अल्विदा अन सुस्वागतम.. माझ्या मित्रांनो !
मी माझ्या न्हाव्याला माझ्या आधीच पातळ अन पांढर्या झालेल्या केसांना कलप लावून पुनरुज्जीवन देण्याची विनंती करत होतो.. मला वाटत होते माझ्या चेहर्याला तरुण लुक येईल. आशा सुटत नाही हो ! अन अचानक फोन वाजला. खूप दिवस झाले होते जेव्हा निवृत्तीनंतर कोणीतरी मला स्थलाकालाचे भान न ठेवता फोन करत होता. आधी खूप सवय होती.. स्व्च्छता गृहात, न्हाव्याकडे असतांना, रात्री अपरात्री फोन घेण्याची कारण कंपनीचा फोन होता ना अन त्यावर ऐर्या गैर्यांची सत्ता होती.
पण तरीही या फोनने माझ्या अन्यथा फोन रहित आयुष्यात थोडी थ्रिल आणली हे मी मान्य करतो. असो.. विषयांतर झाले.. क्षमस्व.
ही फोन वर होती आणि विचारत होती, “ तुम्ही…. तुम्ही टी व्ही ऑर्डर केलाय का?”
मी तर हबकलोच आणि शतश: गोंधळून बरळलो, “ अग, मी असे काही कधी करू शकेन का? तुला न विचारता? अख्ख्या ३० वर्षात असे काही करायला धजलो नाही. मुळीच नाही मी असे काही केलेले”
“अहो असं काय करताय. हा माणूस गेला अर्धा तास उरावर बसलाय आणि मला सांगण्याचा प्रयत्न करतोय!”
माझ्या कलप आणि तुरळक केस या विचारात मग्न असलेल्या पोकळ खोपडीतून विचारांची एक वीज चमकून गेली. ते सगळे “ तुम्हाला १ मिलियन ब्रिटिश पौंड मिळाले आहेत.. १०००० पौंड भरा… इ . इ मेल पिंग घालू लागले. “
“त्याला हाकलून दे.” मी खंबीरपणे उत्तरलो.
“अहो अस काय करताय? हा टी व्ही अनुजाच्या .. आपल्या मुलीच्या नावाने बिल फाडलेला आहे… अ नु जा …..”
“हो! अनुजा आपली मुलगी आहे”. मी खुळ्यासारखा बरळलो.
“अहो ! चेष्टा काय करताय? मला माहित नाही का ती आपली मुलगी आहे? काय करताय ते लवकर संपवा आणि ताबडतोब घरी या”.
पुन्हा काही मिनिटांनी फोन वाजला.
“अहो! कार्टीनेच आपल्या साठी दिवाळी भेट म्हणून ऑर्डर केलाय”
माझा विश्वास बसेना आणि कलप आणि कर्तन आहे तेवढ्या सुबक स्थितीत संपवून घरी दौडलो.
एक भले मोठे टी व्ही बॉक्स आणि सिनेमाच्या पडद्या एवढा मोठा ४२ इंची फ्लॅट टी व्ही अनावृत स्थितीत तिथे उभा होता.सर्व्हिस इंजिनीयर माझी वाट पाहत होता.…
ते नवीन म्हाराज येकदम रुबाबदार दिसत होते. त्यांच्या बाजूला मला १८ वर्षे इमाने इतबारे, माझ्या सुखदु:खात साथ दिलेला , माझा सखा, सोबती केविलवाणा, अंग चोरून पदच्युत स्थितीत उभा होता. त्याचा थोरला बंधु. आय टीत काम करणारा, धाकटा भाऊ दिसत होता.
मला गहिवरून आले, मी गोंधळलो होतो, थ्रिल्ड होतो , आमच्या लाडक्या कन्येने दिलेल्या त्या भेट्वस्तूने भारावलो होतो पण त्याच बरोबर खूप दु:खी होतो.
]त्या सर्व्हिस इंजिनियरने काही मिनिटातच नवा टी व्ही भिंतीवर चढवला. जुजबी डेमॉन्स्ट्रेशन दिले आणि मी व्यवस्थित निरोप देण्या आधीच माझ्या मित्राला ओढत, घेवून गेला.
