मला वाटते या विषयावर यापूर्वी भरपूर चर्चा झालेली आहे , पण तरीही मूळ समस्या तशीच असल्याने आज हा विषय मांडत आहे .
खाजगी उद्योग अथवा सरकार (Employer) हा आपल्याला ऑफिस मध्ये त्यांचे काम करण्याचा पगार देतो . म्हणजे कामाचे जे तास असतील तेवाढे तास आपण ऑफिसचे काम करण्यास बांधील असतो .
असे असताना ऑफिस मध्ये फेसबुक /whatsapp / व इतर मराठी सोशल साइट्स वापरत टाइमपास करणे हे नैतिक दृष्ट्या अयोग्य वाटते .
असे असताना देखील अनेक लोक ऑफिस-अवर्स मध्ये सोशल साइट्स वापरत असतील तर त्या गोष्टीवर उपाय काय ?
सोशल साइट्स ब्लॉक करणे अथवा मोबाइल jammer लावणे / ऑफिस मध्ये मोबाइल वापरण्यास बंदी करणे अशा टेक्निकल उपायाऐवजी Employees नीच मनापासून हे तत्त्व किंवा business ethics / professional work culture चा भाग म्हणून स्वत:हून सोशल साइट्स ऑफिस अवर्स मध्ये टाळल्या पाहिजेत असे माझे मत आहे ...
आपले काय म्हणणे आहे ?
१. मी माझ्या दुकानाच्या वेळेत
१. मी माझ्या दुकानाच्या वेळेत ऑनलाईन येतो. माबो व मला हव्या त्या साईट्सवर जातो.
२. मी माझ्या दुकानाचा संपूर्ण मालक आहे.
३. माझ्या कामाच्या स्वरूपामुळे, कमाई करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या स्किलवर अवलंबून आहे. स्टाफ फक्त माझे काम हलके करण्याइतपत मदत करू शकतो. स्वतः जबाबदारी घेऊन इन्कम जनरेट करू शकत नाही.
३. रोज सकाळी पावडर कुंकू करून दुकानावर बसलो, की पहिले ६-७ हजार रुपये (किमान) मला माझ्या स्टाफचा पगार, भाडे, वीज/फोन इ. बिलांपोटी कमवावे लागतात. त्यानंतर एक रुपया कमवला, की त्यातले ४१ पैसे सरकार डायरेक्ट टॅक्स म्हणून घेऊन जाते.
३. अशा परिस्थीतीत, माझ्या नोकरांनी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या फुकट वायफाय, फोन, कागद, स्टेपलर पिना, चहा, दूध, दगड, धोंडे इ. चा गैरवापर करू नये अशी माझी इच्छा असते.
४. प्रत्येक नोकरास थोडा वेळ या सर्व गोष्टी खासगी कामासाठी वापरु देण्यास माझी हरकत नसते. पण अती केलं, की त्याला चाप लावणे गरजेचे असते. यासाठीच "कंपनी पॉलिसी" ठरवत असावेत.
५. अशा परिस्थितीत, रिकामचोटपणे खुर्चीत बसून स्वतःच्या पैशाने जरी व्हॉट्सॅप खेळत असतील, तरी, समोर काउंटरवर गिर्हाइक थांबलंय, किंवा समोरच्या मॉनिटरकडे लक्ष नाहिये, अस माझ्या ध्यानी आले, तर त्या कर्मचार्यास तात्काळ अर्धचंद्र देण्यात येतो.
एंप्लॉयरच्या दृष्टिने तात्पर्य, हापिसच्या वेळेत टीपी करू नये. रीझनबल रिटर्न्स द्यायला शिकावे, इतकीच माफक अपेक्षा. याव्यतिरिक्त, डेटा चोरून न नेणे वगैरे बाबी आहेतच, मी नॉन कॉर्पोरेट एंप्लॉयर च्या परिप्रेक्ष्यातून लिहिले इतकेच.
Fa +१ Aamchya offc madhe
Fa +१
Aamchya offc madhe aajch kunkun aikali ki ata amachi browser history track honar ahe.
