क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

66/8 (27.2)

नोप.

Reddy: "Why doesn't Kohli declare now and finish the match in next session.. I have exam and need to concentrate on my syllabus... ">> Lol

75/2 (20.4)
पुजारा गेला.

आघाडी २००+ आहे आता. प्रत्येक धाव मोलाची.

फेरफटका, फारेण्ड, धन्यवाद त्या ईंग्लंड आफ्रिका सामन्याच्या संदर्भाबद्दल.
तो सामना मी तेव्हा लाईव पाहिलेला, पण त्यानंतर ते फिक्सिंग वगैरे प्रकरण कानावर आले नव्हते.
अर्थात तेव्हा ना मी न्यूज पेपर वाचायचो, ना कोणत्या सोशलसाईटवर होतो, त्यामुळे मॅच संपली बात संपली.

टेस्ट वाल्याना एवढ्या मानधनात ५ दिवस खेळायला पर्वडत नै. त्यामुळे तीन दिवसात म्याची संपवतात ते हल्ली. त्यामुळे पर डे रोजगार जास्ती पडतो. वन डे चं कसं दिवसभर काम करा संद्याकाळी आपापला हिसाब घ्या आन घरी चालू पडा. मध्येच आंटीकडं जाऊन्शान दोन दोन टंपासं मारा. चार पैशाचे बोंबील घ्या. गप गुमान झोपून जा आन दुसर्‍या दिवशी २०-२० च्या कामावर जायला बरं. रातच्याला जरा जास्तीच झाली तं दुसर्‍या दिशी अन्फिट हय असा निरोप मुकादमाला दिला का बास. आन ज्या दिशी झैरातीचं काम लागल त्या दिशी तं आज्याबात ग्राउंडवं फिर्कायचं न्हाय . हिथं ५-५ दिवस कुथायला टैम न्हाय ::फिदी:

download (1)_3.jpg

रॉहु Lol का हो उगा नावं ठेवता.

बर अमित मिश्राने १० रन केल्या असल्याने त्या आजच्या मॅचमधली हाफ सेंच्युरी म्हणुन घोषीत करण्यात याव्या अशी शिफारस करावी का? Proud तसेच मुरली व शिखरची सेंच्युरी.

मुरली नाही रे.. पुजाराची >> मुरली विजयच. पहिल्या इनिंगला सर्वाधीक ४० धावा होत्या त्याच्या. अफ्रिकेच्या स्कोरच्या निम्म्या धावा एकट्याने केलेल्या. Happy

पीचबद्दल होत असलेली चर्चा निरर्थक आणि अनाठायी आहे. दक्षिण आफ्रीकेच्या पहिल्या डावात एक डिव्हीलर्स वगळता इतर कोणाचीही विकेट पिचमुळे न जाता खराब शॉट आणि अप्रतिम बॉलिंगमुळे गेलेली आहे. अगदी भारताच्या दुसर्‍या डावातही एक चेतेश्वर पुजारा वगळता इतर कोणाचीही विकेट पीचमुळे गेलेली नाही. दक्षिण आफ्रीकेचे बॅट्समन कमी पडत आहेत हेच खरं. हर्षा भोगले म्हणाला तसं 'द डेमन्स इन द पीच आर मॉन्स्टर्स इन द हेड!'

इम्रान ताहिर ३ नम्बरवर कसा आला? नैट वाचमेण म्हणून का? आणि नाईट वाचमन आल्या आल्या आउट झाल्यावर काय करतात?

Pages