पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.
जसे विविध गद्य नाटकातले कलाकार एकदा नटसम्राट करायला मिळाले म्हणजे नट म्हणुन एक मानाचा शिरपेच मिळतो या भावनेने ही भुमिका करतात तसे संगीत नाट्यप्रकारात अनेक नाटकांपैकी हे एक नाटक करायला मिळाले म्हणजे सुध्दा शिरपेच अशीच भावना किमान या नव्या पिढीच्या गायकांमध्ये असावी.
वसंतरावांच्या गायकीने वेड लावलेले अनेक गायक/श्रोते महाराष्ट्रात आहेत. ज्यांनी स्वत: वसंतराव देशपांडे यांच्या कडुन संगीताचे धडे घेतलेले पं. पदमाकर कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य डॉ. रविंद्र घांगुर्डे यांना वसंतरावांनी गाजवलेली खासाहेबांची भुमिका करायचे मनात येणे नवल नाही. राहुल तर हीच सर्व गाणी ऐकत आणि कट्यार निर्मीतीच्या कथा ऐकत लहानाचा मोठा झाला असेल. आपल्या वडीलांकडुन किर्तनाचे धडे घेतलेला आणि किर्तन करणारा चारुदत्तला ही भुमिका करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे त्यांच्याकडुन कधी काळी ऐकायला आवडेल.
मागच्याच वर्षी पंडीत पदमाकरजी हयात असताना मी त्यांना तुमच्या कडुन कट्यार बद्दल ऐकायचे आहे असे सांगताच पंडीतजी खुलले होते. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा माझा मानस तसाच विरला. खर तर मला प्रत्येक खासाहेबांकडुन कट्यार चे काय गारुड आहे हे जाणण्याचा संकल्प होता पैकी पंडीत पदमाकरजींच्या जाण्याने ह्यातला काही भाग रेकॉर्डवर येण्याआधीच पुसला गेला.
पंडितजींच्या जाण्याने झालेला विरस सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाच्या घोषणेने कमी झाला आहे. एखाद्या कथेला नाटकात नेपथ्याच्या मर्यादा येतात. राजे- रजवाडे असलेल्या कालवधीतली ही कथा राजगायकाचा महाल आणि छोट्या सदाशिवा बरोबर एका जुन्या शिव मंदीरात पंडीतजींचा रियाझ या दोनच सेटवर अडकुन पडते. किंबहुना नाटक म्हणुनच लिहायला घेतले असेल तर दारव्हेकरांना ते प्रसंग त्या मर्यादेतच लिहावे लागले असतील.
कट्यार च्या कथेवर येऊ घातलेल्या सिनेमाचे पहिले गाणे येऊन थडकल्यावर " सुर निरागस हो" हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण नाट्यरुपांतरामुळे असलेल्या मर्यादा संपवुन एका नव्या भव्य आकृतीबंधात बांधले जाईल यात शंकाच नाही.
एक पिढी होती ज्यात जुन्या कथा चित्रपटात बांधुन त्याच्या भव्यतेसहीत पडद्यावर साकारत. हे निर्माते फ़क्त हिंदीतच सिनेमे करत. जुन्या पिढीत मुगले आझम असुदे किंवा त्यांचा कित्ता गिरवणारा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असुदेत. केलेला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी मराठी माध्यम अपुरे पडत असावे. यातुन एक काळ असा गेला ज्यात मराठी सिनेमा नव्या कल्पना नसलेल्या निर्मीतीच्या गर्तेत अनेक वर्ष अडकल्याने आपली हिंमत आणि वारसा आणि प्रेक्षक वर्ग ही हरवुन बसला होता.
नजीकच्या मराठी सिनेमात अनेक प्रयोग झाल्यामुळे आणि लोकांना भावल्यामुळे मला मराठी सिनेमा करायचा आहे असे अमिरखान सारखे निर्माते तर रजनिकांत सारखे सुपरस्टार जाहीर रित्या म्हणुन लागले आहेत. ही नादी मराठी सिनेमाला सुवर्णकाळ येईल की काय अश्या काळाची आहे. या पार्श्वभुमीवर कोर्ट या मराठी सिनेमाला कोणत्याही प्रसिध्द स्टार कास्ट शिवाय ऑस्कर पुरस्काराला नॉमिनेशन होणे हा सुध्दा एक चांगला योग मानायला हरकत नाही.
