पाटे देत नसत. परदेशी क्रिकेट संघटनांचा दबाव पडत असेलच (१९८३ मधे बदला घ्यायला भारतात आलेल्या विंडीज ला पहिल्या टेस्ट मधे ग्रीन टॉप दिला होता), आता बीसीसीआय तसे करू शकते.

सहमत आहे. पण ऑसी / अफ्रिका येणार म्हणून ग्रीन टॉप द्यावा असे नको असेही मला वाटते. वी नीड टू नो अवर ओन स्ट्रेन्थंस. आणि ही स्ट्रॅटजी बॅकफायर झालीच आहे. त्याचे उदा इंग्लंडचा भारत दौरा त्यामुळेच दिला.

सध्या बाहेरच्या देशातही चमकतील असे टेस्ट खेळाडू तीन चारच आहेत. मुरली विजय, पुजारा, इशांत काही प्र्माणात कोहली अन थोड्याचप्रमाणात अश्विन. बाकी सगळे भारतातच वाघ आहेत. म्हणून बाहेरून मार खाऊन येतो आपण.

पिच कशी तयार करावी ह्याचे काही नियम नाहीत. त्यामुळे सगळेच देश तो फायदा घेत आहेत असे माझे म्हणणे आहे. इतकेच.

टॉप ऑफ द लाईन टेस्ट मॅच पाहायला मजा येईल हे नक्की. पण आता कालच्या मॅचचे उदा घ्या. त्यात त्यांच्या स्पिनर्सची बॉलिंग पाहायलाही मजा येत होती. आपले डिफेन्स पण कोसळत होते, फक्त त्यांच्या पेक्षा थोडे चांगले अप्लिकेशन माँक विजयरावांंचे होते त्यामुळे स्कोअर झाला अन त्याला साथ पुजाराने दिली.

इनफॅक्ट तिसर्‍या दिवशी ती विकेट बॉलर्सची न वाटता मला नॉर्मल वाटू लागली. ज्याप्रमाणे फाफ अन आमला खेळत होते. ( मी प्रत्येक बॉल बघितला आहे) त्याप्रमाणे तर अजून थोड्यावेळाने टोटल चेंज होऊन ही पाटा होईलकी काय असे वाटले होते. Happy सुदैवाने एक (रादर दोन) अनप्लेयेबल बॉल मिश्राने टाकले अन्यथा ही टेस्ट जाऊही शकली असती असे मला प्रामाणिकपणे वाटते. ( त्यांच्या खेळाकडे पाहून).

फक्त स्पिनर्सचीच विकेट बनवा असे मी म्हणत नाहीये, पण भारत होम अ‍ॅडव्हाटेंज घेतो, ह्याला माझा आक्षेप आहे त्यामुळेच विंडीजचे पण उदाहरण दिले.

रणजी मॅचेससाठी ग्रीन टॉप बनवायचा जेणे करून आपल्याला सवय होईल आणि इंटरनॅशनलसाठी होम अ‍ॅडव्हांटेज घ्यावे. म्हणजे दोन्हीकडच्या सवयी अंगी येतील. ( बेस्ट ऑफ बोथ वल्ड्स)

आपले बॅट्समन आता चांगली फिरकी खेळू शकत नाहीत ह्याला मात्र मी सहमत आहे. अन्यथा आपण ५०० आणि त्यांनी २०० असा स्कोअर दिसू शकला असता.

भाऊ , तुमच्या क्रिकेटप्रेमाचा अन ज्ञानाचा पूर्ण आदर ठेऊनही (किंबहुना त्यामुळेच ) तुमच्या पोस्ट पटल्या नाहीत .