Ya mage karan kay ahe te Mahit nhi but asa kelyas amachya sagalya TP chya hakkachya jaga band hotil
ata amachi browser history
ata amachi browser history track honar ahe.
>>>>>>
आमची होते
मागे एका महिन्यात आमच्या कंपनीकडे काहीच काम नव्हते, रिसेशनसारखा पिरीअड आलेला. पण येणार्या काळात खूप काम येण्याची शक्यता असल्याने कोणाला काढायची भिती नव्हती. या काळात काम नसले तरी सर्वांनी एखादे सॉफ्टवेअर शिकणे, गरजेच्या एक्सेल शीट बनवणे, आपली कॉम्पीटन्सी वाढवणे अपेक्षित होते. पण मी असे काही केले नाही. तर माबो वगैरे वर पडीक राहिलो. तेव्हा रेकॉर्ड चेक करता आमच्या ८०-९० जणांच्या डिपार्टमेंटमध्ये माझी नेटसर्फिंग सर्वात जास्त निघाली. आमच्या सेक्शन मॅनेजरने सांगितलेले की हा लेखक आहे ब्लॉग वगैरे लिहितो. काम नाही तर छंद म्हणून हे करतोय. करू दे. काम आले की तो कामाचा माणूस आहे
तेव्हापासून मराठी सकेतस्थळ म्हणजे काय प्रकार असतो हे माहीत नसलेले आमच्या ऑफिसातील लोक मायबोलीला माझा ब्लॉग म्हणून ओळखतात
>>हे माहीत नसलेले आमच्या
>>हे माहीत नसलेले आमच्या ऑफिसातील लोक मायबोलीला माझा ब्लॉग म्हणून ओळखतात<<
मग आता, गेल्या ३-४ महिन्यांत तुझ्यामुळे मनस्ताप झालेले माबोकर त्या मॅनेजर विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची तक्रार करु शकतात का?
नाहि म्हणजे, भारतातील "अॅट्रॉसिटी" चे कायदे अगदि उथळ आहेत असं ऐकुन आहे...
>>मग आता, गेल्या ३-४
>>मग आता, गेल्या ३-४ महिन्यांत तुझ्यामुळे मनस्ताप झालेले माबोकर त्या मॅनेजर विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची तक्रार करु शकतात का?>> फारच आवडला हा!!
ऋन्मेऽऽष >> Ethics म्हणजे मराठीत "नैतिकता" किंवा नैतिक मुल्ये. Ethically ला मराठी प्रतिशब्द "नैतिकदृष्ट्या" असा असेल.
माझ्या मते तुमचे वर्क कल्चर
माझ्या मते तुमचे वर्क कल्चर कसेही असो.... कामाच्या ठिकाणाहुन वर्च्युअल नेटवर्किंग करण्यापेक्षा कामाच्या ठिकाणीच सोशल नेटवर्किंग करा ना... ते जास्त कामी येते
जेवायाला/चहाला कोणी बरोबर नाही म्हणून मोबाइलमध्ये डोके खुप्ससुन बसलेले अनेकजण दिसतात आजकाल कॅफेटेरीयामध्ये.... अरे असे दूरदूरच्या लोकांमध्येच गुंग राहीलात तर जवळचे लोक कसे वाढतील.... असो.... पण तो या बाफ चा विषय नाहीये!
माझ्या मते आणि माझ्या अनुभवानुसार सोशल नेटवर्कींग साइट्स ही चटक आहे.... एकदा लागली तर कुठे थांबायचे हे फार थोड्या लोकांना कळते.... नोटीफिकेशन आले तर बघितल्याशिवाय चैन नाही पडत.... लेख लिहला तर प्रतिक्रियांची उत्सुकता लागून राहते....अश्याने कामात लक्ष लागणे अवघड होवुन जाते.... त्यामुळे कामाच्या ठिकाणी मोबाइल लांब ठेवलेलाच बरा.... मलाही ते पूर्ण जमलय अजुन असे नाही... पण मी प्रयत्न करतोय!