कट्यारची कथा आता भव्य स्वरुपात पडद्यावर झळकेल ज्यात सचिन पिळगावकर खासाहेबांची तर पंडीतजींची भुमिका शंकर महादेवन रंगवणार आहेत. या सिनेमातले सेट डिझाइन रवी जाधव यांचे आहे तसेच आर्ट डायरेक्टर म्हणुन सुध्दा काम करत आहेत. रवी जाधव यांच्या सेट डिझाइनची झलक " सुर निरागस हो" या राजवड्यातल्या गणेश उत्सवाच्या भागाचे चित्रकरणासहीत चाहत्यांच्या समोर आल्याने कट्यारला काही नविन अॅगलमधे नुसते ऐकायला नाही तर पहायला मिळणार ही एक आनंदाची गोष्ट आहे.
शंकर महादेवनला या निमीत्ताने मराठी सिनेमात पहाणे आणि ऐकणे सुध्दा आगळाच आनंद देईल. मध्यंतरी राहुल देशपांडे आणि शंकर महादेवन यांनी काही गायन एकत्रीत केल्याचे दुरदर्शनवर केल्याचे पाहिले होते. त्यामागे असा काही संकल्प असेल याची कल्पना आली नव्हती.
या चित्रपटाला शंकर- एहसान -लॉय यांचे संगीत आहे. या त्रिकुटाने काही सिनेमांना हटके संगीत दिले होते. चाहत्यांना हवी असलेली नाट्य संगीताची तहान या सिनेमाच्या संगीताने भागवली जाते की संगीत नाटकाचे सिनेमात रुपांतर होताना काही वेगळ्या संगीत संकल्पना पुढे येतात हे पहाण्याचे बाकी आहे.
सुबोध भावे पुन्हा नाटकाप्रमाणे कविराज बाके बिहारींचीच भुमिका रंगवणार असे वाटत होते पण टीझर त्यांना सदाशीवाच्या रुपात आणतोय तर कविराज बाके बिहारी बहुतेक दुसराच प्रसिध्द नट रंगवणार असे दिसत आहे. उमेची भुमीका मृण्मयी देशपांडे तर खासाहेबांच्या मुलीची भुमिका अमृता खाडीलकर करणार असे दिसत आहे. गायकांची नावे या प्रमोत आलेली नाहीत. सचिन पिळगावकर गात असले तरी खासाहेबांची गायकी दुसराच पार्श्वगायकाला करावी लागणार यात शंका नाही. गायकांच्या यादीत फ़क्त शंकरचे नाव आत्ता दिसते आहे. प्रत्यक्षात ही गाणी राहुल की अजुन कोणी हे समजायला सिनेमाच प्रदर्शीत होण्याची वाट पहावी लागणार आहे.
सुबोध भावे यांनी कट्यारचे नाट्यप्रयोग केले आहेत ज्यात राहुल देशपांडे खासाहेब भुमीका करतात. या पार्श्वभुमीवर आणि दुरदर्शनवरची ती जुगलबंदी ऐकल्यावर एका गोष्ट जी कथेच्या मुळ रुपात बदल करुन येईल असे वाटते ती म्हणजे खासाहेब आणि पंडीतजींची दसरा दरबारातली जुगलबंदी. असे घडले तर कथेच्या मुळ स्वरुपात नसलेली एक गोष्ट जी चित्रपट पहाण्याला एक कारण मिळवुन देईल.