१. पहिली गोष्ट मह्णजे स्पिन ला मदत करणारी विकेट वाईट अन स्विंगला मदत करणारी चांगली हा दुजाभाव मला पटत नाही . अशा कितीतरी कसोटी इंग्लंड मधे झाल्या आहेत ज्या ३ दिवसात संपल्या आहेत अन ९०% विकेट फास्ट / स्विंग बोलरना मिळाल्या आहेत , त्यावेळी काही ओरड होत नाही ?
२. समजा येथे श्रीलंका किंवा पाकिस्तान टूर करत असते तर आपली हिंमत अशा पिचेस बनवायची झाली असती ?
अफ्रिकेला स्पिन खेळता येत नाही म्हणून आपण हे करू शकतो ना ?
३. बॉल वळत होते हे मान्य पण अनएव्हन बाऊन्स फारसा नव्हता . त्यामुळे ह्या अगदी सो कॉल्ड डस्ट बाऊल्स नव्हत्या . कदाचित आपल्याकडे द्रविड अन लक्ष्मण असते अन त्यानी आरामात खेळून आपला स्कोर ४०० करून आपण इनिंगने जिंकलो असतो तर कदाचित आपण वेगळ बोललो असतो

त्यामुळे " कसंही करून विजय मिळवायचाच म्हणुन कसोठीसाठी खास खराब विकेट बनवणं हें माझ्या मतें आपला पराभव आधींच मान्य केल्यासारखे आहे . निदान ह्या विजयात जल्लोष करण्यासारखं कांहिंही नाही, असं मला वाटतं !!" अजिबात मान्य नाही .

मला वाटत नाही भाऊंनी केवळ स्पिनर्स ना सपोर्ट असलेली खेळपट्टी अयोग्य म्हंटले आहे. उलट मला त्यांच्या पोस्ट्स आठवतात त्यावरून स्पिनर्स चे ते फॅन आहेत. त्यांचा पॉइण्ट "खेळपट्टीवर चेंडू अतिशय अनियमितपणे वळत व खाली/वर रहात असतात" बद्दल आहे, आणि त्याच्याशी सहमत आहे.

सहमत आहे. पण ऑसी / अफ्रिका येणार म्हणून ग्रीन टॉप द्यावा असे नको असेही मला वाटते. वी नीड टू नो अवर ओन स्ट्रेन्थंस. >> हे ही बरोबर आहे. आणि भाऊंची काँमेण्ट याच्याविरूद्ध नाही असे मला वाटते.

टेस्ट मधे सध्या मिसिंग काय आहे तर ते टॉप ऑफ द लाईन क्रिकेट. पूर्वी बर्‍याच वेळा दोन संघातील सामन्याइतकेच त्यातील दिग्गज खेळाडूंच्या लढतीला महत्त्व होते. गर्दी ते खेचत. सगळे क्रिकेटचे जग गाजवून भारतात आलेल्या वॉर्न ला सचिन ने चेन्नईला फोडला तेव्हा त्याचे महत्त्व वेगळेच होते. पर्थ कसोटीत पॉन्टिंग ला तास तास नाचवत इशांत शर्मा व द्रविड ने शेवटी उचलला ते नाट्य - जे पाहायला तेवढा पेशन्स ही लागतो (खरे म्हणजे पेशन्स म्हणणे चुकीचे आहे - सुरूवातीला इंटरेस्ट ने माहिती करून घेतली की आपोआपच इंटरेस्ट राहतो दिवसभर) - असले काहीतरी आजकाल होत नाही का, की आम्हीच दुर्लक्ष करत आहोत?

मी इनफॅक्ट भाऊंना विरोध करत नाहीये. फक्त माझी बाजू मांडतोय. ते लिहितात ते ही बरोबरच आहे.

पर्थ कसोटीत पॉन्टिंग ला तास तास नाचवत इशांत शर्मा व द्रविड ने शेवटी उचलला ते नाट्य >> त्यामुळेच इशांतचे नाव घेतले. ती कसोटी कोण विसरेल. Happy

अफ्रिकेला स्पिन खेळता येत नाही म्हणून आपण हे करू शकतो ना ? >>

हे मिथ आहे. आमलाचा बचाव पाहिला का? तेवढा चांगला बचाव केवळ मुरली विजय आणि पुजाराचा होता. बाकी सर्व ताहिरच्या अन इतरांच्या नॉट सो डेडली स्पिनवर चाचपडले.

