खीमा हा मांसाहारींचा फारच आवडता. कारण हाडं चोखत न बसता मस्त पैकी आस्वाद घेत खाता येतो. लहान मुलं देखिल आवडीनं खातात.
खीमा करण्याचा अनेक पद्धती आहेत. भारतीय मराठी संस्कृतीत मुख्यत्वे मटणाचा खीमा आणि चिकन खीमा असे दोन प्रकार आवर्जून खाल्ले जातात.
खीमा हा अतिशय व्हर्सटाईल प्रकार आहे. त्यामुळे शाकाहारींना जसा बटाटा, पनीर प्रिय तसा मांसाहारींना खीमा आणि अंडी प्रिय हा सृष्टीचा नियम आहे. सृष्टी सध्या इयत्ता चौथीत शिकते पण तरीही तिला हा नियम माहित आहे. कारण ती नव्या पिढीची आणि नव्या विचारांची पाईक आहे. सिअॅटलमधील पाईक प्लेस मार्केट खूप प्रसिद्ध आहे आणि त्यात खुप प्रकारचा मांसाहार ऐन दिवाळीतही मिळतो. दर्दी लोकं तिथे आवर्जून खरेदीला जातात.
तर आज आपण दिवाळी निमित्त खीम्याची एक छानशी पाककृती शिकणार आहोत.
आपल्या आवडीनुसार खीमा करून घ्या. मटणाचा अथवा चिकनचा कोणताही केला तरी चालेल. मात्र तो सुका हवा. पाणी असेल तर करंज्यांऐवजी रॅविओली खायची वेळ येईल.
खीमा करण्याच्या अनेक पाककृती मायबोलीवर आहेत. या पाककृतींत सांगितल्या प्रमाणे कोणतीही एक पद्धत निवडून त्याप्रमाणे खीमा करून घ्या. :
खिम्याचे पॅटीस - जागू - http://www.maayboli.com/node/41987
खिमा-पाव - डीडी - http://www.maayboli.com/node/48814
थाय स्टाईल चिकन खीमा - वर्षू नील - http://www.maayboli.com/node/42328
मटन कबाब - अनिश्का. - http://www.maayboli.com/node/39754
अंडा घोटाला - वर्षू नील - http://www.maayboli.com/node/54324
मटण खीमा सीख कबाब - अंजली - http://www.maayboli.com/node/4142
हा खीमा आपल्या नेहमीच्या करंजी / कानवल्याच्या पारीत नेहमीच्या शाकाहारी सारणाऐवजी भरा. मग या करंज्या तळा अथवा बेक करा.
प्रत्येक दिवाळीत अशाच प्रकारच्या करंज्या करण्याऐवजी असाही प्रकार करून बघता येईल.
खीमा भरलेल्या मिरच्या - रायगड - http://www.maayboli.com/node/41674
दिवाळीचा तोच तोच फराळ आणि गोडाधोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर हा एक अप्रतिम उतारा मांसाहारींकरता उपलब्ध आहे. घरी कोणी मांसाहारी आले तर त्यांनाही खिलवा.
वाह , खावासा वाटतोय, घरात
वाह , खावासा वाटतोय, घरात मासे आहेत बरेच पण उद्या खीमाच खाणार, बकर्याला राग यायला नको ना नाहीतर बकरा म्हणेल कुणाचही बोलण मनावर घेता
उकडलेल्या माशांचाही खीमा छान
उकडलेल्या माशांचाही खीमा छान होईल. मी मासे उकडून काटे काढून, तुकडे करून पास्त्यात घालते. मस्तं होतो फिश पास्ता. आता डीडी यांच्या खीमा कृतीने उद्या मासे करून बघते. आज आरामदिवस असल्याने मासे आणायला नाही गेले. उद्या जाईन.
अग छोटे शार्क फीश (ईथे मुशी
अग छोटे शार्क फीश (ईथे मुशी म्हणतात) त्याचा खीमा खुपच टेस्टी लागतो. बहीण छान बनवते, रेसीपी देईन ईथे.
zhuरळ च्या चटनीच्या करंज्या
zhuरळ च्या चटनीच्या करंज्या पन चांगल्या होतील
>> हे वापरून उकडीचे मोमो
>> हे वापरून उकडीचे मोमो किंवा मोदक करेन पुढच्यावेळी. <<
खिमा घालुन उकडीचे मोदक?? हे असं सुचतं तरी कसं तुम्हाला?
मी तर पेरु घालून केलेले पंचामृत पण नाही घेऊ शकत.
पार संस्क्रुतिचाच खिमा केलाय
पार संस्क्रुतिचाच खिमा केलाय इथे.
मामी फोटो नाही
मामी फोटो नाही टाकले,
सिंगापुर मध्ये करी पफ नावाचा प्रकार मिळतो. बाहेरुन करंजी सारखा असतो पण आत मात्र चिकन , खिमा असते. आमच्यासारख्या शाकाहारी लोकासाठी त्यात बटाट्याची भाजी घातलेला शाकाहारी करी पफ पण मिळतो.
" Singapore Curry Puff" असे गुगलला विचारल्यावर तुम्हाला बर्याच रेसिपी मिळतिल. नाहितर ह्या दुव्यावर टिचकी मारा.
http://www.indochinekitchen.com/recipes/curry-puff/
नवी मुंबईत चांगला बनवलेला मटन
नवी मुंबईत चांगला बनवलेला मटन खिमा कोठे मिळेल ?
