क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिकेटच्या जागतिकीकरणाचा प्रयत्न
या सामन्यांचा हा उद्देश असेल तर त्याबद्दल मनात संदेह आहे.
३५० डॉ. तिकीट लावल्यावर फक्त ज्यांना क्रिकेट समजते, अ‍ॅम्ब्रोज, हूपर, वगैरे खेळाडूव त्यांची कामगिरी ज्यांना माहित असेल, व सर्व प्रसिद्ध खेळाडूंना एकत्र खेळताना बघायचे असेल तेव्हढेच बरेचसे भारतीय, पाकी, ऑसी, ब्रिट, नि अर्थात बरेचसे वेस्ट इंडिज वाले आले होते.

एकूणच गेल्या चाळीस वर्षात माझे इतके मित्र बेसबॉल, फूटबॉलचे नि इतर खेळांचे कट्टर फॅन असलेले होते, पण क्रिकेट बद्दल त्यांना कधी उत्सुकता वाटली नाही. (मला विचारत असल्याने तसे झाले असेल म्हणा) पण त्यांना प्रत्यक्ष वर्ल्ड कप २०-२० सीडी वर दा़खवले तरी ते इम्प्रेस झाले नाहीत.

याचे एक कारण म्हणजे बरेचसे अमेरिकन लोक समजतात की जे अमेरिकन आहे तेच खरे, बाकीचे बकवास. नाही म्हणायला सॉकर बर्‍यापैकी लोकप्रिय होतो आहे.
यावर इंग्लंड मधल्या माबोकरांना प्रश्न - गेली काही वर्षे इंग्लंडमधे अमेरिकन फूटबॉल चे सामने होतात. ते खेळणारे सर्व जण इथल्या प्रोफेशनल टीम मधले चांगले प्रसिद्ध खेळाडू आहेत व ते सर्व सांमने तितक्याच चुरशीने खेळतात जितक्या चुरशीने इथे. या सामन्यांचे निकाल अत्यंत महत्वाचे असतात. ते पाहून अमेरिकन फुटबॉल कितपत लोकप्रिय होतो आहे तिथे?

वॉर्न , मुरली अन डॅन मस्त खेळले . संगा , सेहवाग अन पंटर ही .

पण आपण इंप्रेस झालो अख्तर ने .

अजूनही त्याला भारताकडून खेळायची ऑफर देऊन बघा . टिनपाट अ‍ॅरोन अन यादव पे़क्षा बराच आहे Wink

ऑस्ट्रेलिया - न्यूझिलंड मॅचेस कसल्या कंटाळ्वाण्या होताहेत. गंमत म्हणजे (किंवा irony) असल्या पाटा विकेट्स बनवून ऑस्ट्रेलिया जिंकतीये आणी मिडीया आणी एक्स्पर्ट्स त्यात बॅट्समेन च्या धावांची भूक वगैरे चं कौतुक करताहेत. उपखंडातल्या विकेट्स बद्दल मात्र नेहेमी 'पाटा' 'आखाडा' अशी हिणवणारी विशेषणं लावली जातात. I don't want to play victim, but just pointing out the contradiction.

किवीज कडे ही फास्ट बोलर्स चा ताफा असल्याने फास्ट विकेट्स बनवल्या नसतील. आपल्याविरूद्ध सुद्धा तसे होउ लागले होते - झहीर-इशांत च्या फॉर्म च्या काळात. मात्र pointing out the contradiction. बद्दल टोटली सहमत.

जेव्हा खेळपट्टी गोलंदाजांना खूप सहाय्य करणारी बनवली जाते तेव्हा कमजोर संघाचेही बाजी मारायचे चान्सेस तुलनेत वाढतात.
जेव्हा स्पोर्टींग वा त्यातही फलंदाजधार्जिणी बनवली जाते तेव्हा ऑस्ट्रेलिया सरस ठरून जाते. ऑसी फलंदाज बॅटींग पिचवर चार-साडेचारच्या गतीने दिवसात साडेतीनशे-चारशे धावा मारतात हा त्यांचा प्लस पॉईंट कामाला येतो. समोरच्या संघात असे तगडे फलंदाज नसतील तर त्यांच्या विकेट प्रेशर टाकून मिळतात. कारण अश्या सामन्यात दोनच निकाल शक्य असतात. ऑस्ट्रेलियाचा विजय किंवा सामना अनिर्णित.

