Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ भारी व्यंगचित्र व नंतरची
भाऊ भारी व्यंगचित्र व नंतरची कॉमेंटही.
असाम्या आपले बॉलर भंगार बॉलींग करतच होते त्यात वाद नाही. पण कागदावर शेर असलेले आपले बॅटसमन बॅटींगसाठी अनुकुल पिचवर खेळत नाहीत त्याचे काय. अगदी कितीही चांगले बॉलर असले तरी पिच पाटा आहे म्ह्णुन दोष देताना आपले लोक का खेळले नाही असा साधा विचारही येऊन द्यायचा नाही का?
असो. तर आजची मॅच मस्तच चालु आहे. ABD ची दांडी जबरी.
मला फिरकी गोलंदाजी खूप आवडते
मला फिरकी गोलंदाजी खूप आवडते व मीं मालव्णी असल्याने मासेही मला जीव कीं प्राण ; पण पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकापासूनच फिरकी म्हणजे सकाळच्य पहिल्या चहाबरोबर पोहे/टोस्टऐवजी मासे !! नो, धिस इज नॉट अ टेस्ट विकेट & धिस इज नॉट टेस्ट क्रिकेट !!
गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर
गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर पुजारा! >> जे बात है !
असाम्या आपले बॉलर भंगार बॉलींग करतच होते त्यात वाद नाही >> केप्या पण पोस्ट फक्त पीच नि शास्त्रीच्या कॉमेटबाबत असताना बाकीच्या शेपट्या माझ्या पाठी का चिकटवतो आहेस बा ?
एखाद्या दिवशी बॅटींग ला अनुकूल पिचवर नाही खेळले तर तेव्हढेच घेऊन बसणार आहेस का ? 
धिस इज नॉट अ टेस्ट विकेट & धिस इज नॉट टेस्ट क्रिकेट ! >> भाऊ (आता ह्यावर तुम्ही एक व्यंगचित्र काढला हे माहित आहे
पण तरीही ) "पहिल्या दिवशी बॉल स्विंगच झाला पाहिजे, नंतरचे दोन दिवस पूर्णपणे बॅटीम्ग ला धार्जिणी नि नंतरचे उरलेले दिवस फक्त स्पिन होत राहिला पाहिजे" अशी ideal situation असेल तर बहुतेक अॅडलेड नि जोहान्सबर्ग वगळता बाकीच्या ठिकाणी क्रिकेटच खेळता येणार नाही. New Zealand तर संपूर्ण हद्दपारच करावे लागेल. जोवर पहिल्या बॉलपासून पीचचा आखाडा बनवलेला नाहिये (आठवा मुंबई २००४) तोवर काय हरकत आहे आपल्या strength प्रमाणे बनवून घ्यायला ? असेल दोन्ही टीममधे कुवत तर तिथेही चौथ्या पाचव्या दिवसांपर्यंत खेचतीलच सामना. शेवटी नं १ असलेल्या टीमला कुठेही खेळून जिंकता आले पाहिजे असे आपण म्हणतोच की.
भाऊ, ह्या स्वतःचा देशात हव्या
भाऊ, ह्या स्वतःचा देशात हव्या तशा विकेट बनवून एकतर्फी खेळ करणारी स्ट्रॅटेजी पाहिली की मला कोल्हा आणि करकोचा आणि खीर ची गोष्ट आठवते ! करकोच्याने सुरईत खीर भरून कोल्ह्याला खाऊ न देणे आणि कोल्ह्याने बदला म्हणून थाळीत खीर वाढून करकोच्यास खाऊ न देणे आणि स्वतः ओरपणे !!
या कसोटी मालिकेतही भारताचा खरपूस पराभव व्हावा अशी इच्छा आहे. अत्यंत अनस्पोर्टी मालिका चालली आहे . तरी ते तुमचे दात तुमच्याच घशांत घालताहेत....
डब्बल
डब्बल
हूडा, गल्ली चुकली रे तुझी.
हूडा, गल्ली चुकली रे तुझी. भाऊ, "पिचबद्दल कितीही त्रागा करते झाले तरी त्यासाठी भारत हरावा", अशी इच्छा कधीच व्यक्त करणार नाहित ह्याबद्दल खात्री आहे.