असे प्रयोग चित्रपट पुन्हा निर्माण करताना करावेच लागतात. संजय लीला भन्साळींचा देवदास पुन्हा पहाताना " डोला रे डोला रे " या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांना एका फ़्रेम मधे आणण्याचा प्रयोग करावा लागला होता तोच प्रयत्न या निमीत्ताने होईल अशी एक आशा माझ्या मनात आहे. अन्यथा खासाहेब आणि पंडीतजी यांचा सामना झाला आणि पंडीतजी न गाताचा उठुन गेले ही मुळची कथा काहीशी चाहत्यांच्या अपेक्शा अपुर्ण ठेवणारी होती.
कथेत बदल होणार म्हणजे नाट्य प्रयोगाचे अस्तित्व अबाधीत ठेऊन नविन गाणी येणार हे " सुर निरागस हो" या निमीत्ताने जाणवले. यातुन कट्यारचे वैभव वाढणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. मराठी प्रेक्शकांनी जसा बालगंधर्व हा सिनेमा डोक्यावर घेतला तसा नव्या स्वरुपातली नाट्य प्रयोग चित्रपटाच्या स्वरुपात मराठी सिनेमाला उंची मिळवुन देऊन एक नवा इतिहास घडवतो का हे समजायला फ़ारसा अवधी राहीलेला नाही. दिवाळीतच हा सिनेमा रिलीझ होऊन दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवायला आपल्या समोर येतो आहे.
गाणी गायलाय तो.. कदाचित राहुल
गाणी गायलाय तो..
कदाचित राहुल फार यंग दिसला असता खान साहेबांच्या भुमिकेत..
र्नाटकात करतोच ना खांसाहेब.
र्नाटकात करतोच ना खांसाहेब. अर्थात त्यात बव्हंशी अभिनय म्हणजे गाणेच आहे आणि नाटकातल्या अभिनयाची कृत्रिमता प्रेक्षक समजून घेतात तसे चित्रपटात नसते ना. अर्थात राहुलला स्क्रीन प्रेझेन्स नसावा.
हल्ली मला प्ले बॅ़क म्हटले एक चतुर नार करके सिंगार हेच गाणे आठवते... ::फिदी:
लोकसत्ताचा रिव्ह्यू वाचला का
लोकसत्ताचा रिव्ह्यू वाचला का ? चित्रपट चांगलाच आहे पण.... ( पण काय ते तिथेच वाचा ! )
शौनकची अनुपस्थितीही जाणवते/
शौनकची अनुपस्थितीही जाणवते/ जाणवली.
फार फार वर्षांपुर्वी
फार फार वर्षांपुर्वी वसन्तरावांच कट्यार... टीव्हीवर लागलेल.
मी आजारी होतो माझा शेवट गेलेला म्हणून खुप रडलेलो.
लोकांनी दुरदर्शनवर कौतुकाचा वर्षाव केलेला.
पुढे काही वर्षानी परत लावा म्हणून दुरदर्शनवर पत्रांचा पाऊस पडला.
तेव्हा आकाशकंदील किंवा त्याच्या बरोबरची ती कुजकी बाई म्हणाली "ऊं हुं ते केव्हाच पुसल गेलाय...."
अख्या महाराष्ट्राच्या काळजात त्या दिवशी भस्सकन कट्यार घुसली.
तशीच आता महागुरू खुपसतील. ही बालकरांची शोकांतिका आहे ते मोठे व्हायला तयार नसतात.
शंकर हा काही अभिनेता नाही पण अतिरंजित महागुरूंपुढे तो ऊठून दिसतोय.
गुगु....अगदीच बरोबर.....अगदी
गुगु....अगदीच बरोबर.....अगदी तीच भावना होती व आहे. दूरदर्शनच्या सरकारी गलथानपणाचा उभ्या महाराष्ट्राला बसलेला तो एक मोठ्ठा दणका होता....
मला तरी सिनेमा
मला तरी सिनेमा आवडला.
ट्रेलरमध्ये सचिनचा आवाज होता. पण पिक्चरमध्ये त्याचा आवाज डब केला आहे. अभिनय , आवाज दोन्ही परफेक्ट आहे.
सिनेमात बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. पटकथा बरीच नवीन आहे.
गाणी मात्र एकेक कडव्यावरच आवरली आहेत.