भारताला स्पिन चांगले खेळता येते हा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया अन इंग्लंडच्या फिरकीसमोर आपण नांग्या टाकल्या आहेत गेल्या ५-६ वर्षात आणि ही टेस्ट सिरिजपण त्याचे चांगले उदाहरण आहे. अन्यथा आपण ४-५०० काढले असते. निदान २१५ च्या पुढे जाऊन ३००+ एकदा तरी केला असता.

थोडंस आणखी बोअर करतों-
माझ्या पिढीच्या ऐन उमेदीच्या काळात 'भारताने कसोटी जिंकणं' ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. तरी पण क्रिकेटमधला इंटरेस्ट आतां इतकाच उत्कट होता. भारताने सामना अनिर्णित ठेवला , एखाद्या डावांत ३३०-३ अशी धांवसंख्या उभी केली तरीही सामना जिंकल्याचाच आम्हाला आनंद होत असे . त्यामुळे, ' जिंकण्यासाठी कांहीही' यावरच क्रिकेटचा आनंद सर्वस्वीं अवलंबून असतो, हें माझ्या पचनीं पडणं कठीणच आहे. जिंकण्याच्या जमान्यात वाढलेल्या पिढीला मात्र तसंच वाटावं असा आग्रहही नाही.

भाऊ, टोटली समजू शकतो. आमची पिढी थोडी त्या काळातील व बरीचशी 'दादागिरी' च्या काळातील. पण गावसकर खेळत असताना सगळ्या भारतीय क्रिकेटप्रेमींचा फोकस केवळ त्याच्या शतकावर असे हे पाहिलेले आहे. भारत जिंकणे हा प्रकार देशातील काही (त्याही सगळ्या नाहीच) सिरीज सोडल्या तर आस्तित्वातच नव्हता.

भाऊ, टोटली समजू शकतो. >> +१ त्याच बरोबर बदलता काळ लक्षात घ्यायला हवा. भाऊंच्या वेळी सामना हरला म्हणून लोक घरांवर दगडफेक करत नसत. (कदाचित ७४ चा अपवाद वगळता). हल्ली तेही होते. तेंव्हा क्रिकेट हा पैसे मिळवून देणारा खेळ नव्हता, आत्ता आहे. त्यामूळे तेंव्हा विजयाला जी किंमत होती त्यापेक्षा त्यापेक्षा आत्ता नक्की अधिक झालेली आहे (emotionally नाही).

जॉन राईट-गांगुलीने २००० मधे हे सगळे बदलून चांगली सुरूवात केली होती, तो पॅटर्न पुढे २०११ पर्यंत चांगल टिकला. तो तोडू नये आता. कधी नव्हे ते परदेशात मॅचेस जिंकायला सुरूवात झाली होती. तुम्हाला आठवत असेल तर कुंबळे मेहनत सुरूवातीपासूनच घेत होता, पण मॅच विनर झाला तो २००२ पासून. कारण फास्ट बोलर्स आले, फास्ट बोलिंग चांगले खेळणारे बॅट्समन आले, आपल्याकडेही फास्ट बोलर्स चांगले आल्याने परदेशात आपल्याला भीषण फास्ट पिचेस देण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, कारण ते अंगावर उलटू लागले. त्यामुळे कामगिरीही सुधारली. >> फा इथे एक गडबड आहे. २०००-२००९ पर्यंत आपण जिंकत होतो त्यात बर्‍याच गोष्टींचा वाटा होता (तू लिहिले आहेस तसा). पण तेंव्हाही भारतीय पिचेस ९० पेक्षा फारशी वेगळी नव्हती. उलट केदार म्हणातो तसे जेंव्हा जेंव्हा आपण वेगळेपणा दाखवायचा प्रयत्न केला तेंव्हा तेंव्हा तो अंगाशी आला.

