Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त भाऊ !!!
मस्त भाऊ !!!
पण स्वतःच्या टीमसाठी अनुकूल
पण स्वतःच्या टीमसाठी अनुकूल पीच बनवण यात मला तरी काही गैर्/अखिलाडू वाटत नाही .
Actually it is one of the beautiful variations possible in this game .
आजच्या टाईम्स मध्ये एक पान
आजच्या टाईम्स मध्ये एक पान भारतीय बॉलिंग वर आहे. मला बरेच मुद्दे पटले.
<< पण स्वतःच्या टीमसाठी
<< पण स्वतःच्या टीमसाठी अनुकूल पीच बनवण यात मला तरी काही गैर्/अखिलाडू वाटत नाही .>> मान्य. पण तसं बनवणं जमलं नाहीं तर हरल्याबद्दल संबंधिताना शिवीगाळ करणं मात्र मला निश्चितच गैर व अखिलाडू वॄत्तीचं वाटतं !! आपल्या संघाला कमी न लेखतां, ह्या दौर्यावरच्या ८ मर्यादित षटकांच्या सामन्यांत द. आफ्रिका फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांत सरस ठरली आहे हें मान्य करावंच लागेल. मग केवळ फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी होती म्हणूनच आपण हरलो, असा आव आणणं व आगपाखड करण हें खिलाडूवॄत्तीचा अभावच नाही का ? शिवाय, फिरकी गोलंदाजीत आपलं पारडं थोडंसं जड असलं, तरीही फिरकी गोलंदाजी खेळण्यात आपण पूर्वीसारखे तरबेज राहिलो नाहीं, हें गेल्या कांहीं वर्षांत प्रकर्षानं जाणवतंय; फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपण हमखास जिंकलोच असतों असं म्हणणंही खूपच धाडसाचं होईल !!
दक्षिण आफ्रीकेला स्पिनर्सचा
दक्षिण आफ्रीकेला स्पिनर्सचा सामना करण्यात काही अडचण येईल असं निदान मला तरी वाटत नाही.
वनडेमध्ये अमला फॉर्ममध्ये नसला तरी टेस्ट क्रिकेट इज अ डिफरंट बीस्ट! स्पिनर्सना खेळण्यात अमला एक उत्कृष्ट बॅट्समन आहे. त्याच्या जोडीला डुप्लेसिस आणि डीव्हिलीअर्सही स्पिनर्सना खेळण्यात पटाईत आहेत. (तसा सध्या एबीडी कोणालाही बदडतोय तो भाग वेगळा). डुमिनीही स्पिनर्सना खेळू शकतो.
मान्य. पण तसं बनवणं जमलं
मान्य. पण तसं बनवणं जमलं नाहीं तर हरल्याबद्दल संबंधिताना शिवीगाळ करणं मात्र मला निश्चितच गैर व अखिलाडू वॄत्तीचं वाटतं !! >> भाऊ तुम्ही काय नि मी काय आपण तिथे नव्हतो. शास्त्रीने शिवीगाळ केल्याचे नाकारले आहे. कमीत कमी नक्की काय झाले हे कळेतो आपला निर्णय देणे धाडसाचे वाटत नाही ? शास्त्री धुतल्या तांदळासारखा नसला तरी MCA काही फारशी वेगळी नाहीये हे तर नाकारता येत नाही. इथे संबधितांचे दुखावलेले egos जास्ती involved आहेत असे एकूण वाटतेय. खालची लिंक पहा.
http://www.rediff.com/cricket/report/shastri-abused-me-wankhede-curator-...
The controversy started when South Africa posted a mammoth 438 for four in the series-decider and Shastri is said to have passed a sarcastic remark to Naik about the nature of the pitch. Naik alleged that the director also abused him, but Shastri has denied the claim.
According to Naik, the Indian team management had wanted a rank turner and wanted a specific part of the pitch to be watered. But the instructions were conveyed to the curators only a couple of days before the match.
"Whenever international match is there, we get a message from BCCI (Team Management) at least 10-12 days in advance about their requirements. This time we did not get any message. So we prepared a good batting track. Two days before the match, we got the message that they want a turning wicket.
"Wicket was already prepared hard with good binding. Whatever possible to do now was done, like no watering, cutting of grass at zero level and very little rolling," Naik was quoted as saying in the letter.
"Team management wanted us to water only good length area one day before the match. We as curators felt it is not advisable as two different shades will be seen. Also BCCI curator Mr. Dhiraj Parsana advised us not to put water."