सिनेमा हिंदी असता तर अगदीच गाजला असता.
मार्क किती देऊ ?
४.८
उगाचच चुका काढायला आम्ही बोहारीण नाही.
गाणी एकाच कडव्याची ? सुरत
गाणी एकाच कडव्याची ? सुरत पियाकि पण ?
माहीत नाही. इंटर्वल आता झाले.
माहीत नाही.
इंटर्वल आता झाले.
मस्त फिल्म...गाणी फारच शॉर्ट
मस्त फिल्म...गाणी फारच शॉर्ट झालीत किंवा घेतलीत...त्यात रंगेपर्यंत किंवा त्यात तल्लीन होईतो ते संपतं...
पहिला शो पाहून झाला..उद्या परत कलाकारांसोबत सोबत प्रिमिअर बघायला जाईन म्हणतो...
काही ठिकाणी चित्रिकरणात आजच्या काळातली भेसळ पण दिसून येते आहे...
उदा.कागदाचा कचरा,काँक्रीट्चा पूल वगैरे...
सांगलीचा निर्माता असल्याने फिल्ममध्ये अॅडऑन चव लागली... सुरेख...
आवडले लिखाण ! तुर्तास फार
आवडले लिखाण !
तुर्तास फार गाजावाजा आहे या चित्रपटाचा
ट्रेलर पाहिले आहे. पण त्यावरून माझ्या टाईपचा चित्रपट वाटत नाही पण तरीही चांगला वाटतोय. तसेच गाजावाजा असला तरी तो काही निवडक आवडी ठेवणार्यांमध्ये. एकंदरीत बॉक्स ऑफिस वर फार काही करेल याची शाश्वती नाही देऊ शकत. जर मुंबई-पुणे-मुंबई चांगला निघाला तर याचे आणखी कठीण होईल.
तरीही सचिन पिळगावकर सरांसाठी त्यांचा लूक पाहता जावे असेही वाटतेय.
सचिन ने बरे काम केलय सिनेमात
सचिन ने बरे काम केलय सिनेमात असे ऐकलय.... "मी माझा" करणे सोडले तर गडी जरा सुसह्य होइल
नाटकाची मूळ थीम सशक्त
नाटकाची मूळ थीम सशक्त असल्याने चित्रपट चांगलाच असेल पण मुं पु मुं २ आणि सल्लूभाई ची टक्कर असल्याने परिणाम होईल असे वाटते. शास्त्रीय संगीत विषय असल्याने प्रेक्षक आधीच मर्यादित झालाय. पण त्याला यश मिळो ही सदिच्छा
कागदाचा कचरा,काँक्रीट्चा पूल
कागदाचा कचरा,काँक्रीट्चा पूल वगैरे..
... इंग्रज काळ आहे. ग्रामोफॉण आहे
शेवटची सुरत पिया की जुगलबंदीही अर्धीच आहे. दोन कडवी घेजुन नंतर एकदम तराना आहे. तराणा अगदी सुंदर आहे.
सदाशिव तिसरा अंतरा रचून म्हणतो हे कट केले आहे.
....
खानसाहेबांची कव्वाली मात्र अतीसुंदर आहे. सिनेमात पूर्ण आनंद देणारे एक गाणे आहे ते.
एकंदरच कट्यार अखेर बैजुबावराच्या दिशेने नेला आहे.
सुरुवातीला पंडीतजी तेजोनिधी
सुरुवातीला पंडीतजी तेजोनिधी लोहगोळ म्हणतात . त्याला जोडून खानसाहेब एक ललतमधली बंदिश गातात. ती सुंदर आहे.
राजकवीची सुंदर वाक्ये नाहीत. रागमाला नाही.
आणि ' खुश रहे सनम मेरा ' हेही नाही.
सुरुवातीला पंडीतजी तेजोनिधी
सुरुवातीला पंडीतजी तेजोनिधी लोहगोळ म्हणतात . त्याला जोडून खानसाहेब एक ललतमधली बंदिश गातात. ती सुंदर आहे.
