काॅलेजचे ते दिवस विसरूनही पुन्हा विसरता येत नाही..अजुनही मला सारं कसं लख्ख आठवतय..अगदी काॅलेजच्या पहिल्यादिवसापासून...
8 वर्षापूर्वी....
आज माझा काॅलेजचा पहिला दिवस होता....एकप्रकारची मनात थोडी भिती वाटत होती...इथले लोक कसे असतील?? शिक्षक कसे असतील? मी त्यांच्यात मिसळेल की नाही?? असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत होते..
काॅलेजची बेल झाली तसे सगळे आपआपल्या क्लासमध्ये गेले..मी ही क्लासमध्ये शिरलो.. माझी भिरभिरती नजर एका व्यक्तीला शोधत होती..ती व्यक्ती जी माझ्याशी मैत्री करेल..मला सांभाळून घेईल पण अशी कुठलीच व्यक्ती मला शोधूनही सापडेना..कुणालाच माझ्याशी मैत्री करण्यात काडीचाही रस नव्हता..
सगळेच अगोदरपासून एकमेकांना ओळखत होते..मुलींच तर महिलामंडळच स्थापन झालं होतं आणि त्यांची प्रचंड होणारी बडबड ही कुठल्याही भाजीमार्केटपेक्षा कमी नव्हती..
मी थोडा खिन्न होऊन पहिल्या बँचवर जाऊन बसलो..
जसा बसलो तसा संपूर्ण क्लास माझ्यावर हसायला लागला..
मला कळेनाच नक्की काय केल मी ते..
तेवढ्यात एकाने माझ्या बॅकसाईडवर चिटकलेला च्युईगम काढला आणि एखादी घोषणा द्यावी तसा जवळजवळ तो ओरडलाच "च्युईगमवाले बाबा की.." "जय" च्या प्रतिसादाने पूर्ण क्लास दणाणून गेला...
मी गिल्टी फिल होऊन दुसरीकडे जाऊन बसलो..
मी खूपच घाबरा, लाजाळू, अतिसभ्य ह्या टाईपमध्ये मोडणारा मुलगा होतो..
कुणाशी पटकन मैत्री करणं , कुणाशी बोलणे हे कधीच मला जमत नव्हतं...ईतक्यात एक जाड भिंगाचा चश्मा घातलेला, एका साइडने पचपचीत तेल लावून पाडलेला चपटा भांग, त्याच्या शरीराला न झेपेल इतके लूज कपडे घातलेला मुलगा क्लासमध्ये आला आणि नेमका माझ्याच बाजूला येऊन बसला..सुरूवात त्यानेच केली..
"हाय आय अॅम विष्णू गायतोंडे..फ्रेंडस.."
असं बोलत त्याने त्याचा उजवा हात पुढे केला मलाही बरं वाटलं ...मी ही माझा हात पुढे केला..
दुसर्या दिवशी क्लासमध्ये एकटे जायला मन धजावत नव्हते विष्णू आला की सोबत जाऊ असा विचार करून मी पॅसेजमध्ये टाईमपास करत होतो..काॅलेजची बेल होऊनही त्याच्या येण्याची चिन्हे काही दिसेना..तेव्हा नाइलाजाने मलाच एकट्याला जाण भाग होतं..
धीर धरून शिरलो एकदाच क्लासमध्ये..थॅन्क् गाॅड!.. सारं काही आलबेल होत म्हणजे कालच्यासारखी माझी फजिती होण्याचे चान्सेस नव्हते..
माझ्या कालच्या जागेवर एक पर्पल कलरचा टाॅप घातलेली मुलगी बसली होती.
मी तिला हळू आवाजात रिक्वेस्ट केली..
" बेहनजी.. आप कही और बैठ सकती हो..कल यहा मैं और मेरा दोस्त बैठै थे.."
मी फक्त रिक्वेस्ट केली होती यार..पण माहीत नाही का ते तिने असं काही माझ्याकडे रागाने बघितलं जशी काही आता ती मला खाणारचं आहे.. नंतर डायरेक्ट अंगावरच आली ना बया..
" आय अॅम नाॅट युअर बेहनजी.. मी काय तशी वाटते तुला.."
दात, ओठ साॅरी त्यासकट लिपस्टिकही खात जवळ जवळ ती ओरडलीच..