मिश्रा का नाहीये आज? मिश्रा असता तर कदाचित एबीडीलाही घेतला असता आधीच.
आणि त्या जागी बिन्नीला का घेतात फुकटच्या फुकट? त्याच्या बॉलिंगचा खरेच काही फायदा आहे का? नसेल तर मग राहुल किंवा शर्मा सारख्या फलंदाजाला का बसवलाय? तगडा वशिला दिसतोय बिन्नीचा.

निवड आधीच झाली होती.. मग वशिला बाहेर गेला.. आणि बंगळूरू बिन्नीचे होम ग्राउंड नव्हे का? तिथे त्याला पिच माहिती आहे.. त्याचा अ‍ॅडव्हांटेज मिळेल वगैरे गमती आहेत ना..

आजची खेळपट्टी पहिल्या कसोटीच्या मानाने कसोटीसाठी खूपच बरी होती व म्हणूनच पहिल्या कसोटीपेक्षां . आजची आपल्या फिरकीची करामत खूपच कौतुकास्पद. तरी पण खेळपट्टी फिरकीला दिवसेंदिवस अधिकाधीक अनूकूल होईल असंच वाटतंय. टॉस जिंकून फलंदाजी न घेणं व शेवटच्या डावात फलंदाजी करणं, धोकादायक ठरूं शकतं.
खेळपट्टी फास्ट गोलंदाजीला पोषक नव्हती हें मान्य करूनही भारतीय फलंदाजांचा आजचा प्रत्येक चौकार सहजसुंदर, शैलीदार व निखळ ' टायमींग व प्लेसिंग'चा नमुनाच होता !
वेगवान गोलंदाजीचा प्रभाव पडत नाहीय हें स्पष्ट असूनही आमलाने भारताचा ६०-० स्कोअर होईपर्यंत फिरकी गोलंदाजाना संधी देवून कां पाहिलं नाहीं, हें कोडच आहे !
डि व्हिलीयर्सला त्रिवार सलाम !!!

एबीडीचा कॅच कसला घेतलाय साहाने! तरूण विकेटकीपर आला हे एका अर्थी बरेच झाले. कॅचिंग सुंदरच होते. पुजारा आणि रहाणेचे पण रिफ्लेक्सेस कसले होते राव. बिन्नीचा आउटफील्ड कॅचसुद्धा बघण्यासारखा होता.

आजचा दिवस फुकट गेला नि पाऊस पडला तेंव्हा सिमिंग वेथर असेल तर कदाचित ३ जलदगती (बिन्नी ला त्यात घातल्याबद्दल ओरडु नका Wink ) घेतल्याचा फायदा होईल बहुधा.

एक दिवस फुकट गेल्याने खरे तर पॅनिक व्हायची गरज नाहीये, पण प्रॉब्लेम असाय की पुढच्या दिवसातील हवामानही काही ठिक नाही..
उद्याचा दिवस तरी किमान व्यत्यय नको, म्हणजे कुठलीही घाई न करता शांत डोक्याने फलंदाजी करतील..

टेलर मस्त खेळला. पण ऑस्ट्रेलिया चा रिप्लाय पण जबरदस्त होता. निकाल लावण्यासाठी खेळतायेत ऑसीज असं वाटतय. मला केन विल्यमसन फार आवडतो. कसला राहूल द्रविड आहे! (राहूल द्रविड हे विशेषण म्हणून घेण्यात यावं).

डेव्हिड बुन, मर्व्ह ह्युज नंतर हॅन्डल बार मुस्टॅच असणारा ऑस्ट्रेलियन. परत एकदा मिशांना क्रिकेटिंग वल्ड मध्ये ग्लोरी त्याच्यामुळे आली. Proud

सा अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरिज मधील मिचेलची बॉलिंग कुठलाही क्रिकेट प्रेमी विसरू शकणार नाही. वन ऑफ द बेस्ट बोलर्स अराउंड.