बाहेरची कामगिरी सुधारण्याचे एक मह्त्वाचे कारण तू लिहिले ते नाहिस ते म्हणजे अनुभव नि सलामीची जोडी (विशषतः सेहवाग factor). अनुभवाबद्दल द्रवीड ने बाहेरच्या पहिल्या दौर्‍यानंतर त्यांनी बसून पुढच्या वेळी कसे handle करायचे ह्याबद्दल कसे प्लॅनिंग केले होते हे मस्त मांडले होते (क्रिकइंफो च्या मॅगझिनमधे लेख होता). सध्याची नवीन पिढी पण हे शिकेल. शेवटचा Australia दौरा आठव. भले आपण हरलो असू पण कधीही सामने चुरशीचे होते नि तोडीस तोड खेळलेले होते.

रणजी मॅचेससाठी ग्रीन टॉप बनवायचा जेणे करून आपल्याला सवय होईल आणि इंटरनॅशनलसाठी होम अ‍ॅडव्हांटेज घ्यावे. म्हणजे दोन्हीकडच्या सवयी अंगी येतील. ( बेस्ट ऑफ बोथ वल्ड्स) >> केदार, aus नि england कडून ४-० मार खाल्ल्यानंतर रणजी मधे ग्रीन पिचेस बनवयाला सुरूवात झाली आहे/होती. कर्नाटकाचे रणजी विजय हे त्यावर आधारीत होते. फक्त as usual आपण एका टोकावरून दुसर्‍या टोकाकडे उडी मारली ज्यामूळे फक्त domestic cricket मधे fast ballers चे average सुधारले, बाकी काही झाले नाही. मूळात जे टेक्निक आधीपासून शिकून घोटावे लागते ते overnight बदलता येत नाही हे ह बदल करताना विसरले. परत त्याच बरोबर स्पिनर्स नि त्याला खेळणारे कौशल्य कमी होत चालले आहे. मागच्या वर्षी परत ह्यात बदल व्हायला सुरूवात झाली पण परत ह्या वर्षी १९० degree turn मारून आखाडे बनवायला सुरूवात झाली. रणजी ट्रॉप्फीमधल्या पिचेस मधे जे फेरफार होताहेत त्याबद्दल हे वाचाच.
http://www.espncricinfo.com/ranji-trophy-2015-16/content/story/945901.html

तू वर जाडेजा नि अश्विन बद्दल लिहिलयस. अश्विन कुंबळे नाही पण तो शिकतोय. ह्या (नि लंका) सिरीज मधली त्याची बॉलिंग हि आधीच्या अश्विन पेक्षा वेगळी आहे हे लक्षात येतेय का ? he is more patience and replying on beating batsman in air rather than relying on vast tricks of trades like carrom balls, दुसरा etc. आपल्या इंग्लंड दौर्‍यानंतर त्याने स्वान किंवा वॉन बद्दल झालेल्या चर्चेबद्दल सांगितले होते. स्वान इंग्लंड काऊंटिमधे जिथे स्पिनर्स ना फारसे assistance नाहि अशा ठिकाणी खेळत असल्यामूळे त्याने 'classical spin वर जिथे बॉल वर अधिक revolutions देण्यावर लक्ष केंद्रित केले नि त्याचा फायदा त्याला भारतातही पाटा खेळपट्ट्यांवर कसा झाला ?' नि तेच अश्विन ला करणे कसे जरुरी आहे (जर भारताबाहेरही यशस्वी व्हायचे असेल तर) हे त्याच्या कसे लक्षात आले वगैरे वगैरे.

जडेजा बॉलिंगमधल्या त्याच्या पेशन्समूळे एक चांगला counter foil होउ शकतो असे मला वाटते. तुम्ही त्याच्याकडून बेदी होण्याची अपेक्षा धराल तर मात्र problem आहे. (अर्थात तो क्षेत्ररक्षणामधे नि बॅटींगमधेही बेदिच्या दहा पावले पुढे आहे Wink ). गेला बाजार मणींदर सिंग झाला तरी पुरे आहे. पुढची तीन चार वर्षे भारतामधे तरी हरणार नाही आपण मग Wink

Pages