फारेंड, तु २४ तास सपोर्टचे
फारेंड,
तु २४ तास सपोर्टचे म्हणतोस.. सगळे २४ तास तु कंपनीचे काम करत बसतोस का?.. तु काम स्प्लीट करतच असशील उदा. ८ तास ऑफिसमधे, घरी. १ तास मिडल इस्ट टीम बरोबर या वेळात , १ तास इंडिया टीम बरोबर या वेळात इ. (समजा टोटल १० तास दिवसाचे) तेवढे काम पुर्ण झाल्यावर असलेला वेळ तुझा आणि फक्त तुझा आहे.. कंपनीचा नाही. त्या वेळात अवांतर काही केले तर ते कंपनीच्या वेळात केले असे होत नाही. (उदा.तु तुझा क्लायंट किंवा टीम बरोबर कॉल्स सुरु असताना किंवा त्या मीटींगच्या scheduled वेळात जर सर्फींग करत असशील तर ते चुकीचे आहे पण कॉल पुर्ण झाला..तुझे Scheduled काम आणि वेळ संपली आणि त्यानंतर तु स्वतःचे काही काम केलेस तर त्यात चुक नाही असे मला वाटते)
माझा आक्षेप हा जे लोक कंपनीच्या कामाच्या वेळात/काम सुरु असताना फालतु गप्पा, टिवल्याबावल्या करतात..सोशल साईट्स वर जाउन नाही त्या उठाठेवी करतात त्याबद्दल आहे. त्याने कामाचा फोकस राहत नाही.
जिथे कामाचे अमुक तास कामाला
जिथे कामाचे अमुक तास कामाला बाकीचे तुमचे तुम्हाला असे काटेकोर नियम आहेत अथवा नोकरीचे स्वरुप तसे आहे की आठ तासा नंतर तुमच्या जागी पुढच्या पाळीचा येतो त्याला पुढे काम सांभाळावे लागते, तिथे mansmi18 यांनी जे लिहिले ते लागु होईल.
कीचकटीचे काम, खुप कॉन्सेन्ट्रेशनचे काम असेल तर दोन तासांनी ब्रेक घ्यावा लागतो आणि घेणे ही चांगले.
या दहा पंधरा मिनीटाच्या ब्रेक मध्ये, बसल्या जागी वर्तमान पत्र वाचले काय, तुम्ही पूर्ण वेळ बाहेर राउंड मारला काय, किंवा एक क्विक राउंड मारुन सोशल साईटवर गेलात काय, काय फरक पडतो?
आपले काम हे त्याची डेडलाईन राखून चोखपणे बजावणे, हेच खरे ethics असे मला वाटते. "कंपनीने मला मी त्यांना देते/ देतो त्या सर्व्हिसेस साठी हायर केलेले आहे" हे भान ठेवुन वागणे.
कामात आणि तत्परतेत जर तडजोड होते आहे, तर तशा रितीने ऑफिसच्या वेळात सोशल साईट्स वापरणेच नव्हे तर इतर उद्योग करणे हे चूक. अन्यथा काही हरकत नाही.
तेव्हापासून मराठी सकेतस्थळ
तेव्हापासून मराठी सकेतस्थळ म्हणजे काय प्रकार असतो हे माहीत नसलेले आमच्या ऑफिसातील लोक मायबोलीला माझा ब्लॉग म्हणून ओळखतात
>>>
+१
माझंच नाव मायबोली पडलंय ऑफिसात
माझा आक्षेप हा जे लोक
माझा आक्षेप हा जे लोक कंपनीच्या कामाच्या वेळात/काम सुरु असताना फालतु गप्पा, टिवल्याबावल्या करतात..सोशल साईट्स वर जाउन नाही त्या उठाठेवी करतात त्याबद्दल आहे. त्याने कामाचा फोकस राहत नाही.
>>
असहमत!
ऑनेस्टली मल्टिटास्किंग हा एक प्रकार असतो.
माझा वर्कफ्लो चालेपर्यंत २ मिन मी माबोवर बागडून घेते आणि त्याने माझ्या कामावर फरक पडत नाही.
मला एका वेळेला ३ ठिकाणी लक्ष देणं जमतं म्हणूनच बहुदा माझ्या मॅनेजरला माझ्या मायबोली वापरण्याशी काही देणं घेणं नाही
मी रीयाच्या वरील मताशी सहमत.
