ऑफिस मध्ये सोशल साइट्स वापरणे

Submitted by उडन खटोला on 11 November, 2015 - 22:45

मला वाटते या विषयावर यापूर्वी भरपूर चर्चा झालेली आहे , पण तरीही मूळ समस्या तशीच असल्याने आज हा विषय मांडत आहे .

खाजगी उद्योग अथवा सरकार (Employer) हा आपल्याला ऑफिस मध्ये त्यांचे काम करण्याचा पगार देतो . म्हणजे कामाचे जे तास असतील तेवाढे तास आपण ऑफिसचे काम करण्यास बांधील असतो .

असे असताना ऑफिस मध्ये फेसबुक /whatsapp / व इतर मराठी सोशल साइट्स वापरत टाइमपास करणे हे नैतिक दृष्ट्या अयोग्य वाटते .

असे असताना देखील अनेक लोक ऑफिस-अवर्स मध्ये सोशल साइट्स वापरत असतील तर त्या गोष्टीवर उपाय काय ?

सोशल साइट्स ब्लॉक करणे अथवा मोबाइल jammer लावणे / ऑफिस मध्ये मोबाइल वापरण्यास बंदी करणे अशा टेक्निकल उपायाऐवजी Employees नीच मनापासून हे तत्त्व किंवा business ethics / professional work culture चा भाग म्हणून स्वत:हून सोशल साइट्स ऑफिस अवर्स मध्ये टाळल्या पाहिजेत असे माझे मत आहे ...

आपले काय म्हणणे आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे. ही पोस्ट तुम्ही ऑफिसच्या कंप्युटरवरून, ऑफिसच्या वेळात पर्सनल फोनवरूनही टाकलेली नसली म्हणजे झालं.

ऑफीसच्या वेळेत स्वतःच्या मोबाईलवरून वापरा. पण वेळ ऑफीसचा आहे. त्याचबरोबर ऑफीसच्या खर्चाने असा टाईमपास करणे चुकीचेच आहे. काही लोक तर घरी आल्यानंतर इतर साईट्सवर दिसत नाहीत. कारण दिवसभर ते ऑनलाईन असतात . वीकेण्डलाही ऑनलाईन दिसत नाहीत. ज्यांना कार्यालयात नेट वापरायचे नाही ते मात्र या वेळेव्यतिरिक्त ऑनलाईन दिसतात. त्यावर एका ऑऑ (ऑफीसमधून ऑनलाईन) असणा-या एका विनोदी लेखकाने अशांची हेटाळणी करणारा लेखही लिहीलेला होता. फुकट मिळाल्याने का होईना , पण नेट कसं वापरावं हे त्यांना कळालंय असंही कधी कधी वाटतं.

शनिवार रविवार सोशल मीडीया शांत असतो यावरून काय ते लक्षात येतंच..

हेडरमधलं म्हणणं वेगळं दिसतंय हेमाशेपो. ऑफिसच्या वेळेत स्वतःचा मोबाईलही वापरू नये सोशल साईट्सवर जायला असं म्हणतायत.

मग तर ऑफीसमधे कुठलाही टीपी असू नये असं म्हणावं लागेल, जे शक्य नाही. आठ तास मान मोडेल असं काम करणे मानवी मर्यादेत शक्य नाही. बाकी मिसयुज बद्दल सहमत असायला हरकत नाही. पण हार्ड अ‍ॅण्ड फास्ट नियम लावणे कठीणच आहे. मात्र यांच्या ऑफीसमधे काही काम असतं की नसतं अशा पद्धतीने ऑनलाईन असणारे अनेक लोक पाहण्यात आहेत, त्यांच्याबद्दल आहे पोस्ट.