माझ्या त्या मित्राने , गेली कित्येक दिवस, नव्हे वर्षे आम्हाला अविस्मरणीय मनोरंजन दिले होते, ते घरंदाज होते. दूरदर्शन वरील मालिका, मैफिली, प्रवास वर्णने अन आठ्वड्यातून एकदाच येणारे दूरदर्शनचे सुंदर कार्यक्रम! उत्तरांचल अन कुमाऊच्या दूर प्रदेशात त्याने हिवाळ्यातील कुडकुडण्यास लावणार्या संध्याकाळी आनंद, संगीत, मराठी गाणी, चित्रहार, ये जो है जिंदगी , वर्ल्ड धिस वीकनी ऊबदार केल्या होत्या. त्या वर मायलेकींनी व्हिदियो गेम्स खेळले होते. डी व्ही डी येण्या आधी मी त्याला सोनी वॉकमन हुक अप करून सी डी क्वालिटीच्या गाण्याचा आस्वाद घेतला होता. सगे सोयरे महाराष्ट्रातून नाटके, भेमसेन, माणिक वर्मा , सी डी वर आणायचे आणि आम्ही सुखद नॉस्टाल्जिया अनुभवायचो. बिस्मिल्ला खानांनी दिवाळी साजरी केली होती याच टी व्ही वर अन दशहतवादाच्या सुन्न करणार्या बातम्या याच टी व्ही व्र आम्ही ऐकल्या होत्या. अन हो! हा टी व्ही हप्त्यावर घेतला होता ! त्याचा वेगळाच, इच्छापूर्तीचा आनंद!सूज्ञांस सांगणे न लगे! हा लेडी डाय्ना आणि मदर टेरीसांच्या निधनाची बातमी एकत्र घेवून आला होता. त्याने नजीकच्या काळात वन डे अन २०-२० जिंकण्याचा आणो ओबामा अध्यक्ष बनण्याचा सोहळा पाहिला होता. त्याच्या त्या मेंदूत .. ऊप्स.. सर्किटीत हे सगळे रुंजी घालत होते. तो माझ्या इतिहासाची बखर होता.
त्याचा माझ्या घरातील प्रवेश अजूनही ताजा आहे. विकत घेण्यापूर्वी मी गो डावून मध्ये गेलो होतो अन स्वत: टी व्ही निष्णात असल्याने, त्याचे कूळ , म्हण्जे थॉम्सन कंपनीची ट्युब पडताळून पाहिल्यावरच त्याच्याशी सोयरीक जुळवली होती.
त्याने आमची इमानेइतबारे सेवा केली होती आणि त्याच्या ऐन जवानीत, सतराव्या वर्षी तो आम्हाला सोडून गेला होता. तो ठणठणीत होता, अनेकदा तो विकून नवीन एल सी डी घेण्याचा विचार माझ्या मनात आला होता हे मी नाकारू शकत नाही.
मला त्याचा अद्ययावत नवा भाऊ आणावासा वाटत होता पण त्याची परिणिती प्रत्यक्षात करण्यास मी धजावत नव्हतो, कदाचित त्याची दुलई सारखी सलगी हे याचे कारण असावे.
आता त्याचा श्रीमंत बंधु आला होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मनात रुंजी घालत होता. माझ्या मुलींचा अभिमान वाटत होता. त्यांनी आमच्या मनात तीळभरही संशय न येवू देता, हक्काने आणि प्रेमाने हे मिशन यशस्वी केले होते. तो नवीन सदस्य आल्याबद्दल मी त्याच्या स्वागतास उत्सुक होतो. तो रुबाबदार होता अन अद्ययावत देखील होता.परंतु आमच्या या जुन्या कौटुंबिक सदस्याच्या आम्हास अचानक सोडून जाण्याने मी खिन्न झालो होतो. माझ्या फ्लॅशबॅक मध्ये अनेक प्रतिमा, समारंभ, मैफिली अन आठवणी होत्या अन तो आता आम्हास सोडून गेला होता.
परंतु मला आनंद होता की जाताना तो निरोगी होता आणि कदाचित दुसर्या गरजू कुटुंबात जाणार होता. त्यांना आता त्याची आमच्याहून अधिक गरज होती. तो अजूनही गात होता, नाचत होता आणि मला आनंद एवढाच होता की तो ठणठणीत होता. घायाळ , विपन्नावस्थेत त्याला पाहण्याचे अन कवडीमोलाने त्याला विकायचे धैर्य माझ्यात नव्हते. मी त्याला मरणप्राय अवस्थेत पअहू शकत नव्हतो.
हे माझ्या मनात चालू असतांना बहुतेक तो तरुण गृहस्थ, नवा सदस्य माझ्याकडे कुतुहलाने अन अपेक्षेने पाहत होता आणि मला म्हणाला “ बाबा , मी सुध्दा तितकीच उत्तम, किंबहुना अधिक उत्तम सेवा देणार आहे”. मी काही जुन्या सी डी काढल्या आणि त्या नवीन टी व्ही वर लावल्या. जुने वैभव आणखी लखलखू लागले. जुने क्षण आणखी सुंदर दिसत होते. आणि हेच तर तो नवा भिडू म्हणत होता, “ मला ठावूक आहे तुला काय वाटतय! मी सुध्दा तेवढाच इमानदार आहे आणि मी तुम्हाला तो सोडून गेल्याचे दु:ख भासू देणार नाही”.त्याच्या वर विश्वास ठेवण्यास मुळीच हरकत नव्हती.