मी रीयाच्या वरील मताशी सहमत. सेम अनुभव माझाही आहे.
सगळे २४ तास तु कंपनीचे काम
सगळे २४ तास तु कंपनीचे काम करत बसतोस का?.. तु काम स्प्लीट करतच असशील >>> नाही मन्समी, तसे होत नाही. इतके काटेकोर वेळापत्रक नाही. यात एक महत्त्वाचा भाग आहे - काही लोकांना काम व स्वतःचा वेळ यात स्पष्ट व काटेकोर फरक ठेवणे आवडते, काहींना तसे नसले तरी चालते. माझे साधारण 'नसले तरी चालते' सारखे आहे.
म्हणूनच बहुदा माझ्या मॅनेजरला
म्हणूनच बहुदा माझ्या मॅनेजरला माझ्या मायबोली वापरण्याशी काही देणं घेणं नाही
>>>>
एक्झॅक्टली!
या सर्व चर्चेत हा एक महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ईंटरनेट लपवून वापरता की तुमच्या मॅनेजर / रिपोर्टींग पर्सनला ते माहीत असते. जर त्याला ते माहीत असेल, आणि त्याची काही हरकत नसेल तर तुम्हाला नैतिकदृष्ट्याही काही अपराधी वाटायची गरज नाही. कारण ते वापरूनही तुम्ही आपल्या कामात चोख आहात असा त्याचा अर्थ झाला.
कामानिमित्त दिलेल्या
कामानिमित्त दिलेल्या सुविधांचा विवेकबुद्धीने केलेला वापर खटकत नाही. पाचेक वर्षांपूर्वी वाचलं होतं की मिसयुज करण्याता आणि चॅटींग करण्यात भारतीय सर्वात पुढे असतात. सुविधा देऊ केली असल्याने कंपनी काही म्हणणार नाही, पण ............................................................., नाही का ?
मीएका स्वीडीश कंपनीत असतानाची गोष्ट. कंपनीचं कामगारांसाठीचं कॅण्टीन एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल सारखं होतं. कामगारांना फ्री तर अधिका-यांना रोजचे नाममात्र ३ रु. अमर्यादीत शाकाहारी आणि सामिष जेवण असायचं.
कामगारांचा एक गट कधीही न मिळाल्याप्रमाने वागायचा. त्यांच्यात स्पर्धा लागायच्या. त्यातल्या एकाने एका वेळी २७ ऑम्लेट्स खाल्ली होती. व्यवस्थापनाला कुणी किती खावं याच्याशी देणंघेणं नव्हतं. पण अतिरेकामुळे त्याला काही होऊ नये यामुळे चिंतित झाले होते सारे. शेवटी कामगार संघटनेच्या उपाध्यक्षाच्या कानावर व्यवस्थापनाची चिंता घालण्यात आली.
(हे हपिसातून लिहीतेय) माबोवर
(हे हपिसातून लिहीतेय)
माबोवर किंवा कोणत्याही सायटीवर स्वतः लेख लिहायचा असला तर घरुन वीकेन्ड ला लिहीते
थोडक्यात प्रतीसाद इथून देते. 'कोड कंपाईल होतोय्/टेस्ट रन होतेय तोवर माबो/जबोंग/अमाझॉन्/फ्लिपकार्ट' इ.इ. उघडू आणि परत वेटिंग संपल्यावर सर्व बंद करुन काम करु' हे मनात जरी असलं तरी कधीकधी जिव्हाळ्याचा विषय असल्यावर वाहवायला होतं आणि जास्त वेळ जातो.
माझ्या हातात निर्णय असले तर मी धरुन(इन्क्ल्युडिंग) सर्व लोकांना हपिसात गुगल्/विकी/टेक्निकल माहिती/ऑनलाईन बॅंकिंग्/बिले भरणे सोडून बाकी सर्व सायटी बंद व्हाव्यात किंवा त्या एका स्वाईप वाल्या खोलीत जाऊन बघाव्या लागाव्यात असा नियम नक्की काढेन. 'अपरिहार्य वेटींग मध्यी काही करता येत नाही म्हणून थोडा वेळ डोकावणे' आणि 'दिवसातला बराच वेळ नकळत अवांतर जाणे आणि मग काम पूर्ण करायला उशिरा थांबायला लागणे' यातली सीमारेषा केसाईतकी पातळ आहे.