हायर केलेला "माणूस" माणसासारखा वागवायचा की "चाबकाच्या फटक्याखाली जनावर/बैलासारखा" वागवायचा याबाबतच्या म्यानेजमेंट नावाच्या यंत्रणेची जी मते असतील, त्यानुसार त्या त्या संस्थांमधे सोशल साईट वापरु द्यायच्या वा नाहीत, पर्सनल फोन वापरणे/करणे/घेणे करु द्यायचे वा नाही हे ठरते.
सर्वसाधारणतः खाजगी व्यवस्थापनांमधे "एण्ड रिझल्टला" अत्याधिक महत्व असते, व तो पूर्वनिश्चित एण्ड रिझल्ट एम्प्लॉईने झोपुन केला की उभा राहुन केला की नाचत केला याला महत्व दिले जात नाही. तो वेळेत केला, व यशस्वी केला की नाही हे बघितले जाते.
इंग्रजकालिन "कारकुनांकरताचे" नियम आजही वापरु गेलात तर ऑर्गनायझेशन कोसळायलाही वेळ लागणार नाही हे निश्चित.
विशिष्ट कामांमधे तर ठराविक काळाने (तासादोन तासाने) ब्रेक घेऊन फ्रेश होण्याकरता म्यानेजमेंटच विविध बाबी पुरवते व सोशल साईटवरिल वावर हा देखिल त्यातिल एक भाग असू शकतो.
अर्थात, कम्युनिस्टांच्या संप/हरताळ वगैरे द्वारेच्या "कामचुकार" पणाला विरोध म्हणुन बर्‍याच म्यानेजमेंटा कडक कायदे करुन अंमलात आणतात, पण १९७० ते १९९० दरम्यानचा कम्युनिस्टांचा संप/हरताळ्/कामचुकारपणा/मोडतोड/विध्वंस इत्यादी गोष्टींचा उर्जित काळ आता राहिला नसुन, कामामधेही विविधता आलेली असल्याने ज्या म्यानेजमेंटा अजुनही कम्युनिस्टांच्या भितीमधेच राहिल्यात, त्या अजुनही अगोचर कायदे/नियम करताना/अंमलात आणताना दिसतात.
ज्या म्यानेजमेंटांना कम्युनिझम/युनियन/संप/हरताळ वगैरे बाबींची भिती (काहीही कारणाने का होईना पण) वाटत नाही, त्या एम्प्लॉईज करता, त्याचे कामावरही मन रमावे, कामाची जागा आपलिशी वाटावी याकरता मनःपूर्वक प्रयत्न करतात.
बहुधा, मल्टीनॅशनल कंपन्या (बहुराष्ट्रीय उद्योग वा परदेशी (युरोपीय/अमेरिकन/जापानी ) कंपन्या याबाबतित कर्मचार्‍यांच्या सेवासुविधा व त्यांच्या वैयक्तिक गरजांच्या पूर्ततेकरता अधिक लक्ष पुरविताना आढळतात.
देशी म्यानेजमेंटा मात्र दुर्दैवाने अजुनही १९७० ते १९९० च्या कालखंडातच रमलेल्या आढळतात.

>>>> लिम्ब्या तू अनुस्वार कधीपासून वापरायला लागला? कोणत्या बाबाने तुला हा उ:शाप दिला ? <<<<<
उ:शाप वगैरे काही नाही, फक्त मला मी "कोब्रा" असल्याचा साक्षात्कार झाला की तेवढ्यापुरता अनुस्वार येतो इतकेच... Proud

लिंबुटींबु सहमत.
याबाबत बरेच लिहायचे आहे. वेळ बदलते आहे. पण जुणे लोक जे वरच्या पदावर आहेत ते हे समजुनच घ्यायल तयार नाहीत.
आज आंतरजालामुळे एकाच ठिकाणाहुन एकाच वेळे मधे काम करणे बंधनकारक नाही, उलट जोपर्यंता डेडलाईन + क्वॉलिटी सांभाळली जात आहे तोपर्यंत कोणत्याही ठिकाणाहुन कोणत्याही वेळी काम करणे कास्त फायद्याचे आहे. पण नेहमीप्रमाने ईथेही ही क्रांती आधी पश्चिमेल मुळ धरते आहे. त्यांनी समाजमान्य केली की मगच ती इकडे फेशन म्हणून मान्य होईल. तो पर्यंत बसा "शार्प ९" ला हजेरी लावत.