झाले धवन लवकर गेला, म्हणजे
झाले धवन लवकर गेला, म्हणजे आता काहीही कन्फ्युजन न ठेवता पुढच्यात बसवता येईल. >> अरे धवनबद्दल शास्त्री काय म्हणाला ते वाचले नाहिस का ? टेस्ट फॉर्म नि लिमिटेड ओव्ह्रसचा फॉर्म वेगळा धरायला हवा. वगैरे वगैरे. त्याच्याशी अंशतः सहमत असलो तरी, तो दोन्ही इनिंग्स्मधे ज्या तर्हेने बाद झाला आहे ते वगळता काही तरी हुकले आहे असे वाटते. IPL मधेही अशा पद्धतीने बाद होत होता. त्यामूळे दोन्ही फॉर्मॅट वेगळे धरण्यात अर्थ आहे का हा प्रश्नच आहे. राहुल ला आणतील कि पुजाराला वर ढकलत रोहितला हा प्रश्न.
अश्विनने अमला काल संध्याकाळी
अश्विनने अमला काल संध्याकाळी केलेली बॉलिंग अफलातून होती. डिप वर अमलासारख्या नजाकतदार नि फूटवर्क असलेल्या खेळाडूला झुलवणे काय जबरदस्त प्रकार होता. आजचे हायलाईट्स बघायला हवेत शोधून
वाकाच्या पीचवर उसळत्या
वाकाच्या पीचवर उसळत्या चेंडूचा सामना सगळ्यांनी करायचा, त्याला ऑसी चॅलेंज म्हणून कौतुक करायचे, तिथे खेळलात तर खरे टेस्ट प्लेअर वगैरे माज करायचा तर तोच नियम उपखंडातील पीचेसना का नाही? मुळात युनिफॉर्म कंडीशन्स नसणे हा क्रिकेट्चा स्थायिभाव आहे, ते मान्य करुनच टीम्स मैदानात उतरतात. नाहीतर उद्या जो मुद्दा पीचेसचा आहे तोच हवामानालाही लागू केला जाईल, 'चेन्नईला फार ह्युमिडीटी, आम्हाला सवय नाही, धिस इज नॉट क्रिकेट'
वाकाच्या पीचवर उसळत्या
वाकाच्या पीचवर उसळत्या चेंडूचा सामना सगळ्यांनी करायचा, त्याला ऑसी चॅलेंज म्हणून कौतुक करायचे, तिथे खेळलात तर खरे टेस्ट प्लेअर वगैरे माज करायचा तर तोच नियम उपखंडातील पीचेसना का नाही?
>> +१
आज बॉलिंग बघायला मजा आली.
अँडरसन सारख्या फास्ट बोलरला
अँडरसन सारख्या फास्ट बोलरला इंग्लिश पीचेसकडून मदत मिळते तर नक्की अश्विनसारख्या स्पिनर्सनी काय कुणाचं घोडं मारलंय? त्यांना मदत न मिळणे वुड बी अनस्पोर्टी. नॉट अदरवाईज.
तिथे खेळलात तर खरे टेस्ट
तिथे खेळलात तर खरे टेस्ट प्लेअर वगैरे माज करायचा तर तोच नियम उपखंडातील पीचेसना का नाही? >> +१
अत्यंत अनस्पोर्टी मालिका चालली आहे >> काहीही हं रॉहू
पहिल्या ईनिंग च्या तुलनेत
पहिल्या ईनिंग च्या तुलनेत दुसर्या ईनिंग मधे पुजारा आणी विजयचं स्पिनर्स विरुद्ध फूटवर्क जास्त चांगलं आणी decisive दिसलं ही उल्लेखनीय बाब होती.
होम अॅडव्हांटेज विषयी सहमत. मागे एकदा कुंबळे म्हणाला होता ते आठवलं, की स्पिन बॉलिंग हा पण क्रिकेटचाच एक भाग आहे. ती खेळता येणं हे पण स्किल आहे.
पहिल्या ईनिंग च्या तुलनेत
पहिल्या ईनिंग च्या तुलनेत दुसर्या ईनिंग मधे पुजारा आणी विजयचं स्पिनर्स विरुद्ध फूटवर्क जास्त चांगलं आणी decisive दिसलं ही उल्लेखनीय बाब होती. >>That's really good. कोहली पण तसाच खेळला तर मस्त लीड होउन मॅच ट्फ होईल.
माझा अंदाज असा आहे की २५० चं
माझा अंदाज असा आहे की २५० चं टारगेट चौथ्या ईनिंग ला चॅलेंजिंग ठरेल. पण आमला, फाफ आणी एबी असताना कुठलंही भविष्य वर्तवणं अवघड आहे.