मी स्वत:शीसच हसलो. मला मुलांच्या विचारशीलतेचे, त्यांच्या आम्हाला गोड धक्का देण्याच्या हेतुचे कौतुक होते आणि त्या बरोबरच त्या जुन्या मित्राच्या जाण्याची खंत , सल होता.
त्या रात्री झोपतांना, दिवे मालवतांना मी त्या टी पॉयवरील जुनी जागा पाहिली. ती रिकामी होती. अनंतचतुर्दशीला बाप्पा गेल्यावर दिसते तशी. त्याचा धाकटा भाऊ नव्या आसनावर- भिंतीवर विराजमान होता.
डोळा लागतांना अश्रू तरळत असल्यासारखे वाटले… आम्हा उभयतांना ही.
शुभास्ते पंथान: संतु मित्रा!!
अल्विदा अन सुस्वागतम माझ्या प्रिय मित्रांनो!
Submitted by रेव्यु on 26 November, 2015 - 11:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं! खूप छान लिहिलंय.
मस्तं! खूप छान लिहिलंय.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
खूप आवडले!
खूप आवडले!
वाह मस्तच लिहिलेय .. शेवटचे
वाह मस्तच लिहिलेय ..
शेवटचे बाप्पांचे उदाहरण तर चपलख !
छान !
छान !
अरे वा. छान. अनेक वेळा अगदी
अरे वा. छान. अनेक वेळा अगदी अगदी झाले. माझ्या जुन्या टीव्हीला निरोप देताना असेच झाले होते.
मस्त लिहीलंय.
मस्त लिहीलंय.
व्वाह!!! एकदम सुंदर लिखाण
व्वाह!!! एकदम सुंदर लिखाण
मजा आली... धन्यवाद 
कालच ऑफिसमध्ये बसल्यानंतर जुन्या टीव्हींची गंमत, त्यांचे ते चित्र वेडेवाकडे होणे, पट्ट्या-पट्ट्या दिसणे, मुंग्या येणे, ते नीट करण्यासाठी कौलांवर चढून अँटेना नीट करणे, केबल नसतांना केबल दिसण्यासाठी धडपड करणे हे सगळे विषय चघळले गेले आणि नोस्टॅल्जिया उगाळला गेला... (हो, अधून-मधून पुन्हा पुन्हा अशा चर्चा होतातच), आणि आज हा लेख
क्या बात है.. शेवटची बाप्पाची
क्या बात है.. शेवटची बाप्पाची उपमा तर एकदम आवडली..
मस्त लिहिलय, आवडलं पालकांना
मस्त लिहिलय, आवडलं
पालकांना आनंदाचा धक्का आम्हीच द्यायचा खरंतर पण आमचा डब्बा मलाही सोडवत नाहीये ...
पण लवकरच येईल हा क्षण आमच्याकडेही
आवडला लेख, आमच्या कडे अजून
आवडला लेख,
आमच्या कडे अजून जुना डबाच आहे.टिव्ही निवांत बसूओन बघण्याचे मुळातले तास किती हा विचार करुन अजून बदलला नाही.
जबरी लिहिलयत!!!
जबरी लिहिलयत!!!
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
मस्त
मस्त
मस्त लिहिले आहे
मस्त लिहिले आहे
छान !
छान !
मस्त लिहिलय, आवडलं..
मस्त लिहिलय, आवडलं..
छान
छान
मलाही असा वस्तूंचा लळा लागतो
मलाही असा वस्तूंचा लळा लागतो
मस्त लिहिलंय.
छान लिहिलंय खरंच. मी जुनं घर
छान लिहिलंय खरंच.
मी जुनं घर सोडतांना घराच्या सगळ्या भिंतींवरुन हात फिरवुन सगळ्या भिंतींच्या पाप्या घेतल्या होत्या हे आठवलं.
निर्जीव वस्तु आणि वास्तुपण खुप जीव लावतात.
मस्त लिहिलंय. खूप आवडलं!
मस्त लिहिलंय. खूप आवडलं!
छान लिहिलय.
छान लिहिलय.
मस्त लिहिले आहे. आवडले.
मस्त लिहिले आहे. आवडले.
मस्त लिहीलयं
मस्त लिहीलयं
वाह !
वाह !
व्वा खुपच आवडल..
व्वा
खुपच आवडल..
मस्त लिहीलयं. खूप आवडल..
मस्त लिहीलयं. खूप आवडल..
मस्त लिहलयं
मस्त लिहलयं
व्वा ! किती सुंदर, मुलायम,
व्वा ! किती सुंदर, मुलायम, तलम, रेशमी भावना मांडल्यात.
खूप खूप सुंदर
अगदी अगदी मनातलं.
अगदी अगदी मनातलं.
Pages