आजही भारतामधे आयटी स्टार्टपच्या बाबतीत एवढी प्रगती झाली तरी ते चालवणारे भारतीयच असल्यामुळे "फेस टु फेस" मे अच्छा बात और काम होता है वर जास्त विश्वास. माणुस समोर असला की त्यावर पाळत ठेवता येते आणि दामटुन काम करुन घेतल्याचे मानसीक समाधान मिळते ही खरी भावन असते.
असो. सविस्तर वेगळ्या लेखातच लिहेन म्हणतो.

देशी म्यानेजमेंटा मात्र दुर्दैवाने अजुनही १९७० ते १९९० च्या कालखंडातच रमलेल्या आढळतात. +१

अनेक लोक ऑफिस-अवर्स मध्ये सोशल साइट्स वापरत असतील तर त्या गोष्टीवर उपाय काय ?
>>

कोणत्या हापिसात चालत हे सगळ? तथाकथित भारतीय सर्व्हिस कंपन्या आधीच चिक्कू असल्याने गेल्या ८ वर्षांपासून एकाही कंपनीत फेसबुक उघडलेले मी पाहिले नाही Wink उलट कैक कंपन्यांनी सॉफीस्टीकेटेड सॉफ्टवेअर बनवून विकले आणि गब्बर झाले (उदा: वेबसेन्स Wink ) आजकालतर म्हणे पर युझर अर्धाक तास सोशल साईटी बघू देतात असलीही सुविधा निघाली आहे Proud

तद्वतच तथाकथित दिलदार अमेरिकी कंपन्याही फेसबुकवगैरे बंद ठेवा असा सल्ला देत असतात. पण तो एक प्रेमाचा सल्ला असतो आणि दिवसाचे काम केल्यावर साईटीवगैरे बघण्यावर त्यांचा काही प्रोब्लेम नसतो. पण एका विशिष्ट लिमिटनंतर तेही बोलावून समजावून सांगतात की बाबारे, कंपनी रिसोर्सेस जास्त वाया नको घालवू.

पण मोबईलवर इंटरनेटबंदी आत्यंतिक होईल. जर ऑफिसमध्ये स्वतःचे इंटरनेट (२ जी किंवा ३ जी डेटा) वापरू देण्यात काहीही हरकत नसावी. कारण जर नोटीफिकेशन्समुळे व्यत्यय यायला लागला तर आपसूकच तक्रारी होऊन व्यवस्थित ती काळजी घेतली जाते.

बाकी मी स्वतः फक्त नो डेटा/युएसबी/कैमेरा फोन अलाउ असलेल्या कंपनीत काम करत असल्याने ह्या सगळ्या गोष्टी नसल्या तरी काही फरक पडत नाही ह्या मताचा आहे Proud

उलट जोपर्यंता डेडलाईन + क्वॉलिटी सांभाळली जात आहे तोपर्यंत कोणत्याही ठिकाणाहुन कोणत्याही वेळी काम करणे कास्त फायद्याचे आहे

>>

महत्वाचे बोललात बघीरा. पण काये, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना कितीही चांगली असली तरी WFH घेउन सुट्टी वाचवायचा प्रयत्न करणारे मी भरपूर बघितले. ( हे जनारिक असेल असे नाही, पण काही कंपनीत मी हे बघितले आहे) त्यांच्यामुळे ज्यांना जेन्युइनली गरज असते, त्यांना ती सुवीधा मिळत नाही.

थोडक्यात, भारतात वर्क फ्रॉम होमसाठी लागणारी म्याच्यूरीटी यायचीय.

कदाचित मोबाईलत्माध्यमातून तिथली माहिती कॉपी केली जाण्याचा संभव असेल...

>>

प्रीसाईझली रॉबीनहूड. मेन तोच प्रॉब्लेम आहे. आधी हे सगळे चालत होते. पण लोकांनी डेटा चोरून विकायला सुरुवात केली. दिल्लीत हे प्रकरण खूप गाजले होते. कंझ्युमर डेटा, सोर्स कोड आदी असल्याने आजकाल कंपनीज दुसऱ्या मेल सर्व्हरवर देखील मेल पाठवू देत नाहीत.

मग कंपनी हे सगळे करणारच.