टेस्ट फॉर्म नि लिमिटेड
टेस्ट फॉर्म नि लिमिटेड ओव्ह्रसचा फॉर्म वेगळा धरायला हवा. वगैरे वगैरे. त्याच्याशी अंशतः सहमत असलो तरी,
>>> असामी हे अंशता सहमत मी जरी असलो तरी मुळात धवन हा वनडे आणि टेस्टमध्ये वेगळा खेळाडू वाटतो का हे देखील बघायला हवे. तसेच तुमचे तंत्र सचिन-द्रविड सारखे भक्कम नसेल तर तुमचा बॅडपॅच मोठा असू शकतो हे ही लक्षात घ्यायला हवे.
पिच पाटा आहे म्ह्णुन दोष
पिच पाटा आहे म्ह्णुन दोष देताना आपले लोक का खेळले नाही असा साधा विचारही येऊन द्यायचा नाही का?
नुसता विचार आला तर हरकत नाही, पण मोठ्याने बोलायचे नाही.
मी पण हाच प्रश्न विचारला होता. पण रॉबिनहूडने मला बादशहा/बीरबल यांची पोपट मेला ही गोष्ट सांगून पटवून दिले.
हरलो, जिंकलो तरी पैसे मिळतात कारण चांगले खेळतो असे वाटते म्हणून ते टीममधे रहातात नि त्यांना पहायला लोक भरपूर पैसे देऊन येतात. चांगले खेळत नाहीत म्हणण्यापेक्षा, पीच पाटा होते, स्लेजिंग,अंपायरचे चूक निर्णय यांच्या बद्दल बोलावे, खरे असो की खोटे.
पण फलंदाजी, नि गोलंदाजी बद्दल चकार अक्षर नाही.
साऊथ अफ्रिकेसमोर मॅच
साऊथ अफ्रिकेसमोर मॅच जिंकण्यासाठी २१८ चे टारगेट आहे. पण आताच त्यांची हालत ५४/५ अशी आहे. सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले आहेत. मॅच बहुतेक आजच संपणार असे दिसते.
कसोटीकरतां खेळपट्ट्या कशा
कसोटीकरतां खेळपट्ट्या कशा असाव्या / असूं नयेत हा न संपणारा वाद आहे; माझं मत मीं मांडलंय व इतरांच्या मताचा आदर करूनही मला तें बदलावसं वाटत नाही.
.मला जाणवलेल्या इतर कांहीं बाबी-
१] पहिल्या डावात डिव्हिलीयर्सला तिसर्या पंचांच्या निर्णयानुसार परत बोलावण्यात आलं त्याचा उल्लेख समालोचक गोलंदाज जडेजाचं ' बॅड लक' असं करत होते; वास्तविक, फिरकीला सर्वस्वी अनुकूल खेळपट्टीवर [ जिथं प्रत्येक चेंडूवर बळी अपेक्षित होता], तिथं केवळ ५-६ पावलांचा 'रन-अप' असणार्या फिरकी गोलंदाजाने ' नो- बॉल' टाकावा हें अक्षम्य असल्याचा धेरा अपेक्षित होता !
२] बर्याच विकेटस न / कमी वळलेल्या चेंडूंवर गेल्याबद्द्ल समालोचक सतत आश्चर्य व्यक्त करत होते; पाटा विकेटवर अचानक चेंडू वळणे व चेंडू हातभर वळत असलेल्या विकेटवर एखादा चेंडू अनपेक्षितपणे न /कमी वळणे , ह्या दोन्ही गोष्टी फलंदाजासाठी तितक्याच फसव्या नाही का ? त्यांत अजबसं काय , तें कळलं नाही.
३] अश्विन हा चांगला गोलंदाज आहे, गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न करतो, हें कौतुकास्पद. पण प्रत्येक दौर्यादरम्यान तो भाष्यं व भाकितं करत असतो, हें मात्र खटकतं. [आजही मोहाली विकेटबाबतच्या टिकेवर त्याचं भाष्य आहेच !] मला वाटतं, गोलंदाजीवरच लक्ष केंद्रित करून त्याने लान्स गिब्स, प्रसन्ना, सकलेन इत्यादींची पातळी गांठण्याचा प्रयत्न करावा, जें त्याला प्रयत्नांतीं शक्य आहे ! .
असाम्या आपले बॉलर भंगार
असाम्या आपले बॉलर भंगार बॉलींग करतच होते त्यात वाद नाही.