मग केवळ फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी होती म्हणूनच आपण हरलो, असा आव आणणं व आगपाखड करण हें खिलाडूवॄत्तीचा अभावच नाही का ? शिवाय, फिरकी गोलंदाजीत आपलं पारडं थोडंसं जड असलं, तरीही फिरकी गोलंदाजी खेळण्यात आपण पूर्वीसारखे तरबेज राहिलो नाहीं, हें गेल्या कांहीं वर्षांत प्रकर्षानं जाणवतंय; फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपण हमखास जिंकलोच असतों असं म्हणणंही खूपच धाडसाचं होईल !! >> नाही धाडसाचेच होईल पण सामना जास्ती चुरशीचा होउ शकला असता असे हमखास म्हणता येईल ना ?
आणी बॅटींग खेळपट्टी होती तर
आणी बॅटींग खेळपट्टी होती तर आपले बॅटसमन होते ना? > >राजा समोर बॉलर्स कोण आहेत ह्यालाही तेव्हढेच महत्व असते ना ?
>>
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले स्थान क्लेम करणार्या व मिळवणार्या कोणत्याही बॅट्स मनने मी कोणत्याही संघाच्या कोणत्याही बोलरला खेळून शतक काढू शकतो किंवा चांगला स्कोअर करू शकतो अशी अलिखित गॅरंटी अथवा ग्वाही दिलेली नस्ते काय? आणि ते ते त्या त्या देशातले सर्वोत्कृष्ट पाच - सहा फलंदाज नसतात काय? मग पुढे कोणते बोलर आहेत ते पाहून मी माझा परफॉर्मन्स देईन असे कंडिशनल सिलेक्शन असते काय? सबळ - दुर्बळ संघ असे काही नसते.सिन्सिअर आणि नॉन सिन्सिअर संघ असेच क्लासिफिकेशन असते.वास्तविक पाटा ते आखाडा कोणत्याही खेळपट्टीवर कोणत्याही फलंदाजाला खेळता आलेच पाहिजे. अन्यथा त्याने होतकरू उदयोन्मुख खेळाडूला जागा खाली करून दिली पाहिजे . निवडसमितीने त्याला लाथा मारून बाहेर काढले पाहिजे.
रॉहू. नुसती मोजकी वाक्ये उचली
रॉहू. नुसती मोजकी वाक्ये उचली नका. त्याआधीचे माझे पोस्ट ज्याला KP चा रिप्लाय होता ते बघा नि त्या context मधे वाचा. फ्लॅट खेळपट्ट्यांवर extra झिन्ग असलेल्या वेगवान खेळाडूंसमोर खेळणे नि १३० च्या आसपास टाकणार्यांसमोर खेळणे ह्यात बराच फरक असतो.
आज झक्की नाही म्हणून इथे मोर्चा का ?
नाही माझे मत असेच आहे .
नाही माझे मत असेच आहे . बॅट्स्मनला सगळ्याच खेळपट्टीवर, सगळ्याच बोलिंग खेळता आल्या पाहिजेत. टेनिसमध्ये असे लाड चालतात काय? समोरून आलेल्या फटक्याला उत्तर देता आले नाही की मेलेच तुम्ही...
एव्हढे सगळे black and white
एव्हढे सगळे black and white असते का प्रत्यक्षात ?
खरे तर खेळपट्टी कशी होती, का,
खरे तर खेळपट्टी कशी होती, का, त्याबद्दल कोण काय बोलले यावर एव्हढी चर्चा कशाला?
सरळ सांगा ना, की या सामन्यात आमची बॅटिंग नेहेमी सारखी जमली नाही, आमचे बॉलर्सहि धावा रोकण्यात असफल ठरले.
होते असे कधी कधी. त्यात काय?
आम्ही त्यावर विचार करून, सुधारणा करू. असे म्हणावे.
उगाच खेळपट्टी, शास्त्री, कपिल यांच्याबद्दल बोलून मुख्य मुद्द्याला बगल का देता? जर खेळपट्टी बनवण्यात काही गडबड झाली असेल, तर पुढच्या सामन्या आधी तीहि धड करता येईल.
, पण मुळात बॅटिंग नि बॉलिंग मधे काय उणिवा आहेत त्या दूर करणे महत्वाचे नाही का? काय झाले? मानसिक, शारिरीक तक्रारी? त्या दूर करता येतील का?