माझी तर फुल फाटलीच होती आणि त्यात हा तमाशा पुर्ण क्लास पाहत होता..
तरीही मनाची शांती जराही ढळू न देता शक्य तितक्या मृदू स्वरात...
"ओके आयटम आणि छमकछल्लो.. तु मज पामरावर कृपा करून दुसर्या जागेवर बसण्याची तसदी घेशिल काय??" असं मी म्हणालो..
तशी ती जरा जास्तच भडकली
ती काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात आमचे कट्टर हिंसावादी अशी ख्याती असलेले गांधीसर आतमध्ये आले..
एव्हाना त्यांनीही हा तमाशा पाहीला होताच...ती काहीतरी बोलणार इतक्यातच सरानी तिला हाताने शांत राहण्याचा इशारा केला..
आणि आपला घसा खाकरत
"आजपासून नाही आतापासूनच तुम्ही दोघांनी इथेच बसायचं तुमच्यातलं भांडण तुम्ही स्वतः सोडवा आणि तुमच्यापैकी एकानेही जागा चेंज केली आणि मला ते कळलं तर तुम्हा दोघांची काही धडगत नाही"
सरांनी धमकीच दिली..
मला आणि तिला एकमेकांच्या बाजूला बसण्याशिवाय पर्याय नव्हता...
ती लेफ्टी होती तर मी राईटी जेव्हा आम्ही दोघ काही लिहित असू तेव्हा तिचा नाजूक गोरापान हात माझ्या हाताला स्पर्श करी आणि माझं अक्षर लाजेने थरथर कापायचं..
....
दिवस कसे मजेत जात होते..काॅलेज खुप छान होतं..ओळखी वाढत गेल्या..
हळू हळू मी चांगलाच रूळत होतो.. एव्हाना मी खूप बदलू लागलो होतो.. माझा धांदरटपणा मला सोडून जाऊ लागला होता....बिनधास्त झालो होतो मी अगदी..कधीही बंक न मारणारा मी आज बंक मारण्याचा परमोच्च आनंद कधी मिस करत नव्हतो आणि हो ती ज्वालामुखी(मी तिला ज्वालामुखी हे नाव दिले होते) माझी चांगली मैत्रीण झाली होती..
मला भिती वाटत होती की, मी तिच्या प्रेमात पडेल की काय..म्हणूनच हल्ली तिला मी टाळत असे तसं तिच नुकतच ब्रेकअप झालं होतं..मी खूपच प्रयत्न केला तिला टाळण्याचा पण नाही जमलं मला ते..आणि ज्याची मला भिती वाटत होती नेमकं तेच झालं माझ्याही नकळत मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो.. माझं ह्रदय मी तिच्या मधाळ डोळ्यात कधीच गमावलं होतं..
प्रेम कधी होतं, कसं होतं, हे बहुतेक कळतं नसावं..पण मला त्याची आता पुरेपुर जाणिव झाली होती..
मला तिच्या प्रेमात पडायचं नव्हतं..बट..बोलते है ना वो.. "दिल है के नादान, मानता नही..."
दिल से सोचो तो सही लगता है...दिमाग से सोचो तो भी सही लगता है..दिल और दिमाग के इस जंग में कौन जितेगा पता नही... ये तो शायद वक्तही बतायेगा...कौन जितेगा??
दिल या दिमाग??
क्रमशः
फिल्मी झालय हो एकदम.. हरकत
फिल्मी झालय हो एकदम.. हरकत नाही छान लिहीताय . लिहा पुढचे.
लिहा पुढचे.
लिहा पुढचे.
पुभाप्र
पुभाप्र
माझं अक्षर लाजेने थरथर
माझं अक्षर लाजेने थरथर कापायचं..>> आवडल फार. येउ द्या अजुन
छान
छान
मस्तं ,.
मस्तं ,.
छान. पुढचे लिहा.
छान. पुढचे लिहा.
फिल्मी झालय हो एकदम.. हरकत
फिल्मी झालय हो एकदम.. हरकत नाही छान लिहीताय . लिहा पुढचे. >> +७८६
कथा छान आहे, अजून फुलवता आली
कथा छान आहे, अजून फुलवता आली असती, अजुन छान झाली असती... पुढील लिखाणा साठी शुभेच्छा...
फोतोग्राफेर२४३....... अहो
फोतोग्राफेर२४३....... अहो आहेना ती क्रमशः