असो. आश्विन नि जडेजाने जी काय गोलंदाजी, भंगार, फसवी, केली त्याने दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज चोक अप झाले ना! कदाचित भंगार गोलंदाजी हीहि फलंदाजांना फसवायला होती.
मिश्राने बहुतेक पहिल्या इनिंगपासूनच पेढ्याच्या पुड्या बांधायला घेतल्या होत्या, जिंकल्यावर वाटायला.
काही असो. भारतीय संघाचे अभिनंदन.
मला वाटते सामना संपेस्तवर पिचबद्दल कुणीच बोलू नये. मग जो हरेल त्याने सांगावे पिच कसे होते.
अचानक चेंडू वळणे व चेंडू हातभर वळत ................त्यांत अजबसं काय , तें कळलं नाही.
ते काय आहे, गवयाचे पोर सुरातच रडले पाहिजे, विनोदी नटाने सतत विनोदच करत राहिले पाहिजे अशी अपेक्षा असते. फिरकी गोलंदाजांनी नुसता चेंडू हातातून खाली टाकला तरी तो हातभर वळलाच पाहिजे, नि फास्ट बॉलरने नुसता चेंडू हातातून खाली टाकला तरी तो १६० कि.मि. ने जमिनीवर पडावा अशी अपेक्षा असते.
दक्षिण अफ्रिकन लोकांचे काय मत आहे, पिच, गोलंदाजीबद्दल? फिरकी टाकतो असे आम्हाला सांगितले पण चेंडू वळवलाच नाही, ही शुद्ध फसवणूक आहे असे कुणि म्हणाले का?
त्यांच्याकडेहि शात्री मांजरेकर सारखे तज्ञ लोक असतीलच ना!
आपल्याला फक्त खेळाडू, जे काही कामगिरी करतात तेच माहित असतात. पण तज्ञ फक्त थेअरी माहित असणारे असावे लागतात. ते आपण कधी खेळताना बघितलेले नसतात. तेंडूलकर, ब्रॅड्मन, इ. ना कोण विचारतो बॅटिंगबद्दल? त्यापेक्षा सचिन पगारेंना विचारा. पगारे, दिवा घ्या!
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार क्रिकेट स्पर्धा" स्टार स्पॉर्ट्स वर आहे.
इच्छु़कांनी लाभ घ्यावा
भाऊ, तिसर्या मुद्द्याबद्दल,
भाऊ, तिसर्या मुद्द्याबद्दल, आजच्या खेळाडूंना media exposure नि commitment आधीपेक्षा अधिक असते, तिथे काय नि कसे बोलावे ह्याबद्दल सगळ्यांनाच पोच असेल असे जरुरी नाही. (सिनियॉरिटीचा सूत्रबद्ध बोलण्याशी काडिचाही संबंध नसतो हे बेदी वगैरे बघितले हे उघड होते) मिडीयासमोर बोलण्यासाठी खास मिडिया मॅनेजर काही वर्षांपूर्वी असत. बहुधा ऑस्त्रेलिया नि आफिके वगैरेम्कडे अजून असतात. आपले काहि माहीत नाही. तरीही अश्विन चे भाष्य मला तरी नीट नि लॉजिकल वाटतात. त्याने DRS बद्दल सामन्याच्या आदल्या दिवशी केलेली टीप्पणी भारताकडून केलेली सर्वात अचू़क होती अगदी धोनी ने सांगितलेले त्याहिपेक्षा.
मला वाटतं, गोलंदाजीवरच लक्ष केंद्रित करून त्याने लान्स गिब्स, प्रसन्ना, सकलेन इत्यादींची पातळी गांठण्याचा प्रयत्न करावा, जें त्याला प्रयत्नांतीं शक्य आहे ! >> +१. तो त्यांच्या पातळीवर जात असेल तर तो बाकी काय बोलतो ह्याच्याशी मला तरी काहि देणे घेणे नाही. भाष्ञाला हरकत कधीच नसावी, फक्त भाकित जपून करावीत असे वाटते.
When Dean Elgar got four
When Dean Elgar got four wickets it wasn't a bad Cricketing wicket eh? If a person of ABD or Amla's caliber says that, I would be inclined to agree with them. But Amla explained today that it was their decision-making that cost them and that they could have scored more runs if they showed better skills.
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार क्रिकेट स्पर्धा" स्टार स्पॉर्ट्स वर आहे.
