Submitted by वारी on 11 November, 2015 - 10:05
नमस्कार,
दिवाळीच्या शुभेच्छा.
सध्या मी कामानिमित्त अमेरिकेत आलो आहे. दरवर्षी घरी आईवडीलांबरोबर लक्ष्मीपूजन केल्याने सगळ्या गोष्टी आणून देण्याशिवाय पुजा मांडण्यात फार कधी लक्ष घातले नाही. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता ते सांगाल का किंवा फोटो टाकाल का?
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरीच आईवडिलांना विचारा की
घरीच आईवडिलांना विचारा की तुमच्याकडे लक्ष्मीपूजन कसे करतात ते.
अहो ते असते तर इथे कशाला
अहो ते असते तर इथे कशाला विचारले असते? सध्या ते सुटीनिमित्त परदेशवारीला गेले आहेत आणि आउट ऑफ रीच आहेत. आणि शेवटचा उपाय इंटरनेटवर शोधणे आहेच.
तुम्हाला माहिती द्यायची नसेल तर किमान असले फुकट सल्ले तरी देऊ नका. काहीतरी विचार करुनच इथे माहिती विचारली असेल ना?
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.
अहो भोले साहेब, तुम्ही इथे
अहो भोले साहेब, तुम्ही इथे नवीन आहात ना, भोळेही दिसताय तेव्हा तुम्हांला माहित असायची शक्यता नाही म्हणून सांगते की इथे फुकट सल्ले देणारेच बरेच भेटतील माझ्यासारखेच. तेव्हा एवढं जीवाला लावून घेऊ नका. (हा सल्ला नाही).
आईवडील परदेशी गेलेत तर आधीच लिहायचंत की हेडरमध्ये.
धन्यवाद. हेडर मध्ये बदल केला
धन्यवाद. हेडर मध्ये बदल केला आहे आणि कटु शब्दांबद्दल क्षमस्व.
http://www.sanatan.org/mr/a/4
http://www.sanatan.org/mr/a/432.html
http://www.loksatta.com/vishesh-news/laxmi-poojan-241976/
http://www.deshdoot.com/news.php/news_details/4335599
अस्मिताने सान्गीतलय, शोधल की सापडत.:स्मित:
इथे सल्ले फुकटच मिळतात म्हणून
इथे सल्ले फुकटच मिळतात म्हणून विचारत आहात ना
अमेरिकेतिल धनवान
अमेरिकेतिल धनवान व्यापारी,लोकं कश्याप्रकारे लक्ष्मीपुजा करतात ते पण माहित करुन घ्या कारण त्या देशात लक्ष्मी वास करते व तो पैसेवाला श्रीमंत देश आहे.म्हणुन हा सल्ला द्यावा वाटला. गैरसमज नसावा.
भोले, इथे आल्यावर सुरुवातीला
भोले, इथे आल्यावर सुरुवातीला आईने लक्ष्मी पूजन अगदी सोपे आणि साध्या पद्धतीने कस करता येईल ते सांगितलेलं. तेच इथे लिहिते.
देवीचा फोटो घेवून स्वच्छ पुसून घ्यावा. तांब्या,नारळ,फुल,अक्षता ,उदबत्ती इत्यादी गोळा करून ठेवावे.
चौरंगावर फोटो ठेवून त्या पुढे कलश तयार करून ठेवावा. कलश म्हणजे तांब्यामध्ये पाणि भरून त्यात अक्षता,नाणी,सुपारी घालून त्यात पाच विड्याची/आंब्याची पान रचावीत. त्यावर नारळ ठेवावा. )
देवीच्या फोटोला फुलांचा हार घालून , तांब्याला पाच कुंकु,हळदीची बोटे लावावीत. वेळ असेल तर छान फुलाम्चा हार करून तो तांब्याच्या भोवती गुंडाळावा. नारळावरून येईल असा सोन्याचा एखादा दागिना घालून घ्यावा. नारळाला हळद कुंकू लावावे.
दाराला आंब्याची पाने (असतील तर),फुलांचे तोरन लावावे.
ताटात छान फळ वगैरे अॅरेंज करावीत. पैसे ठेवावेत. दागीने ठेवायचे असेल तर ते ठेवावेत. समई , आरती लावून घ्यावी. दुध साखर वगैरे ठेवावी. दिवाळीच्या फराळाचे एका बाजुला ठेवावे.
फुल वाहून पुजा करून घ्यावी. आरती म्हणावी. दुसरा नारळ वाढवावा. प्रसाद म्हणुन चिरमुरे बत्तासे वाटावे.
आमच्या घरी शेतकरी,दुकानदार आणि कारखानदार अशा तीनही बॅकग्राउंड असल्याने खुप मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी पुजन होते. ताजा नविन उस आणि केळीचे खांब वगैरे बांधून पुजा केली जाते. जे माझ्या सारख्यांना शक्यच नाही .
म्हणुन मी अगदी इथे माझ्यासारखे बिगिनर लोक जे करू शकतात ते लिहिल. पुजा अशी कशी वगैरे प्रश्न विचारून मला गोत्यात आणु नये.
रश्मी.., सीमा, धन्यवाद. सीमा,
रश्मी.., सीमा, धन्यवाद.
सीमा, तुम्ही खूप छान लिहिले आहे. नक्कीच उपयोग होईल.
सीमा खूप छान सोपी पूजा. मी पण
सीमा खूप छान सोपी पूजा. मी पण अशीच करीन आज. धन्यवाद!
सीमा, आभारी आहे. किती छान आणि
सीमा,
आभारी आहे. किती छान आणि सोपी पद्धत सांगीतलीस.
सीमा, तुम्ही लिहिलेल्या
सीमा, तुम्ही लिहिलेल्या पुजेचा खूप उपयोग झाला. धन्यवाद.
छान.
छान.