या बाकीच्या बोलण्यात त्याचा विसर न व्हावा.
सरळ सांगा ना, की या सामन्यात
सरळ सांगा ना, की या सामन्यात आमची बॅटिंग नेहेमी सारखी जमली नाही, आमचे बॉलर्सहि धावा रोकण्यात असफल ठरले.
>>
जख्खी बोवाजी,
बिरबल आणि पोपट यांची गोष्ट तुम्हाळे माहीत आहे ना बाप्पा ? पोपट मेला आहे असे स्पष्ट सांगितले की कप्तानपदावरून व संघातून हकालपट्टी ठरलेलीच. मग केवळ ब्याट हलवीत विकेटपर्यन्त जाऊ विकेटला शिवून परत येण्याचे काही लाख कसे मिळणार? शिवाय जाहिरातींचा मलिदा अलग. आयपीएल्चे रवाळ तूप संघात नसल्यास कमीच मिळते. एवढे सगळे असताना खरे कशास बोलायचे? जिंदगी ख्वाब है....
आज पहिल्या कसोटीचा पहिला दिवस
आज पहिल्या कसोटीचा पहिला दिवस असूनही कुणी इथं फिरकलं नाहीं; माबोकराना कुठच्या खेळपट्टीवर खेळायला उतरायचं याचा अचूक अंदाज असावा !!
ये बहोत पुरानी कहानी है, भाऊ!
ये बहोत पुरानी कहानी है, भाऊ! :). वन डे वाढल्या तेव्हापासूनची. वन डे सिरीज झाल्यावर नंतर आलेल्या टेस्ट मधली पहिली इनिंग ५०-६० ओव्हर्स मधे आटपणे, ही नेहमीची रिच्युअल आहे
बॅटींग पिच असावे असा अंदाज
बॅटींग पिच असावे असा अंदाज खरच होता बहुतेक कारण त्याशिवाय ३ स्पिन बॉलर्स असतानाही २ फास्ट बॉलर्स घेतले (जेंव्हा एक अधिक बॅट्समन घेता आला असता). उद्याचा दिवस मजा येईल बघायला काय ते.
आजचा मामा "डुप्लेसी" बॉल
आजचा मामा "डुप्लेसी" बॉल बाहेर वळून निघून जाईल या अंदाजाने शेवटच्या क्षणी सोडून देणे महागात पडले. जाडेजाने पहिल्या ओवरमधला दुसराच बॉल अनपेक्षितपणे आर्मबॉल टाकला आणि अचूक टप्प्यावर पडून वेगात किंचितही न वळता सरळ डुप्लेसीच्या ऑफस्टंपला झटका दिला. जाडेजा आर्मबॉल ९०% मिडल स्टंपवर टाकतो जेणेकरून त्याला पायचित मिळावे. इथे नेमका ऑफस्टंपवर टाकून डुप्लेसीला चकमा दिला.
दोन्ही टीम्स नी अॅडव्हान्टेज
दोन्ही टीम्स नी अॅडव्हान्टेज घ्यायची संधी गमावली. पण फारएण्ड ने लिहील्याप्रमाणे हे फारसं अनपेक्षित नव्हतं. आमला किंवा एबी खेळले नाहीत तर ३ दिवसात ही मॅच संपू शकेल. ह्या विकेट वर ५ बॉलर्स ची गरज नव्हती असं वाटतं. धवन नीड्स अ ब्रेक. शास्त्रीने दलजित सिंग ची आरती केली असेल बहुदा (आणी त्याच्याबरोबर पीचवर ऊभं राहून एक सेल्फी काढून सुधीर नाईक ला पाठवला असेल
)
यल्गार हो!! ८ ओवर्स मधे चार
यल्गार हो!!
८ ओवर्स मधे चार विकेट्स!
कोहली म्हणाला होता, बॅटिंगला पिचगनुकूल आहे.
आता पिच अनुकूल असले तरी बॅटिंग नीट करायला पाहिजे हे विसरला.
होते असे कधी कधी.
आता ते पाच पाच बॉलर्स घेतले आहेत ते बघू काय करतात उद्या.
कदाचित आजच्या ऐवजी उद्या पिच बॅटिंगला चांगले होईल ( निदान असे कोहली म्हणेल)
काय आहे, आजकाल बॅटिंग बॉलिंगला महत्व नाही, पिच कुणि केले, कसे केले याला जास्त महत्व आहे. एकदा पिच भारत जिंकेल असे केले की झाले. मग कुणालाहि घ्या टीममधे.