आता काही काही ठिकाणी डेटा मास्कींग वगैरे करून सगळे परत पहिलेसारखे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्या खर्चापेक्षा एका गार्डला पगारी ठेवून मोबईल बाहेर ठेवायला सांगणे स्वस्त पडते Proud

ज्या लोकांची ठराविक तासच ड्युटी असते, त्यात मिळणारे ब्रेक्स जे काटेकोरपणे पाळतात, नंतर काही काम आले तर " सॉरी, माझी ड्युटी संपलीय," असे जे सांगु शकतात अथवा, ओव्हर टाइम केला तर त्यांचे त्यांना पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थीती जिथे असेल तिथे ऑफिसमध्ये सोशल साईट्स वापरण्यावर आक्षेप योग्य आहे.

वेळच्या वेळी करण्याची कामे व्यवस्थित करुन, आपले दिवसभराचे काम पूर्ण करुन सोशल साईट्स वापरत असेल तर हरकत नसावी.

ज्या लोकांची ठराविक तासच ड्युटी असते, त्यात मिळणारे ब्रेक्स जे काटेकोरपणे पाळतात, नंतर काही काम आले तर " सॉरी, माझी ड्युटी संपलीय," असे जे सांगु शकतात अथवा, ओव्हर टाइम केला तर त्यांचे त्यांना पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थीती जिथे असेल तिथे ऑफिसमध्ये सोशल साईट्स वापरण्यावर आक्षेप योग्य आहे.
>>

सहमत.

जिथे मेझरेबल ( मोजण्यासारखे ) काम आहे प्रॉडक्शनसारखे अथवा डेड लाईन असलेले.तिथे हे शक्य आहे. अन्यथा इकडे टाईमपास टाईमपास करायचा आणि कामाकडे दुर्लक्ष करायचे असे होइल.

चर्चा ऑफिसच्या पॉलिसीनुसार करायची आहे का नैतिकतेनुसार?

आमच्या ऑफिसच्या पॉलिसीमध्ये ईंटरनेटच्या काही साईट ब्लॉक आहेत, जसे की क्रिकैन्फो ब्लॉक असल्याने क्रिकेटचा स्कोअर समजत नाही. पण ज्या साईटवर निर्बंध नाही तिथे बागडण्यावर कोणाला आक्षेप नाही, जसे की मग मी याहू क्रिकेटवर स्कोअर बघतो Happy

मायबोली अर्थातच ओपन आहे, मी काम झाल्यावर इथेच बागडतो. पण काम झाल्यावरच हा आपला उसूल आहे.
त्यासाठी मी स्मार्टवर्क करून काम लवकर उरकतो, पण ते कोणाला सांगत नाही आणि वाचवलेल्या माझ्याच वेळात मायबोली करतो.

लिम्ब्या तू अनुस्वार कधीपासून वापरायला लागला? कोणत्या बाबाने तुला हा उ:शाप दिला ? >>> Lol रॉहू- आज सेन्स ऑफ ह्यूमर फुल फॉर्म मधे आहे Happy

सॉफ्टवेअर मधे आयटी, कन्सल्टन्सी आणि प्रॉडक्ट असे तीन प्रकार आहेत. आपल्याकडे सगळ्यालाच आयटी म्हणतात. यातील बर्‍याच कंपन्यांमधे तुम्ही घेतलेली जबाबदारी ठरल्याप्रमाणे पूर्ण करणे हे तुमचे काम. ते करताना तुम्ही सतत काय करत आहात याचे मायक्रो मॅनेजमेण्ट सहसा करत नाहीत, किमान अमेरिकन सॉफ्टवेअर कल्चर मधे तरी. यात मला "प्रॉडक्ट" चा जास्त अनुभव आहे. पण त्याचबरोबर ती जबाबदारी पूर्ण करायला तुम्हाला रात्री उशीरा, वीकेण्ड भर काम करावे लागले तरी तो तुमचा प्रश्न आहे. जबाबदारी अंगावर घेताना तो सर्व विचार करून ती घ्यायची असते. जास्त घेतलीत अतिउत्साहात तर जास्त काम करावे लागते, कमी घेतलीत तर (एका लिमिट पर्यंत) कोणी तक्रार करणार नाही पण वर्षभराच्या कामानंतर दाखवण्यासारखे काहीच नसेल.

