पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : इको-फ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटर-पार्क - chiuu

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 12:05

प्रवेशिका क्र. ४

शीर्षक : इको-फ्रेंडली फोटो अल्बम.
हा मला भेटीदाखल मिळालेला,घरीच बनवलेला, इको-फ्रेंडली फोटो अल्बम आहे. हा अल्बम रिसायकल केलेल्या कागदापासून बनवण्यात आला आहे. कागद वाया जाण्याचा प्रश्नही कागदाचा पुनर्वापर केल्याने, थोड्याफार प्रमाणात सुटू शकतो. हा कागद बनवण्याचा खर्चही कमी येतो. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीप्रमाणे १ टन रिसायकल केलेल्या कागदाच्या वापराने ३०,००० लिटर पाण्याची बचत, तसेच ३०००-४००० कि.वॉट वीजेची बचत होते. ह्याशिवाय ९५% हवा प्रदूषण कमी होते. खरंतर ही खूप छोटी गोष्ट आहे, पण अश्या छोट्या गोष्टीने सुरवात करुन, पर्यावरणाची काळजी घेण्यात आपण नक्कीच हातभार लावू शकू. चला, मग आजपासून रिसायकल्ड कागदाचा वापर करायचा नं आपण?

paryaa4-1_eco_friendly_photoalbum.JPG

शीर्षक : वॉटर-पार्क
हे छायाचित्र वॉटर-पार्कचे आहे, जिथे हजारो लिटर पाणी फक्त जलक्रीडेच्या आनंदासाठी वापरले जात आहे! ह्याशिवाय, वीजेचाही दुरुपयोग होत आहे, जो पर्यावरणाचा नाश करण्याला कारणीभूत ठरत आहे!

paryaa4-2_water.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users