ह्या विकेट वर ५ बॉलर्स ची गरज
ह्या विकेट वर ५ बॉलर्स ची गरज नव्हती असं वाटतं. >> +१. बंगर ने समजावले असे का केल ते. "स्लो नि लो पिच वर बॉल लवकर reverse swing होतो. तेंव्हा दोन फास्ट बॉलर्स जे reverse स्विन्ग करून शकतात ते घेतल्याने advantage मिळेल म्हणून दोन घेतले. ५ batsmen ने आपापली जबाबदारी उचलण्याची अपेक्षा होती. " आपले बॅट्स्मन स्पिन खेळताना क्रिजमधून का खेळत होते एव्हढे ? आफ्रिकेकडे कोण एव्हढा बॉल turn करणारा आहे कि टप्प्यावर पोहोचायला एव्हढा विचार केला जात होता देव जाणे.
पण Elgar चा spell खरच एकदम tight होता. जाडेजाने मॅच केला तर उद्या धमाल होऊन जाईल.
"आफ्रिकेकडे कोण एव्हढा बॉल
"आफ्रिकेकडे कोण एव्हढा बॉल turn करणारा आहे कि टप्प्यावर पोहोचायला एव्हढा विचार केला जात होता देव जाणे." - ईम्रान ताहीर. अफलातून लेग-स्पिनर आहे. उद्या मिश्रा ने तसं काही केलं तर मजा येईल. क्लासिक लेग स्पिन बघायला मजा येते. (अवांतरः मिश्राजी म्हटलं की मला नेहेमी तो पेढ्याचा पुडा बांधायला घेईल असं वाटतं).
अरे हो कि. तो एकटाच आहे ना पण
अरे हो कि. तो एकटाच आहे ना पण ? बाकीचे दोघे तर नव्हते ना ?
असामी, खरय. पण डोमेस्टिक
असामी, खरय. पण डोमेस्टिक क्रिकेट मधे क्वलिटी स्पिनर्स च्या कमतरतेमुळे आणी टी-२० प्रकारामुळे (जिथे धावा रोखुन धरणारी बॉलिंग महत्वाची) चांगली स्पिन बॉलिंग खेळायची सवय आपल्या बॅट्समेन ला सुद्धा नाहीये. जडेजा हा डोमेस्टिक क्रिकेट मधला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे ह्यातच सगळं आलं (हे जडेजा चं क्रिटिसीझम नसून चांगल्या स्पिनर्स च्या कमतरतेवरचं भाष्य आहे).
चांगली स्पिन बॉलिंग खेळायची
चांगली स्पिन बॉलिंग खेळायची सवय आपल्या बॅट्समेन ला सुद्धा नाहीये >> हो स्वीपचा वापर केव्हढा वाढलाय. पुजारा नि राहाणे कडून अपेक्षा होत्या अधिक चांगल्या तर्हेने स्पिन खेळण्याच्या.
दोन निर्णय आपल्या विरुद्ध !
दोन निर्णय आपल्या विरुद्ध ! त्यातील एक एबीचा.
साऊथ आफ्रिका १८४ ऑलआऊट. सर्व
साऊथ आफ्रिका १८४ ऑलआऊट.:) सर्व दहा विकेट स्पिनर्सना पिच एकदम फिरकीला अनुकुल बनवलेला आहे.
सेकंड इनिंग मध्ये जबाबदारीने फलंदाजी करून जर ३००+ टारगेट दिले गेले तर मॅच जिंकण्याचे चान्सेस आहेत.
धवनला सिद्ध करावे लागणार की
धवनला सिद्ध करावे लागणार की रोहित शर्मा वा राहुलला बसवून त्याला खेळवण्याचा निर्णय सही होता.
कोहली मात्र आपले १०१ % देणार या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बाद झालेला तेव्हा वर्लडकप हरल्यासारखे एक्स्प्रेशन होते त्याचे
गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर
गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर पुजारा!
धवनला चष्मा मिळाला. पुढील
धवनला चष्मा मिळाला. पुढील मॅचमध्ये खेळवतील का आता त्याला?
बरं झाले धवन लवकर गेला,
बरं झाले धवन लवकर गेला, म्हणजे आता काहीही कन्फ्युजन न ठेवता पुढच्यात बसवता येईल.
बाकी हा सामना मुरली विजय काढून देईन .. नव्हे तो खेळायलाच हवा
Pages