घरी बैकोला मटन चालत नाही - मी फारच कमी मांसाहार करतो पण मला खिमा , सलामी , सोसेजेस फार आवडते - जे बैकोला आवडत नाही - त्यामुळे बाहेरच बघावे लागेल !
मांसाहारी खीमा करंज्या दारूबरोबर चकणा म्हणून खतरनाक होतील ! भन्नाट पाककृती !
सिंगापुर मध्ये करी पफ नावाचा
सिंगापुर मध्ये करी पफ नावाचा प्रकार >>> अरे वा!
मामी, पाकृ बेश्टे!
सारखे त्या चिनूक्सला असे प्रश्न विचारू नका रे. तो हार्टलेस आहे हे विसरलात का इतक्यात?
सोनू, प्रकरण मस्त दिसतंय.
सोनू, प्रकरण मस्त दिसतंय.
भाऊबीजेला भावांकरता मटण
भाऊबीजेला भावांकरता मटण अथवा चिकनचं जेवण तर होतंच असे. पण भावांनी येताना आणलेले फराळाचे डबे परत करताना, तोच तो फराळ देण्याऐवजी आई घरी केलेला केक देत असे. केकमध्ये अंडी घातलेली असत हे वेगळं सांगायची गरज नाही.
मामे। तुझा सेन्स ऑफ़ ह्यूमर
मामे। तुझा सेन्स ऑफ़ ह्यूमर जबरदस्त आहेत.
मी अजुन कधी खीमा केलेला नाही, नुसत्या पाकृ वाचल्यात. आज चॉप्स बनणार आहेत घरी. मरिनेशन करुन तैयार ठेवलेत. खीमाच्या करंज्या नंतर कधीतरी.
मामी, शब्दखुणा वगैरे सगळंच
मामी, शब्दखुणा वगैरे सगळंच भारी. आम्ही पण शाकाहारी असलो तरी वाचून आमचा धर्म नाही बुडत.
आज नाश्त्याला शाकाहारी सुरमई
आज नाश्त्याला शाकाहारी सुरमई खाल्ली दिवाळी स्पेशल
कविता, मुशीबद्दल बर्याच
कविता, मुशीबद्दल बर्याच दिवसांनी काही वाचलं!
जसा करंज्या/चकल्या करताना त्या तळणाचा दरवळ आळीभर पसरतो तसं आळीत एखाद्या घरी मुशी रांधायला घेतली की ति अफाट सुगंध आळीभर पसरतो.
मुशी परवडू न शकणार्यांचा सण त्या वासावरच साजरा होतो.
साती खरय, आजकाल बोम्बिलही
साती खरय, आजकाल बोम्बिलही परवडेनासे झालेत, २० रु ला १०-१२ येणारे आता १०० रुना फक्त ५ येतात.
एक दोन दिवसात टाकते रेसिपी मुशीच्या खीम्याच्या लाडवान्ची
मामी म्या काय म्हणतुया तुमी
मामी
म्या काय म्हणतुया तुमी बी धर्म भ्रष्ट केला ?
आवं दिवाळीचं सात्विक टायम चालू हाय न
भाकड (भा च्या जागी कुठला शब्द
भाकड (भा च्या जागी कुठला शब्द चपखल बसतो बरे . ) कथेला आळा घातलाय मामीने
एक दोन दिवसात टाकते रेसिपी
एक दोन दिवसात टाकते रेसिपी मुशीच्या खीम्याच्या लाडवान्ची
>>>>>
एक दोन दिवसात टाकते रेसिपी
एक दोन दिवसात टाकते रेसिपी मुशीच्या खीम्याच्या लाडवान्ची
>>>>>
हैद्राबाद के लुख्मियां भूलो
हैद्राबाद के लुख्मियां भूलो नक्को. चारमिनार कने मस्त मिलते खिमा के लुखमि पॅ टिसां. दो लुख्मिया, एक बिस्कुट एक खडा चमचा चाय पिया तो शाम तक बोलना नै. क्या सम झे? दीवाली मनारै क्याकी इदर के नवाबां बेगमां ! मै बी एक फुलझडी लगारुं उदास.
मामी मला बी मटण खिमा खायला
मामी
मला बी मटण खिमा खायला आवडतो.:फिदी:
पाकृमधे फोटो नसला तरी पाकृ
पाकृमधे फोटो नसला तरी पाकृ वाचून विशेषत: शब्दखुणा वाचून काहींचा चेहरा कसा फोटो काढण्यालायक झाला असेल याचा विचार करूनच हहगलो अन फोटोबद्दल माफी!
मामी, बालके दिनूचा शिरसाष्टांग दंडवत स्वीकारावा!
हैला!!
हैला!!
ह्म्म! खीमा!!! आता ऑलिम्पियात
ह्म्म! खीमा!!!
आता ऑलिम्पियात जावं लागेल. खीमा पाव हाणायला.
करंज्या काही करणार नाही. खीमा पाव नैतर खीमा चपाती चा बेत जमल्यास ठरवता येइल भाउबीजेला.
मामी मस्त पाक्रु.....
मामी मस्त पाक्रु..... सिंगापूर च्या Old Chang Kee मधिल चिकन च्या करंज्या आठवल्या.....:-)
मामी, दिवाळी इव्ह ला लैच
मामी, दिवाळी इव्ह ला लैच हसवल्याबद्दल धन्यवाद.
मेरा भारत महान मेरी
मेरा भारत महान
मेरी संस्कृती महान
मेरी आणि मेरीचे सर्व नातेवाईक महान
मेरीची संस्कृती महान
>>>
तोंपासु!
तोंपासु!
मामी,
मामी,
Pages