राजकवीची सुंदर वाक्ये नाहीत. रागमाला नाही.
आणि ' खुश रहे सनम मेरा ' हेही नाही.
रागमाला सिनेमात अप्रस्तुतच
रागमाला सिनेमात अप्रस्तुतच वाटली असती . अर्थात रागमालेसारखी गानी झालीत चित्रपटा मध्ये यापूर्वी. पण तो फारच बाळबोध काळ होता . हल्लीचे दिग्दर्शक वास्तववादी अंगाने विचार करतात . मूळ नाटकात ११ पात्रे गाणारी आहेत त्यामुळे नाटकाचा कालावधी मोठाच आहे. चित्रपटाच्या अदीच तीन तासात बसवायचे म्हणजे काटछाट साहजिकच आहे म्हणा ...
रॉबिन, रागमालेच्या
रॉबिन, रागमालेच्या पार्श्वभूमीवर काही प्रसंग पुढे नेता आले असते. ( ममता मधली रागमाला आठवतेय.. हम गवनवा / सकल बन गगन / विकल मोरा . मुद्दाम आठवतेय का म्हणून विचारतोय, कारण आता ती सिनेमातही नाही आणि यू ट्यूबवरही दृष्यरुपात नाही. ) आणि मराठीत तर जिवलगा कधी रे येशील तू.. या आशाच्या गाण्याव्यतीरिक्त फारसे काही आठवतच नाही.
नाटकात प्रसाद सावकार आणि मग पुढे प्रकाश ईनामदार त्यातला गद्य भाग सादर करत असत.
पाहिला. मुद्दाम ज्यास्त डीटेल
पाहिला.
मुद्दाम ज्यास्त डीटेल देत नाही.
सचिन दिसला कि डोळे बं करू फक्त एका राहुलजी
ह्यांना.
सचिनचे ते हात वारे एक सेंकदच पाहिले ,दिल कि तपीश मध्ये.
असो.
इतरांचा मूड खराब न करण्यासाठी इथेच आज्ञा घेत
झी वरच्या जाहिराती व काल
झी वरच्या जाहिराती व काल परवाच्या हवा येउ द्या मधल्या प्रमोशन मुळे प्रचंड उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट पाहण्याची.
म्हणून हा लेख नीट वाचला. नितीनचंद्र - सुरेख लिहीले आहे. मला हे नाव व त्यातील काही गाणी वगळता फारशी माहिती नव्हती.
सचिन स्टेज वर जरी पकाऊ वाटला तरी तो चित्रपटात कधी बोअर झाला आहे असे लक्षात नाही. त्याचे गेल्या काही वर्षातले पिक्चर्स मी पाहिलेले नाहीत. आमची आठवण म्हणजे शोले, सत्ते पे सत्ता, अष्टविनायक, बनवाबनवी वगैरेंची. तेव्हा तो काही फार छाप पाडत असे असे नाही, पण रोल मधे चपखल असायचा. त्याने या पिक्चर मधे चांगले सरप्राइज द्यावे असे वाटते. डीजे शी सहमत.
सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर
सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर मायबोली व मिपा लोकाना तो बोअर वाटू लागला आहे.
( काँग्रेसात गेला नाही हे त्याचे नशीब . ! नैतर बिचार्याची यथेच्छ धुलाई झाली असती इथे. )
... काँग्रेसी मोगा हातगावकर
छे छे तो कोण्त्याही पक्षात
छे छे तो कोण्त्याही पक्षात गेला तरी रिअॅलिती शो मध्ये तो प्रचंड बोअर करतो हे सत्य शाश्वत आहे. नाहीतरी नटांचे राजकारण लोक फारसे सिरिअस घेतच नाहीत आणि नतही ते तसे घेत नाहीत.
नेहमीप्रमाणे पहिल्या दिवशी
नेहमीप्रमाणे पहिल्या दिवशी दुसरा शो पाहिला!
पहिली रिअॅक्शन! अत्यंद सुंदर चित्रपट!!