त्यासाठी मी स्मार्टवर्क करून काम लवकर उरकतो, पण ते कोणाला सांगत नाही आणि वाचवलेल्या माझ्याच वेळात मायबोली करतो.>>>>>>>>>
कामाच्या वेळात कामाव्यतिरिक्त इतर काही करणे हे Ethically चुकीचेच आहे. पीरीयड! कंपनीच्या दिवसाचे ८ तास कंपनीचे आहेत. ते त्यासाठीच खर्च केले पाहिजेत. उगाच ते जस्टीफाय करण्यात काही अर्थ नाही.

जर तुम्हाला माहित नसेल तर..
प्रत्येक कंपनी ओंड मशिनवर की लॉगिंग सॉफ्टवेअर असते ज्यात तुमची अ‍ॅक्टिविटी लॉग होते. नॉर्मली कंपनीजना तुम्ही नॉर्मल साईट्स वर गेलात किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिविटीज केल्यात तर काही सोयर सुतक नसते. पण जर भलत्या साईट्स वर गेलात आणि तिथुन वायरसेस जर नेटवर्क मधे आले किंवा तुम्ही काही कंपनीशी रीलेटेड गोपनीय माहिती डाउनलोड केलीत/कॉपी केलीत्/दुसरीकडे पाठवलीत तर गोत्यात येउ शकता (आलेच पाहिजे). काही कंपन्या पर्सनल मेल्स साईट उदा गुगल, याहु आणि सोशल नेटवर्क साईट ब्लॉक करतात म्हणजे न रहेगा बांस न बजेगी बांसुरी..

त्यावर उपायः
१.शक्यतो कामाच्या वेळात पर्सनल काम करु नये.
२.जी नोकरी आपल्याला आपली रोजी रोटी देते त्याला मारक ठरेल अशी काही अ‍ॅक्टिविटी करु नये.
३. समजा तुम्ही अवांतर साईट्स वर गेलात (उदा मायबोली इ) तर किती वेळ आपण अवांतर काही केले त्याची नोंद ठेवावी आणि तितका वेळ जास्त काम करावे. (हे आपले आपल्या conscience साठी पळवाट. शक्यतो असे करुच नये).
४. आता स्मार्टफोन अ‍ॅवेलेबल असतात आणि डेटा प्लॅनही चांगले मिळतात. असा एखादा स्मार्ट्फोन घेउन आपल्या लंच अवर किंवा ब्रेक टाईम मधे सर्फ करावे.(मोबाईलवर बॅन वगैरे असतो हे नवीनच कळले.. तसे असेल तर टफ लक!)

ऑफिसमध्ये साइट ब्लॉक केलेल्या असतात तेव्हा प्रत्येकवेळी त्या तुम्हाला ढोरासारखं वागवण्यासाठी म्हणून ब्लॉक केलेल्या नसतात. ऑफिसमध्ये असण्याच्या काळात तुम्हाला डेटा आणि इनफर्मेशन अ‍ॅक्सेस असतो. डेटा सेन्सिटिविटी इश्युमुळे, कोड, इतर काम (उद: एक्सेल फॉर्म्स), डेटा किंवा इमेजफाइल्स पाठवता येतील अशा साइट्स ब्लॉक करणं हे कम्प्लायन्स किंवा क्लायन्ट (आणि इन टर्न कम्प्लायन्स)ची मागणी असु शकते. लिंक्डइन सारखी साइट ऑबवियस कारणासाठी ब्लॉक केलेली असते. याचसाठी नेटवर्क मॉनिटरिंग पण असतं. ईमेल्स पाठवू देत नाहीत. अटॅचमेंट पाठवू देत नाहीत. मी काम करत होते त्या एका ब्यांकेत ट्रेडिंग फ्लोअरवर स्मार्ट डिवायसेस (अ‍ॅपल वॉच सुद्धा) वापरायला परवानगी नव्हती. याच न्यायानं क्लोजसर्किट कॅमेरे पण बसवायला मना होती.