इच्छु़कांनी लाभ घ्यावा
>>>
घेणार व्हॉटस्प्पवर टाईमटेबल आणि टीम कॉम्बिनेशनचा मेसेज आलाय .. सारेच दिग्गज खेळाडू आहेत.. त्यामध्ये आपल्या अजित आगरकरचे नाव बघून आनंद झाला आहे
मिश्राने दोनदा एबीडी ला
मिश्राने दोनदा एबीडी ला घेतलाय.. याची हवा करून एबीडीला मिश्राचा गिर्हाईक घोषित करायला हवे.. आपोआप तो दबावाखाली येईल, आणि त्याला उर्वरीत मालिकेतही लवकर विकेट दिल्यास यासारखा मोठा अॅडवांटेज नसेल.
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार
आज रात्री ११ वाजता "ऑलस्टार क्रिकेट स्पर्धा" स्टार स्पॉर्ट्स वर आहे.
इच्छु़कांनी लाभ घ्यावा
धन्यवाद,
. सध्या लाभ घेत आहे. सचिन व सेहवाग यांची फलंदाजी बघितली नाही पण वार्ने नि वेट्टोरी ची फिरकी पाहिली.
तेंडुलकर २६, लक्ष्मण ८,
स्टेडियममधे बर्यापैकी गर्दी आहे. ३५०००! ३५० डॉ. तिकिट आहे.
१४० ला ऑल आउट - सचिनच्या टीमचा.
With all due respect, मला ती
With all due respect, मला ती ऑल स्टार मॅच बघताना अँब्रॉज, वॉल्श, डोनाल्ड वगैरे लोकांची बॉलिंग बघताना वाईट वाटत होतं. ज्यांच्या वेगाने आणी भेदकतेने भल्या भल्या बॅट्समेन ची भंबेरी उडवली होती, ते सावकाशपणे फक्त सरळ स्टंपात पडेल अशा बेताने बॉलिंग करत होते. मला नाही वाटत की असले प्रदर्शनीय सामने भरवून जगात क्रिकेटचा प्रचार आणी प्रसार होईल. तो एक खेळ आहे आणी तो चुरशीनं खेळला गेला तरच उत्कंठावर्धक वाटतो. ह्या माजी खेळाडूंनी स्वतःच्या आनंदासाठी तो जगाच्या पाठीवर कुठेही खेळावा, लोकांनी तिकीट काढून बघावा (मला शक्य झालं असतं, तर मी पण नक्कीच गेलो असतो). पण त्याला क्रिकेटच्या जागतिकीकरणाचा प्रयत्न म्हणून दिशाभूल करू नये. मी स्वतःला क्रिकेट चा कट्टर फॅन समजतो आणी सचिन ला देव मानणार्यांपैकी सुद्धा आहे. ते कधीच बदलणार नाही., आजही रात्री जागून टेस्ट मॅच बघतो, पण आधी क्रिकेट आहे आणी मग क्रिकेटचे देव आहेत.
मला ती ऑल स्टार मॅच बघताना
मला ती ऑल स्टार मॅच बघताना अँब्रॉज, वॉल्श, डोनाल्ड वगैरे लोकांची बॉलिंग बघताना वाईट वाटत होतं. ज्यांच्या वेगाने आणी भेदकतेने भल्या भल्या बॅट्समेन ची भंबेरी उडवली होती, ते सावकाशपणे फक्त सरळ स्टंपात पडेल अशा बेताने बॉलिंग करत होते. >> +१.. यातले बरेचसे प्लेयर्स खूप आधी निवृत्त झालेत आणि टचमधे नाहियेत खेळाच्या.. लक्ष्मणच्या फेसबूक पोस्टनुसार त्यानेही फक्त १ की २ आठवडे आधी परत नेट सेशन्स सुरू केले होते. त्याच्या पोटावरूनच कळून येत होतं की तो तेव्हढा फीटही नसावा..
पुण्यातल्या क्रिकेट
पुण्यातल्या क्रिकेट रसिकांसाठी चांगली बातमी.. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=BN2FQ
फे. फे. संपूर्ण पोस्ट्ला +१.
फे. फे. संपूर्ण पोस्ट्ला +१. सुरूवातीला चिकाटीने मॅच बघितली. सेहवाग सुटला होता तेंव्हा मजा येत होती पण नंतर अगदीच रया गेल्यासारखे वाटले.
T-20 चा World Cup असा बाहेर खेळवावा हवा असेल तर नवीन Champions Trophy सुरू करून.
Pages