अर्र लौकर रिटायर झाला. एक दोन वर्षांपूर्वी अ‍ॅशेस मधे त्याने फास्ट बोलिंग चे दिवस परत आणले होते. केदार - मुश नंतर आली बहुधा बरीच, टॅटू ही कदाचित. आधी बराच साधा दिसत होता तो, बहुधा २००८ च्या आसपास. डबल रोल मधला मूळचा सॉफ्ट हीरो बदलून त्याच्या जागी टपोरी येतो तसा तो नंतर आला Happy

हो ते माहिती आहे. पण तो नंतर ट्रेडमार्क झाला. म्हणून लिहिले.आणि त्याची बॉलिंगही झहिरसारखी नंतरच बहरली.

त्याची बॉलिंगही झहिरसारखी नंतरच बहरली. >> IPL त्याला संजीवनी दिली. मुंबई इंडिअयन्सचा मुख्य बॉलर झाल्यानंतर त्याचा एकदम कायापालट झाला होता, एकदम लीडर अ‍ॅटीट्युड जागा झालेला. त्याचे अ‍ॅशेस मधले स्पेल्स बास्ट्नमधल्या एका क्रिकेट ला समर्पित असलेल्या पबमधे एका ब्रिटिश कलिगबद्दल पाहिलेले. लय आनंद राव Happy

जॉन्सन ची बॉलिंग बघताना (उत्तरार्धात) नेहेमी असं वाटायचं की तो बहुदा पिच ला खड्डे पाड्ण्याच्या कामगिरीवर आलाय. गूड बॉलर.

त्याने कारकिर्दीच्या एका टप्प्यावर अचानक जे वेगवान रूप धारण केले तेव्हाच त्याचा शेवट जरा लवकर होणार याचा अंदाज आलेला. तसेच गेल्या काळात त्या वेगाची बोथट होत चाललेली धार पाहता योग्यवेळी निवृत्त झाला. जर फलंदाजीत सातत्य राखता आले असते तर कारकिर्द वाढली असती. पण त्याने काही भन्नाट वेगवान गोलंदाजीचे स्पेल टाकून या काळात जे नाव कमावलेय ती त्याची आयुष्यभराची कमाई राहील. तसेच आता आयपीएल जिंदाबाद बोलत 2-3 वर्ष तिथेही छापेल.

बाकी आपला सामना तर पावसाने धुपवला..

फार वर्षांपूर्वी एक सामना पाहिला होता. बहुधा ऑस्ट्रेलिया आफ्रिका असावा. ज्यात अश्या ड्रॉ होणार्या सामन्यात दोन्ही संघांनी आपली एकेक इनिंग डिक्लेअर करून थेट चौथी इनिंग सुरू केलेली. आणि अत्यंत चुरशीचा सामना होत निकाल लागलेला. बहुधा आफ्रिका चेस करत होती आणि ऑस्ट्रेलियाने जास्त रिस्क घेत जुगार खेळलेला ज्यात ते हरले... कोणाला नेमके आठवतेय का? की त्यातील एक संघ ईंग्लंड होता?

मलाही अंधुक आठवते. बहुधा इंग्लंड-द आफ्रिका. तेव्हा अशीही टीका झाली होती की हे जर भारत, पाक ई संघांनी केले असते, तर मॅच फिक्सिंग आहे म्हणून लोक म्हंटले असते Happy

ऋन्मेष, तुम्ही रेफरन्स दिलेला सामना द. अफ्रिका वि. ईंग्लंड होता आणी नंतर हॅन्सी क्रोनिए ने दिलेल्या कबुलीजवाबाप्रमाणे फिक्स्ड होता (क्रोनिए कडून, ईंग्लंड कडून नाही). त्यात पावसाने वाया गेलेल्या वेळेनंतर देखील सामन्याचा निकाल लागेल असं 'ठरवलं' गेलें होतं. (सामन्याचा निकाल निश्चित नव्हता, पण सामना निकाली होईल हे निश्चित होतं).

फारएण्ड, क्रिकेट आपलं पहिलं प्रेम आहे हो. अशा काही काही गोष्टी मेमरीत अडकुन पडल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे बुचर दुसर्या ईनिंग मधे छान खेळला होता.

Pages