कामाच्या वेळात कामाव्यतिरिक्त इतर काही करणे हे Ethically चुकीचेच आहे. पीरीयड! कंपनीच्या दिवसाचे ८ तास कंपनीचे आहेत. ते त्यासाठीच खर्च केले पाहिजेत. उगाच ते जस्टीफाय करण्यात काही अर्थ नाही.
>>>>>>>>>>

आपण ऑफिसमध्ये कामाव्यतिरीक्त ज्या पर्सनल गप्पा मारतो तो वेळ मग कसा काउंट करायचा? यात तुझा शर्ट किंवा साडी छान दिसतेय यासारखी क्षुल्लक कॉमेंटही आलीच.
तसेच लंचब्रेक वा टीब्रेक वगळता अध्येमध्ये कोणी वॉशरूमला जात असेल तर ते देखील काऊंट करायला हवे का?

Ethically .. याला मराठी प्रतिशब्द काय..
मला असे वाटते की कंपनीने आपला वेळ विकत घेतलेला नसतो. आपल्या आयुष्यातील वेळ विकत घेणे याचाच अर्थ माणूस विकत घेण्यासारखे आहे ते. आपण कंपनीने दिलेले ठराविक काम ठराविक किंमत घेत त्या ठरलेल्या ठराविक काळात करत असतो, जर मी माझ्या वाटणीचे ८ तासांचे काम ७ तासांत केले तर वरचा १ तास मी अतिरीक्त काम करत वरिष्टांची मर्जी संपादन करत प्रमोशन मिळवावे की थोडे रिलॅक्स व्हावे हे मीच ठरवणार.

अर्थात जर कोणी रिसेप्शनिस्ट किंवा सिक्युरटी पर्सन असेल ज्याची आठ तास ड्यूटी म्हणजे म्हणजे आठ तास त्याने ती सर्विस दिलीच पाहिजे तर ते वेगळे झाले.

राहिला प्रश्न ऑफिसचे ईंटरनेट वापरायचा तर ती एक फॅसिलिटी आहे. जसे कँटीन, वॉशरूम, पँट्री, लेडीज रूम, जिम, लायब्ररी वगैरे वगैरे. माझे काम उरकून मी ही फॅसिलिटी वापरतोय ईतकेच.
बाकी ती फॅसिलिटी द्यायची की नाही, कि कितपत द्यायचे हे कंपनीच्या हातात आहेच की.

कंपनीच्या दिवसाचे ८ तास कंपनीचे आहेत. >> >मनस्मी, तुझ्या कडून या पोस्टचे आश्चर्य वाटले. मला वाटले तुझ्या कामाचे स्वरूपही ही राउण्ड द क्लॉक आहे.

मी पूर्वी टेल्को मधे होतो तेव्हा ८:३० ते ५ ही कामाची वेळ. तेथून घरी गेलो की दुसर्‍या दिवशीपर्यंत कामाचा संबंध नाही. एथिक्स ची तेव्हाची व्याख्या वेगळी होती.
आता मी इस्टर्न टाईम झोन वर, आमचे हापिस व बाकीची टीम पॅसिफिक टाईम झोन वर, माझी जवळजवळ सगळी टीम भारतात. आमचे कस्टमर बहुतांश अमेरिकन व युरोपियन टाईमझोन मधे. दिवसरात्र महत्त्वाच्या मेल्स, त्याला उत्तरे देणे, काही निर्णय घेणे सुरू असते. रात्री १२ वाजता एखादा निर्णय घेणे व सकाळी ८ पर्यंत थांबून "कामाच्या वेळेत" घेणे याने वेळेचे, प्रॉडक्टिविटीचे नुकसान होउ शकते.

हे माझ्यासारखेच इतर अनेकांचे असेल. त्यामुळे लोक कोणत्याही वेळी माबोवर दिसले तरी आश्चर्य वाटत नाही Happy

फारएण्ड, सहमत. तसंही ८/९ तासाच्या जॉब मध्ये कुणीही 'अ‍ॅक्चुअली' तेव्हढे तास काम करत नाहीत. लंच्/टी/ टॉयलेट ब्रेक्स लागतातच की प्रत्येकाला.

Pages