दुसरी रिअॅक्शन! प्रत्येक कलाकाराची अप्रतिम अॅक्टिंग!!
तिसरी रिअॅक्शन! सचिनची अफलातून अदाकारी; महादेवनचे पदार्पणातच शतक; सुबोध भावे आणि दोन्ही मुली (नावे ठाऊक नाहीत... आम्ही मागच्या पिढीतील माणसे!) अत्यंत दमदार अभिनय!!
हा चित्रपट पैशांची आणि बक्षिसांची सर्व रेकॉर्ड मोडणार असे माझे वैयक्तिक भाकित.
भारावून गेलो आहे!!
रात्रीचा शो पाहिला. मूळ नाटक
रात्रीचा शो पाहिला.
मूळ नाटक न पाहिल्याने तुलना न करता सिनेमा पाह्ता आला. संगीत श्रवणीय आहे. पण बहुतेक सर्व गाणी एक एकच कड्व्याची आहेत.अजून कडवी घालून पुर्ण तीन तासाचा सिनेमा केला असता तरी चाललं असतं. कव्वाली आणि शेवटचे गाणे चित्रपटाचा highlight आहे
पुष्कर राजकवी आहेत हे दाखविण्यासाठी त्यांच्या तोंडी एक हिंदी कविता आहे सुरुवातीला जी पुर्ण मराटी accent मध्ये आहे. बहुतेक त्याची शूटिंग झाल्यावर अजून कविता राजकवीच्या तोंडी न टाकण्याचा निर्णय घेतला गेला असावा.
महागुरुंचे गाणी गातानाचे अति हात वारे सोडता काम एक्दम झकास आहे. बाकी स्टार कास्ट ने चांगले काम केलं आहे. थोडक्यात एकदा पाहण्याजोगा चित्रपट आहे.
शरद यांची पोस्ट वाचून जास्तं
शरद यांची पोस्ट वाचून जास्तं ऑप्टीमिस्टीक, इथे पहायला मिळु देत थिएटरला :).
फा ला अनुमोदन,!
सचिन महागुरु म्हणून डोक्यात जायला लागला, सिनेमात कामचलाउ कॅटॅगरी होता, डोळ्यात खुपणे कॅटॅगरी नाही वाटला कधी.
बालकलाकार म्हणून बेस्ट होता बाकी !
>>सिनेमात कामचलाउ कॅटॅगरी
>>सिनेमात कामचलाउ कॅटॅगरी होता, डोळ्यात खुपणे कॅटॅगरी नाही वाटला कधी
कसा वाटणार?..... सिनेमात स्वताबद्दल बोलायला देत नाहीत ना!
स्वरूप लई भारी :
स्वरूप लई भारी ::हहगलो:
बर्याच जणांकडून चांगलेच
बर्याच जणांकडून चांगलेच रिव्यु ऐकलेत.
सचिनला स्वतःचं काही करायला जागाच दिली नाहीय असंही ऐकलं.
सचिन सुसाह्य काय चक्क आवडून जातो हे ही ऐकलंयच
एका कट्टर सचिन बॅशर्स कडून
एका कट्टर सचिन बॅशर्स कडून सचिनची या रोलबद्दल चक्क स्तुती ऐकली मी.... सुबोध भावे ला मानले पाहिजे
महागुरुंचे गाणी गातानाचे अति
महागुरुंचे गाणी गातानाचे अति हात वारे सोडता काम एक्दम झकास आहे. बाकी स्टार कास्ट ने चांगले काम केलं आहे. थोडक्यात एकदा पाहण्याजोगा चित्रपट आहे. >>>> + १
सचिनला स्वतःचं काही करायला जागाच दिली नाहीय >>>>>+१ मी पण पाहिला काल. याचीच जास्त धास्ती वाटत होती पण, खरचं सुबोध भावेला सलाम
एक मात्र नक्की कि, तेजोनिधी, सुरत पिया हि गाणी थोडी मोठी हवी होती. ती सुरु होई पर्यंत संपून गेली असचं वाटत आणि 'या भवनातील' तर नाहीच आहे : (
Pages