(आता काम करते )
मी ओफीसातून ऑला होते अन ते
मी ओफीसातून ऑला होते अन ते आमच्या बॉसला माहित आहे. ती मराठी पेपर सारखा वाचत असते, पुस्तके (हार्ड कॉपी) वाचते तुम्हाला काय करायचे, ती जागेवर तर कायम बसते ना, काम पूर्ण असते (माबो, पेपर असे वेगळेत्य्येनला कळत नाही) असे माझा एक बॉस भर मिटींग मधे म्हणालेला.
तेव्हा.. आणि काम असताना माबो उघडणे लक्षात सुध्दा रहात नाही, म्हणून प्र्त्येक ठिकाणी बोसचा पाठिंबा होता अन आहे.
अनघा, कित्त्त्त्त्त्ती तरी
अनघा, कित्त्त्त्त्त्ती तरी अनुमोदने.
उलट मागे एकदा माझ्या बॉसने एकदा माझ्या टिममेट्सना हे ऐकवलेलं की तुम्ही रिकाम्या वेळात एकत्र बसून गॉसिप्स करता आणि ती तिचा छंद जोपासते. कोण बरोबर ते तुम्हीच सांगा तिचं काम डिले झालं तर मात्र माझ्यापाशी नक्की कंप्लेंट करा मग मी बघतो.
तेंव्हापासून कोणीच मला मायबोलीवरून काही बोललेलं नाही. अर्थात काय किती वापरायचं आणि कशाचा किती फायदा घ्यायचा हे ज्याने त्याने ठरवावं.
रिया अन हे सगळे गुज्जु - खास
रिया अन हे सगळे गुज्जु - खास बनिया - बोस असून
(हे वरचे काही जातीवाचक नाहीये.. )
माझा मॅनेजर तर तेलुगु आहे
माझा मॅनेजर तर तेलुगु आहे बाबा
माणस मल्टीटाक्सिंग करू शकतात
माणस मल्टीटाक्सिंग करू शकतात ह्यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसलेला दिसत नाहीये
विकेंडला ह्या लेखावर आलेल्या
विकेंडला ह्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया आणी वीक-डेज ला आलेल्या प्रतिक्रियांच्या संख्येवरून हा वाद मिटला आहे हे गृहीत धरावं.
फेफा, तुम्हाला वीक-डे ला
फेफा, तुम्हाला वीक-डे ला आलेल्या प्रतीक्रिया आणि वीक-एंडला आलेल्या प्रतीक्रिया असं म्हणायचं आहे बहुधा..
योकु, बरोब्बर! दुरुस्ती
योकु, बरोब्बर! दुरुस्ती केलीये (ऑफिस च्याच संगणकावरून)
फेरफटका म्ल्टी टास्किंग का ?
फेरफटका म्ल्टी टास्किंग का ?
एकदम!
एकदम!
आमच्या हापिसात पोस्टर लागलीत
आमच्या हापिसात पोस्टर लागलीत ... जेवणानंतर फिरायला जा आणि फिरता फिरता टीम मिटींगा आटपा.
आता टेलीफोन वगैरे लागत असतील तर त्या मिटींगा वेगळ्या
हे आमच्याकडे सर्रास चालते.
हे आमच्याकडे सर्रास चालते. कॉन्फ कॉल्स सुद्धा सेल फोन वरून, चालता चालता. माझ्या बॉसबरोबर किंवा माझ्या टीममधल्या लोकांबरोबरच्या इन्फॉर्मल चर्चा आम्ही चक्कर मारतच करायचो. आता मी मुख्य ऑफिस मधे काम करत नसल्याने ते बंद झाले. पण मी किमान एखादा कॉल चालता चालता घेतो.
आज तब्येत बरी नसल्याने घरूनच
आज तब्येत बरी नसल्याने घरूनच काम करतोय. तेव्हां सोशल साईटीवर दिसल्यास काय अर्थ काढावा ?
Pages